Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 2

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 2


सकाळी अनघा  लवकर जाग आली, ती लगेंच उठली,  पण  घरात  काहीच  नव्हते.  ती थोडावेळ तशीच बसली. नंतर
तिने अंघोळ केली.  परत तेच कपडे  घालून  घेतले.  

अनिकेत उठला. शेजारी पाहिलं तर अनघा नव्हती.
“अनघा उठली आणि काय करत आहे?” अनिकेत विचार करू लागला.
तो उठून बसला. त्याला अनघा बसलेली दिसली. ती काहीतरी विचारात गढलेली दिसत होती.

“अनघा, काय झालं? कसला विचार करत आहेस?” अनिकेत म्हणाला.

“काही नाही, अशीच बसली होते… काय विचार करणार?” अनघा म्हणाली.

“बरं, मी अंघोळ करून येतो. आपण बाहेर नाश्ता करायला जाऊ. त्यानंतर तू मार्केटमध्ये जा, लागणारं सामान घेऊन ये, तुला घरी काहीतरी बनवता येईल” अनिकेत म्हणाला.

“हो, चालेल,” अनघा म्हणाली.

अनिकेत आंघोळीला निघून गेला.

मी घरी जाते. तिथून माझे कपडे घेऊन येते. अजून लागणारं सगळं सामानही आणता येईल. तेवढेच पैसे वाचतील, ते पैसे मला साठवता येतील, अनिकेत देत जाईल, त्यातले पैसे मी साठवत जाईल, अनघा मनात विचार करत होती.

......

“आपण अनिकेतला घरात घ्यायला पाहिजे होते. आपल्याला एकच तर मुलगा आहे. त्याचं आपण काहीच ऐकलं नाही. त्याच्याशी नीट बोललोही नाही,” ललिता म्हणाल्या.

“तो आपलं ऐकण्यासाठी थांबला का? निघून गेला ना?” अशोक रागाने म्हणाले.

“आपण लवकर बोललो नाही. तो किती वेळ वाट बघणार? तो बॅग भरून बाहेर आला, निघून गेला… तरीही आपण एकही शब्द बोललो नव्हतो,” ललिता म्हणाल्या.

“आता का त्यांच्या मागे हात जोडू? घरी यायचं असेल तर तो येऊ शकतो. इथे राहू शकतो. माझी काही हरकत नाही,” अशोक म्हणाले.

“मी त्याला कॉल करते. आता तो ऑफिसला जायला निघत असेल,” ललिता म्हणाल्या.

“तो आला तरी एकटा येणार नाही. ती मुलगी अनघा पण सोबत येईल. तुला चालणार आहे का?” अशोक म्हणाले.

ललिता काही बोलल्या नाहीत. त्यांना अनघा आवडलेली नव्हती. त्यांना त्यांच्या आवडीची सून हवी होती, भाऊंची मुलगी त्यांना अनिकेतसाठी आवडत होती. त्या अनिकेतला कॉल करणार होत्या. त्याच्यासोबत बोलणार होत्या.

“चहा आण,” अशोक म्हणाले.

ललिताने चहा आणून दिला. त्यांनीही घेतला. तो विषय तिथेच थांबवला.

......

अनघा आणि अनिकेत नाश्ता करायला बाहेर आले.

“अनघा, काय खाणार?” अनिकेत म्हणाला.

“जे असेल ते खाईन,” अनघा म्हणाली.

तिथे पोहे, इडली, डोसे होते.
अनिकेतने पोहे आणि इडली घेतली.

दोघांनी खाली बसून नाश्ता केला.
चहा देखील घेतला.

अनिकेतने पैसे दिले.

“अनघा, मी ऑफिसला जातो. तू सामान घेऊन जा, घरी जा,” अनिकेत म्हणाला.

“मी सामान घेऊन घरी जाईन. ते लावून टाकेन. तू कॅन्टीनमध्ये काही तरी खाऊन घे. मी पण काही तरी बनवेन,” अनघा म्हणाली.

“काही तरी बनव आणि खाऊन घे. मी पण कॅन्टीनमध्ये काही तरी खाईन,” अनिकेत म्हणाला.
तो ऑफिसला निघून गेला.

अनघा तिच्या घरी जायला निघाली, ती खूप आनंदी होती. आई आणी बाबांना आणी भावाला भेटला येईल, बोलता येईल, आई माझ्यासोबत. बोलेल का? तिच्या मनात प्रश्न पडला होता. जे होईल ते होईल, मी आज तिथे जाणार, अनघा म्हणाली. तिच्या घरी जायला निघाली..

अनघा तिच्या घरी गेली. तिने, “आई!” अशी हाक मारली.

“आता का आली आहेस? तुझं तोंड तर काळं केलंस… आणि आमचंही. तुला असं करायचं होतं, तर आधी का नाही बोललीस?, त्याच्याकडे काय आहे? त्यांची आई सगळ्यांसोबत भांडण करत असते. तुझ्यासोबत पण चांगली वागणार नाही, ” सुषमा रागाने म्हणाल्या.

“आई, अगं मी सांगत होते ना… माझं अनिकेतवर प्रेम आहे. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. म्हणून मला जावं लागलं ना. तुम्ही माझे ऐकले असते तर, मी अजून इथेच असती, मी लवकर लग्न केले नसते, ” अनघा जीव तोडून समजावत होती.

“तू आमच्याशी बोलू नकोस… आणि इथून निघून जा, परत या घरात यायचे नाही. ” सुषमा कठोरपणे म्हणाल्या.

“आई, मी सामान घ्यायला आली होती…” अनघा शांतपणे म्हणाली.

“तुझं सगळं घेऊन जा. असंचही… आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही, मी तुझा सामान फेकून देणार होते. तू आली तर सगळे घेऊन जा, एक पण वस्तू तुझी इथे ठेवू नको,” सुषमा म्हणाल्या.

“आई, तू काय बोलते आहेस?” अनघा व्याकूळ झाली.

पण आई काहीच बोलल्या नाहीत. फक्त आत निघून गेल्या.

अनघाने तिचा सामान, मोबाईल घेतला आणि पुन्हा आईसोबत बोलायला गेली. पण तिची आई एक शब्दही बोलल्या नाहीत.

इतक्यात तिचा भाऊ बाहेरून आला.

“ताई कधी आलीस? अशी का निघून गेलीस? आधी सांगायचं तरी ना…” शुभम म्हणाला.

“मला आधी विचारलंत तरी होतं का?” अनघा रागाने म्हणाली.

“ताई, जाऊ दे… मनाला नको लावून घेऊ. शांत राह,” शुभम म्हणाला.

“मी नाही लावून घेणार मनाला. आता निघते. तुला कॉल करत जाईन. तुझी आणी आई, बाबांची काळजी घे,” अनघा म्हणाली.

शुभम आत निघून गेला.

अनघा पण सामान घेण्यासाठी मार्केटकडे निघून गेली.
तिने आधी घरातला सामान घेतला. नंतर भाज्या घेतल्या.


---

अनिकेत काम करत होता. पण त्याचे मन वारंवार अनघाकडे जात होते.
तिला काही त्रास झाला असेल का? ती घरी नीट पोचली असेल का? काही खाल्लं असेल का?

“तिला सकाळी बोललो… तुला कॉल करेन असं म्हणाली होती. पण तिच्याकडे मोबाईल कुठे आहे? ती सामान घेऊन गेली असेल का?” अनिकेत स्वतःशीच विचार करत होता.

काम करत असूनही त्याची काळजी काही केल्या कमी होत नव्हती.



---

अनघाने सामान घेतले. ती घरी गेली. सामान ठेवले. मोबाईल चार्जिंगला लावला. पाणी पिले… आणि तशीच बसून राहिली. थोडा वेळ असाच गेला.

नंतर अनघाने आणलेले सामान लावायला घेतले. तिने घेतलेली प्रत्येक वस्तू नीट आवरून ठेवली आणि मग बेडरूममध्ये गेली. बेडवर आडवी झाली.

“आई मला किती बोलते… तिला आधीच सांगितलं होतं. तेव्हा ऐकलं असतं तर? आता आम्ही एकत्र सुखात राहिलो असतो…”
अनघा मनात म्हणत होती.

तिला खूप रडायला येत होते. ती खूप वेळ रडली.
रडता-रडता तशीच झोपून गेली.


---

अनिकेत ऑफिसमधून निघाला.

त्याला विक्रम दिसला.
अनिकेत विक्रमजवळ गेला.

“हॅलो विक्रम, तू इथे काय करतोस?” अनिकेत म्हणाला.

“हॅलो अनिकेत, मला काम होते म्हणून आलो होतो,” विक्रम म्हणाला.

“तुझे काम झाले का?” अनिकेत म्हणाला.

“माझे काम झाले. तुला काही तरी सांगायचे होते म्हणून थांबलो होतो,” विक्रम म्हणाला.

“काय सांगायचे आहे? काही झाले आहे का? माझे आई बाबा चांगले आहे ना, माझ्यासोबत बोलत नाही, पण तू एकदा त्यांच्याकडे जाऊन ये,” अनिकेत म्हणाला.

“मी अनघा वहिनीला त्यांच्या घरी जाताना पाहिले होते, मावशी काकांना भेटायला जाणार आहे, मला वाटते, तू पण घरी जा. त्याच्यासोबत बोल, राहायला नको जाऊ, ” विक्रम म्हणाला.

“काय! तिला तिची आई खूप बोलली असेल, मी आई बाबांना भेटायला जाईल ” अनिकेत घाईने म्हणाला.

“त्या रडत घरातून निघाल्या. त्यांचा भाऊ चांगला बोलला, असे दुरून वाटत होते. बघ, जरा घरी गेल्यावर सांभाळून घे,” विक्रम म्हणाला.

“चल बाय, ती रडत बसली असेल. काही खाल्लेही नसेल. तिच्यासाठी काही तरी खायला घेऊन जातो,” अनिकेत म्हणाला.

“चाललं, बाय. नीट जा,” विक्रम म्हणाला.

अनिकेत घरी जायला निघाला.

......

अनघाला जाग आली. तिने घड्याळ पाहिले. मोबाईल चार्जिंगवरून काढला. फ्रेश होण्यासाठी गेली.
“आता अनिकेत येईल…” ती मनात विचार करत, तिचे सगळे आवरू लागली.


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all