तुही मेरा... (भाग १०)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग १०


नयना चा राग बघता राघवला कळाल की तिचा पारा अजून का चढला... पण मीनलची बकबक नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि राघव काही बोलणार इतक्यात नयना तशीच दुसरीकडे निघून गेली.. (बिचारा राघव ????‍♂????)

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राघव कॉलेजला जातो. लेक्चर्स अटेंड करुन राघव आणि त्याचे मित्र कँटीनमध्ये मजा मस्ती करत असतात.. थोड्यावेळाने तिथे मीनल येते..

राघव : मीनल!! तु इथे काय करतेस ??

मीनल : तुझ कॉलेज पहाण्यासाठी आले..

राघव : पण तुला परमिशन कशी मिळाली आत येण्याची...

मीनल : no no.. Watchmen didn't allow me.. Your principal Sir... He gave me a permission... ????

राघव : really?? But how ?? ????

मीनल : are you sure ??? You need a explanation ?? ????

अभय : हा.. आम्हाला ऐकायच आहे..

राघव नाही म्हणत असतानाही मीनल सुरू झाली..

मीनल : actually your principal Sir.. माझ्या मॉमच्या एक्स कॉलेजचे प्रोफेसर होते.. मी जेव्हा स्माॅल होते तेव्हा मॉमसोबत असताना एकदा त्यांना भेटले होते.. On that time we are staying in India.. बस मी त्यांना पाहिल आणि ओळखल.. ????

अभय : तुला लहानपणी पाहिलेला चेहरा अजून आठवला? ? ????

मीनल : ईल्ले.. नो नो... तस नाही..

राघव : ????‍♂ राहु दे मीनल.. ते गरजेचे नाही.. Meet my friends.. अभय, प्रमोद.. ( आणि एक एक करून तो बाकीच्यांची ओळख करुन देतो )

इतक्यात नयना तिथे येते.. ???? अभय नयनासोबत मीनलची ओळख करून देतो.. नयना काहीच रिप्लाय न देता एका टेबलवर बसते.. राघवच लक्ष नयनावरच स्थिरावलेल होत..???? आणि नयना ती आपल्या मीनलला बघून आतून लालबुंद होत होती.. ???? मीनलसाठी सगळे रात्री ढाब्यावर जेवणाचा प्लॅन बनवतात.. अभय नयनालाही invite करतो.. ती आधी नाही म्हणत असते पण नंतर दिप्तीसाठी तयार होते..

थोड्यावेळाने रीसेस संपते आणि सगळे पुढचे लेक्चर्स अटेंड करायला क्लासरूमध्ये जातात.. मीनलही निघतच असते.. नयना अजून तिथेच असते.. मीनल तिला library चा रस्ता विचारते.. लेक्चर्स संपेपर्यंत काही वाचत बसू तेवढाच टाइमपास असा मीनल विचार करते.. नयनाने सांगितल्याप्रमाणे मीनल दुसऱ्या मजल्यावर जात असते तर अचानक तिच्या डोक्यावर छोटा खडक लागतो..

नयना नेहमी तोंडपाठ असल्याप्रमाणे लायब्ररीचा रस्ता तर सांगते पण नंतर तिच्या लक्षात येत की तिथे दुरुस्तीच काम चालू आहे ती पळतच मीनलच्या मागे जाते पण त्याआधीच मीनलला खडक लागला होता आणि बऱ्यापैकी रक्तही येत होत..

नयनाने मीनलला घेतली बाहेर एका बेंचवर बसवले..

नयना : तु ठिक आहेस ना?? I am sorry मी सवयीप्रमाणे तुला हा रस्ता सांगितला.. मी विसरलेच होते की इथे दुरुस्तीच काम चालू आहे...

मीनल : It's okay..

नयना : चल फस्ट एड करून देते.. ( तिच्या जखमेवर रूमाल धरून )

मीनल : It's okay नयना.... All fine..

राघवला समजताच तो पळतच तिथे येतो.. त्याला वाटले की नयनाने मुद्दाम हे केले.. त्याच्यावरचा राग तिच्यावर काढला.. म्हणून राघव नयनावर भडकतो पण जास्त वाद न घालता मीनलला डॉक्टरकडे घेऊन जातो..

नयना आणि राघवचा वाढता दुरावा बघता अभयने नयनाला गाठले आणि स्पष्टच विचारले.. तेव्हा नयनाने त्याला विरेन कडून कळलेल्या गोष्टी आणि कँटीनमध्ये ऐकलेल्या मित्रांच्या गप्पा सांगितल्या..

अभय : नयना मला खर सांग तुझ राघववर खर प्रेम आहे ना??? आणि जर खरच आहे तर मग तु राघववर विश्वास न ठेवता एका परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवलास.. विरेनला जयपूर बद्दल कस माहीत पडल हे मला माहीत नाही पण हा पैज मी लावली होती मित्रांसोबत राघवने नाही.. तो तर तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाइक करतो आणि जेव्हापासून त्याला कळल की तुही त्याला लाइक करतेस, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.. नयना we are mature.. तुला खर खोट ओळखता नाही आल...जर काही प्रोब्लेम होताच तर निदान आधी त्याच्या सोबत क्लिअर करायला हवा होता सरळ सगळ्यांसमोर कानाखाली मारली..

नयना : (आपलीच चूक झाली हे कळल्यावर) शीटट.. हे मी काय केल...I'm sorry अभय....????

अभय : Sorry मला नाही तर राघवला बोल... पण आता कठीण आहे.. (उगाच चिडवत) ????

नयना : म्हणजे ?? ????

अभय : राघवचा राग तुला माहीत आहे आणि आता तर काय मीनल आहे जोडीला.. ????

नयना : तस होणार नाही.. मी आता जाउन त्याला sorry म्हणते..

नयना सुद्धा राघव आणि मीनलच्या मागोमाग जाते.. राघव जवळच्याच दवाखान्यात मीनलला घेऊन जातो.. डॉक्टर मीनलला मलमपट्टी करत बसतात.. रस्त्यात दवाखान्या जवळ राघवची बाईक बघून नयना थांबते.. गाडी बाजूला लाऊन राघव दवाखान्यातून बाहेर येण्याची वाट बघत बसते…

(आत दवाखान्यात )

मीनल : राघव I am fine.. हे तु इथे कशाला आणल ??

डॉक्टर : please keep quiet… Seat properly.. 

मीनल : अय्यो डॉक्टर… My friend is crazy little bit.. 

राघव : मीनल जरा गप्प बस.. किती बोलशील?? 

ड्रेसिंग झाल्यावर दोघेही घरी जायला निघाले.. त्यांना बाहेर येताना बघून नयना गाडीतून खाली उतरली.. राघवने नयनाला बघुन न बघितल्यासारखे केले आणि बाइकवर बसला.. मीनल मात्र नयनाला बघून थांबली..

राघव : (थोडा रागात गाडी स्टार्ट करत) मीनल चल बस… 

नयना : राघव!!! मला तुझ्याशी बोलायच आहे… 

राघव : मीनल बस लवकर आपल्याला घरी जायला उशीर होतोय… (नयनाकडे दुर्लक्ष करत)

मीनल : राघव she wants to talk with you.. 

राघव : but I’m not interested.. Let’s go मीनल..

मीनल बाइकवर राघवच्या मागे बसते.. नयना बाइक पकडून राघवकडे बघत असते.. राघव गाडीला acceletor स्टार्ट करतो… तो त्या acceletor च्या माध्यमातून च नयनाला सांगत असतो की तु बाजुला हो आम्हाला निघायच आहे.. नयनाची नजर, राघवची नजर शोधत असते पण राघव तिच्याकडे बघतसुद्धा नाही.. आणि उभ्या जागी बाईकला acceletor देत असतो… आता आवाज कर्णकर्कश होत चालला होता शेवटी नयनाने गाडीवरची पकड सैल केली आणि बाजुला झाली.. नयना दूर होताच राघव मिनलला घेऊन निघुन गेला…

नयना हतबल होऊन फक्त बघत राहिली.. मनातल्या मनात “राघव सॉरी ना.. ” म्हणत स्वतःलाच दोष देत होती.. पण येवढ्यात हार मानणारी नयना नव्हती.. आपले पाणावलेले डोळे पुसत गाडीत बसली आणि अभयला फोन केला…


क्रमशः


(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all