Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -10

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग -10


अनघा तयार झाली. हलका, छानसा ड्रेस घातला होता. केस मोकळे ठेवले होते. बाहेरची हवा थोडी गार होती. आजोबा पण छान शर्ट घालून तयार झाले. दोघं हळूहळू बाहेर पडले.

“खूप दिवसांनी असं फिरायला जातोय आपण,” आजोबा म्हणाले.

“मला पण खूप उत्सुकता आहे आज… पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती,” अनघा हसून म्हणाली.

दोघं रस्त्यावरून चालत होते. लोकांची वर्दळ, स्टॉल्सचा सुगंध, हलका वारा… अगदी छान वातावरण होतं. आजोबा अनघाच्या पावलांशी पावलं मिळवत चालत होते.

“इथे खाऊ या? हा स्टॉल खूप फेमस आहे,” अनघा म्हणाली.

“चल, खाऊया,” आजोबा आनंदाने म्हणाले.

अनघाने पाणीपुरी ऑर्डर केली. आजोबा पहिली पाणीपुरी खाऊन हसले.

“अगं, ही तर जबरदस्त आहे! तू खूप छान जागा निवडलीस,” आजोबा म्हणाले.

अनघा आनंदाने बघत राहिली. दोघांनी भेळ, चाट, शेवपुरी असं सगळं थोडं-थोडं खाल्लं.
सगळं किती साधं… पण किती सुंदर क्षण होता तो.

तेव्हाच अनघाचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव चमकले,  अनिकेत

अनघा लगेच कॉल घेत म्हणाली,
“हॅलो… अनिकेत, तू निघालास का?”

“मी  निघालो आहे,  पण तू कुठे आहे?  किती आवाज येत आहे. "  अनिकेत म्हणाला.

अनघा हसत म्हणाली,
“मी आजोबांसोबत चाट खायला आले आहे.”

क्षणभर अनिकेत शांत राहिला… नंतर हलक्या आवाजात म्हणाला,
“तू खुश आहेस ना? स्वतःला एन्जॉय करतेयस ना? बस… मला तेवढं ऐकायचं होतं.”

अनघाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं.

“तू ये, आपण तुझ्यासाठी पण घेऊ,” ती म्हणाली.

“ठीक आहे, मी पंधरा मिनिटांत येतो,” अनिकेत म्हणाला.

कॉल संपला.
आजोबांनी विचारलं,
“येणार आहे का?”

“हो… येतोय,” अनघा म्हणाली.

आजोबा समाधानाने म्हणाले,
“मग आज तर अजून मजा येणार…”

दोघं पुन्हा स्टॉलकडे वळले. वातावरणात गोड आनंद पसरला होता,
एकत्र बसून खाण्यातला, बोलण्यातला…
घरासारखा, आपुलकीचा आनंद.

......


अनघा म्हणाली, “अनिकेतला येऊ दे ना, मग आपण खाऊ. आपण इथंच बसू… अनिकेत आपल्याला बघेल.”

“चालेल. मग आपण छान गप्पा मारू,” अनघा हसत म्हणाली.

आजोबा काहीतरी बोलत होते, पण अनघाचे लक्ष तिकडे नव्हते. जवळच काही लहान मुलं खेळत होती. अनघा त्यांच्याकडे खूप प्रेमाने बघत होती.

आजोबा बोलतच होते. अनघा का प्रतिसाद देत नाही? म्हणून ते तिच्याकडे वळून पाहतात.

अनघा ज्या दिशेला बघत होती, तेही तिकडेच पाहतात. ती मुलांकडे अगदी ममता भरून पाहत होती.

आजोबांच्या चेहऱ्यावर आपसूकच छान हसू आले. त्यांनी हलकेच अनघाच्या हातावर हात ठेवला.
“मला पण पणजोबा व्हायचं आहे…” आजोबा अलगद म्हणाले.

अनघा चकित होऊन त्यांच्याकडे पाहत म्हणाली,
“आता कसा काय आम्ही बाळाचा विचार करू? अनिकेतला अजून जास्त पगार नाही. मी तर काहीच कमवत नाही. मला चांगला जॉब मिळाला तर… मग मी अनिकेतसोबत बोलेन. मला बाळ हवं आहे म्हणून…”

“मी दिवसभर बाळाला सांभाळीन. एक बाईही ठेवू. काळजी करू नकोस,” आजोबा आत्मविश्वासाने म्हणाले.

अनघा हसायला लागली.
“आजोबा, अजून काहीच ठरलं नाही… आणि तुम्ही किती स्वप्नं बघताय!”

“अगं, स्वप्न बघायला पैसे थोडंच लागतात! स्वप्न बघायचीच असतात,” आजोबा म्हणाले.

अनघा मान हलवून हसली. “बरोबर आहे तुमचं.”

तेवढ्यात तिला अनिकेत येताना दिसला. तोही आजूबाजूला पाहत होता. अनघा आणि आजोबा दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

अनिकेतने गाडी एक साईटला लावली.  त्यानंतर   तो सरळ त्यांच्या दिशेने चालत आला.


---


अनिकेत आला आणि तिघंही गार्डनमध्ये मस्तपैकी फिरायला निघाले.
हवेत हलकी थंडी होती, झाडांच्या पानांचा सुगंध, आणि त्या शांत वातावरणात तिघंही अगदी स्वतःमध्ये रमून गेले.

सगळ्यात आधी पाणीपुरीचा स्टॉल लागला.

“चल, पाणीपुरी खाऊ या!” आजोबा उत्साहाने म्हणाले.

अनघा हसत म्हणाली, “आजोबा, तुम्हालाच तर जास्त आवडते!”

तिघांनी मिळून पाणीपुरी खाल्ली. अनघा तिखटाची, अनिकेत मध्यम आणि आजोबा गोडपाणी मागत होते.
नंतर त्यांनी भेळ घेतली. आजोबा भेळ खाताना पंखा करत होते,
“अगं, किती तिखट आहे ही! पण छान आहे!”
अनघा आणि अनिकेत दोघेही हसत होते.

थोडं पुढे चालत गेले, तिथे आईस्क्रीमचं दुकान होतं.

“अनघासाठी आईस्क्रीम!” म्हणत आजोबांनी दोन कोन घेतले.

अनघा एक घ्यायला गेली, पण अनिकेतने उठसुट तिच्या हातातून कोन घेतला आणि म्हणाला,
“हे मी घेतो… तू दुसरं घे.”

अनघा त्याच्याकडे प्रेमाने बघत हसली. आजोबा लगेच म्हणाले,
“अरे, मग मी अजून एक घेतो,”
आणि पुन्हा काउन्टरकडे गेले.

तीघेही आईस्क्रीम खात, फिरत फिरत हसत बोलत गेले.
अनिकेत कधी अनघाचा हात धरत होता, कधी आजोबांना सावकाश चालायला सांगत होता.
अनघा मुलांकडे, फुलांकडे बघत आनंद घेत होती.

आजोबा म्हणाले,
“आज खूप मजा आली… असं आपण अजून फिरायला जायचं बरं का!”

तिघांच्या चेहऱ्यावर खरंच खूप शांतता आणि आनंद होता.
अशीच त्यांची गप्पा, आईस्क्रीम, फिरणं, आणि प्रेमाने भरलेली मस्त संध्याकाळ झाली.


---

मस्त मजा करून तिघेही घरी आले.
आजोबा देखील अनघा आणि अनिकेतसोबत त्यांच्या घरीच आले.

“आजोबा, मजा आली ना? तुम्हाला काही खायचे आहे का? खिचडी करते,” अनघा प्रेमाने म्हणाली.

“खूपच मजा आली! आपण कधी तरी मस्त पिकनिकला जाऊ… फक्त तिघंच! मस्त फिरून येऊ,”
आजोबा आनंदाने म्हणाले.
“मला आता काही खायचं नाही आहे.
आता मी मस्त झोपणार.”

“तुमचे पाय दुखत आहेत का? मी दाबून देते,”
अनघा काळजीने म्हणाली आणि त्यांच्या पायाजवळ बसली.

अनिकेत फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता.

“अगं, काय करतेस तू? माझे पाय दुखत नाहीत. मी रोज गार्डनमध्ये चालतो. मजबूत आहेत अजून!”
आजोबा हसत म्हणाले.

“खरंच बोलत आहात ना?”
अनघा विश्वासाने म्हणाली.

“अनघा, मी खोटं कशाला बोलेन? खरं सांगतो , मी गार्डनमध्ये फिरतो, म्हणून कसलाही त्रास नाही,”
आजोबा शांतपणे म्हणाले.

“अगं ठीक आहे मग… मी पाणी आणून देते,”
ती म्हणाली आणि ताबडतोब किचनमध्ये जाऊन पाणी आणून दिले.

इतक्यात अनिकेतही फ्रेश होऊन आला.

“अनिकेत, अजून किती दिवस उशीर होईल? किती काम बाकी आहे?”
आजोबा विचारतात.

“उद्या माझे काम पूर्ण होईल. उद्या नक्की उशीर होईल. पण त्यानंतर रोजच्या वेळेवर घरी येईन,”
अनिकेत म्हणाला.

“चांगलं आहे. ठीक आहे,”
आजोबा समाधानाने म्हणाले.

तिघंही काही वेळ मस्त गप्पा मारत बसले.
संध्याकाळचा थकवा, आणि एकत्र केलेल्या मजेची ऊब सगळं वातावरण खूप शांत झालं होतं.

नंतर आजोबा त्यांच्या घरी जायला निघाले.

“गुडनाईट अनघा… अनिकेत… आता मी झोपतो,”
आजोबा हसत म्हणाले.

“गुडनाईट आजोबा,”
अनघा आणि अनिकेत दोघांनीही एकत्र म्हटलं.

आजोबा शांतपणे त्यांच्या घरी निघून गेले.


आजोबा गेल्यावर घरात शांतता पसरली.
दिव्यांचा हलका प्रकाश… खिडकीतून येणारी थंड हवा… दोघांच्याही मनात एक वेगळंच समाधान.

अनघा किचनमध्ये ग्लास ठेवून बाहेर आली.
अनिकेत सोफ्यावर टेकून बसला होता… थोडा थकलेला पण चेहऱ्यावर हलकी स्माईल.

अनघा त्याच्या शेजारी जाऊन बसली.
हलका हात त्याच्या खांद्यावर ठेवला.

“खूप थकला आहेस ना?”
ती अलगद विचारते.

अनिकेत तिच्याकडे बघत हसला.
“थकलो होतो… पण तू जवळ बसलीस ना… सगळा थकवा गायब झाला.”

अनघा हलकीशी लाजली.
तिने त्याच्या केसांवर हात फिरवला.

“आज खूप छान दिवस गेला… आजोबा खूप खुश होते…”
अनघा म्हणाली.

“हो… आणि तू पण खूप खुश दिसत होतीस. तुझं हसणंपण… मला सगळ्यात जास्त आवडतं,”
अनिकेत हळू आवाजात म्हणाला.

अनघा त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन बसली.
दोघे काही क्षण शांत… एकत्र…

अनिकेतने तिचा हात हलकेच आपल्या हातात घेतला.
“अनघा… तू माझ्या आयुष्यात आलीस ना… सगळं सुंदर झालं.” अनिकेत म्हणाला..

अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं…
“मी पण तुझ्यामुळे खूप खुश आहे अनिकेत… खूप.”

तो तिचा चेहरा आपल्या हातांनी हलकाच वर करतो आणि तिच्या कपाळावर एक कोमल किस ठेवतो.

अनघा त्याला बिलगून बसते.
त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटते.

“असंच नेहमी माझ्या जवळ राहशील ना?”
ती कुजबुजते.

अनिकेत तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणतो.
“नेहमी. कायम. तू माझी आहेस… आणि मी तुझा.”

दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत काही वेळ बसून राहतात…
बाहेर वारा हलका वहात होता… आणि घरात फक्त त्यांची शांत, सुखाची जवळीक…




क्रमश
दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all