तुझी लायकी एवढीच २ Series © आरती पाटील
( सुमन लग्न करून आली आणि राजच्या वागण्याचा अर्थ लागत नसल्याचं मीराला सांगितलं. मीरा स्वतःला थोडं बदल असं म्हणून सासूबाईना भेटायला जाते. लाडू घेवून जाणाऱ्या सुमनला मीराचे बोलणे अर्धवट ऐकू येते. )
मीरा गेल्यापासून सुमन मीरा नक्की कोणाबद्दल? आणि काय बोलत होती यावरच विचार करत होती. रात्री राज ऑफिसवरून आल्यावर कामासाठी बाहेर गावी ४ दिवस जायचे आहे असं सांगतो. सुमनच्या सासूबाई सासऱ्याकडे पाहतात. दोघेही डोळ्यानेच काही बोलत असल्यासारखे सुमनला जाणवले. नक्की पाहिले ते खरे की भ्रम झाला याचा असे सुमनला वाटू लागले.
राज चार दिवसांसाठी बाहेर गावी गेला. जाताना सुमनशी नीट बोलला पण नाही. सुमन चार दिवस राजच्या call ची वाट पहात होती. पण call काही आला नाही. तिने सासूबाई पण विचारलं की राजचा call आला होता का? सासूबाईंनी नाही सांगितलं पण असं होत कधी कधी वेळ नाही मिळत किंवा रेंज नसते. तू टेन्शन नको घेऊस. मीराला कळत नाही की असं कसं होईल? पोहचलो असा एक call तरी यायला हवा होता. फोनला रेंज नसेल पण PCO वरून तरी कळवू शकतात ना. तरी ती मनाला समजावून शांत राहते.
चार दिवसांनी राज घरी येतो. पण वागणे तसेच तुटक असत. ती राजला म्हणते की एक call तरी करायचा तर तो तिच्यावर ओरडतो. कामासाठी गेलो होतो तुझ्याशी फोन वर रोमान्स करायला वेळ नव्हता माझ्याकडे. राजचे असे बोल ऐकून सुमनला रडू येतं. ती स्वयंपाक घरात निघून जाते.
दुसऱ्या दिवशी सुमन राजचे कपडे धुवायला घेते आणि सवयी प्रमाणे कपडे धुण्याआधी सर्व खिसे चेक करते. कपडे चेक करताना पॅन्टच्या खिशात तिला हॉटेलचे बिल सापडत. त्या बिल मध्ये २ व्यक्ती असल्याचे तिला स्पष्ट झालं. राज आणि राजचे आई - बाबा हॉलमध्ये बसलेले असतात. सुमन येऊन फक्त बिल दाखवते. राज तिच्यावर चिडतो. माझ्या कपड्याना हात का लावलास ? सुमन म्हणते, " अहो, ऑफिसमध्ये जमा करायचं असेल बिल म्हणून तुम्हाला देतेय. ओरडताय का ?" बिल सुमनच्या हातातून घेवून राज तिथून जातो. पण राज चिढला त्यामुळे सुमनच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली.
संध्याकाळी सुमन घरात सांगून मंदिरात जाते. परत येते तेव्हा सासूबाईच्या रूम मधून भांडणाचा आवाज येतं होता. तिच्या कानावर सासूबाईचे शब्द पडले त्या राजला सांगत होत्या, " आम्ही तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय, म्हणून तूला सांगतोय, आताही वेळ आहे. नीट वाग. " त्यावर राज म्हणाला, " चांगला? तुम्हाला खरंच असं वाटतंय? तिला माझ्या गळ्यात मारली तुम्ही. आता जबरदस्ती संसार पण करू..? तुम्ही एक प्रकारे जबरदस्ती माझं लग्न लावलंय. आता मला माझ्या मनाप्रमाणे वागू द्या. प्लीज.... "
हे सर्व ऐकून सुमनची ह्र्दय दडपत. राजचे असे बोलणे ऐकून सुमन आतून तुटते. तिच्या हातातून पूजेचं ताट खाली पडत आली सुमन घेरी येवून खाली पडते.....
क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा