Login

तूच माझी राधा भाग ५

एक प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग ५

मागील भागात आपण पाहिजे की, जोशी गुरूजी राधा ची पत्रिका घ्यायला  तिच्या घरी आले होते.

आया पुढे.

राजेन्द्र ने गुरूजींना सांगितले की तिचे शेवटचे वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न लावू पण आता फक्त ठरवछन ठेऊया. त्या लोकांना पुढच्या शिक्षणाची परवानगी पण आताच मागा. मगच असे चांगले स्थळ आणा.

गुरूजींनी होकार कळवला आणि ते चहा नाष्टा करूननिघून गेले. राधा लगेच बाबांच्या कुशीत शिरली. बाबांचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नंदन आवरून आईला आवाज देत आला. " आई, चलं नाष्टा दे. म्हणजे खाऊन मी निघतो. अमोद येईलच इतक्यात. "

" हो आणते रे नाष्टा.  बसं तू. "

" प्रिया, ऐ प्रिया. उठं ग . मी ट्रिप ला निघालोय . उठ ना ."

" काय दादा, काय कटकट आहे रे तुझी सकाळी सकाळी. "
तेवढ्यात अमोद आला. आधी गालतल्या गालात हसला अन् मग म्हणाला, " काय रे का ओरडतोय प्रियाच्या नावाने. "

" अरे आपण निघालोय ना. तर तीला काही सूचना नको का द्यायला. " प्रियाकडे बघून " लवकर घरी ये. आई एकटीच असते घरी. उशीराचं बाहेर फिरू नको. काही वाटलं तर मला लगेच फोन करं. अन् आई तू मी नाही म्हणून इकडे जा तिकडे जा करू नको. "

हे सगळं नंदन सांगतोय इकडे अमोद गालातल्या गालात हसतोय. तो हसतोय बघून प्रियाचे अजून डोकं फिरलं .  " अमोद म्हणाली, " ऐ माकडा तू दात नको काढू नाहीतर दादाला सांगून इथेच ठेवीन आँफिस बघायला कळलं का. "

" ऐ बाई, मी काय केलेय. मी माझा माझा नाष्टा करतोय. उगाच तुमच्या सूचनांन मध्ये मला नको घेऊ. काकू, मला वाढा अजून उपमा. "

त्याला  उपमा वाढून नंदनला म्हणाल्या, " आम्ही घेतो आमची काळजी. तू जातोयस तर जरा एंजॉय करं  उगाच सारखा फोन करून आम्हाला ही त्रास देऊ नको. आणि तूही करून घेऊ नको. आवरा अन् पळा लवकर. उशीर नका करू. "

" हो आई नाही करत फोन पण तुम्ही दोघी नक्कीकाळजी घ्या. "

नाष्ट झाल्यावर अमोद आणि नंदन निघाले. श्रीकांत व  बाकीच्यांना घेऊन' गणपती बाप्पा मोरया ' जोरात म्हणून प्रवासाला सुरूवात केली. रस्त्याने गप्पा मस्ती करत त्यांचा प्रवास चालू होता.

निघताना अमोद ने एकदी तीला मँसेज केला की, प्लीज रागवू नको. मी आल्यावर अख्खा एक दिवस तुझा. एवढे चार दिवस फक्त . मग तुझे नक्की ऐकणार."

नंदन गेल्या नंतर तासाभरातच जोशी गुरूजी आले. नंदनची आई आणि जोशी गुरूजी गप्पा मारत बसले होते. तेव्हा जोशी गुरूजी म्हणाले, " अहो ताई, मी एक  तुम्हाला योग्य स्थळ आणलं आहे. पण त्या कन्येची एक अट आहे?" अट म्हणाल्यावर ताईंचे डोळेच मोठे झाले.

ताईंच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून गुरुजी म्हणाले ," अहो ताई, घाबरू नका. कन्येचे एवढेच म्हणणे आहे की तीला अजून पुढे शिकायचे आहे. "

" एवढचं ना. मी घाबरलेच. आता जमाना बदलत चालाय तर काय नवीन अट असेल या भीतीने. पण असो. आमची काही हरकत नाही. तिचा काही फोटो, माहिती ?"

" हो आणलीय ना. " त्यांनी पिशवीतून काढून ताईंच्या समोर ठेवली.  तीचा फोटो आणि माहिती ताईंना दिली.

फोटो बघून ताई म्हणाल्या, " अरे व्वा, किती गोड दिसतीय मुलगी. बघताच क्षणी आवडली मला. नाव पण किती गोड ' राधा '  तुम्ही हिची पत्रिका जुळतीय का बघा. तोपर्यंत मी मुलाला आणि मुलीला दोघांनाही दाखवते. पण मुलगा चार दिवस गावाला गेलीय तर तो आला की पुढचं ठरवू. "

"अहो, मी पत्रिका आधीच बघितलीय.  अगदी ३० गुण जुळतायत. अन् त्यांचा संसार पण सुखाचा होईल. अगदी छान पत्रिका जमतीय. "

" अरे व्वा , छानचं . थांबा तोंड गोड करते. " असं म्हणून त्या गुरूजींसाठी खायला आणायला गेल्या.

"ऐ दादा, दादा कुठेयस तू ?" राधा दादाला आवाज देत फार्महाऊस पालथे घालत होती अन् एकीकडे दादा ओरडणं चालूच होतं.

" का गं ओरडतीय एवढी. काय झाल ?"

" अरे, खोल्या तयार आहेत मी आईला स्वयंपाकात मदत करायला जाते. "

" बरं ठिक आहे जा. "असं म्हणून ती बाहेर आली तर गेटपाशी मुले फोटो काढत होती तर नंदन बाजूला जाऊन रोहनलाच फोन लावत होता. ती चौकशी करायला जाणार तेवढ्यात तीला आईचा फोन येत होता म्हणून ती तशीच निघून गेली.

नंदन आणि रोहन च बोलणं झालं म्हणून तो अमोद ला म्हणाला, " हेच घर आहे. चला आत जाऊया. "

तेवढ्यात समोरून रोहन आला. तो नंदनला बघून म्हणाला ," या नंदन साहेब.  तुमचीच वाट बघत होतो. "

" हँलो, आम्ही ६ जण आहोत तर आम्हाला आता थंड काही मिळू शकेल का ?"

" हो देतो ना. तुम्ही आत खोल्या आहेत तिथे जाऊन फ्रेश व्हावा. मी आणतोच तोपर्यंत. " असं म्हणून रोहन ते आणायला तर ही मंडळी आत गेली.

" आई ते लोक आलेत बहुतेक. "

"तुला कसं कळलं ग राधा ?"

" अग मी येत होताते तर गेटपाशी लोकं उभी असताना दिसली. बरं सांग पटकन काय करायचे आहे ते. "

दोघी बोलत बोलत स्वयंपाक करत होत्या.  तेवढ्यात रोहन आला.
" आई, जरा मस्त आवळा सरबत करं थंड पाहिजे . मग थोड्यावेळाने जेवतो म्हणालेत. "

"बरं करते." आई राधा कडे बघून म्हणाली " करं ग जरा. माझे हात कणकेचे आहेत. " राधा मान हालवून सरबत करायला लागली.

अमोद नंदनला म्हणाला, "  अरे नंदन , तू फोन वर बोलत होताना तर तुझ्या शेजारून एक मुलगी गेली तू पाहिलीस का ?"

" नाही , का रे ?"

" एकाच बाजूने दिसली तर चांगली वाटली म्हणून .. "

" अरे गप्प, झाला लगेच सुरू. "

" अरे तसं नाही, मी काय माझ्यासाठी नव्हतो पाहात . "

" मग, कोणासाठी?"

" अरे तुझ्यासाठी "

" काय माझ्यासाठी?, गप्प. कालच आईने विषय काढला होता लग्नाचा.... " काहीसा विचारत करत म्हणाला, " तुला आईने सांगितले आहे का मला मुलगी बघं म्हणून. "

" ह्या, मला कशाला सांगतील. मी भेटलो तरी आहे का काकूंना. "

" मग मध्येच काय हे ?"

" काय आहे ना तुम्ही पडले सरळमार्गी, तुम्ही कधी डोकवून बघणार मुली. म्हणून मीच तुला दाखवून देतोय म्हणजे तुला एखादी आवडलीच तर काकूंच काम हलकं होईल ना. "

तो काहीतरी विचार करत म्हटला, "नंदन, आपण तुला गावातीलच मुलगी बघू . चालेल ना?"

बघूया पुढच्या भागात काय म्हणतोय नंदन ते ?