Login

तूच माझी राधा भाग २३

दोन प्रेम जीवांची कथा
तूच माझी राधा

भाग २३

इकडे नंदन ची पण तीच अवस्था होती , " आपण आई ला तर म्हणालोय कि  मी मुलगी बघायला तयार आहे पण ..... तिचा अपेक्षा काय असतील . ती आईला आणि प्रियाला सोडून नवीन संसार थाट म्हंटली तर  ...... तिचे शिक्षण पूर्ण करू शकेल......  अश्या अनेक विचारांनी तो नुसताच या कुशीवरून त्या कुशीवर होत होता.

कसे असते ना लग्न म्हटलं की दोघांचही आयुष्य बदललं जातं. दोघांचे स्वभाव वेगळेवेगळे पण जोपर्यंत मन जुळूत नाही तोपर्यंत संसार होत नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आई ची गडबड चालू होती. तिला इथले आवरून मावशीकडे सगळी व्यवस्था करायला जायचे होते. पण मावशी आणि  प्रिया नंदन जायची वाट बघत  . म्हणजे तो गेला कि या लगेच मावशी कडे जायला मोकळा.

इकडे पण दहा वाजेपर्यंत निघायचे म्हणून सगळ्यांची नुसती गडबड चालू होती  . आजी च्या सूचना पण त्यांच्या सोबतीला होत्याच. सगळ्यांचं आवरून निघास्तोवर १०. ३० वाजले. राधाच्या मनात चलबिचल चालू होती . ती बळबळ आवरत  होती . आजीला तिची अवस्था काळात होती पण....

शेवटी बाबाच बोलले , " बाळा , काळजी नको करू . तुझी सगळी स्वप्ने पुर्णे होतील याची मी नक्की काळजी घेईन .  जा बाळा देवाच्या पाया पड  मग आजीच्या पाया पड . "

सगळे जड मनाने निघाले. गाडीत सगळे शांत होते . रोहननेच गाणी म्हणायला सुरवात केली . मध्येयच बाबांनी  नंदन च्या आईला फोन करून कळवले कि आम्ही निघालोय .

नंदन गेल्यावर प्रिया जरावेळ कॉलेज ला जाऊन आली . जेउन दुपारी मावशीच्या घरी गेल्या.

नंदन ऑफिसला आला होता पण त्याचे कामात लक्षच नव्हते . नुसता विचार करत बसला होता . अमोद आवाज देत आत आला, " नंदन , हि जोशीं ची फाईल बघितील का ? "  पण त्याचे लक्षच नव्हते . समोर हात हलवला तरी काहीच नाही . म्हणून कानात बोलला , " राधा , खूप छान दिसतीय ना ? "

तंद्रीत  तो म्हणाला , " छान नाही दिसत फक्त गाते पण छान ."

" अरे व्वा , तू गाणं ऐकतोय का आता ?"

" हो ." असे म्हणाल्यावर त्याला कळले आपण काय बोलतोय ते म्हणून त्याने बाजूला पहिले तेर अमोद अगदी त्यांच्या कोणापाशी उभा होता . अमोद ला पाहून म्हणाला , " तू इथे काय करतोय ? "

" काही नाही . तुझ्या बरोबर राधाचं गाणं ऐकतोय ."

" मी कुठे गाणं ऐकतोय ,. मी फाईल वाचतोय . ?"

" हो का कोणाची रे ?"

" हि काय जोशींची ?"

" काय वाचतोय रे "

शेवटी हार मानून म्हणाला , " अरे विचार करत होतो . उद्या च्या कार्यक्रमाचा ?"

" अरे नको विचार करू जे होईल ते बघू . आता जरा कामाचे बघ . हि फाईल बघून ठेव .  उद्या पासून  परत कामात लक्ष कमीच होणार आहे....... "  असे म्हणून तो बाहेर पळून गेला

तो पण हसून कामाला लागला.  दोघांचा हि कामात दिवस कशा गेला . ते कळलेच नाही . संध्याकाळी निघताना नंदन अमोद ला म्हणाला , " उद्या सकाळी लवकर ये. उगाच रविवार म्हणून झोपा काढू  नको . "
दुसऱ्या दिवशी सकाळी राधा च्या घरचे आवरून बरोबर सकाळी १० वाजता नंदन च्या घरी आले.  आल्या आल्या नंदन च्या आईने आणि प्रिया ने त्यांच्या स्वागत केले. राधाला बघून तर नंदनच्या आईला  खूप आनंद झाला त्या म्हणाल्या , " फोटो पेक्षा तर खूप सुंदर आहेस. अगदी दोघांची जोडी शोभून दिसेल . " हे ऐकून तर राधा बाबांकडे बघू लागली. त्यांनी डोळयांनीच शांत राहायला सांगितले . 

आई म्हणाली , " या ना आत बसा ना . या या . " नंतर प्रियाकडे बघून म्हणाली , " प्रिया जा बाळा पाणी आण. "

" नमस्कार , मी मीरा . मी नंदन ची आई , हि उमा माझी बहीण  आणि हि प्रिया माझी मुलगी . "

" नमस्कार , मी राजेंद्र  राधाचे वडील, हि तिची आई, हि माझी आई आणि हा रोहन . आमचं गणपतीपुळे इथे छोटेसे फॉमहाऊस आहे . ते हाच सांभाळतो . नंदन राव नाहीये का ? "

" अहो घरातच आहे . थांबा मी बोलवते . जा प्रिया बोलवून आण . "

राधा आईच्या कानात म्हणाली, " आई बहुतेक माझी साडी सैल झालीय . आपण नीट करूयात का ? "

" हो करूयात . मी त्यांनां विचारते . " असं म्हणून आई मीरा ताईंना म्हणाली , " ताई . जरा आत जायचं होते ? "

" हो या ना . जा उमा आत घेउन  "

राधा , आई आणि मावशी   आत गेल्या . तेवढ्यात  नंदन आणि अमोद बाहेर आले . नंदन आल्यावर काकांच्या आधी पाया पडला आणि रोहन ला हात मिळवायला लागला तेंव्हा रोहन म्हणाला , " ओळखलंत का मला . ?"

" हो ओळखलं की . आम्ही तुझ्याकडे च तर थांबलो होतो हो ना अमोद . "

" क्षमस्व . माझी बहिण तुम्हाला फोन वर जे बोलली त्याबद्दल क्षमस्व . "

" अरे झाला तो विषय . जाऊदे आता तो विषय . "

सगळे त्यांच्याकडेच बघतायत म्हणून नंदन च म्हणाला , "" आम्ही आता गणपतीपुळे येथे  गेलो होताना मागच्या आठवड्यात  तर यांच्याच कडे राहिलो होतो . "

अमोद म्हणाला , " अरे हो खरच की . मगाच पासून तोच विचारकारतोय मी यांना कुठे पाहिलंय ते . अहो काका तुमच्याकडे खूप छानच व्यवस्था झाली आमची . धन्यवाद . "  काकांनी पण नमस्कार केला .

तेवढ्यात आई आणि प्रिया चहा आणि नाष्टा घेऊन आले . प्रियाने सगळयांना देत म्हणाली  , " अरे राधा आणि काकू कुठे गेल्या ? "

" राधाची आजी म्हणाली , " येतायेत जरा आत मध्ये गेल्यात . "

" घ्या सगळ्यांनी . ते आल्यावर घेतील . "

खात खात राधाच्या वडिलांनी नंदनशी बोलायवाला सुरवात केली . नंदनही त्यांच्या  सर्व प्रश्नांची उत्तरे दे होता .

राजेंद्र म्हणाले, " मीरा ताई, नंदनराव  राधा आता काँलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे . तीची पुढे शिकण्याची इच्छा आहे. तीला वकिल व्हायचय तर तीला ते पुढे जाऊन करता यावे. "

मीरा ताई म्हणाल्या, " अहो का नाही. तिला नक्की शिकवू. तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील याची मी खात्री देते. "

नंदन पण म्हणाला, " समजा आमचं जुळलच तर मी तिचे स्वप्न पूर्ण व्हायला नक्की मदत करेन आणि प्रिया शिकतीच आहे की तिच्या बरोबर हीचेही शिक्षण पूर्ण होईल. "

तेव्हढ्यात  राधा बाहेर आली . आल्या आल्या नंदन ला बघून जोरात ओरडली , " तू . तू इथे काय करतोय ? "

नंदन आणि बाबा बोलत असल्यामुळे त्याचे लक्ष नव्हते. तो आवाज ऐकून त्याने तिच्याकडे पहिले अन् तो जोरात ओरडला , " तू ?"

बघूया पुढच्या भागात हे दोघं लग्नाला तयार होतायत का ते ?