Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 4

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 4


अनघाला  लवकर  जाग आली.
तिने घड्याळ बघितले,
सहा वाजले होते.
ती उठली. तिने आंघोळ करून घेतली.

तिने बाप्पाची मूर्ती आणली होती. ती मूर्ती एका ठिकाणी ठेवली होती.
तिथे तिने दिवा लावला, अगरबत्ती लावली.   देवासमोर  हात जोडले.  आणी नंतर ती अनिकेतचा डब्बा बनवायला लागली.
नाश्त्याचीही तयारी तिने केली.

अनिकेतलाही जाग आली.
त्याने शेजारी पाहिले ,  अनघा उठली वाटत होती.  ही लवकर उठली. 
घरात अगरबत्तीचा खूप छान सुगंध पसरला आहे.  
अनिकेत म्हणाला.  उठला आणि अंघोळीसाठी गेला.

अनिकेत अंघोळ करून बाहेर आला.
अनघा नाश्ता बनवत होती.

अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला,
“अनघा, किती शांतपणे सगळं सांभाळतेस तू… घरातला एक, एक कोपरा सुगंधीत झालाय.”

अनघा हलकं हसली.
“बाप्पाला आणलंय ना घरी… म्हणून दिवा लावला. तुला उठल्यावर शांत वातावरण मिळावं म्हणून.”

अनिकेत तिच्या जवळ आला.
“तू आहे म्हणूनच माझं घर ‘घर’ झालंय.”
असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवला.

अनघा थोडी लाजली, पण नजरा खाली करत म्हणाली,
“चल, आधी नाश्ता कर. नाहीतर ऑफिसला उशीर होईल.”

दोघांनी एकत्र नाश्ता केला.
अनघाने त्याचा डब्बा, पाण्याची बाटली, आणि टिफिन बॅग नीट लावून दिली.

अनिकेत निघायला उभा राहिला.
“तुझा फोन चार्ज करून ठेव. आणि आज जरा शेजारच्या ताईंशी बोलून घे… तुला बोरही कमी होईल.”

अनघा मान डोलावून म्हणाली,
“हो, बघते.”

अनिकेत तिला बघत म्हणाला,
“काही लागलं तर मला लगेच मेसेज कर.”

ती म्हणाली,
“हो, नक्की.”

अनिकेत, “मी पण बाहेर येते. असंच खाली गार्डनमध्ये फेरी मारते. आता सगळं काम झालं आहे. थोडं जे आहे, ते मी आल्यावर करते,” अनघा म्हणाली.

“चालेल, चल. तेवढंच तुला बरं वाटेल,” अनिकेत म्हणाला.

अनघा आणि अनिकेत घरा बाहेर निघाले.
अनघाने कुलूप लावले.
दोघे पण बाहेर आले. दोघे पण गप्पा मारत होते.

थोडं पुढे जाऊन अनिकेतने अनघाला बाय केले.
अनघाने पण अनिकेतला बाय केले 

अनघा गार्डनमध्ये गेली.
ती फेऱ्या मारत होती, सगळीकडे बघत होती.

तेवढ्यात तिचं लक्ष एका आजोबांकडे गेलं.
अनघा आजोबांकडे गेली.

“आजोबा, तुम्ही एकटे आहात?” अनघा म्हणाली.

“मी एकटाच असतो. पैसे आहेत, पण दोन वेळेचं जेवण नाही. गार्डनमध्ये येतो, मुलांना बघत बसतो… तेवढा दिवस जातो,” आजोबा म्हणाले.

“तुम्ही कुठे राहतात?” अनघा म्हणाली.

आजोबांनी अनघाला सांगितलं, “पहिल्या मजल्यावर राहतो.”

“मी तुम्हाला दोन्ही वेळेचं जेवण आणून देत जाईन,” अनघा म्हणाली.

“तुझं मन खूप मोठं आहे. आजपासून तू माझी नात,” ते आजोबा म्हणाले.

अनघा हसत “हो” म्हणाली.

“तू मला आधी कधी इथे दिसली नाही,” आजोबा म्हणाले.

“आम्ही इथे राहायला येऊन दोन दिवस झाले,” अनघा म्हणाली.

“आता मी घरी जातो. थोडा वेळ आराम करतो,” आजोबा म्हणाले.

“मी तुम्हाला सोडायला येते,” अनघा म्हणाली.

अनघा आजोबांना सोडायला गेली.

त्यांच्या रूमच्या समोरच आजोबांची रूम होती.

अनघाने आजोबांना त्यांच्या रूममध्ये सोडले.
ती तिच्या घरात गेली. तिने जेवण बनवले होते. ते आजोबांसाठी घेऊन आली.

“आजोबा, जेवण करून घ्या. मी वाढून आणलं आहे. मी इथे समोर राहते,” अनघा म्हणाली.

आजोबांनी पहिलाच घास घेतला, आणि खाऊ लागले.

“अनघा, खूप छान जेवण बनवलं आहेस. मला खूप आवडलं,” आजोबा म्हणाले.

आजोबांनी पूर्ण जेवण संपवलं.

“आजोबा, आता आराम करा. मी तुम्हाला रात्रीचं जेवण आणून देईन,” अनघा म्हणाली.

आजोबांनी काही पैसे काढले आणि अनघाच्या हातात ठेवले.

“आजोबा, मला हे पैसे नको. तुमचा आशीर्वाद खूप आहे,” अनघा म्हणाली.

“माझा आशीर्वाद नेहमी असणार. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार. हे पैसे असू दे… मला छान जेवण करून देत जा. माझ्याकडे पैसे आहेत, पण माणसं नाहीत. मला मुलंबाळ नाही. बायको होती… जमेल तसं जेवण करून खाऊ घालायची. ती पण देवा घरी गेली… मी एकटा पडलो…” आजोबा भावुक झाले होते.

“बरं, मी तुम्हाला छान जेवण बनवून आणून देत जाईन. आता मी निघते. शेजारच्या ताईसोबत बोलायचं आहे… काही काम मिळतं का बघायचं. अनिकेत गेल्यावर घरी खूप बोर होते,” अनघा म्हणाली.

“तुझं शिक्षण काय झालं आहे?” आजोबा म्हणाले.

“माझं MBA झालं आहे. शेवटच्या वर्षाचा रिजल्ट लागायचं आहे,” अनघा म्हणाली.

“तुम्ही आराम करा, मी येते संध्याकाळी,” अनघा म्हणाली.

तिथून ती तिच्या घरात निघून गेली.

आजोबा विचार करतच राहिले…

---

अनघा घरी गेली. ताट साफ करून ठेवले… शेजारच्या ताईकडे गेली.

“ताई, मी येऊ का?” अनघा म्हणाली.

“तुम्ही कोण? मी ओळखले नाही,” शेजारची ताई (शिल्पा) म्हणाली.

“मी शेजारी राहायला आले आहे. शेजारी म्हणून ओळख करून घ्यायला आले,” अनघा म्हणाली.

“अरे वा! असे कोणी करत नाही. तू स्वतःहून आलीस, छान वाटलं. बिल्डिंगमध्ये कोणी कोणाशी बोलत नाही… सगळे बिझी असतात,” शिल्पा म्हणाली.

“ते मला माहिती होतं. आमच्या इथे असे नव्हते. आम्ही सगळे बाहेर बसून गप्पा मारायचो, खूप मजा व्हायची,” अनघा म्हणाली.

“आताच लग्न झालं का?” शिल्पा म्हणाली.

“हो, दोन दिवस झाले…” अनघा लाजत म्हणाली.

“अरे बापरे! किती गोड लाजतेस,” शिल्पा हसत म्हणाली.

अनघा फक्त स्माईल करते.

तुला माझ्यासोबत काही काम होते का?  शिल्पा म्हणाली.

“घरातल्या घरात, ताई इथे काही काम मिळेल का?” अनघा म्हणाली.

शिल्पा अनघाकडे नीट बघत म्हणाली,
“काम? कशाचं काम करायचं आहे तुला?”

“काहीही… घरातल्या घरात होईल असं. अनिकेत ऑफिसला जातो, मग मला दिवसभर घरी बोर होईल. काहीतरी काम असेल तर बरं वाटेल,” अनघा म्हणाली.

“असं आहे तर… माझी एक ओळखीची बाई आहे. ती घरातूनच लेडीज वेअरचं छोटंसं काम देतात, फोल्डिंग, पॅकिंग, लेबल लावणे. जास्त काही नाही पण महिन्याला थोडंफार जमते,” शिल्पा म्हणाली.

अनघाच्या चेहऱ्यावर क्षणातच स्मित आलं,
“ताई, काम काहीही चालेल. माझा वेळ छान जाईल.” अनघा म्हणाली.

तुझे शिक्षण काय झाले आहे?  शिल्पा म्हणाली..

अनघाने शिल्पाला सगळं सांगितले.

“हो, आणि तू MBA केलंयस म्हणतेस ना? मग एक-दोन महिन्यात मी तुला दुसरंही काही सांगते. आमच्या बिल्डिंगमध्ये दोन-तीन ओळखी आहेत. कधी कधी डेटा एंट्रीचं, छोटे छोटे ऑनलाइन काम येतं,” शिल्पा म्हणाली.

“हो ताई, खूप मदत झाली. खरंच धन्यवाद,” अनघा मनापासून म्हणाली.

“अगं काही नाही! आता तू शेजारीण आहेस, मैत्रीण आहेस. कधी काही लागलं तर सांग,” शिल्पा हसत म्हणाली.

अनघा पण हसली.
तिच्या मनातून पहिल्यांदाच इतकं हलकं वाटलं.
नवीन ठिकाण, नवीन माणसं… पण मन मात्र हळूहळू जुळत चाललं होतं

अनघा शिल्पासोबत  थोड्यावेळ गप्पा मारला.  तिच्या घरी  निघून गेली.


---

अनघा घरी गेली.
आज ती खूप खुश होती.
तिला आज जेवण करावसं वाटत नव्हतं.
आजोबांकडे जाऊन आल्यावर, त्यांची प्रेमाने केलेली बोलणी, त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद…
तिचं पोट जणू तसंच भरलं होतं.

आजोबांनी दिलेले पैसे तिने नीट एका छोट्या पर्समध्ये ठेवून दिले.
त्या पैशांमध्ये प्रेम, आपुलकी, आणि कृतज्ञता होती…
अनघाच्या मनात मात्र एकच विचार
“आजोबा माझ्यावर एवढं विश्वास ठेवतात… मी त्यांना कधीच निराश करणार नाही.”

तिने आणलेला मोबाईल अजूनपर्यंत ओपनही केला नव्हता.
तीने मोबाईल सुरु केला.
लगोलग खूप मेसेजेस, मिस्ड कॉल्स, नोटिफिकेशन एकामागोमाग येऊ लागले.

अनघाने काहीच पाहिले नाही.
सगळं बाजूला ठेवून तीने अनिकेतला मेसेज केला.

त्या वेळेला अनिकेत ऑफिसमध्ये होता.
आताच लंच करून आला होता.
तो खुर्चीवर बसताच त्याच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला.

तो हसला,
“अनघाचा मेसेज आहे!”

त्याने लगेच रिप्लाय दिला.
दोघांची थोडावेळ छान गप्पा झाल्या.
अनघाने सकाळपासून जे झालं होतं ते सारं आनंदाने सांगत होती. ती काम करणार आहे. ते गोष्ट सोडून,
अनिकेतला तिचा आनंद ऐकून खूप बरं वाटलं.

थोड्यावेळाने अनिकेतला काम होतं, त्यामुळे त्याने अनघाला सांगितलं,
“थोडा वेळ काम करतो, संध्याकाळी पुन्हा बोलू.”

अनघाने हो म्हटलं.

मोबाईल बाजूला ठेवला
हळूहळू तिचे डोळे मिटत गेले…
आणि ती शांतपणे झोपून गेली.





.....

क्रमश

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all