तुच माझी राधा
भाग ४
मागील भागात आपण पाहिले, राधा च्या घरी तिच्या लग्नाविषयी चर्चा चालू होती.
आता पुढे
" बोल राधा , तूझं मत काय आहे यावर "
" अहो बाबा, माझं एवढचं म्हणणं आहे की , हे शेवटचे वर्ष पूर्ण होऊ दे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभ राहायला मी प्रयत्न चालू करते. मग विचार करू. "
" अहो बाबा, माझं एवढचं म्हणणं आहे की , हे शेवटचे वर्ष पूर्ण होऊ दे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभ राहायला मी प्रयत्न चालू करते. मग विचार करू. "
" अगं बाळा तू स्वतःच्या पायावर उभी राहाच पण स्थळ तर बघूया. योगाचा खेळ आहे हा सारा. योग जुळले तर जमणार सगळं. बाकिच्या गोष्टी असतात ना बाळा. तूला जोपर्यंत योग्य वाटत नाही व्यक्ती तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. "
बाबा काही ऐकणार नाही. या विचाराने तीने होकार दर्शविला. चला आता जेऊया. बघुया पुढच्या पुढे. सगळे जेवण करत होते तेवढ्यात रोहनचा फोन वाजला ,
" हँलो, मी नंदन बोलतोय. "
" हँलो, मी नंदन बोलतोय. "
" नमस्कार, बोला ना. परवा नक्की येताय ना ?
" हो येतोय. त्याचसाठी फोन केला होता. आम्ही सहा जण आहोत. "
" ठिक आहे . आल्या आल्या जेवण देईन. तर तुम्हाला काय पाहिजे जेवणात ?"
" तुम्ही द्याल ते चालेल. दुसऱ्या दिवशी उकडीचे मोदक द्याल का ?"
" हो नक्की देऊ. " थोड्यावेळ बोलून दोघांनी फोन ठेवला. जेवण करून सगळे झोपायला गेले.
प्रिया आल्यावर सगळ्यांनी एकत्र चहा घेतला. नंदन प्रियाला काँलेजबद्दल विचारात बसला आणि आई स्वयंपाक करायला गेली.
तो तिला तुझा कोणी मित्र आहे का हे विचारायला आणि आई ने हाक मारायला एकच वेळ झाली त्यामुळे प्रियाने सुटकेचा श्वास सोडला अन् लगेच घरात गेली.
नंदने तिचे हावभाव बघितले होते. त्याला थोडी थोडी कुणकुण लागली पण ती काही बोलत नाही तोपर्यंत आपण काही बोलायचे नाही असा विचार करून तो शांत बसला.
जेवताना आई म्हणाली, " नंदन, काय रे अमोद येणारे का ?"
" हो येणारे. मी त्याचं खोट पकडले. त्यामुळे त्याला यायलाच लागलं. " या वाक्यावर प्रिया चा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हे नंदनच्या नजरेतून सुटला नाही.
" हो येणारे. मी त्याचं खोट पकडले. त्यामुळे त्याला यायलाच लागलं. " या वाक्यावर प्रिया चा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हे नंदनच्या नजरेतून सुटला नाही.
" बरं झालं. बिचारा एकटाच राहिला असता. घरीपण जबाबदारी असल्याने त्याला कुठे जायला जमतच नाही. . तुम्ही गेले की मी पण त्याच्या आईला भेटून येते. " आई म्हणाली.
" बरं जा जाऊन ये. असं ही मी आँफिसला सुट्टी दिलीय चार दिवस. त्यामुळे तुला आँफिसला जावे नाही लागणार. "
" अरे व्वा. माझं गुणी बाळ. आता मी तुला आनंदाची बातमी देणार. "
प्रिया आणि नंदन तिच्या चेहऱ्याकडे बघतचं राहिले. प्रिया म्हणाली, " काय आहे आनंदाची बातमी? माझ्या साठी पण आहे का ?"
"तुझ्या साठी नाही फक्त नंदन साठी. "
" त्याच्यासाठी? त्याचं लग्न ठरवतीस की काय ?"
" हुशार माझं पिल्लू. अगदी बरोबर. अरे आज जोशी गुरूजी आले होते. तर मी त्यांना तुझी पत्रिका दिलीय . मुलगी बघायला सांगितले आहे. पण तुला कशी मुलगी हवीय ती सांग म्हणजे तसे शोधतील ते ?"
" अगं आई पण आता कुठे? अजून प्रियाचं शिक्षण व्हायचय? "
" तुझ्या लग्नाचा आणि तीच्या शिक्षणाचा काय संबंध ? काय ग प्रिया तुला काही त्रास आहे का याचं लग्न झालं तर ?"
" आई, मला काय त्रास? उलट किती छान मी आणि वहिनी एकत्र आनंदाने राहू की ?"
" बघं आता तिच काही म्हणणं नाही . आता बोलं.... "
" आई, अगं पण मी त्यादृष्टीनेविचार नाही केला. तरी तूला जे योग्य वाटते तशी बघं. फक्त तीने माझ्याबरोबर तुमचाही विचार करावा . एवढीचं अपेक्षा. "
" बरं जोशी गुरूजींना सांगते. बघू त्यांचे कडे कोणती स्थळं आहेत ती. "
नंदन ने मान हालवली अन् जेवणाकडे लक्ष द्यायला लागला.
नंदन ने मान हालवली अन् जेवणाकडे लक्ष द्यायला लागला.
दुसऱ्या दिवशी नंदने आणि अमोद ने संध्याकाळ पर्यंत सगळी कामे उरकली. संध्याकाळी चार दिवसाची सुट्टी म्हणून आँफिस व्यवस्थित बंद करून घरी निघाले.
नंदन म्हणाला, " अमोद, उद्या सात वाजता? तेवढ्यात नंदनच्या फोनची रिंग वाजते. " हा बघ, श्रीकांतचा फोन आला "
" हँलो, बोलं श्रीकांत"
"अरे उद्याच नक्की आहे ना ? "
" हो आहे ना. तुम्ही सगळे तयार रहा मी येतो सात वाजता न्यायला. "
" हो चालेल. मी बाकिच्यांना पण सांगतो. चलं बाय . भेटू उद्या. "
" हो बाय. " फोन ठेवल्यावर अमोद कडे बघून ," तूही ये आवरून माझ्याकडे . थोडसं खाऊन जाऊ नाहीतर आई सोडणार नाही. "
" हो येतो ना. चलं आता निघतो. उद्याची तयारी करायची आहे"
नंदन आँफिस बंद करून घरी निघाला.
" राधा येऊ का ग ?" आवाज ऐकून राधा बाहेर आली." या ना काका ?"
" पोरी , बाप आहे का ग तुझ्या घरात?"
" हो आहेत ना. या बसा. मी बोलवते. " राधा बाबांना आवाज देत गुरूजींना पाणी आणायला गेली.
" अरे, जोशी गुरूजी. या बसा ना . " दोघही बसून घेतात तोपर्यंत राधाने पाणी आणलं होतं राधाबरोबर आईपण बाहेर आली होती.
" बोला काय काम काढलं ? "
" अरे राजेंद्र , मी उद्या मुंबईला जाणार आहे. तर म्हटलं राधाचा फोटो आणि पत्रिका मिळली असती तर.... "
" देतो पण मुलीच्या मर्जीशिवाय काही होणार नाहीये . मुंबईत कोणतं स्थळ आहे ?"
" स्थळ असं नाही पण ऐकांनी बोलवलय तर असावी बरोबर म्हणून मागितली. "
" बरं देतो." रमा कडे बघून म्हणाले "अहो आणता का ? अन् राधाला म्हणाले, " राधा ,जरा गुरूजींच्या चहा पाण्याचं बघं. " ती मानेने होकार देऊन घरात निघून गेली.
बाबा म्हणाले, " फक्तं तिचं एवढं शेवटचं वर्ष पूर्ण झालं की आपण जोमाने सुरूवात करू. जे स्थळ आणाल त्यांना पहिलेच सांगा की , मुलीला पुढे शिकून स्वतःच्या पायावरं उभं राहायची परवानगी असावी. "
राधा आतून हे ऐकत होती. बाबा आपला विचार करतायत हे बघून भरून आलं अन् समाधान पण वाटलं. आता आपण पण त्यांच्या शब्दाबाहेर न जाता ते म्हणतील त्याचप्रमाणे करायचे. हे मनोमन ठरवून ती चहा नाष्टा घेऊन बाहेर आली.
बघूया पुढच्या भागात गुरूजी कोणतं स्थळ आणताय ते?
टिप : दिवाळीची तयारी असल्याकारणाने पुढील भाग दर दोन दिवसांनी टाकण्यात येतील. तसदी बद्दल क्षमस्व.
क्रमशः
©®सौ. चित्रा अ. महाराव
©®सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा