Login

तूच माझी राधा भाग ४५

प्रेमाची परीक्षा
तूच माझी राधा

भाग ४५

प्रिया अमोद आणि रोहन एका उपहारगृहात भेटले . पहिल्यांदी सगळयांनी खायला सांगितले मग गप्पा मारू लागले . सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते . विषय कसा काढायचा हेच सुचत नव्हते . त्यामुळे  रोहन ने शांतच बसून घेतले .

शेवटीच अमोद ने विचारले , " रोहन काय झालं ? काय म्हणाली राधा ?"

" तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये श्रावणी नावाची कोणी मैत्रीण आहे का ?"

" हो आहे . तिचं काय ?"

" तिचा स्वभाव कसा आहे ?"

मध्येच प्रिया म्हणाली , " आता तीच काय ? ती तर मला ती अजिबात आवडत नाही . "

" आधी मला तिचा स्वभाव कसा आहे ते तर सांग ?"

या तिघांची चर्चा चालू होती पण नंदनला ऑफिस मध्ये करमत नव्हतं म्हणून तो कधीचा त्यांच्या मागे येऊन बसला होता पण त्यांचे कोणाचेच आजूबाजूला लक्ष नव्हते त्यामुळे त्यांना काही कळलेच नाही .

अमोद म्हणाला , " ती ना खूप हट्टी आहे . घरी एकुलती एक असल्यामुळे लाडात वाढलेली आहे . त्यामुळे तिला जे पाहिजे ती ते मिळवतेच .  आता सांगशील नीट काय झालंय ते ? "

रोहन ने राधा काय काय म्हणाली ते सगळं सांगितले. ते ऐकून नंदन ला तर श्रावणीचा खूप राग आला . ती माझ्या आयुष्याशी का खेळली ? हा प्रश्नच त्याच्या मनात येत होता . तो त्याच्या विचारातच असताना नेमकी श्रावणी पण तिथेच आली . आणि तिने नंदनला पाहून आवाज दिला . तो आवाज ऐकून रोहन , प्रिया आणि अमोद पण आजूबाजूला बघायला लागले तर त्यांना नंदन आणि श्रावणी बोलताना दिसले . त्यांचे डोळेच मोठे झाले . तिघांच्याही मनात हाच प्रश्न होता , " हे दोघे इथे काय करतायत ?"

नंदनचे  पण लक्ष या तिघांकडे गेले . त्यांचे डोळे मोठे बघून तर हा घाबरूनच गेला . मनातच म्हणाला , " आता माझं काही खरं नाही . देवा आता मी काय अमोद आणि प्रिया पासून वाचू शकत नाही . माझं आता स्वप्न पण पूर्ण नाही होणार राधा बरोबर लग्न करायचं . तू असा कसा वागू शकतोस माझ्याबरोबर ?"
त्याच्या या वाक्यावर त्याला स्वतः लाच हसू आलं म्हणून तो हसू लागला .

तर श्रावणीने त्याला विचारले , "  नंदन तू का हसतोयस ? "

तिच्या या वाक्यावर तर प्रियाला इतका राग आला तर ती नाक मुरडत निघून गेली . तिच्या मागे रोहन आणि अमोद त्या दोघांवर तीक्ष्ण नजर टाकून निघून गेले .

नंदन ला अंगाला घाम सुटला होता त्यांची नजर बघून म्हणून  " तो श्रावणीला मी जातो . मला काम आहे आपण नंतर भेटू . " असं   सांगून निघून यांच्या मागे मागे जाऊ लागला .

बाहेर येऊन तो प्रिया ला आवाज देत होता , " प्रिया ,थांब एकदा ऐकून घे . "

ते काही थांबेना बघून शांतपणे घरी निघून आला . उगाच रस्त्यावर तमाशा नको . म्हणून....

तो गेलेला बघून तिघेही एका झाडाखाली बसले . प्रत्येकजण आपल्या परीने विचार करू लागले .  पुढे काय होईल ?????

घरी नंदनला लवकर आलेले पाहून आईने विचारले , " काय रे आज लवकर . बर नाहीय का  ?"

" नाही . अगं . माझं आज काम लवकर पूर्ण झालं म्हणून आलो . "

" अच्छा . मग तुझा चेहरा असा का उतरलाय ? "

" काही नाही . मी आहे खोलीत . मला कॉफी देशील का ?"

" हो देते . तू तुझं आवर तो पर्यंत आणते . "

" धन्यवाद मातोश्री " असं हसत म्हणताच आत गेला .


तो खोलीत आला आणि डोक्याला हात लावूं बसला होता . मनातच म्हणाला , " एकदा राधा माझ्याशी या गोष्टीवर बोलली असतीस तर मी तुझ्या आई बाबांना काही होऊ  न देता आता मी तुझ्या बरोबर असतो .  असो . पण अजून वेळ गेलेली नाही . मीच आता हे सगळं सोडवणार . असं म्हणून तो डोळे मिटून शांत बसून होता .

तेवढ्यात आई कॉफी घेऊन आली , " काय रे डोकं दुखतंय का ?"

" नाही . आई इथे बस माझ्या शेजारी . " असं म्हणत आईला शेआजारी बसून घेतली आणि कॉफी चा कप त्याने शेजारच्या टेबलावर ठेवला . आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला .

आई त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली , " बाळा , काय झालाय रे ? मी तुला काही मदत करू शकेल का ?"

नंदन थोडं  थांबून त्याने आता पर्यन्त घडलेले सगळं सांगितले . आई जसं जसं ऐकत होती तसं तसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटत होतं . तिने शांत पाने ऐकून म्हणाली , " तू आता काय करायचे ते ठरव मला राधा या घरात हवीच आहे . नाहीतर मी  बोलणार नाही . आता कॉफी घे आणि कामाला लाग . "

नंदन ने स्वतःचे आवरून आला आणि कॉफी घेतली. थोडावेळ विचार करत होता.

बघूया पुढच्या भागात काय होतय ते