तूच माझी राधा
भाग ४१
नंदन राधाचा विचार करत खिडकीपाशी उभा असताना प्रिया त्याच्याजवळ येऊन उभी राहते . दोघंही गप्पा मारत असतात . दोंघांच्याही मनात काय चाललंय हे दोघांनाही कळू द्यायचे नव्हते पण एकमेकांकडून काढायचा प्रयत्न चालू होता . गप्पांमध्ये नंदन प्रियाला हाकलून देत असतो पण प्रिया काय त्याचा पिच्छा सोडत नसते . म्हणून प्रिया परत त्याला बोलण्यात गुंतवत असते .
" काय रे तू उद्या कुठे चाललंयस ?"
" कुठेच नाही . "
" आता तर आईला म्हणालाच ना मी दोन दिवस नाहीये . मी अमोद ला पण विचारलं तुमची कोणतीही मिटिंग नाहीय मग .... "
" अग माझे काम आहे ऑफिस नाही . "
" मग तेच विचारतीय कुठे ?"
आता हि ऐकणार नाही असं वाटून त्याने प्रियाला सांगायचे ठरवले , " प्रिया , मी दोन दिवस राधाच्या गावाला चाललोय . "
" तिच्या गावाला ?, ती तर इथे आहे . "
" हो पण ... "
" पण काय ? मला एकदा त्यांच्याशी परत बोलायलाचे आहे . "
" मी तुला काही मदत करू का ?"
" तू काय मदत करणार ?"
" पहिली गोष्ट तिचे लग्न झालेले नाही . "
" काय ????? तुला कसं माहिती ?"
" हे बघ . तू उद्या कुठेही जाऊ नको . " यावर नंदन डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागला . त्याचा हा अवतार पाहून प्रिया म्हणाली , " आधी माझं ऐक पूर्ण मग ठरव . "
त्याने मानेनेच होकार कळवला . तो शांत बसलेला पाहून प्रिया पुढे म्हणाली , " उद्या मी आणि आमोद ने रोहन ला इकडे बोलावले आहे . आम्ही दोघे त्याच्याशी बोलणार आहे . तो पण आपल्याला मदत करायला तयार आहे . तर तेंव्हा तू पण आमच्या बरोबर चल . "
" अगं राधा तिथे असेल तर .... "
" नाही येणार . तू जास्त विचार करू नको . आता आम्ही सांगतो तसं कर . आधी आम्ही तिघे बोलतो मग तू आम्हाला जॉईन हो . नाहीतर रोहन मोकळा बोलू शकणार नाही . "
" चालेल . मी नाही जात उद्या बाहेर . उद्या शांतपणे आईशी बोलतो नाहीतर ती उगाच काळजी करत बसेल . मग आपण भेटू . "
" आता कसे हुशार बाळासारखं बोललास . झोप आता . फार विचार नको करू . उद्या नवीन पहाट होणार त्याचे आनंदाने स्वागत करायचे आहे . "
हे ऐकून नंदन तिच्याकडे बघायला लागलाच . बघता बघता डोळ्यातून अश्रू कधी आले काळच नाही . त्याने मायाने तिच्या डोक्यावर हात ठेवून एक मिठी मारली .
या मिठीत काय नव्हतं . भावाबहिणीचे असणार घट्ट नातं , एकमेकांविषयी असणारी काळजी , भरपूर प्रेम . आणि कायम साथ राहणार याचे अश्वासन . "
खरोखरचं ज्यावेळी आधाराची गरज असते ना त्यावेळी आपल्याच जवळचा माणसाने आधार दिला ना तर येणाऱ्या अडचणी पण सोप्या वाटायला लागतात . त्यासाठी कायम आयुष्यात एक भाऊ किंवा एखादी बहीण तरी नक्की असावी .
इकडे राधा आपल्याच विचारात बसली होती. तिच्याही मनाची घालमेल चालू होती. उद्या रोहन आल्यावर आपण खरं काय ते सांगू शकू का ? तो काय म्हणेल हे चार वर्ष आधीच का नाही सांगितले ? नंदन ला कळलं तर
देवा कोणत्या संकटात टाकलय. आज इतक्या दिवसात सगळं बदललं असेल असं वाटलं होतं पण नंदनच्या डोळ्यात तेच दिसत होतं . मला पटकन काय करावं ते सूचल नाही म्हणून मी अनोळखी नजर दाखवली. पण त्यामुळे त्याला किती वाईट वाटतं होतं .
खरचं असं असेल का ???? तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
सगळा गोंधळ उडालाय. देवा काय आहे कळतचं नाहीये. बरं होत मी या सगळ्यापासून लांब होते ते.
जाऊ दे झोपूया . उद्या बघू काय होतय ते . प्रश्न वाढतील का सुटतील ???
तेव्हढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. ते ऐकूनच चिडून आता कोणाचा फोन आहे म्हणून ती दुर्लक्ष करत होती पण तो सारखा वाजत होता म्हणून तिने उचलला.
" बोल ग आई "
" बाळा , कामात होतीस का ?"
" नाही . बोललं ना . "
" बरं . उद्या रोहन येतोय तर त्याच्याबरोबर खायला पाठवलंय तर बाळा खा . काळजी घे . नाहीतर तू उद्या रोहन बरोबर काही दिवस येते ग राहिला . बाळा , तुझी आठवण येते ग . "
" आई रडू नकोस ना . मी लवकरचं येईन तुला भेटायला . बाबा बरे आहेत ना ?"
" हो आम्ही बरे आहोत . तू ये ग फक्त भेटायला ."
" हो येते . ठेऊ . रोहन येईपर्यंत ऑफिस मला लवकर ऑफिस ला जाऊ न येते . त्यामुळे लवकर झोपायचं आहे तर ठेऊ का फोन . "
" हो ठेव बाळा . काळजी घे . "
" काय हो बरी आहे ना ती . काही बोलली का ? " बाबा आईने ठेवलेला फोन बघून म्हणाले
" नाही हो . पण ती काही त्रासत वाटत होती . रडल्या सारखा आवाज येत होतो हो . ठीक असेल ना ."
" हो असेल . बघू उद्या रोहन गेल्यावर काय होतोय ते ."
" हो . रोहन ला सांगाल का तिला समजून थोडे दिवस इथे आण म्हणावं . "
" हो सांगतो . चल तिला काय द्यायचे ते भरुया . "
आजची रात्र प्रत्येकाची आपल्या आपल्या परीने विचार करण्यात चालू होती . झोप तर कोणालाच लागत नव्हती . उद्या काय होईल याचीच चिंता प्रत्येकाला होती . सगळयांना विचारात उशीरा झोप लागली .
तुम्हाला काय वाटतंय उद्या काय घडेल ?
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा