Login

तुही मेरा... (भाग ७)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग ७

शॉपिंग करुन राघव नयनाला स्काय वाल्टस हवेलीला घेऊन आला... तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती.. खर सरप्राईज तर अजून बाकीच होत... नयना ने राघवचा हात हातात घेतला.. 

नयना : राघव Thank you so much..  For this beautiful day... ????

राघव : picture  अभी बाकी है मेरे दोस्त.. ????

नयना आश्चर्याने काय???? म्हणून विचारते.. तस राघव तिला स्काय वाल्टसच्या आत घेऊन जातो.. तो नजारा बघून नयना खूप एक्सायटेड होते.. आणि समोरचा सुंदर नजारा बघतच बसते..  रंगीबेरंगी हॉट एअर बलून आकाशात उडत असतात...  संध्याकाळ झाली असल्याने वातावरण पण छान रोमॅन्टिक वाटत होत.. तांबड्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला आभाळ... त्यात उडत असलेले रंगीबेरंगी हॉट एअर बलून, घरच्या वाटेला निघालेल्या पक्षांचा किलबिलाट... मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जात होत... 

राघवने एक hot air balloon खास त्या दोघांसाठीच बुक केला होता.. छान इंद्रधुच्या रंगात न्हाऊन निघालेला..???? राघवने आपला हात पुढे केला तसा नयनाने तिचा हात त्याच्या हाती दिला.. त्याने आधी आपल्या ओठांनी तिच्या नाजूक हाताचे चुंबन घेतले..???? नयना हलकेच हसली.. ???? मनातून तर ती जाम खूश होती.. दोघेही बलूनमध्ये उभे राहिले आणि आकाशी झेप घेतली... 

अजून पूर्णपणे अंधार पडला नव्हता त्यामुळे आकाशातून निसर्गाच सौंदर्य एक वेगळाच अनुभव देत होत..???? पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल जयपूर, आकाशातून त्या ओल्या सांजवेळी रंगांच्या निरनिराळ्या छटांचा अनुभव देत होता...???? आकाशी असलेले विरळ ढघ आज फार जवळ भासत होते..  त्यामुळे त्यांना स्पर्श करण्याचा मोह सुद्धा होतो. ☁ अशीच त्यांची सैर पुढे चालली होती..

आता काही अंतर पार केल्यावर अंधार पडत आला होता.. राघवने हलकेच नयनाचे डोळे आपल्या हाताने मिटले.. 

नयना : राघव काय करतोयस??? हात काढ ना डोळ्यांवरचा??? किती सुंदर आहे हे सगळं ... 

राघव : (हळुच कानात) थांबना दोन मिनिटं... सरप्राइज आहे... ☺

नयना : बस कर अरे... अजून किती सरप्राईज देणार आहेस..? ????‍♂

राघव : तुझ्यासाठी काही पण.. ???? (काही मिनिटांनी राघव आपला हात तिच्या डोळ्यांवरून बाजूला घेतो.. )

नयना : बघ सगळीकडे अंधार झाला.. ???? (त्याच्याकडे वळून) 

राघव तिच्या ओठांवर आपल बोट टेकवत तिला गप्प करतो आणि खुणेनेच तिला मागे वळून खाली बघायला सांगतो.... 
तिने मागे वळून बघताच खाली एक एक दिवे उजळायला लागले... नीट निरखून पाहिले तर " I ❤ U " अस लिहिल होत दिव्यांनी... पिवळ्या रंगाच्या दिव्यांनी I आणि U सजला होता.... तर मधला ❤ निरनिराळ्या रंगांनी सजला होता. नयना तर आवासून पाहत बसली.. 

राघवने हळूच मागून नयनाच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली... आणि "I love you नयना" म्हणत गोड स्माईल दिली... आता ते दिवे एक एक करत वर उडायला लागले.. ते दिवे म्हणजे स्काय लॅटर्न होते... जे आकाशी झेप घेताना फारच सुंदर वाटतात...  हे सगळं पाहून नयना भारावून गेली... तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आल... तिने मागे वळून राघवला घट्ट मिठी मारली... 


नयनाच्या अनपेक्षितपणे मिठी मारल्याने राघव दोन मिनिटे स्तब्ध झाला.. नयनाच्या मिठीत आणि त्या नयनरम्य रोषणाईत तोहि आता हरवून गेला.. त्याने अलगद आपले डोळे मिटले आणि तिला आपल्या मिठीत सामावून घेतले... आता त्याचीही पकड तिच्याभोवती घट्ट झाली... ???? काही वेळाने दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहील आणि आपसुकच त्यांनी आपली पकड घट्ट करत ते दिर्घ चुंबनात विलीन झाले.. ???? आता डोळे मिटून फक्त तो क्षण अनुभवत होते.. 

हळू हळू हॉट एअर बलून खाली आला.. दोघेही त्या क्षणात येवढे हरवले होते की बलून सफारी संपली हे त्याच्या लक्षातही आले नाही.. थोड्या वेळाने भानावर आल्यावर नयनाने डोळे उघडून राघवकडे पाहिल आणि लगेच नजर चोरली.. आपलेच ओठ चावत पूर्ती लाजली.. ???? आणि परत एकदा राघवच्या मिठीत शिरली.. दोघेही हातात हात घालून बाहेर पडले..मनात खूप सार्‍या आठवणी साठवत.. प्रेमाच्या धुंद लहरीत हरवत... 

????????गूँजी सी हैं सारी
जैसे बजती हो
ल़ाहेराती है माहकि
गुनगुनाती है
सब गाते है सब ही मदहोश
हम तुम क्यूँ खामोश
च्छेदो चुप हो क्यूँ गाओ
आओ ना आओ आओ ना आओ

गा गा रे गा गा रे गा रे गा मा गा
नि रे सा नि रे सा नि सा
गा गा गा रे गा गा रे गा मा पा
ढा नि ढा नि ढा पा मा गा रे मा
गा गा रे गा गा रे गा रे गा मा गा
नि रे सा नि रे सा नि सा
गा मा पा नि ढा नि ढा नि ढा
ढा पा पा सा सा सा नि ढा पा मा गा रे मा

तन मन में क्यूँ ऐसे बाहेती
ठंडी सी एक आग
साँसों में है कैसी यह
धड़कन में क्या राग
ये हुआ क्या हुमको समझाओ ना
सब गाते हैं सब ही मदहोश
हम तुम क्यूँ खामोश
दिल में जो बातें हैं होंतों पे लाओ
आओ ना आओ आओ ना आओ

अब कोई दूरी ना उलझन
बस एक इकरार
अब ना कहीं हम ना तुम हो
बस प्यार ही प्यार
सुन सको धड़कनें इतने पास आओ ना
सब गाते हैं सब ही मदहोश
हम तुम क्यूँ खामोश
अब मेरे सपनों पे तुम ही तुम छ्चाओ
आओ ना आओ आओ ना आओ ????????

तिथुन बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता.. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते.. जवळच्याच रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले.. जेवण करेपर्यंत खूप उशीर झाला होता.. तिथुन माघारी नयनाच्या हॉटेलवर जायला बराच उशीर झाला असता.. रात्री अपरात्री अशा परक्या शहरात फिरण थोड रिस्की असल्यामुळे त्यांनी तिथल्याच जवळच्या हॉटेलमधे थांबण्याचा निर्णय घेतला.. 

तिथे त्यांनी डबल सुइट बूक केला... आणि वेटींग रुम मधल आपल सामान घेऊन आपल्या रुममध्ये गेले.. दिवसभराच्या फिरण्यामूळे जाम थकवा आला होता म्हणून जास्त टाईम पास न करता.. नयना आतल्या रुममध्ये जाउन झोपली आणि राघवने बाहेर आपले हातपाय पसरले.. ????

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी जाग आली तेव्हा सात वाजले होते.. नयनाने शीळ घालत आपला आळस झटकला.. कालच्या दिवसभराच्या गोड आठवणी आठवुन मनाशी हसून अंघोळीसाठी बाथरुममध्ये निघून गेली.. ती बाहेर आली तरी राघव अजूनही बाहेरच्या खोलीत झोपून होता.. निघायची तयारी करावी म्हणून तीच त्याला उठवायला गेली... झोपेत असलेल्या त्याचा निरागस चेहरा पाहून तिला त्याच्या कपाळावर किस करण्याचा मोह झाला.. 

नयनाने हळूच त्याच्या कपाळावर किस केल पण त्याचवेळी तिच्या ओल्या केसातून त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पाण्याच्या स्पर्शाने त्याला जाग आली.. त्याने डोळे उघडले तर समोर नयना होती.. सैल पॅटर्नचा चटणी रंगाचा टॉप जो डाव्या खांद्यावरून तिच्या दंडावर उतरलेला, त्यात ती नुसतीच अंघोळ करून आल्यामुळे निखरलेल तिच रूप, ओल्याशार केसातून टपटप पडणारे पाण्याचे थेंब.. यामुळे खूप मोहक दिसत होती.. राघवने हळूच तिच्या चेहर्‍यावर आलेले ओले तिच्या कानामागे सारले.. आपला हात तिच्या मानेमागे नेत तिला आपल्या जवळ ओढत आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले... 

नयना लाजूनच दूर झाली आणि मागे वळून बसली.. राघव तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत उठला आणि त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली... तिच्या पाठीवरच्या ओल्या केसात आपल डोक ठेवून तिला गुदगुल्या करु लागला.. नयनाही त्याच्या स्पर्शात मंत्रमुग्ध होत होती. त्याने तिला तसच बेडवर झोपवले आणि तिच्या कपाळावर किस केले.. मग तिच्या डोळ्यांवर किस केले.. पुढे दोन मिनिटे आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश केले.. ???? 

अचानक काही मनात येताच राघव तिच्यापासून दूर झाला आणि उठून जाऊ लागला.. पण नयनाने त्याला हात धरून अडवले.. राघवने मानेनेच नकार दिला आणि नयना त्याला होकार सांगत होती.. तिलाही त्याच्या स्पर्शात हरवून जायच होत.. नयनाने तसच त्याला स्वतःजवळ ओढले.. आतातर तिचीही संमती होती.. इतकावेळ तो तिला सतवत होता पण यावेळी तिनेच पुढाकार घेतला होता.. नाही म्हणत असताना त्याचाही संयम तुटला.. आणि ते दोघेही एकमेकांच्या स्पर्शात गुंतत गेले... ????


????????साँसों को साँसों में ढलने दो ज़रा
साँसों को साँसों में ढलने दो ज़रा
धीमी सी धड़कन को बढ़ने दो ज़रा
लम्हो की गुज़ारिश है ये पास आ जाए
हम… हम तुम…
तुम… हम तुम…


आँखों में हमको उतरने दो ज़रा
बाहों में हमको पिघलने दो ज़रा
लम्हो की गुज़ारिश है ये पास आ जाए
हम… हम तुम…
तुम… हम तुम…
साँसों को साँसों में ढलने दो ज़रा ????????

गुलाबी स्पर्शात न्हाऊन निघाल्यापासून दोघेही बराच वेळ शांतच होते.. दोघही एकमेकांच्या मिठीत पडून आपल्या हाताची बोटे एकमेकांच्या बोटांत गुरफटवत निपचित पडून होते.. राघवने नयनाच्या कपाळावर हलकेच किस करत आपला मोबाइल उचलला.. घड्याळात दहा वाजले होते.. नयनाने पण तसच आपला मोबाईल चेक केला... पंधरा मिसकॉल होते मैत्रिणींचे.. रात्री झोपमोड होऊ नये म्हणून सायलेंटवर टाकला होता मोबाईल तिने... ????

सगळी तयारी आवरून दोघेही परतीला निघाले... राघवने नयनाला तिच्या होटेल जवळ सोडले.. दोघांनीही एकमेकांना हग केले आणि नयना जायला लागली.. 

राघव : (काहीतरी आठवत) नयना!!! एक मिनिट... 

नयना : (इशारेनच)  काय झालं?? 

राघव : (खिशातून envelope काढत) तुझ युनिवर्सिटीच पत्र..  मोठ्या मुश्किलीने सरांची permission घेऊन मी ते स्वतः तुला द्यायला आलो होतो.. 

नयना : (excited होऊन )आणि तु मला आत्ता देतोयस.. ( आणि ती envelope उघडून बघते) 

राघव : तुझ सिलेक्शन झालय..

नयना : (आनंदाने) या स्पेशल कोर्ससाठी मला admission  मिळाल.. I am so happy... ???? 

राघव : म्हणजे तु पुढच वर्षभर लंडनला असणार... ????

नयना : (राघवचा उतरलेला चेहरा पाहून त्याला मिठी मारते) एकच वर्षाची तर गोष्ट आहे.. मी लवकरच परत येईन... 

राघव : (हलकेच हसून आपली मिठी घट्ट करत तिला कपाळावर किस करतो ) हमम... मला खूप आठवण येईल तुझी... 

नयना : Me too ... ???? आता तु निघ... कोणी पाहील तर ????

राघव : हो ग राणी निघतो... Bye... Love you... ????

नयना : Love you too.. ???? 

राघव : काय म्हणालीस ??? परत बोल... (कान तिच्या जवळ करत) 

नयना : अरे बाबा..  I love you...., I love you,  I love you so much.... Bye.... ????

राघव खूश होऊन निघून जातो..नयाना भेटल्यावर सगळ्या मैत्रिणींचा प्रश्नांचा भडीमार सुरू होतो.. नयना काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेते.. सगळे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात... 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


दोन दिवसांनी कॉलेजमध्ये आल्यावर तिला विरेन रस्त्यात अडवतो... 

विरेन : Hiii  नयना... ????

नयना : Hiii.... ????

विरेन : जयपूर जरा जास्तच enjoy केलस???  ????

नयना : काय म्हणायचे आहे तुला ?? (थोडी शंका घेत) 

विरेन : राघवने शर्त लावली होती तुला पटवण्याची... 

नयना : just shut up ????

विरेन : खोट वाटत असेल तर कँटीनमध्ये जाऊन बघ.. राघव आणि त्याचे मित्र तिथेच बसून गप्पा मारत आहेत... 

नयना : तस काही नाही आणि तुला तर मी नंतर बघून घेईन.. 

विरेन : बिनधास्त... मी इथेच आहे... 

नयनाला पूर्ण विश्वास असतो की विरेन खोट बोलतोय पण विरेनला धडा शिकविण्यासाठी ती मुद्दाम कँटीनमध्ये जाते. पण.... 


क्रमशः


(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली.. असे दोन तीन वेळा झाले.. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all