Login

तुझंच तर घर आहे    भाग १

सासूबाई अडून अडून घे घर माझं आणि माझ्या मुलाचं आहे. या घरात मी म्हणणे तेच होणार हे सांगायच्या, तर नवरा गोड बोलून हे घर तुझंच आहे म्हणत वादाटून अंग काढून घ्यायचा. पुढे काय होत जाणून घेण्यासाठी कथा नक्की वाचा.


तुझंच तर घर आहे    भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर



" असं काय करतेस ? घे ना थोडं समजून तसही हे घर तुझंच आहे. थोड आईचं ऐकलं. काय फरक पडतो ?
चल मी निघतो. मला उशीर होईल नाहीतर. " असं म्हणत माधव ऑफिसला निघूनही गेला. रमा त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहतच राहिली.

रमासाठी हे नवीन नव्हतंच. नीनाबाई म्हणजेच रमाच्या सासूबाई तिला वाटेल तसं बोलायच्या. तिच्या कामात चुका काढत राहायच्या. पण माधव मात्र तिचा त्रास समजून न घेता, तिला आईला समजून घे. तिच्यामागे सर्व तुझंच आहे. हे घर तुझंच आहे असं बोलून स्वतःच अंग काढून घ्यायचा.

रोजच्या या कटकटीला रमा कंटाळाली होती. आजही तेच झालं. सकाळी रमाने नाश्त्याला उपमा केला. ते पाहून नीनाबाईंनी तोंडसूख घेतलं.

" ही सर्व मुद्दाम करते. मला सकाळी तिखट खायला आवडत नाही माहित आहे. तरी हिने उपमा बनवला. शिरा, लापशी असं काही बनवायचं तर. पण नाही. मी खाणार नाही माहित आहे ना. ठेवा मला उपाशी. " असं  म्हणत त्या रमाला ऐकवू लागल्या.

" आई रोज सकाळी सकाळी गोड खायला मुलांना आवडत नाही. नेहमी मी त्यांना ओरडून, चिडून, कधी कधी मारून पण खायला लावते. पण रोज कसं जमेल. कधीतरी तुम्ही पण खा ना. मुलं लहान असून खातात ना ? " रमा जरा चिडूनच म्हणाली. यावरून वाद वाढला.

माधवने पुन्हा आपलं अंग काढत रमाला समजावलं, " असं काय करतेस ? घे ना थोडं समजून तसही हे घर तुझंच आहे. थोड आईचं ऐकलं. काय फरक पडतो ? "

याउलट नीनाबाईंनी कितीतरी वेळा रमाला अडून अडून ' हे घर माझ्या आणि माधवच्या नावे आहे. त्यामुळे या घरात इतरांनी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नये. या घरात मी सांगेन तसंच होईल. ' हे सांगितलं होत.

रमा एक वर्किंग वूमन होती. सकाळी सर्व आवरून, मुलांचं करून तिला ऑफिसला जावं लागायचं आणि आल्यावर पुन्हा कामे होतीच. त्यात नीनाबाई घरात काही करायच्या तर नाहीत पण चार नातेवाईकांना कॉल करून रमा घरात कसं लक्ष देत नाही. हे सांगायच्या.

रमाला या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या गोष्टीचा कंटाळा आला होता. सासू घर आमचं आहे. आम्ही सांगू तसं राहवं लागेल. असं म्हणायच्या, तर नवरा गोडीत म्हणायचा, आईच्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. थोडं समजून घे. हे घर तुझंच आहे.

यावेळी मात्र रमाने या सर्वांचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं.

संध्याकाळी रमा घरी आली. मुलांना खाऊ करून दिला आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने जेवण बनवलं नाही. नीनाबाईंच्या हॉलमध्ये फेऱ्या सुरू झाल्या.

तेवढ्यात माधवही ऑफिसमधून आला. नीनाबाईंनी आता मोठ्याने बडबड सुरू केली.
" हे आपलं घर आहे. इथे राहायचं असेल तर माझ्या म्हणण्यानुसार चालाव लागेल. समजवून ठेव तुझ्या बायकोला. अजून स्वयंपाकला सुरुवात केली नाही तिने. "

नीनाबाईचं बोलणं ऐकून रमा बाहेर आली. आणि म्हणाली, " हो, माहित आहे. हे घर तुमचं आहे. माझं नाही. म्हणूनच आज ठरवलं आहे. काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. "


क्रमश:


सूचना   :  माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.


0

🎭 Series Post

View all