Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -9

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं
भाग -9


सकाळ झाली. अनिकेत ऑफिसला गेल्यावर, अनघा किचनमध्ये काम करत होती.
थोड्याच वेळात दरवाजावर टकटक झाली.

अनघा दरवाजा उघडते तर संजय उभे होते.
त्यांच्या येण्याने अनघा थोडी घाबरली.

“ बाबा या… आत या,” ती हळूच म्हणाली.

घरात आजोबा आधीपासूनच बसले होते.
संजय आत येताच आजोबांनी त्यांच्याकडे नीट पाहिलं.

अनघा कशी आहे?  तू इथे कशी काय? संजय  म्हणाले.

अनघा त्यांना सगळं सांगते. 

तुला काही पण  हवे असेल तर,  मला साग,  संजय म्हणाले.

तुम्ही, आई आणी शुभम कसा आहे?  अनघा म्हणाली.


चांगले आहे,  अनघा  एकदा मला बोलली असती तर,  संजय  म्हणाले.

काय सांगणार होते.?  आई मला काहीच  बोलू देत  नव्हती.  मी. काय सांगणार होती.  तो मुलगा  मला आवडला नव्हता.  अनघा म्हणाली.


ते जाऊ दे,  आता  तुम्ही दोघ सुखाने संसार करा.   संजय म्हणाले..

अनघानी संजयला पाणी आणून दिली.  त्यांनी पण  घेतले.
अनघा चहा ठेवायला गेली.

संजयचे लक्ष आजोबांकडे गेले.

तुम्ही  कोण आहे? संजय म्हणाले

मी शेजारी  राहतो.  आजोबा म्हणाले.

अनघाकडे लक्ष ठेवा.  संजय  अनघाच्या काळजीने म्हणाले.

अनघा माझी नातं झाली आहे.  खूप  काळजी घेते.  छान जेवण बनवते.  आजोबा म्हणाले..

संजयला अनघाचे कौतुक ऐकून  खूप छान वाटले.. 

तू अनघाला भेटायला येत जा,  आजोबा म्हणाले.

हो येत जाईल,  संजय म्हणाले..

“हो, भेटायला हरकत नाही. पण अनघा आता तिच्या आयुष्यात आनंदाने आहे. कोणतीही चिंता तुम्ही करू नका.” आजोबा हलक्या हसत म्हणाले,

अनघा चहा घेऊन आली..  संजयने चहा  घेतली. 

अनघाला आजोबा तिच्या बाजूने किती घट्ट उभे आहेत याची जाणीव झाली.
तिला डोळ्यांत पाणी आलं, पण तिने डोळे खाली केले.

संजय थोडा वेळ बसतात, पण घरातील वातावरण आजोबांनी इतकं स्पष्ट केलं की त्याला जास्त थांबणं बरोबर वाटलं नाही.

“ठीक आहे… मी निघतो, अनघा काळजी घे,” तो म्हणाला.

आजोबांनी मान हलवली.
अनघाने दरवाजापर्यंत जाऊन त्याला निरोप दिला.

दार बंद होताच आजोबा तिच्याकडे प्रेमाने वळले.

“घाबरू नको अनघा… मी आहे ना. जोपर्यंत मी आहे, तुला काही होऊ देणार नाही,” आजोबा म्हणाले.

अनघा आजोबांच्या जवळ येऊन हळूच म्हणाली,
“धन्यवाद आजोबा… तुम्ही असता म्हणून मी सगळं सांभाळू शकते.  बाबा मला फक्त  भेटायला आले होते.  ते  मला काही बोलणार नाही. मी  आईला सगळं सांगितले होते.  तिने माझे काहीच  तेव्हा ऐकले नाही. अनिकेतचा आईला मी आधीपासून आवडत नाही.”


तू नको काळजी करू, अनिकेतचे आई बाबा पण तुला मनाने घरात घेतील.
आजोबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
त्या क्षणी अनघाला खरंच वाटलं
हे फक्त नात्याने आजोबा नाहीत… तर मनाने तिचे खरे आजोबा आहेत.


---

आजोबा बसले होते.
अनघा किचनमधून बाहेर आली.

“आजोबा, आता मी शिल्पा ताईकडे जात आहे. बारा वाजता येते.
जर उशीर झाला तर, तुम्हांला जेवण देऊन जाऊ का?” अनघा म्हणाली.

आजोबा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले,
“तू ये, आपण सोबत बसून जेवू.
मला एकट्याला जेवण जाणार नाही.”

अनघा हसली.
“मी आल्यावर तुम्हांला हाक मारते.”

ती बाहेर निघाली.
आजोबा तिला जाताना पाहतच राहिले.
अनघा शिल्पा ताईकडे गेली.
आजोबा त्यांच्या घरी गेले.

घरात आल्यावर आजोबा शांतपणे खुर्चीवर बसले.
थोड्या वेळाने त्यांनी मोबाईल उचलला…
आणि कुणाला तरी कॉल केला.

त्यांचा आवाज मंद पण स्पष्ट होता.
“हो, मी सांगतोय… मुलगी खूप चांगली आहे…
खूप सोज्वळ, समजूतदार…
अनिकेतसाठी देवानेच पाठवली आहे.
तुम्ही बघा एकदा…
मी बघतो पुढे.”

समोरून कोणीतरी होकाराने काहीतरी म्हणत होते.
आजोबा पुन्हा म्हणाले,
“हो… हो… योग्य वेळ येईल तेव्हा सांगतो.
सध्या हे आपल्या दोघांमध्येच.
तिला काही कळू देऊ नका.”

कॉल संपला.

आजोबा मोबाईल बाजूला ठेवून खुर्चीतून मागे टेकले.
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं.

ते मनात म्हणाले,
“या मुलीसाठी काहीतरी चांगलं करायलाच हवं…
हे दोघं माझं कुटुंब आहेत आता.
त्यांचा संसार मी माझ्या डोळ्यांसमोर फुलवणार.”

(काय प्लॅन?
कोणाला फोन केला?
काय ठरवलं?
हे अजूनही पूर्ण गुपित…
पण आजोबांच्या मनातलं प्रेम आणि काळजी मात्र स्पष्ट होती.)


---

अनघा शिल्पा ताईकडून परत आली.
तिच्या हातात छोटंसं डब्बा आणि काही वस्तू होत्या.
ती दारात आली तेव्हा तिने आवाज दिला

“आजोबा… आले मी!” अनघा म्हणाली.

आजोबा लगेच बाहेर आले.
तिला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.

“चल, हातपाय धुऊन ये… मग आपण जेवायला बसू.
मी वाट बघत होतो.” आजोबा म्हणाले.

अनघा हसली.
“हो आजोबा… दोन मिनिटांत येते.”

ती हात धुवायला गेली.
आजोबा मात्र तिच्या मागे पाहत विचारात पडले…
“देवा, ही मुलगी नेहमी अशीच हसत राहू दे.
मी जे ठरवलंय, ते योग्य वेळी पूर्ण करायचंच…”

अनघा बाहेर आली तेव्हा टेबलवर आजोबांनी पाण्याचा ग्लास ठेवला होता.

“आजोबा, मी ठेवते ना… तुम्ही का त्रास घेताय?”
अनघा म्हणाली.

“अगं, हा काही त्रास नाही.
माझ्या नातीसाठी दोन मिनिटं उभं राहणं म्हणजे आनंद आहे.”
आजोबा म्हणाले.

अनघाच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं.
तिला "नात" हा शब्द फार आवडत होता…
जरी रक्ताचं नातं नसूनही,
मनापासून जोडलेलं नातं होतं.

दोघे जेवायला बसले.


“आजोबा, तुम्ही पण थकलात का?
थोडं चक्कर आलीये असं वाटतंय…” अनघा म्हणाली..

आजोबा स्मितहास्य करत म्हणाले,
“अगं नाही… काही नाही.
फक्त जरा विचार करत होतो.
आपल्या भविष्यासंबंधी…”

अनघा थोडी चकित झाली.
“काय विचार?”

आजोबा लगेच बोलणं बदलत म्हणाले
“काही नाही… आधी जेवू.
तू सांग, शिल्पा ताईकडे काय झालं?”

अनघा बोलायला लागली…
पण आजोबांचे विचार तर दुसरीकडेच होते

“लवकरच तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे मुली…
आणि तो निर्णय माझ्याकडूनच होणार आहे.”  आजोबा मनात म्हणाले.


---

“आजोबा…”
अनघाने हाक मारली.

आजोबांनी अनघाकडे पाहिले.
“हा, बोल ना.” आजोबा म्हणाले.

“आपण फिरायला जायचे का?
मस्त पाणीपुरी खाऊ, भेळ खाऊ…
आज खूप फिरावेसे वाटत आहे.” अनघा म्हणाली.

“तू परत शिल्पाकडे जात नाही आहेस ना?” आजोबा म्हणाले.

“आजचे काम झाले आहे.” अनघा म्हणाली.

“अरे वा, मस्त!
मग आपण जाऊ. पाच, सहा वाजता निघू.” आजोबा म्हणाले.

“चालेल.” अनघा म्हणाली.

“मी आता थोडा आराम करतो… मग आपण जाऊ.” आजोबा म्हणाले.

“मी पण थोडावेळ आराम करते.” अनघा म्हणाली.

आजोबा तिथून निघून गेले.
अनघा बेडरूममध्ये गेली.
बेडवर आडवी झाली.
तिने मोबाईल घेतला… थोडा वेळ बघत राहिली.
आणि नंतर झोपून गेली.


---

अनघा उठली, फ्रेश झाली.
तिने एक छान ड्रेस काढून ठेवला.
चहा तयार केला.

तिने आजोबांना कॉल केला
आणि त्यांना बोलवून घेतले.

आजोबा पण लगेच आले.
दोघांनी मिळून चहा घेतला.

“तू अनिकेतसोबत बोलणे झाले का?
अनिकेत येणार आहे का?” आजोबा म्हणाले.

“मी काही त्याला मेसेज किंवा कॉल केला नाही.
तो कामात असतो.
आपण निघू तेव्हा त्याला कॉल करते.” अनघा म्हणाली.

“चालेल. मी पण आवरतो.” आजोबा म्हणाले
आणि तिथून निघून गेले.

.....

अनिकेत काम करत होता. आज तो खूप बिझी होता. त्याला वेळ मिळत नव्हता. खूप काम येत होते. अनिकेत काम खूप छान करतो.
त्यांचे कलींग त्याच्याकडून मदत घेत होते. अनिकेत त्याना मदत करत होता. त्यांचे काम वाढत जायचे. त्यांचे सर सगळं बघत होते. त्यांना पण अनिकेतचे काम आवडायचे.






क्रमश

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all