तूच माझी राधा
भाग २८
मागील भागात आपण पाहिले की , अमोघ रोहन ला आपल्या घरी घेऊन आला. त्याने आईला हे येणार आहेत याची आधीच कल्पना दिली होती पण ती बाहेर असल्यामुळे घरात कोणीच नव्हते . घरी विश्रांती घ्यायला सांगून तो परत नंदन कडे गेला.
रोहन आणि त्यांचे बाबा थोडावेळ आतल्या खोलीत विश्रांती घेत होते तर आजी आणि आई दुसऱ्या खोलीत जरा वेळ झोपल्या . राधा सोफ्यावर बसून नंदन काय बोलला याचा विचार करत होती . तिला काय करावे ते सुचतच नव्हते . आई बाबांना जर हे स्थळ आवडले तर ? आम्ही दोघे एकत्र राहू शकतो का ? आम्ही तर सतत भांडतच असतो ? आमचे पटेल आई बाबांना सारखे ? तो आता शिकवायला तयार झाला अन नंतर शिकवलेच नाही तर ? ती अश्या अनेक प्रश्नांनी ग्रासले होते . तिला काही केला उत्तर मिळतच नव्हते ?
यावर कोणाशी बोलावे तेच कळत नव्हते . या सगळ्यात तास कसा गेला तिला कळलेच नाही . आई तिच्या शेजारी येऊन बसली अन तिने राधाच्या हातावर हात ठेवला तेंव्हा कुठे राधा विचारातून बाहेर आली .
" काय ग काय झाले ?"
" काही नाही ."
" मग कसला विचार करतीयस ?"
" अगं आई त्यांचा होकार आला तर ?"
" बाळा , त्यांचा होकार आला तरी तुला योग्य वाटत असेल तर आपण पुढे जाणार आहोत . त्यामुळे त्या गोष्टीचा जास्ती विचार करू नकोस. त्यापेक्षा तो तुला योग्य वाटतोय का ? त्यांच्या घरात तुला जमेल का ? "
" पण आई तो योग्य आहे का नाही कसे ठरवायचे ?"
खरोखरच आपला जोडीदार शोधताना प्रत्येकाला पडलेला प्रश्न आपल्याला हा योग्य जोडीदार आहे का नाही ते ठरवायचे कसे ? त्यावेळी मैत्रीण, आई बाबा जे सांगतील त्यानुसार विचार करून निर्णय घेतला जातो . पण खरा काय निकष लावतो ते काही कोणाला सांगता येत नाही . थोडा मनाने आणि थोडा नशीब, देव यावर विश्वास ठेऊन जोडीदार निवडला जातो . असे मला वाटते . असो
" अगं बाळा त्याच्या बोलण्यातून त्याचे विचार, आचार कळतात . तो खरच कष्ट करून पैसा कमावतो का ? , आई वडिलांचा मान कसा ठेवतो ? यासारख्या बारीक सारीक गोष्टीतून आपल्याला कळून येते . "
" बरोबर आहे . तुझ्या आईचे ?" असं म्हणत बाबा आणि रोहन त्याच्या जवळ येऊन बसले .
" हे बघ बाळा . मला विचारशील तर नंदन खरच खूप हुशार आणि कष्टाळू वाटला . "
" बरोबर अगदी . बाबा , नंदन मला त्याचे ऑफिस दाखवायला घेउन गेला होता . "
" मग कसंय ऑफिस ? त्याच्या हाताखाली किती जण काम करतात . तो अंदाजे किती कमावतो असे तुला वाटते ?"
" होती चार पाच जण . पण तो किती कमावतो ते नाही कळले पण तो राधाचे पुढचे शिक्षण , तिला योग्य सांभाळू शकतो . असे मला वाटते ?"
" तुला का असे वाटते . "
" बाबा , रोहन काहीतरी राधाशी बोलला आहे ते विचारा आधी मग मी सांगतो ." असं रोहन म्हणल्यावर बाबा राधा कडे बघू लागले .
" बोल बाळा , काय म्हणाला नंदन ?"
" ते म्हणत होते कि .... .... " असं सगळं नंदांचे बोलणे सांगितले .
" बरोबरच आहे त्यांचे . मग आता तुझे काय मत आहे ?"
" बाबा लगेच कसे ठरवता येईल . मला काही वेळ द्याल का ?"
रोहन लगेच म्हणाला , " तुला पाहिजे तेव्हढा वेळ घे. आता हा विषय सोडा. आता आपण यावरून बाहेर पडू. थोडं फिरून येऊ म्हणजे तुला टेंशन नाही येणार . "
" हो चालेल. चला आवरू या . रोहन एकदा अमोघ ला फोन करून सांग . "
" हो सांगतो. तुम्ही आवरून घ्या . "
सगळे आता गेले तर रोहन फोने लावत होता . " नमस्कार , अमोघ मी रोहन बोलतोय ."
" हां , बोल रोहन काय झाले ?"
" आम्ही एक अर्धा तासात बाहेर पडतोय तर तू घरी येतोस का म्हणजे घराला कुलूप लावायला . "
" हो येतो. अरे तुम्ही चहा घेतला कि नाही ?"
" आम्ही घेऊ बाहेर पडल्यावर ."
" बरं .ठीक आहे मी आलोच "
*******
नंदन सगळ्यांनबरोबर गप्पा मारत बसला होता . तेंव्हा आई ने विचारले , " काय रे कशी वाटली राधा ?"
" आई , मला काय वाटते त्यापेक्षा तिच काय उत्तर येतंय ते बघू ?"
" अरे तिचा होकारच येईल "
" आई तिच्यावर कोणीही दडपण द्यायचे नाही . ती निर्णय घेईल तो पर्यन्त तुम्ही सहज गप्पा मारा . म्हणजे सारखा सारखा विषय नाही निघाला केला तिला दडपण नाही येणार . "
" बघ आई दादाला आता पासून च वहिनीची काळजी ."
" ए गप्प तू "
" मी काय गप्प . मी खरं तेच बोलले . आता आम्हाला विसरणार ."
" मी काही तुम्हाला विसरत नसतो. आधी तुम्हीच राहणार . कळलं का ?"
" कळलं बरं "
" बरं , आई मला सांग तुला राधा कशी वाटते ?"
" का रे तुला आवडलीय का ते सांग ."
" अगं आई मला अजून कळत नाही म्हणून आधी तुझे मत विचारतोय ."
मधेच मावशी म्हणाली , " मला तेर योग्य वाटली. आणि कसे आहे ना बाळा , नातं दोन्ही बाजूने असले कि नातं निभवायला त्रास होत नाही . काही बाबतीत आईला सासू म्हणून काही गोष्टी धरून तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील तेंव्हा त्यांचे नाते खूप आनंदाचे होईल . त्याचप्रमाणे तुझी येणाऱ्या बायकोने केलं तर तिला पण त्रास होणार नाही . काय ग ताई बरोबर ना ?"
" हो अगदी बरोबर . तू माझ्याकडून काही काळजी करू नको मी तिला समजून घेईन . "
" म्हणजे तुझा होकार आहे तर ?"
" हो आहे होकार . "
लगेच प्रिया म्हणाली , " मला पण राधा पसंद आहे . आता सगळं तुझ्यावर आहे . "
लगेच बोलता बोलता नंदन म्हणाला , " माझ्यावर नाही तिच्यावर आहे ."
" काय म्हणालास दादा ? म्हणजे तुला पसंद आहे राधा ?'
" मी कुठे म्हणालो असं ?"
" आत्ताच तर म्हणाला तिच्यावर आहे म्हणजे तुझ्याबाजूने होकार आहे तर . हो का नाही मावशी हा असच म्हणला ना ?"
" हो हो "
" दादा खरं काय ते सांग ?"
" काही नाहीय . तिचा होकार आल्यावर मग बघू ."
" उगाच खोटं बोलू नको. गालात हसतोय म्हणजे नक्की काहीतरी गोष्ट आहे. थांब अमोघ लाच विचारते . "
" काही गरज नाहीय . त्यापेक्षा माझे एक काम कर. "
तेवढ्यात आई म्हणाली , " तुम्ही दोघे बस गप्पा मारत . आम्ही मावशीकडे जाऊन रात्रीच्या स्वयंपाकाचे बघतो . "
" बरं जा तुम्ही . मी दादांशी बोलून येते मावशी कडे . "
" बरं चालेल . चल ग आपण आवरून निघूया . " असं म्हणून आई आणि मावशी आवरायला निघून गेल्या .
बघूया पुढच्या भागात नंदन प्रियाला काय काम सांगतो ? राधा काय उत्तर देईल .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा