Login

तूच माझा राधा भाग ४४

तिला मिळविण्यासाठी चाललेली धडपड
तूच माझी राधा

भाग ४४


राधा रोहन सांगत असताना रोहनचा फोन वाजला म्हणून तो बोलत बोलत बाहेर आला . " हॅलो "

" हॅलो . भेटायचे ना ४ वाजता ."

" नको . "

" का "

" म्हणजे आता ४ वाजता नको तर संध्याकाळी भेटू . मी आता राधाशी बोलतोय तर माझं झाले कि भेटू. मी तुम्हाला आधी तसा मेसेज करतो . पण कितीही उशीर झाला तरी नक्की भेटू . ठेऊ . "

" हो . चालेल. भेटू लवकरच "


तो फोन ठेऊन आता आला तर राधा खिडकी पाशी उभी राहून विचार करत होती . तो तिच्या शेजारी उभी राहून म्हणाला , " बोल , असं का सांगून आली होती . "

" आपण फिरून आलो ना त्यादिवशी मला एक फोन आला आणि ... "

" कोणाचा फोन ? काय बोलणं झालं ?"

तिने मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरूवात केली , " त्यादिवशी  मला एक अनोळखी नंबर वरून फोन आला होता . "

" अनोळखी  . नक्की सांग काय आहे ते ?"

" सांगते . ऐक .

" हॅलो राधा का ?"

" हो राधा बोलतीय . आपण कोण ?"

" मी श्रावणी ,  नंदनची मैत्रीण . "

" अच्छा . बोला माझ्याकडे काय काम होत . मी तर तुम्हाला ओळखत नाही . "

" हो. ओळखत नाही . पण मी तुला ओळखते . बर ते  जाऊदे . मी काय सांगतीय ते ऐक . "

" पण मी का तुमचं ऐकायचे . माझा तुमच्याशी काय संबंध ? "

" तुझाच तर संबंध आहे . तू उगाच प्रश्न विचारू नको . मी काय सांगतीय तेवढंच करायचं आणि तेवढाच बोलायचं ."

" कोणाशी बोलायचं आणि काय करायचं ?"

" कोणाशी काय नंदन शी . "

" नंदनशी . मग मी तुम्ही सांगेल तेवढंच का बोलेन . मला जे बोलायचे आहे ते मीच बोलीन ना . "

" ए गप्प . मी सांगतोय तेच बोलायचे आणि तू तसेही बोलशील कारण .... "

" कारण काय ?"

" कारण तुला तुझे आई वडील  आता इथून तुमच्या गावाला जाऊ वाटत असतील तसेच  आई बाबा व्यवस्थित हवे असतील तर मी सांगतीय ते ऐक . "

" बोल . मी काय करायचे आहे ?"

" फार काही नाही. त्याला लग्नाला होकार कळवायणा नाही. "

" मी असं केल तर तुमचा काय फायदा ?"

" त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये. मी जेवढं सांगितले तेवढचं करायचं. "  हे बोलून  तीने फोन ठेऊन दिला.

" एवढं सगळं झालं राधा एवढ्या वर्षात एकदाही बोलली का नाही ?"

" मी काय म्हणून सांगू ?"

" अगं बाळा स्वतः ला एवढा त्रास करून घेण्यापेक्षा काय ते तेंव्हाच खरं समजलं असतं . बर ते झालं आता . मला एक सांग आज तुला अचानक कसे सांगावे वाटले ?"

" ते .... "

" मागच्या आठवड्यात कामानिमित्त मी नंदनच्या ऑफिस मध्ये गेले होते . तेंव्हा त्याच्या नजरेत तू का गेली असा प्रश्न दिसत होता . पण मी त्यावेळी अनोळखी नजर दाखवली त्यामुळे तो विषय तिथेच  संपवला . पण .... " असं म्हणत ती शांतच झाली . पुढे काहीही  बोलतच  नव्हती .

तो शांत पणे  तिचे निरीक्षण करत होता . रोहनला वाटले तिला तिचा अजून वेळ द्यावा म्हणून तो तिला म्हणाला , " राधा  बाळ , फार विचार करून नकोस . थोडावेळ विश्रांती घे . ये माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोप ये . "

तिला पण खूप आधाराची गरज होती . गेली चार वर्षे स्वतःला भक्क्म दाखवून तीपण  आता थकली होती .  त्यामुळे लगेच दादाच्या मांडीवर डोकं ठेवून पडली. डोळ्यातून अश्रू तर वाहत होते .  रोहन पण प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता .

खरोखरच आई वडिलांनंतर भाऊच आपला आधार असतो . आणि त्यात पण रोहनसारखा कायम पाठी उभा राहणारा असेल तर विचारायला नको .

दोघंही आपल्या आपल्या परीने विचार करत होते . रोहनच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं पण त्याने शिताफीने पुसून काढलं . तिला विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलं च नाही .  

तिला शांत झोपवून रोहन खोलीतून बाहेर आला आणि त्याने अमोदला लगेच फोन लावला .

" हॅलो , अमोद , रोहन "

" हॅलो बोल ना ."

" आपण एक तासाभरात भेटूया  का ? तुम्हाला शक्य आहे का ? "

" हो हो . भेटू . मी तुला पत्ता पाठवतो. तू तिथे ये . आम्हीपण येतो . "

" चालेल . " असं म्हणून रोहनने फोन ठेवून एकदा राधाला बघून आला तर ती शांत झोपली होती . तिचा फोन चा आवाज कमी करून तो बाहेर आला. बाहेर येऊन भांडभर पाणी पिला . तेंव्हा कुठे त्याला जरा बर वाटलं . आपल्याला पोचायला उशीर नको होयला म्हणून तो लगेच बाहेर पडला .


बाहेर पडल्या पडल्या त्याने बाबांना फोन केला . त्यांना सगळं व्यवस्थित आहे . काही काळजी करू नका . मी दोन दिवसात येतो असं सांगून फोन ठेवला .

इकडे अमोद ने प्रियाला फोन करून भेटायचे आहे तर तू निघ . मी इकडून निघतो .असं सांगितलं . अमोद आणि नंदन एकत्रच काम करत होते त्यामुळे नंदन सगळं ऐकत होता. त्याच पूर्ण लक्ष अमोद कडेच लक्ष होत .

प्रियाशी बोलून तो नंदन कडे बघितलं तर नंदन च लक्ष आपल्याच कडे आहे बघून तो नंदनला म्हणाला , " आम्ही आधी तिघे भेटतो . मग तुला फोन करतो मग तू ये . "

" चालेल. "

अमोद ने मानेनेच होकार देत तो निघालाच होता तर नंदन ने आवाज दिला , " अमोद "

अमोद वळून त्याच्याकडे बघू लागला तर नंदन ने त्याला एक घट्ट मिठी मारली. अमोद ने त्याला अश्वस्त केले  आणि तो निघून गेला .

नंदन तिथेच विचार करत होता . काय होईल याचा ????

तुम्हाला काय वाटतंय ? काय होईल ? ती श्रावणी काय करेल ?

बघूया पुढच्या भागात