Login

तुही मेरा.. (भाग १)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे

तुही मेरा...

भाग १ 

college ची बास्केटबॉल प्रॅक्टिस मॅच सुरू आहे.... सगळीकडे फक्त राघव.... राघव... ????

राघव... राघव.... जल्लोष सुरू आहे...

बाॅल विरूद्ध टीमच्या खेळाडूच्या हातात आहे ते एकमेकांना बॉल पास करत असल्याचे भासवत होते पण बॉल काही हातातून सुटत नव्हता त्यांच्या... अचानक राघवने त्याचा गेम खेळत समोरच्या खेळाडूच्या हातून बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि मग काय पहिल्याला धक्का, दुसर्याला हुलकावणी, तिसर्याच्या दोन पायांमधून बॉल पास करत परत आपल्या ताब्यात घेऊन, चौथा आणि पाचव्याला रडकुंडीला आणून फानयली he jump over the sixth player.... And it's a basket.... Wo ho ooooo....

सगळीकडे परत एकच जल्लोष सुरू झाला ... राघव ..... राघव...

मुली तर अक्षरशः त्याच्यासाठी वेड्या होत्या.... त्याची एक नजरभेट आणि स्माईल पाहण्यासाठी सतत त्याच्या अवतीभोवती असायच्या.... सगळे खेळाडू गेम चांगला झाल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत होते... गर्दीचा जल्लोष बघून राघवने गर्दीकडे बघून एक flying kiss ???? केल तस गर्दीतल्या मुली तर अगदी वेडावल्या...

राघव देशमुख कॉलेज टॉपर आणि बास्केटबॉल चॅम्पियन... उंच धिप्पाड, गोरापान, सरळ नाक, कर्ली ब्राऊन हेअर.. एकदम स्टायलिश लुक... एक श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा... Attitude अगदी ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा आमचा राघव... दिसण्याचा गर्व नाही की श्रीमंतीचा माज नाही असा हा कॉलेजचा सर्वांचा लाडका राघव...

प्रॅक्टिस संपवून राघव आणि त्याचे मित्र कँपसच्या बाहेर पडत होते... तस त्यांच्यातल्या एकाने सगळ्यांना एका क्लास रूम बाहेर थांबवले... वाकून पाहिल तर तिथे डान्स प्रॅक्टिस सुरु होती...

अभय : Hey look.... नयना... (excited होऊन)

राघव : come on अभय... Please... आता इथे नको...

अभय : काय यार साल्या तुझ नेहमीच आहे...अरे नयना आहे ती... सगळे मुल हिच्या मागे मागे आणि तु??? तुलाच ठाउक....

राघव : ok ok आता तु परत सुरू होऊ नकोस... मी थांबतो इथे तुम्ही जा आत आणि बघा प्रॅक्टिस...

अभय आणि त्याचे बाकी मित्र पुढे गर्दीत मिसळून नयनाची प्रॅक्टिस बघत बसतात...

नयना कारखानीस.... उंच, देखणी, बोल्ड आणि ब्युटीफूल... कारखानीस जे एक बिझनेसमन आहेत त्यांची एकुलती एक मुलगी... अतिशय रागीट ... पण मनाने हळवी... हिलाही attitude ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला नेहमी हजर... कथकमध्ये well trained... कॉलेजच्या मुलांच्या दिलाची धडकन...

नयना आणि तिच्या पार्टनरने चांगलाच ठेका धरला होता पण अचानक एका ठिकाणी येऊन तिच्या पार्टनरची पकड सैल झाली आणि नयना खाली पडली... तस गर्दीतून एकाचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला... आता पर्यंत बाहेर बसलेला राघव आत येऊन कधी प्रॅक्टिस बघायला लागला हे त्याच्या मित्रांणापण कळल नाही... आणि तो नयनाच्या पडण्यावर हसत होता... गंमत समजून तिथे उभे असलेले काही नवीन स्टुडंट तेही राघवला शामिल झाले पण अभय आणि जे लोक नयनाला चांगले ओळखत होते त्यांनी शांतच रहाण पसंत केलं कारण नयना अजून शांतच होती... अशा परिस्थितीत नयनाच शांत राहण म्हणजे वादळापूर्वीची शांतता....

नयनाने एक नजर राघवकडे पाहिल ???? तो अजूनही पोट धरून हसत होता... तिच्या पार्टनरने तिला उठण्यासाठी मदतीचा हात दिला पण ती स्वतःहून उठली आणि उठल्याबरोबर आपल्या पार्टनरच्या एक कानशिलात लगावली... तस सगळीकडे भयाण शांतता पसरली...

नयना : (आपल्या पार्टनरला) एक महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे... लक्ष कुठे असत तुझ...???

विरेन जो नयनाचा पार्टनर आहे तिला सॉरी बोलुन परत प्रॅक्टिसला सुरूवात करतो... पण नयना आता अजूनही भडकलेलीच होती...

नयना : कितीदा सांगितले आहे प्रॅक्टिस सुरू असताना क्लासरूमच दार बंद करत जा म्हणून.... आणि ती गर्दीवर एक कटाक्ष टाकते... ????

तिचा राग बघताच सगळेच हळूहळू तिथून सटकतात...

राघव : (त्याच्या मित्रांना) तुमच झाल असेल तर आपण निघायच का??? फालतू मध्ये टाईम वेस्ट केला... नाचता येईना आंगण वाकडे.... ????

नयना : Hey you mind your tongue हा... ????

तसा राघव तिला प्रत्युत्तर देणार इतक्यात राघवचे मित्र

आता यांच इथे भांडण जुंपणार हे ओळखून त्याला घेऊन बाहेर जातात...

राघव आणि नयना दोघेही कॉलेजचे टॉपर... आणि सर्वांचे रोल मॉडेल... एक दोन मार्कांच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नयना पुढे... या दोघांच एकदिवसही पटत नाही... हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे.....

राघव आणि त्याचे मित्र आपापल्या घरी निघून गेले...

राघव : (घरी आल्यावर) hiii आई.... खूप भूक लागलीये.... (सोफ्यावर अंग टाकतच तो म्हणाला)

आई : हात पाय धुवून घे.... मी जेवायला वाढते...

राघव : नको तु असच आण खूप भूक लागलीये....

आई : कधी सुधरणार तु??? (हलकेच हसून)

आणि आई जेवणाच ताट घेऊन आली ..

राघवने ताट पुढ्यात घेतल तस आई त्याला अडवत म्हणाली, "थांब मीच भरवते तुला "

राघव : (आईच्या हातचा पहिला घास खाउन) I love you आई.... (आईला गळ्यात मिठी मारतो)

आई : नाटकी माहित आहे मला सगळ.... (आणि दोघेही हसायला लागतात...)

राघव : आई पुढच्या आठवड्यात आम्ही कॉलेजच्या स्टेट लेवलच्या स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार आहोत...

आई : हमम... मी बॅग, पॅक करून ठेवीन... And All the best...

इथे नयना सुद्धा आपल्या घरी येते... घरी कुणीच नसत.... नॅनी सोडून..... नॅनी म्हणजे आपल्या नयनाला लहानपणापासून सांभाळणारी केअर टेकर... पण नयनासाठी खूप काही होती ती.... खूप जीव लावायची ती नयनाला... नयनाचे वडील बिझिनेस साठी सतत बाहेर असायचे, तीची आई समाजकार्यात आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची.... त्यामुळे नयनाला त्या दोघांचा सहवास फार कमीच लाभला.... त्यामुळे तीला नॅनीच फार जवळची वाटायची.... आपली सगळी सुखदुःख नयना नॅनीसोबत शेअर करायची....

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नयना आपली गाडी घेऊन कॉलेजला जाते.... कॉलेजच्या गेटवर already एक गाडी उभी असते... गाडी हटत नाही म्हणून नयना हॉर्न वाजवते पण काही केल्या गाडीवाला गाडी बाजूला घेत नाही म्हटल्यावर ती अजून चीडते आणि अजून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागते.... तस तिथे राघव आणि राघवचे मित्र येतात... गाडी राघवची असते.... हे नयनाला माहित असत म्हणून ती अजून जोरात हॉर्न वाजवतच असते...

अभय : (नयनाला समजावत) अग गाडी पंक्चर झाली आहे... पंक्चरवाला आलाय आता होईल गाडी बाजूला दोन मिनिटे शांत रहा....

नयना : अशा भंगार गाड्या वापरता कशाला?? Useless... सकाळ सकाळ टाईमपास लावलाय नुसता... (चिडून)

आणि परत हॉर्न वाजवत बसते... एव्हाना तो गोंधळ ऐकून अर्ध कॉलेज तिथे जमा होत... आणि प्रिंसिपल सर पण तिथे आले...

प्रिं. सर : (गोंधळ बघून) What's going on here??? नयना please stop it.... (तशी नयना आधीच गप्प होते).. काय लावलय सकाळी सकाळी तुम्ही दोघांनी???

राघव : सर गाडी इथेच पंक्चर झाली... हे बघा इथे कोणीतरी मुद्दाम हे खिळे टाकले आहेत...

नयना : फटिचर गाडी.... (गाडीच्या बाहेर येऊन नाक मुरडत )

प्रिं. सर : (एक कटाक्ष टाकत) नयना... Please.... आणि तुम्ही सगळे इथे काय करताय जा आपापल्या कामाला लागा...

तोपर्यंत पंक्चरवाला पंक्चर रिपेअर करतो... नयना आपल्या गाडीत जाउन बसणार तोच तिच लक्ष तिच्या गाडीच्या टायरवर जात... ते पण आता पंक्चर झाल होत ????

राघव आणि त्याचे मित्र हसायला लागतात...???? तस प्रि. सर परत सगळ्यांना दम देऊन निघायला सांगतात... नयना आपल्या गाडीला लाथ मारून राग व्यक्त करते..????

प्रिं. सर : नयना आणि राघव तुम्ही नंतर मला अॉफीस रुम मध्ये भेटा... (पंक्चरवाल्याला) ए बाबा वातावरण खूप तापलय तु लवकर रिपेअर कर आणि निघ ????

राघव डोक्यावर हात मारून गाडी पार्क करायला जातो.... ????‍♂

थोड्यावेळाने नयना आणि राघव अॉफीस रूममध्ये येतात...

प्रिं. सर : (एक स्माईल देत) ???? बसा...

दोघेही समोरच्या खुर्चीत बसतात....

राघव मगाजच्या गोष्टीच स्पष्टीकरण देतच असतो... पण सर त्याला मध्येच थांबवतात...

प्रिं. सर : हे बघा पुढच्या आठवड्यात स्टेटलेवलच्या स्पर्धा सुरू होत आहेत... कॉलेजला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत... So दोघेही एकत्र येऊन काम करा...

नयना : हो सर.... मी निघू आता... ????

सर पण हसतात आणि जा म्हणतात... राघव तु तुझी जबाबदारी चांगलीच संभाळशील.... लक्ष असू देत....

राघव : of course Sir... Will do our best.....

क्रमशः

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all