तूच माझी राधा
भाग ४२
" नंदन , ऐ नंदन , प्रिया , प्रिया "
" अगं उठा आता , आठ वाजले उठा ."
" आलो आई . "
" काय ग आई , काय झालं ?"
" अरे बाळा , तुला जायचं होतं म्हणून लवकर नाष्ट्यासाठी बोलावत होत . बरं मला सांग तू कुठे चालला आहेस ?"
" आई मला माफ कर मी तुला नीट नाही सांगितले . पण माझं काम होणार आहे फोनवर तेर मी नाही जात आहे . आणि आज मी जरा उशिरा ऑफिस ला जाणार आहे . आपण दोघे निवांत बसून गप्पा मारत नाश्ता करूयात . "
" बरं . मी घेयून येते तोपर्यंत तू प्रियाला उठव . "
" बर . मी बघून येतो तिला . " असं म्हणून तो तिच्या खोलीकडे चालला होताच कि प्रिया बाहेर आली .
" ए आई , आली ग प्रिया , आतातरी आण खायला . "
" आणते रे . थांब जरा "
" काय दादाश्री , आज एवढे काय खुश ."
" खुश नाही आपलं आईला मस्का मारणं चालू आहे . "
" पण मी म्हणते असे करूच नाही ना म्हणजे हि वेळ येत नाही . "
" असू दे . काय ना मला काय सवय ना रागवाल्याला कसं मनवायचे . ते तुम्हाला चांगलं जमत . "
" हो , बरोबर आहे नंदन , प्रिया काय म्हणते तुम्ही आता लग्नाचा विचार करत नाही . झाले कि ४ वर्ष . "
या चारवर्षात प्रिया आणि अमोद ने एकमेकांवरील प्रेम सगळ्यांसमोर काबुल केलं होतं . तेंव्हापासून आई त्यांच्यामागे लागली होती तू तरी लग्न कर पण ती दादा चे लग्न झाल्याशिवाय करणार नाही . असं त्या दोघांचे मत होते .
अमोद आणि नंदन ने आपल्या कंपनीत चांगली प्रगती केली होती . नंदन ने अमोद ला नवीन फर्म चालू कर सांगितलं होत पण त्याने मी तुझ्याबरोबर च काम करणार असं सांगितल्यामुळे दोघेही अजून एकत्रच काम करत होते .
राधा पण या ४ वर्षांमध्ये वकिलीची परीक्षा देऊन एक वकिल झाली होती. एवढ्या वर्ष्यात लग्न झालं नाही म्हणून गावाची लोक सारखे टोमणे मारत होती म्हणून ती गावाला च जात नव्हती . जी मुलगी कायम घोळक्यात राहणारी ती त्या दिवसापासून एकटीच राहिला लागली होती . तिने बोलणे पण फार कमी केली होती . तिची हि अवस्था रोहन ला बघवत नव्हती .
त्याने खूपदा विचारलं होत बाळा काय झालं पण तिने प्रत्येक वेळेला अभ्यास चे कारण देऊन विषय बंद केला होता . पण आज तिने स्वतःहून बोलवले होते त्यामुळे रोहनला पण काळजी वाटतं होती . या काळजीपायी तो घरातून लवकरच निघाला होता . बाबांना पण आता काळजी वाटायला लागली होती नक्की काहीतरी घडणार असं सारखं वाटतं होत . घरात च बसून होते . कोणाचं कामातच लक्ष लागत नव्हतं .
रोहन साधारण १२ वाजता राधाच्या घराजवळ आला . त्याने आल्या आल्या पहिला अमोद ला फोन केला आणि आज ४ वाजता भेटायचे ठरवले . नंतर त्याने राधा ला फोन केला .
" हॅलो , राधा . "
" हॅलो , बोल दादा . आलास का ?"
" हो मी आलोय . तू कुठे आहे ?"
" मी ऑफिस मध्ये आहे . शेजारच्या काकूंकडे किल्ली ठेवली आहे . तू आवरून घे . मी येते अर्ध्या तासात . "
इकडे नंदन ला पण चैन पडत नव्हत . तिला एकदाच फक्त बघावं असं सारखं वाटतं होत . म्हणून तो राधाच्या ऑफिस जवळ थांबला होता . खूप वेळ थांबला होता . घरातून एका ऑफिसच्या कामाला जातोय सांगून आला होता त्यामुळे आई काही म्हणाली नाही . आणि प्रिया ला तो इकडे आलाय तेच माहिती नव्हतं . त्यामुळे तो कितीवेळ थांबला तरी आज त्याला कोणीच विचार नव्हतं .
समोरून राधा त्याला येताना दिसत होती . आपण तिच्याशी बोलावं म्हणून तो हळूच तिच्या जवळ चालायला लागला . काही पावलं चालल्यावर तो हळूच म्हणाला , " हाय राधा ."
एकदम आवाज ऐकून ती दचकून बाजूला बघायला लागली तर शेजारी नंदन हसत तिच्याकडे बघत होता . " तुम्ही ??"
" हो . इथून चाललो होतो तर तुझ्याशी बोलावं म्हणून आलो ."
" हो का ? "
" हो . का आपण बोलू शकत नाही एकमेकांशी ?"
" मी असं कुठे म्हणाली . "
" मग तू त्यादिवशी अनोळखी असल्यासारखी का बघत होती . "
" तसं काही नाही . "
" मग कसं "
" काही नाही . मी जाऊ का माझी रोहन वाट बघत असेल . "
" हो जा . म्हणजे मी तुला सोडतो . "
" नको मी जाईन . "
" नाही. मी सोडतोय . " असं म्हणून त्याने तिचा हात हातात घेउन तो गाडीपाशी घेऊन जाऊ लागला .
ती एकदा त्याच्या हाताकडे आणि एकदा त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली .
" माझ्याकडे नको बघू. पुढे बघून चाल. उगाच पडशील . नाही म्हणजे मी आहे सांभाळायला पण सध्या तुझी तयारी नाही ना .... "
ती मनातच विचार करू लागला . आज हा असा का बोलतोय . आणि ह्याने माझा हात कसाकाय धरलाय . पण किती छान वाटतय ना .... नाही नाही हे माझे नाहीयेत . त्या सटवीची आहेत मग हे माझ्याकडे कसे काय ??? देवा ............
या विचारांमध्ये ती गाडीत जाऊन बसलेली कळलंच नाही . आणि शांततेत दोघांचा प्रवास सुरु झाला .
नंदन ने तर ठरवल्या प्रमाणे एक पाऊल टाकलंय . आता बघूया पुढे काय होतंय ते ???
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा