Login

तूच माझी राधा भाग ८

तीची आणि त्याची कथा
तूच माझी राधा

भाग ८

मागील भागात आपण पाहिले की, सगळे समुद्रावर आले आहे. सूर्यास्त व्हायला सुरूवात झालीय. म्हणून ते बघत बघत नंदन समुद्राच्या जवळ जाऊन उभा आहे. थोड्यावेळाने अमोद पण येतो. ते दोघं एकमेकांशी बोलतय.

आता पुढे

अमोद म्हणाला, " काय रे , कोणता विचार करतोय?  "

नंदन म्हणाला, "  अरे बघ ना. आज तुझ्यामुळे बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा मी एवढा हासलोय. आई आणि प्रियाच्या जबाबदारी मुळे मी स्वतःला एवढं गुरूफुटून घेतलाय. स्वतः चं असं अस्तित्वच नाही राहिलं.

आता त्यात आई लग्नासाठी मागे लागलीय. अजून तिची एक जबाबदारी. कसं होणार ? याचा विचार करत होतो. आई फिरून फिरून त्याच विषयावर येतीय. मला तर काय कराव तेच कळतं नाहीये. "

तेवढ्यात स्वामिनी ने हाक मारली. " अमोद, नंदन चला ना भूक लागलीय. चला लवकर "

लगेच श्रावणीने पण रिघ ओढली, " हो खरचं भूक लागली चला ना "

अमोद म्हणाला," आलो भूक्कड." असं म्हणतच ते दोघं त्यांच्यापाशी आले. श्रावणीकडे बघतच म्हणाला, " सारखं खायचं बघ. जरा वातावरणाची मज्जा घ्यायची तर चालली लगेच खायला. " असं म्हणत तिच्या डोक्यात टपली मारली.

नंदन म्हणाला, " तरी आताच श्रीकांतने भेळ आणि नारळपाणी आणून दिलं ना लगेच लागली भूक. "

" ऐ गप्प , तू पण त्याचासारखा बोलायला लागला. "

श्रीकांत म्हणाला," जरावेळ बसू गप्पा मारू मग जाऊ. हिच्याकडे नका लक्ष देऊ. " चर्चेत अजून थोडावेळ थांबायचे ठरले मग बसले तिथेच गप्पा मारत.

गप्पांच्या नादात किती वेळ झाला त्यांना कळलेच नाही. शेवटी रोहनचा फोन आला तेव्हा त्यांनी घड्याळ बघितले आठ वाजून गेले होते. आजूबाजूला पाहिले तर किनाऱ्यावर पण फार लोकं दिसत नव्हती.

रोहनशी फोन वर बोलून नंदन म्हणाला, " चला निघूया. त्यांचं जेवणाच तयार आहे. ते आपली वाट बघतायत आपण निघूया आता. "

सगळे एकदम म्हणाले, " हो चला चला निघूया. "

तेवढ्यात स्वामिनी म्हणाली, " हो चला लवकर. मी ऐकलय कोकणात रात्रीचं भूत असतात. मला तर भिती वाटते आपण जाऊया. उद्या परत येऊया. "

असं तिने म्हटल्यावर श्रावणी थोडी घाबरली पण मनात असं काही नसते अशी समजूत काढून त्यांच्या बरोबर चालायला लागली.

इकडे श्रीकांत आणि अमोदचे रात्री काय करायचे याचे  आराखडे बांधायला सुरूवात झाली. दोघं एकमेकांच्या गळ्यात हात घालून चालले होते . त्यामुळे ते यांच्या पासून अंतर ठेवून चालत होते.

सगळे फार्महाऊस वर येऊन फ्रेश होऊन जेवायला आले. गप्पा मारत जेवण झाल्यावर रोहन घरी निघून गेला.

घरी आल्यावर बाबा पण आले होते म्हणून सगळे एकत्र जेवायला बसले .जेवता जेवता मध्येच राधा म्हणाली, " आज ना मी काँलेज वरून येताना एक गंम्मतच झाली. "

रोहन म्हणाला, " काही उद्योग केला नाही ना ?"

