© शुभांगी शिंदे
तुही मेरा...
भाग ५
डान्स संपला तेव्हा ती त्याच्या बाहुपाशात होती... दोघांचेही डोळे मिटले होते... श्वास फुलले होते.. हृदय एकाच गतीने जोर जोरात धडधडत होते .. एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.. दोघांनाही एकमेकांचा सुगंध संमोहित करत होता.. एकमेकांचा स्पर्श शहारून निघत होता... तो क्षण त्यांच्यासाठी तिथेच थांबला होता.... ????
संपूर्ण हॉल एकदम शांत झाला होता.. वेळेच भान राखून अभयने टाळ्या वाजवल्या तसे सगळेच जल्लोष करायला लागले... राघव आणि नयना भानावर आले.. नयना आता नजर चोरून गालातच लाजली... पण दुसरीकडे तिला फार ओक्वड पण वाटल.. ती गर्दीतून वाट काढत बाहेर पडते... आणि राघव मुलींच्या घोळक्यात अडकतो...
नयना पळतच बाहेर येते... बाहेर कोणीच नसत... ती एकटीच उभी असते धापा टाकत... स्वतःशीच लाजत.. ☺
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पार्टी संपवुन सगळे घरी जायला निघतात... दिप्ती आणि नयना बर्याच वेळ त्या गाडीजवळ उभ्या असतात... नयना खूप प्रयत्न करते पण गाडी काही केल्या स्टार्ट होत नाही..
त्यांना अस अस्वस्थ बघुन राघव आणि अभय तिथे येतात..
अभय : काय झालं?? Any Problem???
दिप्ती : अरे गाडी खराब झाली आहे...
अभय : ohhh my baby... ???? (दिप्ती लगेच लाडिक मिठी मारते ????)
नयना : ए बेबी वाल्या... माझी... गाडी खराब झाली आहे.. तुझ्या बेबीला काही नाही झाल.. ????
राघव : तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला... ????
नयना आधी नाहीच म्हणते पण अभय आणि दिप्तीच्या सांगण्यावरून ती तयार झाली.. नयना राघवच्या गाडीत मागे दिप्तीच्या बाजुला बसायला जाते तर अभय तिला पुढच्या सीटवर बसायला लावतो...काही अंतरावर गेल्यावर राघवने एका गार्डनशेजारी गाडी थांबवली...
नयना : काय झालं इथे का गाडी थांबवली?? ????
राघव : चल थोड बाहेर फिरुया.. ????
नयना : काय...?? उगाच लाडात नको येऊस ????
राघव : (थोड त्रासून) अग बाई त्या लव बर्डसना थोडा वेळ एकत्र घालवू देत.... किती बोरर आहेस यार तू... ????
नयना नाक उडवून एका बेंचवर जाउन बसते... राघव असाच उभ्या उभ्या फेरफटका मारत बसतो.... अभय आणि दिप्ती दुसर्या बेंचवर जाऊन बसतात....
अगदी नवीन नवीन प्रेम फुलल होत त्यांच.. त्यात ते अगदी जवळ खेटून बसणे.. हातात हात घेऊन गोड गोड गप्पा मारणे, मध्येच त्याने तिला चिडवने आणि चिडून तिने त्याला हलकेच चापटी मारने.. वर तर वर पाठ फिरवून रुसून बसने.. ???? थोडक्यात काय तर ट्रिपिकल प्रेमी युगुलांप्रमाणे त्यांच चालल होत... ????
नयनाने अगदी डोक्यावरच हात मारला.. ????♂आणि राघव नयनाचे expression बघुन हसायला लागला.. ???? तिने राघवला हसताना बघून पुन्हा नाक मुरडले...
छान गार वारा सुटला होता.. थंडी वाजते म्हणून अभयने अगदी सिनेमातल्या हिरोप्रमाणे स्वतःच जॅकेट काढुन दिप्तीला दिल.. त्या दोघांना बघून नयना राघवकडे बघते..
राघव : तुलापण जॅकेट हवय.. माझा कोट चालेल?? ☺
नयना : (अगदी त्रासून) काहीही... .नसता मुर्खपणा.. ????
राघव : (हसुन) किती unromantic आहेस गं... ???? माहित नाही आपल्या बाबतीत कस होणार माझ... ????
नयना : काहीही होणार नाही आपल... नसती स्वप्न नको बघु.. ???? (आणि नेहमीप्रमाणे नाक उडवून चालायला लागली)
राघव : कठीण आहे रे बाबा... ????♂
राघव आणि नयना गाडीत येऊन बसतात.. राघव गाडीचा हॉर्न वाजवतो तस अभय आणि दिप्ती सुद्धा गाडीत येऊन बसतात... राघव आधी दिप्तीला घरी सोडतो, मग अभयला आणि शेवटी गाडी नयनाच्या घराजवळ येऊन थांबली.. नयना उतरून जाऊ लागली...
राघव : (हार्न वाजवून) थँक्यू म्हणायची पद्धत नाही वाटत तुमच्याकडे?? (मुद्दाम चिडवत) ☺
आणि तो गाडीतून उतरून बाहेर येतो..
नयना : (तशीच मागे फिरून गाडी जवळ येते) गाडीपण आपलीच... ड्रायव्हर पण आपलाच... मग थँक्यू कशाला हवाय?? ???? (आणि ती हसून परत जायला निघते)
राघव : (आधी काहीच न कळल्यामुळे शांत असतो आणि मग आश्चर्याने ) काय म्हणालीस?? आपला?? ????
नयना : मी कुठे काय म्हटलं?? ???? (आणि पळतच घरी निघून जाते)
राघव : (गालात हसून) अग निदान बाय तरी म्हण... ☺
तोपर्यंत ती घरी पोहचते आणि राघव हलकेच हसून गाडी स्टार्ट करून निघून जातो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दुसर्या दिवशी रविवार असतो... नयना नेहमीप्रमाणे अनाथ आश्रमात जाते... महिन्यातून एक रविवार ती नेहमी आश्रमात जाते.. तिथल्या मुलांना भरभरून गिफ्ट्स घेऊन जाते... दिवसभर त्यांच्याशी दंगामस्ती करून संध्याकाळी परत घरी...
ती स्वतःला त्या मुलांपैकीच एक मानायची... त्या मुलांवर आईवडिलांचे छत्र नव्हते आणि नयना सगळं काही असून पोरकी होती... तिथल्या मुलांना छान छान गोष्टी सांगणे.. त्यांचा अभ्यास घेणे.. त्यांच्या कलागुणांना वाव देणे... त्यांना डान्स शिकवणे असे एक ना अनेक गोष्टी ती आश्रमात करत असे...
आजही ती आश्रमात येताच सगळी मुल ताई ताई करत तिच्या भोवती गोळा झाली... सगळे तिला बघून खूप खुश होतात... आजपण ती नेहमी प्रमाणे खूप मज्जा करते... आश्रमाच्या संस्थापक बाईंनी तिला एक गिफ्ट आणि ग्रिटींग कार्ड दिले.. सर्व मुलांच्या वतीने त्यांनी तिला ते गिफ्ट घेऊन दिले होत...
खूप विनंती केल्यावर तिने ते गिफ्ट घेतले.. आणि उत्सुकतेने कार्ड ओपन केले.. कार्ड ओपन करताच आतला मजकुर वाचुन चटकन तिच्या डोळ्यांत पाणी आले...
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई...तु नेहमीच अशीच हसतमुख रहा"
नयना तर विसरलीच होती की आज तिचा बर्थडे आहे...नॅनी सोडली तर तिला जवळच अस कोणीच नव्हत जे तिला बर्थडे विश करतील.... तिने सर्व मुलांना एक गच्च मिठी मारली.. तिने गिफ्ट ओपन केल तर त्यात पिंक कलरची ब्लॅक बॉरडरची साडी होती...
संस्थापक बाई म्हणाल्या मला काही जमल नाही पण मनापासून वाटल तुला छान दिसेल म्हणून घेतली.. मुलांच्या अट्टाहासामुळे नयनाने ती साडी त्यांना नेसून पण दाखवली...
तिथे त्या मुलांना भेटायला अजून एक बाई सुद्धा आल्या होत्या.. त्या मगाच पासुन नयना आणि मुलांची तिच्यासोबत असलेली गुंतवणूक बघत होत्या... तिचा वाढदिवस लक्षात घेता त्यांनी मुलांसाठी ताबडतोब केक आॅर्डर केला.. नयनाने सर्वांसोबत मिळून केक कट केला आणि प्रत्येकाला आपल्या हाताने केक भरवला...
सगळं आटपून नयना घरी जायला निघाली.. तेव्हा तिच लक्ष केक मागविणार्या बाईंकडे गेल.. तिने त्यांच्या पुढे गाडी थांबवून विचारणा केली.. तेव्हा कळाल की त्यांचा ड्रायव्हर तब्येत ठीक नसल्याने घरी निघून गेला आणि म्हणून त्या आॅटोची वाट पाहत आहेत.. नयनाने त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करत त्यांच्या घरी त्यांना सोडायला गेली...
गाडी त्यांच्या गेटवर येऊन थांबली..त्यांनी तिला कॉफीच्या निमित्ताने घरी नेले.. त्यांचा बंगला खूपच सुंदर होता.. नयना सोफ्यावर बसून होती तेवढ्यात तिथे राघव येतो... नयना राघवला तिथे बघून आश्चर्यचकित होते.. ????
नयना : तु इथे ??? ????
राघव : हो मी माझ्याच घरी असणार ना?? ????
नयना : तुझ घर??? म्हणजे आन्टी ??? ????
आई : (कॉफी घेऊन येतात) मी राघवची आई... ????
नयना : (मनात) अरे यारर कुठे अडकले?? याने आन्टींना काही सांगितले तर??
आई : राघव तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना??
राघव : हो आई... Actually we are.... ???? (नयनाला नजरेने खुणावत )
नयना : (घाबरून त्याच बोलण मध्येच तोडत) we are just friends... Collage friends ????
राघव : हो आई we are just a friends ????
आई : तुम्ही बोलत बसा मी आलेच ... ( आणि त्या किचनमध्ये निघून जातात)
नयना : मी निघू खूप उशीर होत आहे ...( पळ काढण्यासाठी) ????
राघव : अग नयना ते economics चे नोट्स हवे होते ना तुला?? रेडी आहेत घेऊन जातेस का?? चल तुला देतो... ☺
आणि तो तिला स्वतःच्या बेडरुममध्ये घेऊन पण गेला... नयनाला आत सोडून तिच्या हातात एक चिठ्ठी देऊन मी दोन मिनिटांत आलो सांगत तो निघून जातो.. नयना काही बोलणार इतक्यात तो पुढे निघून जातो.. ????♂
नयना हातातली चिठ्ठी वाचत आत रूममध्ये जाते... समोरच दृश्य बघून हैराण होते.. तिथे बरेच लहान मोठे गिफ्ट ठेवले होते... चिठ्ठीत एक मजकूर होता....
Nayana this is for you ????
नयना पुढे जाते.. एक छोट गिफ्ट उचलते... "Happy friendship day Nayana..." gift खोलते तर त्यात सुंदर friendship band असते.. त्यावर इयर लिहील होत... नयना : अरे हे तर आपल कॉलेजच पहिल वर्ष होत... ???? दुसर गिफ्ट उघडते तर त्यात छोटा टेडी ???? असतो... तिसर गिफ्ट उघडते तर त्यात किचेन असत... कधी chain, तर कधी कानातले, कधी मोठा टेडी, तर कधी ग्रिटींग, तर कधी ड्रेस... एक दोन नव्हे तर त्यांच्या 1st year पासुन अगदी आजपर्यंतच्या सगळ्या कॉलेज डेज, तिचे बर्थडे, व्हॅलेन्टाईन्स डे ला तिच्या साठी घेतलेले सर्व गिफ्ट तिथे होते... ती खूप खुश झाली होती .. हे सगळं बघुन मन भरून आलं होतं....
राघव केक घेऊन रूममध्ये येतो.. नयना वळून राघवकडे बघते..
नयना : राघव!! हे सगळं...??
राघव : (केक टेबलवर ठेवत त्यावर कँडल लावत बसतो) अग कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून तुझ्यासाठी घेऊन ठेवल.. पण तुला देण्याची हिंमतच झाली नाही... ????
नयना : का?? मी काय फाडून खाणार होते तुला ?? ????
राघव : नेहमीच नाक वाकड करत असतेस... ???? आता पण बघ कशी नाक फुलवून आहेस....????
नयना : (रागवून ) हमम ....
तसा राघव माचिसच्या काडीने कँडल जळवतो... आधीच रूममध्ये मंद रोषणाई करण्यात आलेली असते आता त्यावर ह्या कँडलच्या प्रकाशात ती अजूनच उजळून येते...????
फिकट गुलाबी रंगाची साडी त्याला काळया रंगाची चकाकणारी बॉर्डर... काळ्या चकाकीचा स्लीवलेस ब्लाऊज.. मोकळे सोडलेले केस कानात खड्याचे स्टड्स.. याव्यतिरिक्त काहीही शृंगार नव्हता पण तरीही खूपच सुंदर दिसत होती ती... राघव तिला बघतच बसला..???? माचिसची काडी विझताना लागलेल्या चटक्यामुळे तो भानावर येतो...
राघव : नयना!!! Happy birthday to you... Happy birthday to you.... Happy birthday dear नयना...
नयना केक कट करते... राघव तिला पहिला घास भरवतो.. तोच अर्धा बाईट नयना राघवला भरवते आणि चटकन तिच्या डोळ्यांत पाणी येत...
राघव : ए वेडाबाई तु रडाव म्हणून नाही केल मी हे...
नयना : नाही रे रडत नाहीए मी... (एका बोटाने डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत) थांब मी हात धुवून आले...
ती पुढे जाते... तसा राघव मागुन तिचा पदर धरतो... नयना जरा घाबरून तिथेच थांबते... राघव हळू हळू तिच्या जवळ जातो...
नयना : (मन धडधडायला लागल) राघव काय करतोयस?? सोड मला...
राघव : (तिला स्वतःकडे वळवून तिचा हात हातात घेत) अग हात धूवायची काय गरज आहे??? (आणि तिची केक ने माखलेल्या बोटांवरचा केक ओठांनी साफ करतो) ???? बघ झाली स्वच्छ...
नयना लाजून राघवच्या मिठीत शिरते..???? राघवही तिला आपल्या मिठीत सामावून घेतो... थोडा वेळ झाल्यावर मी निघू खूप उशीर झाला आहे... नयना म्हणते...
राघव ओके म्हणत तिला गाडीपर्यंत सोडायला येतो... नयना गाडीत बसून गाडी स्टार्ट करते.. तस राघव गाडीजवळ जातो...तिच्या समोर वाकून कानात हळूच बोलतो...
राघव : आजच गिफ्ट तर... न घेताच चाललीस... ( आणि तो आपले ओठ तिच्या गालावर टेकवतो) ????
नयना आधी शॉक होते पण मग राघवची नजरभेट होताच लाजेने चूर होते.. आपलेच ओठ आपल्या दाताने चावत... लाजतच गोड स्माईल देऊन निघून जाते... घरी पोहचेपर्यंत ती लाजतच असते... गालातल्या गालात हसत असते.. ????
????????जादू है तेरा ही जादू, जो मेरे दिल पे छाने लगा
दीवाने मेरे ये तो बता क्या किया तूने,
मीठा सा दर्द होने लगा
ये क्या हुआ, पहले ना ऐसा होता था
मैं हूँ कहाँ, मैं जानूँ ना
कोई मुझे इतना बता दे, घर का मेरे मुझको पता दे
जादू है तेरा ही जादू...
मैंने तो, ये जाना ना, होता है क्या इंतज़ार
मेरा दिल, क्यूँ माने ना, मुझको तो हो गया है प्यार
मैं चैन से पहले रातों को सोती थी, तूने मेरी नींदें लूटीं
ये रोग क्या, तूने लगाया, दीवानापन कैसा जगाया
जादू है तेरा ही जादू...
जानेमन ओ जाने जां, क्या है इरादा बता
छूने दे इन होठों को, होठों से मेरे ज़रा
क्या खूब है, मैं भी कैसा दीवाना था,
क्यूँ इश्क़ से अंजाना था
पागल मुझे, तूने बनाया, चाहत है क्या मुझको बताया
जादू है तेरा ही जादू... ????????
घरी पोहचेपर्यंत ती लाजतच असते... गालातल्या गालात हसत असते.. ????
नयना घरी येते... नॅनीला सोबत घेऊन नाचायला लागते.. इतक्यात तिची नजर सोफ्यावर बसलेल्या आपल्या आईकडे जाते.. नयनाचा डान्सचा मूड खराब होतो..
क्रमशः
(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली.. असे दोन तीन वेळा झाले.. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा