तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं
भाग -8
भाग -8
अनिकेतचे काम झाले होते. त्याने लॅपटॉप बंद केला, बाकीचे पण बघून घेतले. अजून टेबल वर होते. ते पण सगळे नीट ठेवून घरी जायला निघाला. त्याला विक्रम दिसला.
अनिकेत विक्रमला हाक मारतो.
विक्रम अनिकेतजवळ येतो.
"किती वेळ झाला, अजून घरी गेला नाहीस?" विक्रम म्हणाला.
"खूप काम होते. आता पूर्ण झाले. आता घरीच जात होतो," अनिकेत म्हणाला.
"काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर सांग. मला पण छान जॉब मिळाला आहे. आई पण खुश आहे. लग्नाच्या मागे लागली आहे. मला लग्न नाही करायचे आहे," विक्रम म्हणाला.
"तू का लग्न करायचे नाही आहे? तुला कोणी आवडते का? मला प्रॉब्लेम नाही आहे. प्रमोशनसाठी चालू आहे. " अनिकेत म्हणाला.
"तुझ्यापासून काय लपवायचे… तुझी मामाची मुलगी मध्ये इथे राहिली, तेव्हा खूप आवडली रे. तू भेटायला आला होतास तेव्हा तिच्यासोबत बोलत होतो. तिने तिचा नंबर दिला होता. तुझ्या आईने तिला तुझ्यासाठी पसंत केले होते. म्हणून ती आता इथे येत नव्हती. आता तुझे लग्न झाले आहे, तर तिला कॉल करून बोलव ना, तुला काही पण प्रॉब्लेम असेल तर मला साग," विक्रम म्हणाला.
"तू माझा मित्र असून माझ्यापासून सगळं लपवलंस! ती पण काही बोलली नाही. मोनिका येईल तेव्हा आपण काहीतरी करू. मी तृप्तीला पण बोलवून घेईन. मामाशी मी बोलेन," अनिकेत म्हणाला.
"तूच यार… माझा यार आहेस!" विक्रम आनंदाने म्हणाला.
"आता मी निघतो. आजोबा पण वाट बघत असतील. अनघा पण वाट बघते," अनिकेत म्हणाला.
"आजोबा कोण?" विक्रम म्हणाला.
अनिकेत विक्रमला थोडक्यात सगळं सांगतो.
"खूप छान आहे! त्या आजोबांना तुम्ही दोघे मिळालात, आणि तुम्हांला पण आजोबा मिळाले," विक्रम म्हणाला.
"हो अरे… आजोबा खूप छान आहेत. आमच्यावर खूप प्रेम करतात, काळजी करतात, मला अनघाची पण काळजी नसते." अनिकेत म्हणाला.
"घरी ये ना कधी, आई तुझी आठवण काढत होती," विक्रम म्हणाला.
"हो, येईन. आज मी घरी गेलो होतो," अनिकेत म्हणाला.
"तुझे आई बाबा काही बोलले?" विक्रम म्हणाला.
"फक्त माझ्याबद्दल विचारत होते. अनघाबद्दल काहीच विचारलं नाही. ‘घरी ये’ हे तर म्हटलं नाही," अनिकेत म्हणाला.
"तू नको टेन्शन घेऊ. मोनिकाला येऊ दे, तू बरोबर करशील," विक्रम म्हणाला.
"ती पण येईलच. तिचे एक्साम झाले आहेत. आता मी निघतो," अनिकेत म्हणाला.
"नीट जा, बाय " विक्रम म्हणाला.
अनिकेतने पण विक्रमला बाय केले. आणी घरी जायला निघाला.
---
आजोबा अनघाकडे आले.
"आजोबा या… अजून अनिकेत आला नाही म्हणून मी तुम्हांला बोलवायला आले नाही. तुम्हांला भूक लागली का?" अनघा म्हणाली.
"तू कशी आली नाहीस, तेच बघायला आलो. अजून काही भूक लागली नाही. अनिकेतला येऊ दे, सोबत जेवण केल्यावर दोन घास जास्त जातात. मी तर तुझ्यासोबत गप्पा मारायला आलो," आजोबा म्हणाले.
"मी पण अनिकेतची वाट बघत होते. तो सकाळी त्याच्या घरी गेला होता. तिथे काय झाले, ते मला त्याला विचारायचे होते. आता रात्री त्याला विचारेल… आता खूप दमून येतो," अनघा म्हणाली.
"थोडं त्याचं ऐकून घ्यायचं. तू काम करतेस, ते अनिकेतला सांगितलं आहेस का?" आजोबा म्हणाले.
"मी अनिकेतला नाही सांगितलं… त्याला आवडणार नाही, मी बाहेर जॉब करेल, असा मी. विचार करत आहे. अजून रिझट पण लागला नाही आहे. तो लागल्यावर लगेंच बाहेर नोकरींसाठी अप्लाय करेल," अनघा म्हणाली.
"तू अनिकेतला सांगितलं नाही?…" आजोबा म्हणाले.
"अनघाने काय सांगितलं नाही?" अनिकेत म्हणाला.
अनघा आणि आजोबा एकमेकांकडे बघतात. आता काय बोलावे.
"अनघा, बोल ना," अनिकेत म्हणाला.
"तुझ्यासाठी मी आज खीर बनवली आहे… ते आजोबा म्हणाले. तू अनिकेतला सांगितलं आहे का? त्याला आनंद होईल, तुला सरप्राईज देणार होते. तू आता ऐकले, " अनघा म्हणाली.
"अरे व्वा! मी लगेच फ्रेश होऊन येतो. तू सांगितल्यावर तर मला लगेच भूक लागली. मला खीर खूप आवडते," अनिकेत आनंदाने म्हणाला.
अनघा किचनमध्ये निघून गेली.
"दोघे किती छान आहेत… देवा, या लेकरांना नेहमी आनंदी ठेव. मला पण यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे… ते मी लवकरच करणार," आजोबा मनात म्हणाले.
अनिकेत डब्बा घेऊन किचनमध्ये गेला. अनघाला दोन डबे दिले.
"आईने भाजी दिली होती का?" अनघा म्हणाली.
"हो, दिली आहे. मी नाही खाल्ली. तिने दिली, मी घेऊन घेतली," अनिकेत म्हणाला.
अनघा काही बोलली नाही. तिने जेवण लावायला घेतलं.
अनिकेत आजोबांसोबत बोलत होता.
---
अनिकेत घरी आला, तेव्हा आजोबा खुर्चीत बसून त्याची वाट बघत होते.
“अनिकेत, आज तुला खूप उशीर झाला,” आजोबा हलक्या आवाजात म्हणाले.
“अनिकेत, आज तुला खूप उशीर झाला,” आजोबा हलक्या आवाजात म्हणाले.
अनिकेतने बॅग खाली ठेवली.
“ऑफिसमधून उशिरा निघालो, आजोबा… आणि मध्ये मला विक्रम भेटला,” तो म्हणाला.
“ऑफिसमधून उशिरा निघालो, आजोबा… आणि मध्ये मला विक्रम भेटला,” तो म्हणाला.
अनघा स्वयंपाकघर आवरून बाहेर आली.
“विक्रम काय म्हणत होता?” ती विचारतच सोफ्यावर बसली.
“विक्रम काय म्हणत होता?” ती विचारतच सोफ्यावर बसली.
“विक्रम कोण आहे रे?” आजोबांनी कुतूहलाने विचारलं.
अनिकेत त्यांच्या जवळ येऊन शांतपणे म्हणाला,
“माझा मित्र आहे आजोबा… आणि हे घरसुद्धा त्याचंच आहे. तो म्हणत होता ‘घरी ये, आई तुझी आठवण काढते आहे.’”
“माझा मित्र आहे आजोबा… आणि हे घरसुद्धा त्याचंच आहे. तो म्हणत होता ‘घरी ये, आई तुझी आठवण काढते आहे.’”
अनघाने आजोबांकडे पाहत हळूच म्हणाली,
“आपण जाऊन येऊया ना… चांगलं होईल.”
“आपण जाऊन येऊया ना… चांगलं होईल.”
---
आता मी जातो… झोप आली आहे. अनघा, खीर खूप छान झाली होती. मला खूप आवडली,” आजोबा म्हणाले.
“थँक्यू आजोबा,” अनघा हसून म्हणाली.
आजोबांनी तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला.
“गुडनाईट,” आजोबा म्हणाले.
“गुडनाईट,” आजोबा म्हणाले.
“गुडनाईट,” अनघा आणि अनिकेत एकाचवेळी म्हणाले.
आजोबा तिथून निघून गेले.
अनघा आणि अनिकेत बेडरूममध्ये आले.
“अनिकेत… आई बाबा तुला काही बोलले का?” अनघा शांतपणे विचारते.
“तेच. काहीच बोलले नाही. तुझ्याबद्दल एक शब्दही बोलले नाही. मला राग आला… मग मी तिथून निघून आलो,” अनिकेत म्हणाला.
अनघा काहीच बोलली नाही. फक्त त्याच्याकडे पाहत राहिली.
“अनघा… तुला एक सांगायचं होतं,” अनिकेत म्हणाला.
“काय सांगायचं आहे?” अनघा उत्साहात विचारते.
“विक्रम तृप्तीवर प्रेम करतो. आणि तृप्तीलाही विक्रम आवडतो. ते दोघं कॉलवर बोलतात,” अनिकेत म्हणाला.
“दोघं सोबत किती छान दिसतील!” अनघा आनंदाने म्हणाली.
“आता मोनिका येईल… अजून मजा येईल,” अनिकेत म्हणाला.
मोनिका येणार आहे, पण ती आपल्याला भेटायला येईल का?
अनघा मनात विचार करत होती.
अनघा मनात विचार करत होती.
दोघंही गप्पा मारत बसले. अनिकेत खूप दमला होता. तो बोलता बोलता झोपून गेला.
अनघाही त्याच्या शेजारी शांतपणे झोपून गेली.
अनघाही त्याच्या शेजारी शांतपणे झोपून गेली.
....
आजोबा त्यांच्या घरी गेले, पण त्यांना झोप येत नव्हती.
अनघा आणि अनिकेत मला किती छान सांभाळतात… कस मी त्यांचा आजोबा आहे.
मला पण ते दोघं आवडायला लागले आहेत.
“असं… नातं नातू माझे असते तर किती छान झालं असतं,” ते मनात म्हणाले.
“असते नाही… आता ते माझेच आहेत.”
“असते नाही… आता ते माझेच आहेत.”
त्यांच्या मनात सतत तेच येत होतं
मला त्यांच्या दोघांसाठी काहीतरी करायला हवं.
मला त्यांच्या दोघांसाठी काहीतरी करायला हवं.
अनघा पण संसारासाठी किती करते… काम करते, पण अनिकेतपासून लपवते.
अनिकेतला वाईट वाटू नये म्हणून ती किती विचार करते.
अनघा किती छान आहे… सगळ्यांना आपलंस करते.
अनिकेतला वाईट वाटू नये म्हणून ती किती विचार करते.
अनघा किती छान आहे… सगळ्यांना आपलंस करते.
अनिकेतच्या आई, बाबांनी तिला घरात घ्यायला हवं होतं…
पण असो, आता तरी ते दोघं खुश आहेत.
पण असो, आता तरी ते दोघं खुश आहेत.
आज अनिकेत घरी जाऊन आला… काही झालं नसेल.
कारण अनिकेत शांत होता.
कारण अनिकेत शांत होता.
अनघा जेवण खूप छान बनवते.
आज खीर तर खूपच छान झाली होती.
आज खीर तर खूपच छान झाली होती.
दोघं आनंदी राहू दे… आजोबा विचार करत होते.
विचारांच्या करत करता, कधी तरी त्यांना झोप लागली.
क्रमश
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा