तूच माझी राधा
भाग ६
मागील भागात आपण पाहिले की अमोद नंदनला गावातलीच मुलगी बघू असं म्हणून त्याला चिडवतोय.
आता पुढे
"काय आहे अमोद शेठ आपली जी आहे ना ती चार दिवसांनी काय करेल याचा आधी विचार करा . मग माझ्या लग्नाचं बघा. " हे नंदन अमोदच्या डोळ्यात डोळे घालून बोलला.
" माझी कोणीच नाहीये. उगाच तुझा विषय माझ्या वर ढकलू नको. आवरं चला ,भूक लागलीय तर जेवून घेऊ. "
" हो चलं. मी आलोच पाच मिनिटात . तोपर्यंत बाकींच्यांना बोलव. "
" हो ये आवरून. मी जातो बाहेर ." अमोद सगळ्यांना बोलवायला गेला तर नंदन आवरायला.
बाहेर श्रीकांत उभाच होता. त्याने अमोदला बघितले आणि म्हणाला, " बरं झालं तू आला. मी आता आवाजच देणार होतो. भूक लागलीय पण या बघ अजून आवरताच आहेत. "
" थांब, आपण ह्या तिघींची गम्मत करूया चलं" असं म्हणून अमोद श्रीकांतला घेऊन त्या तिघींच्या खोलीच्या बाहेर आला. दार वाजवायला लागला. आधी कोणी दार उघडलचं नाही परत वाजवले तेव्हा आतून कोणीतरी कडी उघडतानाचा आवाज आला तसं हे दोघं पळून बाहेर निघून आले.
तेवढ्यात नंदन आला त्यांच्याकडे बघून म्हणाला, " काय रे काय झालं पळायला. "
दोघही एकदम म्हणाले, " कुठे, काय, काहीच नाही. जा त्या तिघींच आवरलं का ते बघं. आम्ही तोपर्यंत जेवणाचं झालय का ते बघतो. ." असं म्हणून ते लगेच निघाले तिथून कारण त्यांना माहिती होतं आपण जर अजून इथे थांबलो तर नक्की पकडले जाऊ म्हणून ते लगेच सटकले.
रोहन आणि त्याची आई जेवणाचं साहित्य घेऊन आले होते. रोहन पान वाढायची तयारी करत होता. तेवढ्यात अमोद तिथे आला. रोहन पानं लावतोय हे बघूनच तो म्हणाला, " व्वा ,तयारी झाली तर. वास पण खूप छान येतोय. "
यावर लगेच श्रीकांत म्हणाला, " हो वास खूप छान येतोय. काकू, काय केलय जेवायला ?"
" अरे बाळांनो, अख्खा मसूर, भाकरी, ठेचा अन् गोड म्हणून गुलाबजाम ." हे बोलत असतानाच त्या तिघी अन् नंदन आला.
स्वामिनी म्हणाली, " व्वा गुलाबजाम. मी खूप खाणार.
श्रावणी म्हणाली, " खाऊन खाऊन अजून जाडं होणार. "
" ये गप्पे. माझ्या जाड्यापणावर यायचं नाही हां. मग काय तुझ्या सारखी काड्यामोड्या पैलवान होऊ का ?"
नंदन म्हणाला, " आता चला जेवूया."
सगळे एकदम म्हणाले, " हो हो चला. खूप भूक लागलीय. "
काकू म्हणाल्या, " या मग गरम गरम खायला. "
सगळे गप्पा मारत जेवत होते. रोहन इथे त्यांना काय काय बघायला आहे ते सांगत होता. ते ऐकून मनात एकजण आपापले आराखडे मांडत होते.
जेवन झाल्यावर सगळ्यांना झोप अनावर झाली म्हणून सगळे झोपायला गेले. पण नंदन तिथेच बसून रोहनशी गप्पा मारत होता. पण रोहन काही काळानंतर झोपायला गेला.
नंदनला काही झोप येत नव्हती म्हणून तो तिथेच बसून होता. पण थोडावेळातच कंटाळा. इथे बसून काय करायचे म्हणून तो गावात फेरफटका मारायला गेला.
प्रत्येक घराच्या बाजूलाच त्यांच्या नारळ, काजू च्या बागा होत्या. तो बघत चालला होता की त्याला एका ठिकाणी मुलं गोट्या खेळताना दिसल्या. तो बराच वेळ तिथेच उभा राहून मुलं गोट्या कसं खेळताय ते बघत होता.
ते बघत असतानाच त्याला लहानपणी बाबा आणि तो गावाला गेलो की गोट्या खेळायचे हे आठवले. त्याच्या मनात इच्छा झाली आपण पण खेळून बघूया म्हणून त्याने मुलांना विचारले, " ऐ मुलांनो, मी पण खेळू तुमच्या बरोबर "
आधी मुल तर त्याच्या कडे बघूच लागली. हा ऐवढा मोठा अन् आपल्या बरोबर खेळणार म्हणून ते त्याला खालून वरून न्याहाळू लागले.
तो पण मुलांची गम्मत करायची म्हणून तो बारीक तोंड करून म्हणाला, " अरे, तुमच्या या दादाला खेळायला घ्या की रे. मी लबाडी नाही करणार. तुमच्या नियमांप्रमाणे खेळीन. घ्या की रे दादाला. "
असं म्हटल्यावर मुलं एकमेकांनकडे बघू लागले. शेवटी त्यांच्या मोहरक्या तयार झाला. मग काय अर्धा पाऊण तास तो त्या मुलांबरोबर गोट्या खेळत होता. जाणारे येणारे त्याच्याकडे बघत होते. पण तो कोणाकडे लक्ष न देताच मुलांशी एकरूप होऊन खेळत होता.
राधा व तीच्या मैत्रिणी रस्त्याने जात होत्या. त्यांनी बघितले की मोठा मुलगा गोट्या खेळत होता अन् हुशारीने जिंकत होता. हे पाहून राधा म्हणाली, " ओ, लहान समजून त्यांना गंडवताय का ?"
नंदन तिच्याकडे बघत म्हणाला, " ओ मी नियम पाळूनच खेळतोय. विचारा मुलांना ?"
तो मुलांकडून म्हणाला, " काय रे मी गंडवतोय तुम्हाला? मी तुम्ही सांगितलेले सगळे नियम पाळतोय ना?"
मुलंपण एकदम म्हणाली, " अग हो ताई, ते नियम पाळतायत. "
" अरे ते तुमचं लक्ष नाही बघून हाताने गोटी हालवताय. मी बघितले मगाशी. "
तो भोळेपणाने मी नाही म्हणून मान हलवत होता.
त्यावर ती म्हणाली, " अच्छा तुम्ही नाही ना केलं तर चला माझ्याबरोबर खेळून दाखवा. बघू कोण जिंकतोय ते ?"
तो पण टशन देऊन म्हणाला, " मी काय घाबरतोय का? खेळा की मग. बघू बघू कोण जिंकतोय ते ?"
दोघं एकमेकांना टशन देत गोट्या जिंकत होते कधी तो पुढे तर कधी ती पुढे मुलं नुसता गोंधळ घालत होते. त्यांच्यात पण दोन गट पडले. दादाच्या बाजूने तर काही जण ताईच्या बाजूने .
इकडे अमोद सगळे उठून आवरून याची वाट बघत होते. रोहनने आणलेला चहा पिऊन झाला तरी याच्या काही पत्ता नाही. अमोदने, श्रीकांत ने फोन लावून पाहिला. पण तो उचलतच नव्हता.
तो उचलणार कसा ना यांचा खेळ रंगत आला होता त्यामुळे त्याचे फोनकडे लक्षच नव्हते. याचकाळात आईने राधाची माहिती आणि फोटो पण त्याला पाठवला होता.
शेवटी अमोद ने सगळे त्याला शोधत गावात निघाले . आजूबाजूच्या बागा बघत. कधी फोटो काढत तर याला शोधत शोधत चालले होते.
थोडं पुढे आल्यावर श्रावणीला नंदन खेळताना दिसला. ती ओरडून म्हणाले, " ऐ समोर बघा, नंदन गोट्या खेळतोय. "
सगळे आधी तिच्याकडे मग समोर बघत होते. त्याच्याकडे एकटक बघत बसले होते.
सगळे आधी तिच्याकडे मग समोर बघत होते. त्याच्याकडे एकटक बघत बसले होते.
बघुया पुढच्या भागात कोण जिंकतेय ते.
क्रमशः
©® सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा