Login

तुही मेरा... (भाग ९)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग ९

राघवने सुटकेचा निःश्वास सोडला.. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर पहिले पोलिस तिला भेटतील आणि मगच तुम्हाला भेटता येईल अस डॉक्टरांनी सांगितले होते.. त्यामुळे बाहेर वाट बघण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता.. मि. देशमुखांनी म्हणजेच राघवच्या बाबांनी राघव आणि राघवच्या आईला घरी पाठवले.. आणि ते स्वतः तिथे थांबून राहिले...

सकाळी त्या मुलीला जाग आली तेव्हा डॉक्टरांनी सर्वात आधी पोलिसांना बोलावून घेतले.. तो पर्यंत राघवचे बाबा बाहेरच वाट पहात होते..

मुलीची जबानी घेतल्यानंतर त्यांनी मि. देशमुख यांना सगळं ठीक असल्याचे सांगितले आणि ते निघून गेले.. मि. देशमुख डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या मुलीला भेटायला गेले..

ती मुलगी छानपैकी बेडवर पायावर पाय लांब करून फळे खात बसली होती..???? राघवने वर्णन केल्याप्रमाणे भीतीचे कसलेच भाव तिच्या चेहर्‍यावर नव्हते.. पण तिला बघून मि. देशमुख यांना आश्चर्याचा धक्का बसला.. ????

मि. देशमुख : मीनल!!! तु???

मीनल : अय्यो अंकल तुम्ही?? Thank God तुम्ही मला भेटलात.. पण तुम्ही इथे कसे?? आणि तुम्हाला कस कळल की I am here ?? अरे अंकल तुम्ही काही बोलत का नाही ?? कधी पासुन मीच बोलतेय ?? ????

हि मुलगी म्हणजे मीनल मराठे अय्यर.. ऊंच, देखणी, सरळ नाक, गोरा रंग, US ला असल्या कारणाने राहणीमान अतिशय मॉडर्न.. आणि भरपूर बडबडी... बोलण्यात थोडा पण वैविध्यपूर्ण बाज.. अर्धी मराठी आणि अर्धी साऊथ इंडियन.. आता हे कस तर मीनलची आई साऊथची आणि वडील मराठी.. आता प्रश्न पडला असेल मग आडनाव मराठे अय्यर कस?? मीनल च्या आईवडीलांच लव्ह मॅरेज.. दोन्ही कुटुंब अगदी देशस्थ..आधी लग्नाला घरुन विरोध होता मग जातीचा विषय सोडला तर नकार देण्यासारखे काही नव्हते..आणि मग नाव न बदलण्याच्या अट्टहासामुळे दोन्ही आडनाव कायम ठेवत त्यांनी असा तोडगा काढला.. ☺

मि. देशमुख : अग हो... तु थांबशील तर मी काही बोलेन ना.. ????

मीनल : OK ok.. तुम्ही बोलाना अंकल.. ????

मि. देशमुख : आधी तु सांग?? तु तर उद्या येणार होतीस ना??

मीनल : (त्यांच वाक्य मधेच तोडत) ते तर तुम्हाला सरप्राइज देण्यासाठी मी दोन दिवस आधी आले.. But I got a big surprise.. ???? Actually झाल अस की मी एअरपोर्टवर उतरून टॅक्सी पकडली.. हातात मॅप घेऊन रस्ता शोधत त्याला सांगत होते.. इतक्यात मला खूप hunger झाल.. (तिच्या या वाक्याने मि. देशमुख ???? काय???) I mean hungry.. मग मी रोड स्टॉल वरून फुड घेतल.. (रस्त्यावरच्या टपरीवर) So yummy food.. After one hour taxi driver became angry ???? and half रस्त्यात सोडून गेला.. ???? suddenly माझ stomach very दुखायला लागलं.. (तोपर्यंत मि. देशमुख यांची अवस्था ????????????????‍♂???? अशी झाली होती ????) मग मी near च्या public toilet मध्ये गेले.. बाहेर येऊन परत टॅक्सी पकडुन सामान गाडीत ठेवले but when taxi driver see my face पळून गेला तो.. (मि. देशमुख ???? का??) his a same guy... ????‍♂ मी त्या taxi मागे पळाले आणि suddenly एका गाडीसमोर आले.. And right now you are in front of my eyes... ????

मि. देशमुख : ???? अग मग फोन करायचा ना???

मीनल : अय्यो सरप्राइज होत ना ... ????

मि. देशमुख : (डोक्यावर हात मारून )????‍♂ बाई खूप छान सरप्राइज दिल...

मीनल : (परत तोंडाचा पट्टा चालू) पण तुम्हाला कस माहीत मी इथे आहे ते ???

मि. देशमुख : तु आधी घरी चल.. गाडीत सगळं सांगतो.. ????

हॉस्पिटलच्या formalities पूर्ण करून मि. देशमुख मीनलला घेऊन आपल्या घरी निघाले.. गाडीत बसल्यावर त्यांनी तिला ती कशी आणि कोणाच्या गाडीला धडकली इत्यंभूत सगळी माहिती दिली.. गाडीतपण तिची अशीच बडबड सुरु होती..

मि. देशमुख यांनी गाडीत बसण्याआधिच घरी मीनलबद्दल कल्पना दिली होती.. गाडी दारात येताच राघवची आई किचनमधून बाहेर येते.. आईंना बघताच मीनल त्यांना वाकून नमस्कार करते..

आई : अरे वाह!! US ला राहुन सुद्धा संस्कार जपून आहे.. छान..

बाबा : लहानपणीचा स्वभाव ही जपुन आहे.. ????

आई : म्हणजे?? ????

बाबा : कळेल थोड्यावेळात... ????

आई : असो... अग मीनल तु तय उद्या येणार होतीस ना??

मीनल : अय्यो... ते काय झालं ना आँटी... ब्ला ब्ला ब्ला... (आणि तीच पुराण सुरू झाल) ????

बाबा : (डोक्यावर हात मारून मनात ) ????‍♂ आपण तोपर्यंत फ्रेश होऊन येउया..

थोड्यावेळाने राघवसुद्धा हॉलमध्ये येतो.. रात्रभर तो नयनाच्याच विचारात असतो.. त्यामुळे झोप नीट झाली नव्हती.. त्याच्या चेहऱ्यावरून कळत होत.. नाश्त्यासाठी सगळे डायनिंग टेबलवर हजर झाले.. मीनलला समोर बघून राघवला आश्चर्य वाटले.. मीनलची तर अजुनही बडबड सुरूच होती..???? आईंनी सर्वांना नाश्ता दिला आणि त्याही सोबत बसल्या..

बाबा : अरे ही मीनल आपल्या मराठे काकांची मुलगी..

राघव : ओहह!! ती बडबडी...

मीनल : आत्ता नाही हा.. लिटिल लिटिल talking ????

आई : हो हो ... ????

राघव : अग पण काल तु अचानकपणे माझ्या गाडीसमोर कशी आलीस?? (राघव आत्ताच सर्वांना भेटत असल्यामुळे मीनलचा गोंधळ माहित नाही) ????

मीनल : अरे ते actually झाल अस ---------???? (ते आपल पुराण A to Z (????????‍♂ राघवच्या आईबाबांची रिअॅक्शन )

राघव : (नाश्ता उरकून) ओके मी निघतो.. मला उशीर होतोय कॉलेजला.... Bye bye..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कॉलेजमध्ये आल्यापासून राघव नयनालाच शोधत असतो पण नेमकी ती कॉलेजला आलेली नसते.. राघव तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून दोन लेक्चर्सनंतर घरी येतो.. घरी येऊन बघतो तर मीनलने त्याच टि शर्ट आणि ट्रक पँट घातलेली असते.. तिचा तो अवतार बघून राघवला आधी हसू येत.. पण तिच सगळ सामान टॅक्सी मध्ये राहिल्याने तीला राघवच्या कपड्यांशिवाय पर्याय नव्हता.. कारण आईंची साडी नेसण्यापेक्षा हे जास्त आरामदायी होत... ????

आईच्या सांगण्यावरून राघव मीनलला शॉपिंगला मॉलमध्ये घेऊन जातो.. मीनल पाच सहा कपडे सिलेक्ट करते आणि ट्रायल रुममध्ये निघून जाते.. राघव बाहेर बसून असतो.. तो मोबाईलवर त्याचे आणि नयनाचे जयपूरचे फोटो पाहत असतो.. तिथेच नयनासुद्धा नॅनीला घेऊन शॉपिंगला आलेली असते..

नयनापण ट्रायलरूमसाठी तीथे येते तर राघव आणि तिची भेट होते.. इतक्यात मीनल आतून बाहेर येते.. शार्ट जीन्स, yellow slip top..

मीनल : (राघवला कपडे दाखवत) राघव!! Look... How's this ??? Nice na...? ?????

नयना : रागाने लालबुंद होत एक कटाक्ष टाकते...???? (मनात) काय निर्लज्ज माणुस आहे आज चक्क दुसरीला घेऊन फिरतोय..

नयना चा राग बघता राघवला कळाल की तिचा पारा अजून का चढला... पण मीनलची बकबक नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि राघव काही बोलणार इतक्यात नयना तशीच दुसरीकडे निघून गेली.. (बिचारा राघव ????‍♂????)


क्रमशः

(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all