तूच माझी राधा
भाग ४०
रात्री सगळे जेवायला बसले होते तर प्रिया म्हणाली , " आई , तुमच्या सहलीसाठी एका ठिकाणी मी चौकशी केलीय . तर ते उदय बघून सांगणारेत . मग आपण पुढचं ठरवू . "
" हो चालेल. तू एकदा नंदन ला दाखवून ठरव. काय रे नंदन बघून घेशील . "
नंदन आपल्याच विचारात होता . त्याच्या या दोघींकडे लक्ष नव्हतं . हे आईच्या लक्षात आल्यावर आईने परत एकदा आवाज दिला , " ऐ . नंदन . ऐ नंदन . "
प्रियाला माहित होते तो करंट्या विचारात आहे म्हणून तिने हळूच हाताने हलवून त्याने भानावर आणले .
" काय ?"
" काय झालं ? तुझे लक्ष कुठे आहे ?"
" अगं काही नाही . मी काय म्हणतो . मी दोन दिवसा साठी एका काम निमित्त गावाला चालोय . उद्या सकाळी लवकर जाईन . "
प्रिया तर डोळे मोठे करून बघायला लागली . मनातच म्हणाली ," आता हा कुठे चाललाय ? ह्याच्या डोक्यात काय चाललंय नक्की . जेवण झाल्यावर बोलते . "
" बरं . सावकाश जा. प्रिया तूच सहलीचं नीट बघून घे. त्याला वेळ नाहीय तर . "
" काय , कोण चाललंय सहलीला ?"
" अरे , मघाशी तेच सांगत होते . मी , मावशी आणि मैत्रिणी असं तीन - चार दिवस फिरायला जायचं म्हणतोय . तर प्रियाने ठिकाण शोधून ठेवलाय तर ते बघ . "
" अच्छा . प्रिया नीट चौकशी कर . मग मला सांग. मी आलयावर बघतो . माझं झालयं . तर मी झोपतो. सकाळी मी माझं यावरून जाईन . आई तू काही लवकर उठू नको . "
" बरं . सावकाश जा . पोचला कि सांग . "
" हो. काळजी नको करू . " नंदन निघून गेला. ह्या दोघी मागचं आवारात होत्या .
" काय ग प्रिया , नंदन कुठे चाललंय . तुला काही म्हणाला का ?"
" नाही . मी आत्ताच ऐकलं . "
" अमोद ला तरी माहिती कि नाही . तू एकदा आमोद ला विचारून बघ . "
" हो बघते . "
" जा झोपायला . मी पण जाते . "
प्रिया नंदन च्या खोली जवळ आली . आत जाऊ का नको विचार करत दारापाशीच उभी होती . " तो बोलले का माझ्याशी का आमोद ला सांगू . "
शेवटी मनाची तयारी करून गेलीच खोलीत . तर नंदन खिडकीपाशी उभा राहून बाहेर दिसणारा चंद्र बघत मनात बोलत होता , " माझं काय चुकलंय ज्यामुळे माझा चंद्र जवळ नाही . मी खरच योग्य नसेल का तिच्या . तिच्या डोळ्यात अनोळखी भाव बघून खूप त्रास होतोय . बास आता हा त्रास कमी करायचा असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल. आणि मी ते उद्यापासूनच करणार . पण ..... "
आयुष्यात तो ' पण ' किती प्रश्न निर्माण करतो आणि गडबड घालतो . या 'पण' चे उत्तर वेळेवारी मिळवावी . नाहीतर सुखी आयुष्य जगताच येणार नाही .
आता या पण साठी काय करतोय नंदन बघूया .
त्याला खिडकी पाशी उभा राहिलेला बघून प्रिया त्याच्या शेजारी उभी राहिली . एकदा चंद्रा कडे तर एकदा दादा कडे बघून म्हणाली , " दादा . चंद्राचा लख्ख प्रकाश पडलाय ना ?"
" हो ना पण .... "
" पण काय ?"
" पण माझ्या चंद्राचा नाही पडला ग प्रकाश माझ्या आयुष्यात . तुला माहितीय प्रिया तिची परवा अनोळखी नजर बघून खूप त्रास झाला ग . मी एवढा वाईट आहे का ग तिने काहीच सांगितलं नाही . माझं काय चुकलं तेच काळात नाहीय . खूप त्रास होतोय ग . " हे बोलता बोलता त्याच्या डोळयातून पाणी कधी आली काळचं नाही त्याला .
प्रिया त्याचे डोळे पुसत म्हणाली , " दादा , तूझी काहीच चुकलं नाही. तू नको तो विचार करू नको . तुझ्या सारखा मुलगा कुठे शोधूनही सापडणार नाही . त्यामुळे तू रडू नको . त्यापेक्षा वेगळा विचार कर . "
" वेगळा विचार म्हणजे . मी दुसरी मुलगी बघू ना ?"
" नाही तसं नाही . "
" मग कसं ?"
" तीने का उत्तर दिलं नाही हे शोधून काढायचा प्रयत्न केलास का ?"
" नाही केला . "
" का "
" मला कोणताही नातं जबरदस्तीचे नको होते . मला वाटलं ती नक्की परत येईन . पण परवा तिची नजर पाहून खूप त्रास झाला . म्हणून मी पुन्हा एकदा तिला विचारणार आहे . "
" समजा . तिचे लग्न झाले असेल तर ??? किंवा तिने परत नकार दिला तर ??"
" मग काय आता जसा शांत होतो तसाच राहणार आयुष्यभर "
" हा माझा दादा नाही . तो त्याला काय पाहिजे तेच कायम मिळवत होता . तो दादा पाहिजे . असं शांत राहणार नको . "
" मग काय करू प्रिया मी ?"
" आता म्हणालाच ना तू पुन्हा प्रयत्न करणार . मग ते करायच्या आधीच माघार ."
" मी माघार नाही घेत पण तूच म्हणाली नि तिचे लग्न झाले असेल तर .... "
" अरे, मी फक्त शक्यता दर्शवली. आपण त्यातून मार्ग काढू . तू प्रयत्न तर कर . "
" हो ते तर मी करणारच आहे . म्हणून तर मी ... "
" मी काय ?"
" काही नाही . जा झोप उशीर झालाय . "
तुम्हाला काय वाटतंय नंदन काय करणार ????
बघूया पुढच्या भागात काय होतोय ते .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा