तूच माझी राधा
भाग ४३
नंदन ला तिला बघायचे असते म्हणूनतो तिच्या ऑफिसच्या जवळ थांबला होता . ती दिसल्यावर तिच्यावर हक्क दाखवून तिला गाडीतून सोडायला निघाला होता .
" अहो , आज गाडीतून एकत्र फिरायचा विचार आहे का तुमचा ?"
ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली .
तिला असं बघताना बघून नंदन म्हणाला , " असं बघू नकोस . तुझ्या घराचा पत्ता माहित नाहीये तर तू सांगितलं नाहीस तर आपल्याला असच गाडीतून फिरत बसावं लागले. म्हणजे मला चालेल . मला खूप आवडेल पण ..... "
" पण मला नाही चालणार . मी सांगते पत्ता . "
तिला बघून गालातल्या गालातल्या हसत होता . त्यामुळे ती अजून चिडत होती पण दाखवू पण शकत नव्हती . शेवटी चिडून शांत बसली आणि त्याला गूगल मॅप लावून दिला .
शांत बसून तो आपला गाडी चालवत होता तर ती विचार करत होती , ' हे असे का वागताय ते ? नक्की काय चाललय ? मला ना आता काहीच कळत नाही . जाऊ दे रोहन शी बोलूया तोच मला योग्य मार्ग दाखवू शकतो . "
ह्याच्या मनात पण विचार चालू होता , " हि काय विचार करत असेल . मी आलेलो आवडलं नसेल का ? मी जबरदस्ती केली का ? "
दोघांच्या विचारात ते कधी येऊन पोचले त्यांना कळलेच नाही . त्याने गाडी थांबवून तिला विचारातून हाक देऊन बाहेर काढले .
" हो मँडम , उतरा आता . "
" हो उतरते . " ती असं म्हणून ती लगेच उतरली . बाहेर बघितलं तेंव्हा तीला कळले कि ती घरापाशी आलीय . नाहीतर ती उतरवून त्याच्यावर तोफ चालवणार होती ( शब्दांची )
" बाय . भेटू लवकरच "
" कशाला भेटू. मला तुम्हाला अजिबात भेटायचे नाहीय . "
" नका भेटू. पण मला भेटायचंय तुम्हाला त्यामुळे मी नक्की पुन्हा भेटणार . "
ती पाय आपटत गेली . जाणाऱ्या तिला पाहून तो हसायला लागला . गाडी वाळवून निघून गेला .
" अरे राधा आली तू , चल जेऊया . मला खूप भूक लागली . "
ती आधीच चिडलेली असल्यामुळे अजूनच चिडली अन् चिडून म्हणाली , " हो , जरा थांब . आत येऊ कि नको . का दारातच जेऊ ? "
" हो शांत हो आधी . तू आवरून ये मग आपण जेऊ . "
ती पण आवरून आली तोपर्यंत ती थोडी शांत झाली होती त्यामुळे ती लगेच म्हणाली , " दादा , मला माफ कर मी उगाच तुझ्यावर चिडले . "
" अगं ,मला राग नाही आला . असू दे . आतातरी जेऊया का ?"
" हो चल . " दोघंही जेवण होईपर्यंत शांत होते .
जेवण झाल्यावर रोहन राधाच्या खोलीत बसून विचार करत होता . हिच्याशी बोलायचं कसे ? आणि इकडे राधा स्वतः ला तयार करत होती सगळं दादाला कसे सांगायचे ?
विचारांमध्ये बसलेले असल्यामुळे दोघंही समारोसमोर येत नव्हते .
शेवटीच राधा दादाला आवाज देत खोलीत आली .
" अगं ये ना . बस इथे . "
ती पण शांतपणे येऊन बसली .
" आता बोल मगाशी काय झालं होत एवढं चिडायला ?"
" दादा , ते ???"
" स्पष्ट बोल . कोणी त्रास देतंय का ?"
" नाही . "
" मग ??"
" थांब . मी सगळं सांगते . माझं पूर्ण ऐकून घे . मग तू बोल . "
त्यानेच मानेने होकार कळवला .
" तुला आठवतंय ते आपल्या गावात आले होते "
ते ऐकल्यावर त्याने डोळे मोठे करून बघितले . त्याचे मोठे डोळे बघून ती म्हणाली , " ते म्हणजे नंदन . तर ते जेंव्हा गावात आले होते तेंव्हा आमची दोनदा तीनदा भेट झाली . त्या भेटीमध्ये आमची फक्त भांडणच झाली . त्यामुळे मी फार काही लक्ष नाही दिलं . पण ते तिथेच माझ्यावर लक्ष ठेऊन होते . तेंव्हा जरा वेगळं वाटलं .
पण जेंव्हा आपण त्यांच्या घरी गेलो ना . त्यावेळी दोघे समोर आलो तेंव्हा काय झालं हे तुलाच माहिती आहे . नंतर आम्ही दोघे बाहेर गेलो होतो , गप्पा मारताना आमच्यातील गैरसमज दूर झाला .मला भांडत असलो तरी मनात त्याच्याबद्दल काहीतरी वाटत होत . पण काळत नव्हतं . त्यादिवशी आम्ही बऱ्याच विषयावर बोलललो . त्यांने माझ्या शिक्षणाविषयी संमती पण दर्शविली होती . मी आपल्या घरच्यांची काळजी पण घेणार हे पण त्याला मान्य होतं . दुसऱ्यादिवशी पण त्याने घेतलेली सगळ्यांची काळजी मनाला भावून गेली . तेंव्हाच ठरवलं होत आपण होकार देण्याचा निर्णय एकदा तुमच्या बरोबर बोलून घ्यायचा . त्याप्रमाणे आपल्यात चर्चा पण झाली. आणि त्याच रात्री ..... "
" काय झालं . त्याने तुझ्याबरोबर ??? "
" नाही तसे काही नाही . पण मीच त्यांना नकार नाही पण मी काहीच उत्तर देणार नाही असं सांगून आले . आणि त्या दिवसापासून आमच्यात काहीतरी बिघडलं "
" पण असं का म्हणाली . ? "
हे बोलत असताना रोहनचा फोन वाजला . तो फोनवर बोलत बाहेर निघून आला.
बघूया पुढच्या भागात काय नक्की कारण असेल ते.
क्रमशः
सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा