तूच माझी राधा
भाग ९
तेवढ्यात श्रावणी म्हणाली, " ऐ दोघांच काय गुलूगुलू चालय"
दोघेही एकदम म्हणाले, " आमचं ! ... काही नाही. "
स्वामिनी म्हणाले, " नाही. तुम्ही अजिबात काही बोलले नाहीत. आम्हीच एकमेकींच्या कानात बोलत होतो. हो ना ग श्रावणी?"
" हो तर. आपण एक काम करूया. आपण जाऊया तिकडे मस्त गप्पा मारूया. ह्यांना बसू दे गुलूगुलू करत. "
" ऐ गप्प बसा." असं नंदन म्हणाल्यावर सगळे शांत झाले.
तेवढ्यात रोहन काँफी घेऊन आला. काँफी देऊन रोहन चाललाच होता तर नंदनने त्याला थांबवले आणि आपल्या गप्पांमध्येच सामील व्हायला सांगितले.
आता पुढे
रोहन सगळ्यांना काँफी घेऊन आला होता. नंदनने त्याला पण गप्पांमध्ये सामील व्हायला तयार केले. रोहन पण मी जरावेळ बसतो असं म्हणून त्यांच्यात गप्पा मारायला बसला.
नंदन सी.ए. असल्यामुळे त्याने किती पर्यटक येतात? कोणत्या काळात गर्दी असते असे अनेक प्रश्न रोहनला विचारून त्याचं अकाऊंट लिहायचेच काम चालू केले. शेवटी अमोद या प्रश्नांना वैतागून बोलला " अरे नंदन. जाऊ तिथे तुझं अकाऊंट वरच गप्पा चालू होता बस झालं आता. "
श्रीकांतने लगेच रिघ ओढली, " हो ना. जरा बाहेर ये . आनंदी जीवन जगायचा विचार करं .हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनी हो हो ssssss
बरं रोहन , तुझं लग्न झालाय की नाही?"
" नाही. आता तरी काही विचार नाही आणि अजून बहिणीच पण लग्न व्हायचय. हे अजून वाढवायचय मग बघू."
अमोद म्हणाला," आयुष्याचं फारच मोठं प्लँनिंग केलयस. इथे फक्त व्हेजच आहे का ? "
" हो फक्त व्हेज. बाकी काही करायला पण देत नाही. म्हणून बुकिंग करताना आधीच सांगतो तसं. "
" का रे असं ?"
" आधीपासूनच आम्ही सरळमार्गी, त्यात कोणी मुलं येऊन दंगा, वादावादी नको वाटतं तसंच माझ्या बहिणीप्रमाणे इथे तिच्या मैत्रिणी पण येत असतात. मग त्यांची काळजी आपणच घेतलेली बरं आणि कसय ना मुलांचे एका दिवसाची गम्मत होते पण इथल्या लोकांना , मुलींना सारखा त्रास होतोच ना.
गणपतीच्या दर्शन ला येतात आणि हे सगळं करतात हे आम्हाला नाही पटत म्हणून आम्ही आधीच काळजी घेतो. "
नंदन म्हणाला, " अगदी बरोबर. रोहन तुझं म्हणणं पटलं. आपणच स्वतः काही नियम पाळले तर कोणालाच त्रास होणार नाही. मला पण हे असलं आवडत नाही त्यामुळे मी कधी पार्टी मध्ये जात नाही. "
रोहन म्हणाला, " चला मी जातो खूप उशीर झालाय. उद्या भेटू सकाळी नाष्ट्याला. नाष्टा किती वाजता आणू साहेब?"
" दहा वाजता आणं. तोपर्यंत आम्ही आवरतो. "
" चालेल" असं म्हणून रोहन घरी निघून गेला.
श्रावणी लगेच म्हणाली, " मगाचा विषय राहिला. चला बोला आता कोण मत मांडतय. "
कोणी काहीच बोलायला तयार नाही. शेवटी श्रावणी म्हणाली, " नंदन तूच सांग. "
" ये बाई आता माझा काही विचार नाहीये आणि तसही तुमचं आमच्या आधी होणार त्यामुळे तूच सांग तूला कसा नवरा हवा ते. "
असं म्हटल्यावर श्रावणी शांतच झाली. कोणीच काही न बोलता काँफीचा आस्वाद घेत होते फक्तं.
खूप वेळ शांतता होती फक्त लाटांचा आवाज येत होता. तो आवाज एखाद्या संगीताप्रमाणे वाटत असल्याकारणाने सगळे तेच ऐकत मनात चाललेला गोंधळ कमी करायचा प्रयत्न करत होते.
काही काळा नंतर नंदन म्हणाला, " चला आता झोपूया. उद्या सकाळी समुद्र किनारी जायचय ना. "
" हो जायचय ना. " सगळे एकमेकांना शुभ रात्री म्हणून झोपायला गेले.
रात्री सगळे गाढ झोपल्यावर श्रीकांत आणि अमोद ने मुलींच्या खोलीचे दार वाजवून पळून गेले. असं त्यांनी दोन दा तीन दा केलं . यामुळे श्रावणी घाबरली तिच्या डोक्यात एकच कोकणातील भूत आलं. परत एकदा दार वाजल्यावर तिने स्वामिनीला उठवले. अगं कोणीतरी दार वाजवतय. भूत आलं उठ लवकर. कोकणी भूत????
या दोघींचा बोलल्याचा आवाज येतोय म्हटल्यावर अमोद आणि श्रीकांत खोलीत जाऊन झोपले.
दोघींनी हळूच दार उघडून बघितले तर त्यांना कोणीच दिसले नाही. एकमेकींनकडे बघत परत जाऊन झोपल्या. पण श्रावणीला बराच वेळ झोप येत नव्हतीच. ती रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. म्हणता म्सणता कधी झोप लागली कळलीच नाही.
हे सगळे उशीरा झोपले त्यामुळे लवकर कोणीच उठले नाही. पण नंदन नेहमीच्या वेळेला उठून सुर्योदय पाहायला समुद्रावर निघाला.
वातावरण खूप आल्हाददायक होतं.

तो मस्त दोन्ही बाजूने नारळच्या बागा असणाऱ्या रस्त्याने चालत समुद्राकडे चालला होता. काही घरांच्या अंगणात महिला सडा रांगोळी करत होत्या. हे बघून त्याला खूपच छान वाटत होतं. शहारात हे जरा कमीच बघायला मिळत असे त्यामुळे त्याला याचं नवलही वाटत होतं.
थोडं पुढे आल्यावर एक आजीबाई शेणाच्या सड्यावर खूप मोठी रांगोळी काढत होत्या. त्याला याचे नवल वाटलं म्हणून तो त्यांच्या जवळ जाऊन बघत होता. त्याने त्यांचे खूप फोटो काढले.
आई गावातलीच असल्याकारणाने तिला या गोष्टी खूप आवडायचा पण सध्या शहरात राहत असल्यामुळे त्यांना याचा अनुभव घेत येत नव्हता. त्याचा मनात विचार आला की , " आपण हे फोटो आईला पाठवले तर आई खूप खूश होईल." म्हणून तो हे सगळे फोटो आईला पाठवतो.
तोपर्यंत आजींची सगळी रांगोळी काढून झाली होती. ती एकदा डोळ्यात साठवून पुढे चालू लागला. वातावरणाचा आनंद घेत तो चालला होताच की एका देवळातून भजन म्हणतानाचा आवाज आला.
कधीही देवळात न जाणार पण आज त्या आवाजाने तिकडे ओढला गेला अन् तो कधी देवळात पोचला त्याचे त्याला कळलेच नाही.
जिथून आवाज येतोय तिथे बघत होता तर समोर एक मुलगी बसली होती. एका बाजूने दिसत असल्याने त्याला काही तिचा चेहरा दिसत नव्हता पण केस हवेने उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते अन् ती गाण म्हणताना तिच्या नाजूक हाताने बाजूला करत होती. तीने केस बाजूला केल्यावर त्याला फक्त तिचे गुबगुबीत गाल दिसत होते.
तिचा चेहरा पाहण्यासाठी तो अजून पुढे जाऊ लागला. अगदी बरोबर तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. यावेळेत तिचे भजन संपल म्हणून तिने देवाला नमस्कार केला. तेवढ्यात तिच्या जवळ काकू आल्या . त्यांच्याशी ती आदराने बोलत होती. ती बोलत असताना मध्येच हसली तेव्हा तिच्या गालावरची कळी बघून त्याची तिला बघण्याची उत्सुकता वाढली. पण तिचा काही चेहरा दिसत नव्हता.
तिच्या गप्पा मारून झाल्यावर ती देवाचं दर्शन घेण्यासाठी पुढे चालू लागली. तो पण तिच्या मागेमागे देवापाशी. तो एवढा तंद्रीत होता की त्याला कळलचं नाही आपण देवाचं दर्शन घेतलं सुद्धा.
नंतर ती प्रदक्षिणा मारून ती पलटी अन्....
बघुया पुढच्या भागात कोण आहे ती आणि काय होतय ते.
क्रमशः
फाँलो आणि कमेंटस् करायला विसरू नका. मी कमेंटसची वाट बघतीय.
©® सौ. चित्रा अ. महाराव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा