Login

तूच माझी राधा भाग १५

प्रेमाची गोष्ट


तूच माझी राधा
भाग १५

मागील भागात

आजी मध्येच म्हणाली, " अहो गुरूजी बुवा, तुम्ही कोणती स्थळ आणलीयेत ती तर सांगा."

" अहो आधी कडक चहा घेतो. मी जरा दमलोय. मग बोलूया चालेल ना?"

" अहो चालेल की. हे बघा राधा चहा घेऊन आलीच.  रोहन पण आला. राधाचा हातचा फक्कड चहा घेऊ मग बोलूया. "

आता पुढे

गुरूजी म्हणाले, " हे बघा, ही पाच स्थळ आहेत. त्यातील ही दोन स्थळ आहेत ती उत्तम जुळतायत. बाकी तीन थोड्या कमी गुणांनी जुळतायत. आता तुम्ही नीट वाचा, फोटो बघा आणि विचार करून मला कळवा ."

बाबा म्हणाले, " आम्ही नीट बघतो. राधाचं काय मत आहे ते पण बघूया. पण गुरूजी तुम्ही या सगळ्या लोकांना तिच्या शिक्षणाबद्दल सांगितले आहे ना ?"

" हो सांगितले आहे. त्यांच आता तरी काही मत नाहीये. तरी आपण जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा स्पष्ट बोलून घेऊया. "

" ठिक आहे. " असं म्हणून बाबा आणि रोहन पत्रिका  बघायला लागले.

रोहन म्हणाला, " गुरूजी, या पत्रिकेत त्यांचा फोटो नाहीये."

" अरे, विसरलो त्यांच्याचकडे. हो पण स्थळ सगळ्या बाजूने उत्तम आहे. फक्त त्याचे  वडिल अपघाती वारलेत. पण त्यांच्यावर आईने उत्तम संस्कार केलेत आणि मुळात म्हणजे राधा त्यांच्या घरात अगदी मुलीसारखी राहिलं. "

आजी म्हणाली, " अरे व्वा, गुरूजी तुम्ही सांगताय तर हे स्थळ उत्तमच आहे. आपण ह्या स्थळाच्या बाबतीत पुढे जाऊया...."

तेव्हढ्यात रोहन म्हणाला, " अग आजी , थांब घाई करू नको. उद्या दिवसभर नीट विचार करू मग ठरवू. "

गुरूजींकडे बघून म्हणाला, " यांचा फोटा मिळाला तर बघा. "

गुरूजींनी मान हालवली. अन् सगळ्यांकडे बघून म्हणाले, " आता मी निघतो. तुम्ही विचार करून ठरवा आणि मला कळवा . मग पुढचे मी मार्गी लागतो. चला येतो नमस्कार " सगळ्यांनी पण उभे राहून नमस्कार केला. इतक्यावेळ शांतपणे चर्चा ऐकणाऱ्या राधाने चहा नाष्ट्याचं उचलून स्वयंपाक घरात निघून गेली. तिच्या मनात विचारचक्र सुरू होतं.

आता ह्यातील एक जरी स्थळ घराच्यांना आवडलं अन् लग्न ठरलं तर... आपलं पुढचं शिक्षण???? आपलं ध्येय कसं साध्य होणार. ? दादा कितीही म्हटला लग्न करणार नाही तरी एखाद्या मुलाकडून होकार आला .....

आता लग्नाला नकार द्यायला कारणं शोधावी लागेल. रात्री मुक्तालाच फोन करते आणि बघते काही मार्ग निघतोय का ते ? आता इथून सटकू नाहीतर आताच धरतील मला.
असा विचार करून ती निघतचं होती की बाबांनी आवाज दिला, " राधा "

आवाज ऐकून राधा बाबांच्या जवळ येऊन म्हणाली, " काय झालं बाबा ?"

" अग काही नाही. तुझा अभ्यास कसा चालू आहे ?"

असा प्रश्न ऐकून राधा आधी तर त्यांच्याकडे बघायलाच लागली. ती काहीच उत्तर देत नाही बघून परत बाबा म्हणाले, " काय ग, कश्याचा विचार करतीय ?"

राधाने भानावर येत म्हणाली, " नाही. कश्याचा नाही."

" मग मी तुला विचारले की तुझा अभ्यास कसा चालालय?"

" हो छान चालू आहे. आता पुढच्या महिन्यात  सत्रांत परीक्षा येईल . त्यामुळे जोरात चालू आहे. "

" अभ्यासाकडे नीट लक्ष दे. चांगल्या मार्काने पास व्हायला हवे. "

" हो माझं नीट लक्ष आहे. यावेळी पण उत्तम मार्काने पास होईल. त्याशिवाय पुढचं शिक्षण कसं होईल."

मध्येच आजी बोलली, " अरे राजेन्द्र , काय चालूय तीला स्थळाविषयी विचारायचे तर शिक्षणावर काय चर्चा करतोय ?"

रोहन म्हणाला, " बरोबरच आहे आजी बाबांचे. तिचे शिक्षण महत्त्वाचे आहे लग्न नाही. "

" अरे पण, या स्थळांचे काय करायचे ?"

" अगं आई, जरा थांब. दोन दिवस  जाऊदे . मी आधी नीट चौकशी करतो. मी आणि रोहन आधी त्या मुलांच्या घराच्याशी बोलतो मग ठरवू पुढे. "

" बरं. करा तुम्हाला काय करायचेय ते. मला मेलीला कोण विचारेल. " तणतण करतच आजी निघून गेली. आई पण घरातले आवरायला गेली .

आता तिथे फक्त रोहन , राधा आणि बाबा राहायले. रोहन म्हणाला, " हे बघ राधा, तुला पुढे काय शिकायचेय ते ठरवले आहेस का ? म्हणजे आम्हाला त्यादृष्टीने समोरच्यांशी बोलता येईल. ही एक गोष्ट. आणि दुसरे म्हणजे तू आता च लग्नाला तयार आहे का ते आधी सांग. नाहीतर आपण अजून थोडे दिवस वाट बघूया. "

" दादा, मी आता तरी तयार नाहीये. आपण एवढी सत्रांत परीक्षा संपली की विचार करूया असं मला वाटते. एकच महिना राहिलाय तर कशाला गडबड. "

बाबा म्हणाले "  बाळा, तुझं बरोबर आहे. आपण थांबूया. बघू तुझी परीक्षा झाल्यावर. आता फक्त परीक्षेकडे लक्ष द्यायचा. हा झालेला विषय इथेच सोडून द्यायचा. जा आता अभ्यास कर. "

" धन्यवाद बाबा.. मी परीक्षेत उत्तम मार्क पाडून दाखवेन." असं म्हणत तिने बाबांना मिठी मारली आणि दादाकडे बघून डोळयांनीच धन्यवाद म्हणाली.

हे सगळं आई आतून बघत होती. तिला आपल्या पोरीची इच्छा पुर्ण होतीय हे बघून मनासिक समाधान मिळाले. आपल्या वेळी आपल्या वडिलांनी असा विचार करून मला पण पुढे शिकून द्यायला हवे होते. पण असो... जे झालं ते झालं. आता माझ्या पोरीच्या बाबतीत मी तिच्या पाठिशी उभी राहणार.  असा मनातच विचार करून ती आनंदाने घरात गेली.

रोहन पण बाबांना म्हणाला " बाबा, खरचं तुम्ही जगातील बेस्ट बाबा आहात.  मी तुमच्या बरोबरीने राधाच्या शिक्षणाची काळजी घेईन. "

हासून बाबा म्हणाले, " फक्त राधाची नाही तर तुझ्या येणाऱ्या बायकोच्या पण शिक्षणाची जबाबदारी घ्यायची आहे. तुझ्या आईच्या बाबतीत जे झालं ते आता तुझ्या बायकोच्या बाबतीत नको व्हायला. "

तेव्हाढ्यात आजी बाहेर आली, " काय रे राजेन्द्र, तुझ्या बायकोच्या बाबतीत काय झालं ?"

" अग आई, विशेष काही नाही. जाऊ दे तो विषय. मी काय म्हणतो आई?"

" काय ? आता तुझचं ऐकायचं माझं म्हातारीची कोण ऐकणार ना ?"

" अगं आई , तुझच ऐकतोय. पण काय म्हणतोय ते ऐक, थांब रमाला बोलवतो मग दोघींना एकदम सांगतो. " अस म्हणून त्यांनी रमाला आवाज दिला.

हाका मारल्यावर आई पण बाहेर आली. मग बाबा म्हणाले, " हे बघा. मी आताच राधाला सांगितलेय की ,  तीने शेवटच वर्ष आहे तर अभ्यासावर पूर्ण लक्ष दे आणि आलेल्या स्थळांचा आता विचार करू नकोस. तोपर्यंत मी आणि रोहन सगळ्या स्थळांची चौकशी करतो . त्यातील जो योग्य वाटेल त्याच्याशी आम्ही आधी भेटून येऊ मग बघण्याचा कार्यक्रम करू. "

" अहो तुम्ही बरोबर करतायत . असचं करा मीपण तिच्यासमोर लग्नाचा विषय काढणार नाही. "

" आई, झालं का आता तुझ्या मनाप्रमाणे. "

रोहन म्हणाला, " हो ना परत म्हणशील माझ्या म्हातारीच
कोण ऐकतेय. " सगळे हासायला लागले.

इकडे राधा खोलीत येऊन मुक्ताशी बोलण्यासाठी फोन करू लागली. पण ती फोनच उचलत नव्हती.  त्यामुळे ती नुसतीच येरझाऱ्या घालत होती.  मनाची घालमेल पण.कमी होत नव्हती. सारखी तिला फोन लावत होती पण.... तिला आता काय करावे सुचूतच नव्हते.

रोहनने आपल्या खोलीत जाताना तिला पाहिले तर ती येरझाऱ्या घालताना दिसली. म्हणून त्याने राधा आवाज दिला . पण राधा आपल्याच तंद्रीत होती. शेवटी रोहनने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तर तीने घाबरून मागे सरकली.

रोहनने तीला जवळ घेऊन म्हणाला, " राधा, बाळा मी आहे एवढी काय घाबरतेयस ?"

" दादा ,तू..."

" हो मीच. बस इथे. शांत हो आधी .धर पाणी पी. "

ती पाणी पिऊन जरा शांत झाल्यावर रोहनने परत विचारले, " काय झालं ? का घाबरलीस ?"

बघूया पुढच्या भागात राधा काय उत्तर देतीय ते.