"अरे ऐक तर , मी काँलेज वरून येत होते तर आपला पक्या आणि त्याचे मित्र गोट्या खेळत होते. तर तिथे एक आपला वयाचा मुलगा येऊन त्यांच्यात खेळत होता. मी येताना बघत होते तो मुलांना गंडवत होता खेळात. म्हणून मी जाऊन त्यांना सांगितले की " हा ना खेळात लबाडी करून जिंकतोय " तर तो मुलगा म्हणाला, " नाही रे मुलांनो मी काही गंडवत नाहीये " तर मीच त्याला म्हटले ," माझ्याशी खेळून दाखव. बघू कोण जिंकतोय. "

यावर रोहन म्हणाला, " हारली असशील ना ?"

राधाने बारीक तोंड करून विचारले, " हो तुला का कसं कळलं  ?" 

"आल्या आल्या तुझा चिडका चेहरा बघूनच लक्षात आलं होतं काही तरी झालयं पण मला बाहेर जायचं होतं त्यामुळे तुला तेव्हा नव्हतं विचारले. "

बाबा म्हणाले, " जाऊ दे . जेवा आता. "

*****

" प्रिया ,  अगं तुला माहितीय , आज ना जोशी गुरूजी आले होते. त्यांनी एक स्थळ आणलय दादा साठी. हा बघ फोटो . "

" फोटोत तर छान दिसतीय पण ..... "

" हे बघं तूला , दादा ला आवडली तर पुढे जायचयं. तोपर्यंत नाही. "

" हा मग ठिकआहे. मी आधी तिच्याशी बोलेन. मला योग्य वाटली तर सांगेन. "

" बरं बाई. दादाच्या आधी तूच भेट मग तर झालं. "

" हां मग ठिक आहे. पण आई दादाला सांगितले का नाही ?"

" नाही. मी आता काहीच सांगणार नाही. तो आला की बघू. ऐक तर खूप दिवसांनी असा मित्रांसोबत बाहेर गेलाय. त्याला मज्जा करू दे मग आल्यावर बघू. "

" हो बरोबरच आहे आणि त्यात अमोद बरोबर आहे म्हटल्यावर काही विचारायला नको. "

" का गं  सारखं त्या अमोद ची खोडी काढत असते?"

" मी नाही तो पण काढत असतो. "

" असो. बरं चलं जेवून झोपूया. उशीर होतो मग सकाळी आवरायला. मला उद्या अमोदच्या घरी पण जायचयं "

" बरं चलं. मी काँलेज सुटल्यावर तिकडेच येईन. मग एकत्र येऊ घरी."

दोघी एकत्र जेवून आवरून झोपायला जातात. पण प्रिया थोडावेळ अभ्यास करत बसते.


*****

नंदन आणि सगळे जेवण करून शेकोटी करून त्याच्या भोवताली बसून गप्पा मारत होते.

मध्येच श्रावणी  सगळ्यांना उद्देशून म्हणाली, " कोणी लग्नाचा विचार केलाय का नाही ? माझी आई आताच मागे लागलीय. तिने एकदोन स्थळ बघायला सुरुवात केलीय. ती ना माझं काही ऐकतच नाही. "

हे ऐकल्यावर अमोद आणि श्रीकांतने एकमेकांनाकडे बघितले. अमोद हळूच श्रीकांतच्या कानात बोलला, " लवकर हालचाल करावी लागेल नाही तर रामकृष्ण हरी म्हणत बसावे लागेल. "

" ऐ गप्प , तू आधार देतोय की माझे खच्चीकरण करतोय. "

" अरे मी तुला जाणीव करून देतोय. "

तेवढ्यात श्रावणी म्हणाली, " ऐ दोघांच काय गुलूगुलू चालय"

दोघेही एकदम म्हणाले, " आमचं ! ... काही  नाही. "

स्वामिनी म्हणाले, " नाही. तुम्ही अजिबात काही बोलले नाहीत. आम्हीच एकमेकींच्या कानात बोलत होतो. हो ना ग श्रावणी?"

" हो तर. आपण एक काम करूया. आपण जाऊया तिकडे मस्त गप्पा मारूया. ह्यांना बसू दे गुलूगुलू करत. "

" ऐ गप्प बसा."  असं नंदन म्हणाल्यावर सगळे शांत झाले.

तेवढ्यात रोहन काँफी घेऊन आला. काँफी देऊन रोहन चाललाच होता तर नंदनने त्याला थांबवले आणि आपल्या गप्पांमध्येच सामील व्हायला सांगितले.

बघूया पुढच्या भागात रोहन थांबतोय का?