Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -5

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -5


अनिकेत काम  करत होता.  आज  त्याला  खूप काम  होते.   तो  काम करत होता.  त्याला  काम  संपवायचे  होते. त्याला त्यांच्या आई बाबांना पण  भेटायला जायचे होते.   पण  प्रमोशन  त्याला मिळणार  आहे.  म्हणून तो काम करत  होता. 
उशीर झाला तरी त्यांचे घड्याळकडे गेले.  पण  त्यांचे थोडे काम बाकी होते.  तो काम करत राहिला. अनघाला ऑनलाईन मेसेज या कॉल  करायला  पण  वेळ मिळाला नाही. 
---

अनघा उठली, उठून बसली, मोबाईल बघितला. चार वाजले होते. आजोबांना चहा करून देऊ का? अनघा मनात विचार करते. नतर फ्रेश होण्यासाठी गेली. लगेंच फ्रेश होऊन आली .ती किचन मध्ये गेली.
तिने चहा ठेवला.
चहा बनून झाला तशी ती आजोबांना द्यायला गेली.

आजोबांना तिला पाहून खूप आनंद झाला.

आजोबा मी चहा आणला आहे. आपण मस्त गप्पा मारत चहा घेऊ, अनघा म्हणाली.

हो चालेल, आजोबांनी लगेच चहा घेतली. एक घोट घेतला. अनघा चहा पण खूप छान झाला आहे. खूप दिवसांनी चहा घेतला आहे. आजोबा म्हणाले.

माझी आई खूप छान चहा बनवायची, मला तिच्या हातचा आवडतो. ती आता माझ्यासोबत बोलत नाही. अनघा म्हणाली.

तुझी आई तुझ्यासोबत का बोलत नाही आहे? काही भांडण झाले आहे का? आजोबा म्हणाले.

मी आणी अनिकेतने पळून जाऊन लग्न केले, म्हणून आई रागावली आहे.. अनघा म्हणाली.

मला साग काय झाले होते? नंतर कधी तरी सांगेल. अनघा म्हणाली.

तुला वाटेल तेव्हा साग, आजोबा म्हणाली.

अनघा पण तिची चहा तिथेच घेऊन गेली होती.
दोघेही शांतपणे गप्पा मारत चहा पित होते.

थोडा वेळ झाल्यावर अनघा म्हणाली,
“आजोबा, मी आता निघते… अनिकेत येईल.”

“हो चालेल बाळ, जा,” आजोबा हसत म्हणाले.

अनघा तिच्या घरात निघून गेली.

घरी येऊन तिने घर आवरून घेतले.
नंतर मोबाईल पाहू लागली.
शिल्पा ताईने ग्रुप बनवला होता.
त्यात काम काय आहे, त्यांचे डिटेल्स, सगळं तिने टाकलं होतं.
उद्या पासून कामाला लागणार होते. सगळा सामान शिल्पाकडे येणार होता.

अनघा सगळं लक्षपूर्वक वाचत होती.

काही वेळाने तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं.
“अजून अनिकेत कसा आला नाही?”
क्षणभर विचारात पडून ती स्वतःशीच म्हणाली,
“कदाचित त्यांच्या घरी गेला असेल…”

अनघा चिंतेने वाट पाहू लागली.

.......

अनघाला अचानक कॉल येतो.
ती न बघताच कॉल उचलते आणि बोलायला लागते.

“अनिकेत, अजून घरी कसा आला नाहीस? मी तुझी वाट बघत आहे… कधी येशील?” अनघा घाईघाईने म्हणाली.

“अनघा…,”

“बाबा? तुम्ही मला कॉल केला आहे?” अनघा आश्चर्याने म्हणाली.

“हो बाळा, तू कशी आहेस? अनिकेत अजून कसा आला नाही? ऑफिसमध्ये काही झालं आहे का?” संजय काळजीने म्हणाले.

“मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात?
त्यांचे काम आता वाढलं आहे. त्याला प्रमोशन मिळणार आहे. त्यामुळे उशीर झाला असेल.
त्यांच्या येण्याची वेळ झाली म्हणून जरा टेन्शन आलं…” अनघा म्हणाली.

“मी पण मस्त आहे. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बघून येऊ का?” संजय चिंतेने म्हणाले.

“नको बाबा, तुम्ही कशाला जाता? तो येईल…” अनघा शांतपणे म्हणाली.

“तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी…” संजय हळूच म्हणाले.

“बाबा, तुम्ही मला एवढं करा… मला माफ करा.
अनिकेत खूप चांगला आहे, माझी साथ देतोय. आम्ही आनंदी आहोत,” अनघा भावूक होत म्हणाली.

“अनिकेत चांगला मुलगा आहे. पण त्याचा पगार कमी होता, म्हणून त्याचे आई, बाबा तुला त्रास देतील असं मला वाटत होतं, म्हणून आम्ही नाही म्हणत होतो.
तुम्ही दोघं आता कुठे राहताय?” संजय म्हणाले.

“अनिकेतचा मित्र विक्रम आहे ना, त्याच्या घर होते. ते खाली होते. तिथे आम्ही राहतो.,” अनघा म्हणाली.

“ठीक आहे. तुला भेटायला मी कधी तरी येईन,” संजय म्हणाले.

“कधीही या… आई येईल का? तिला माझा खूप राग आहे.” अनघा म्हणाली.

“तुझी काळजी घे. काही लागलं तर मला सांग. तुझ्या आईचा राग लवकर जाईल, तीच तुला भेटायला येईल,” संजय म्हणाले.

“नक्की सांगेल, ती आली तर, मला खूप आनंद होईल. ” अनघा म्हणाली.

तेवढ्यात दरवाजा वाजला.
अनघा पटकन उघडायला गेली.

अनिकेत बाहेर उभा होता.

“अनिकेत, उशीर झाला…” अनघा म्हणाली.

“ऑफिसमध्ये खूप काम होतं, तुला मेसेज आणी कॉल करायला पण वेळ नव्हता. आता असेच काम करावे लागणार आहे. ” अनिकेत थकून म्हणाला.

“तू फ्रेश हो, मी चहा करते,” अनघा म्हणाली.

मागून मोबाईलवरून आवाज आला
“हॅलो… हॅलो… अनघा ”

“बोला बाबा…” अनघा म्हणाली.

“अनिकेत आला ना? आता त्याच्याकडे बघ. मी कॉल कट करतो,” संजय म्हणाले आणि कॉल कट केला.

अनघाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित उमटली.
“बाबांनी मला कॉल केला…
आता आईनेही मला लवकर माफ केलं तर किती बरं होईल…”
ती मनात विचार करत चहा ठेवू लागली.

अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला.

“अनघा, कोणाचा कॉल होता?” अनिकेतने विचारले.

“बाबांचा…
हे घे चहा,” अनघा हसत म्हणाली आणि चहा पुढे केला.

“तुझ्या बाबांनी तुला माफ केलं?
आणि तू चहा का घेत नाहीयस?” अनिकेतने विचारले.

“त्या आजोबांसोबत माझा चहा आधीच झाला.
आणि हो… बाबांनी मला माफ केलं.
आपल्याला भेटायला येणार आहेत,” अनघा आनंदाने म्हणाली.

“खूप छान.
आणि मला पण त्या आजोबांना भेटायचं आहे,” अनिकेत म्हणाला.

“आता जेवण बनवते.
आजोबांना जेवण घेऊन जाईन… तेव्हा आपण दोघं जाऊ,” अनघा म्हणाली.

“त्यांना आपल्या घरी बोलवत जा, एकटे असतात.. आपल्यासोबत जेवण केले तर… त्यांना बरं वाटेल,” अनिकेत म्हणाला.

“हो चालेल. आता जेवण बनवते,” अनघा म्हणाली.

“हो, ठीक आहे,” अनिकेत मान हलवत म्हणाला.

......

संजय घरात गेले.

"कोणासोबत बोलत होते?" आरती म्हणाल्या.

"मित्राचा फोन होता," संजय म्हणाले.

त्यांनी मुद्दामून अनघाला कॉल केला होता हे सांगायचे टाळले. आरतीने बडबड केली असती, संजय मनात म्हणाले.

"हात, पाय धुवून घ्या. आपण जेवण करून घेऊ. शुभम, चल रे, जेवण करून घे, नंतर अभ्यास कर," आरती म्हणाल्या.

संजय आले, शुभम पण आला. आरतीने त्यांना जेवायला वाढले. त्यांनी पण घेतले... ते जेवायला बसले.

.....

"अनघा, जेवण झाले का? आजोबांना भूक लागली असेल," अनिकेत म्हणाला.

"अनिकेत, जेवण बनवून झाले आहे. मी आजोबांना बोलवून आणते," अनघा म्हणाली आणि आजोबांना बोलवायला गेली.

.....

अनघा आजोबांजवळ गेली.
"आजोबा, आमच्या घरी चला. तिथेच जेवण करू. अनिकेतला तुम्हांला भेटायचे होते. आम्ही जेवण घेऊन येणार होतो, पण तुम्ही आमच्यासोबत जेवण केले तर तुम्हांला छान वाटेल," अनघा म्हणाली.

आजोबांना पण आवडले. त्यांच्यासोबत जेवण केले तर, मला पण छान वाटेल, त्यांना पण छान वाटेल, आजोबा असे मनात विचार करत होते. नंतर ते अनघासोबत तिच्या घरी जायला निघाले.

अनिकेत आजोबांच्या जवळ गेले. आजोबांचा हात हातात घेतला. आजोबांना घरात घेतले.

अनघा जेवण घेऊन आली.
तिघे पण जेवण करायला बसले.
अनघा आणि अनिकेत आजोबांसोबत गप्पा मारत होते. त्यांच्या अशा गप्पा चालू होत्या. असे की ते खूप जुनी ओळख आहे. आजोबांना खूप छान वाटले. अनघा आणी अनिकेतला पण छान वाटले. आजोबा हसत आहे. गप्पा मारत आहे. त्यांचे दुःख कमी झाले असेल.

आजोबांना खूप छान वाटत होते. त्यांना छान परिवार मिळाला होता.

अनिकेत आणि अनघालाही आजोबा मिळाले होते.

ते गप्पा मारत जेवण करत होते.


---





क्रमश

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all