तुझी लायकी एवढीच ६ © आरती पाटील
( सुमनला सासू - सासरे गावी घेवून जातात. त्यानंतर सुमनचे सासरे शहरात परत येवून राजला घराबाहेर काढून दार बंद करून गावी निघून जातात. आता पुढे...... )
गावी वाढलेली सुमन गावी लवकर रमली. शेतातली सर्व कामे माहिती असल्याने मी शेतात काम करू लागली. तिची शेतातली रुची पाहून सासूबाई आणि सासरे यांनी तिला शेतीविषयीची पुस्तके दिली. त्यामुळे सुमनला शेतीच्या नव - नवीन तंत्रज्ञानाची माहिती झाली. ती अजून नव - नवीन गोष्टी वाचू आणि शोधू लागली. परदेशी तंत्रज्ञानचा उपयोग करून कमी जागेत जास्त उत्पन्न घेऊ लागली.
हळूहळू तिच्या लक्षात आलं की भाज्या आणि दूध नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दारात ते विकावं लागतंय. त्यामुळे त्यात गुंतवलेला पैसाही वसुल होतं नाही. आतापर्यंत सुमनमध्ये बराच आत्मविश्वास आला होता, त्यात सासूबाई आणि सासरे यांचा भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या संमतीने सुमनने food company उभी केली. त्या company मध्ये सॉस, वेगवेगळ्या भाजी चे सूप ( vegetables sup ), easy to cook, दूध पावडर अश्याप्रकारचे product च उत्पन्न होऊ लागले. याचा फायदा तिच्यासोबत गावकर्यांनाही होऊ लागला. शेतातील उत्पन्न चा योग्य मोबदला आणि शिवाय company मध्ये नोकरी ही. त्यामुळे गावकरी ही खुश होते शिवाय सुमनला अनेक गावातून मोठा मान मिळत होता. सुमनच यश दिवसेंदिवस वाढत होतं.
दुसरीकडे मंदीमुळे राजची नोकरी गेली. राज वडिलांनी घराबाहेर काढल्यावर राज रियाच्या घरी रहात होता. नोकरी गेल्यानंतर पैश्याची राजला चणचण भासू लागली. राजकडचे पैसे संपल्यावर रिया आपले रंग दाखवू लागली. त्याला टोमणे मारणे, नोकरीवरून बोलणे, दुसऱ्या मुलांबरोबर फिरायला जाणे. राजच्या लक्षात आलं आणि तो बोलला. त्यावर रिया "तू माझ्या पैश्यांवर जगणारा, तू मला नाही विचारायचं मी काय करतेय ते. " रियाचं बोलणं ऐकून राजला धक्का बसतो. सुमन आणि आई - बाबाचं बोलणं त्याला आठवत. आई - बाबांनी त्यांच्या लग्नाला केलेला विरोध आठवला. त्याला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. राज आपल सामान घेवून गावी निघतो. त्याला आपण केलेला एक -एक प्रसंग आठवू लागतो आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
गावी आल्यावर पाहतो तर सर्वत्र सुमनच नाव आदराने घेतलं जातंय. लोकांना जेव्हा कळलं की तो सुमनचा नवरा आहे तेव्हा लोकांनी त्याला मान -सन्मान केला. त्याला घरापर्यंत सोडायला आले. आवाज ऐकून सुमन, आई -बाबा बाहेर आले. समोर राजला पाहून आई - बाबांना राग येतो आणि सुमनच्या चेहऱ्यावर जुनं दुःख उभारून येतं.
राज सुमनला पाहून मान घालतो. राज सर्वांची माफी मागू लागतो. चुकलं, ते मला उशिरा कळलं. मला माफ करा म्हणतो. राजला झालेला पश्चाताप पाहून सुमन राजला माफ करते. राज चे आई - वडील म्हणतात, " आज ती तुझ्यापेक्षा जास्त मोठी, जास्त कमवती आणि जास्त कर्तृत्ववान आहे. आता या घराबाहेर तुझी ओळख ही सुमन चा नवरा ही असेल. ज्या मुलीची लाज वाटत होती, त्याच मुलीमुळे मान - सन्मान आहे. आता कळलं असेलच ना तिची लायकी...? " हे ऐकून राजला त्याने आधी सुमनला बोललेलं वाक्य आठवलं तुझी लायकी एवढीच.....
आज राजला सुमनच्या अवाक्याचा अनुभव आला होता. सुमनला यापुढे सुखात ठेवायचं असं राज मनोमन सुमनला वचन देतो आणि त्यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु होतो.
समाप्त...
तुझी लायकी एवढीच १
https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-yevdhich
तुझी लायकी एवढीच २
https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-2
तुझी लायकी एवढीच ३
https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-3
तुझी लायकी एवढीच ४
https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-4
तुझी लायकी एवढीच ५
https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-5
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा