Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 13

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 13




अनघा स्वयंपाक करत होती.
अजून अनिकेत आला नव्हता. तिने स्वयंपाक करून घेत होती.

आजोबाही अनघा जवळ होते. अनघासोबत गप्पा मारत होते.

....

मोनिका अंगणात होती. विक्रम तिकडे गेला होता. त्याला मोनिका दिसली. तो मोनिका जवळ गेला.

“मोना डार्लिंग, कशी आहेस? कधी आलीस? तुला माझी आठवण येत नाही का?” विक्रम म्हणाला.

“हो, तुझी आठवण येते ना! तू सगळं कस खातोस… मोटा!” मोनिका हसत म्हणाली.

“अगं, तू मला मोटा म्हणत जाऊ नको. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. ‘दादा’ म्हणत जा,” विक्रम म्हणाला.

“मी फक्त अनिकेत दादालाच दादा म्हणेन,” मोनिका म्हणाली.

“तू अनिकेतला दादा म्हण… मग मी कोण आहे?” विक्रम म्हणाला.

मोनिका हसायला लागली.

“तू पण माझा दादा आहेस. कसा आहेस?” मोनिका म्हणाली.

“मी मस्त आहे. तुझे एक्झाम कसे गेले?” विक्रम म्हणाला.

“छान गेले,” मोनिका म्हणाली.

दोघेही थोडावेळ बोलतात.
विक्रमला घरी जायचे होते. तो निघून गेला.

मोनिका पण  घरात  निघून गेली.
...


अनघा स्वयंपाक करून बसली होती.
तेवढ्यात दरवाजा वाजला.

“अनिकेत आला असेल…” अनघा हलक्या हसत म्हणाली.
ती दरवाजा उघडते. अनिकेत समोर उभा होता.

अनघाच्या चेहऱ्यावर लगेच गोड स्माईल पसरली.
अनिकेतही खाली मान झुकवून हलकंसं हसला.

“आलास?” अनघा मऊ आवाजात म्हणाली.

“हं… तुझ्या हसण्यावरच दिवसभराचा थकवा जातो,”
अनिकेत हळूच म्हणाला.

अनघा गोंधळून हसली.
“बस, मी पाणी घेऊन येते.”

ती पाणी आणते. अनिकेत आजोबांना स्माईल देतो.

“ये, अनिकेत… दमला असशील.”

अनिकेत पाणी घेतो आणि म्हणतो,
“हो आजोबा, पण घरात आल्यावर सगळा दम निघून जातो.”

तो फ्रेश होण्यासाठी आत जातो.

थोड्या वेळाने बाहेर येतो.
अनघा जेवण घेऊन येत असते,  गरम भाकरीचा वास सगळीकडे पसरलेला.

अनिकेत तिच्याकडे बघून म्हणतो,
“आज खूप छान सुगंध येतोय… काही खास?”

अनघा हसली,
“खास असं काही नाही… तू दमून येतो म्हणून तुझ्या आवडीचं केलं.”

अनिकेत तिच्या हातातून डबा घेतो.
“माझ्यासाठी केलं म्हणजे तेच खास.”

अनघा लाजत आजोबा अनिकेत दोघांसमोर बसते.
घरभर एक मऊ, शांत आणि प्रेमभरलेलं वातावरण पसरतं.


---

अनघा प्लेटमध्ये गरम भाकर, वरण आणि भाजी वाढत होती.
अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला.

“काय… असं काय बघतोयस?”
अनघा हसत विचारते.

“काही नाही… तू अशी माझ्यासाठी स्वयंपाक करताना खूप छान दिसतेस,”
अनिकेत शांतपणे म्हणतो.

अनघा लाजून खाली बघते.
आजोबा ते सगळं पाहून हलकंसं हसतात.

“अगं अनघा, बाळा… खूप छान जेवण करतेस तू.
माझं पण रोज पोट भरतं,” आजोबा म्हणाले.

अनघा प्रेमाने म्हणाली,
“आजोबा, तुमच्यासाठीच तर शिकले मी हे सगळं…”

अनिकेत ताटातला घास घेत म्हणाला,
“खरंच, आजोबा… अनघाचं स्वयंपाकात मन असतं.
ते दिसतं प्रत्येक घासात.”

“अहो थांबा आता… तुम्ही दोघं माझी अशीच तारीफ केली तर मी रोज स्वयंपाक करेन,”
अनघा चिडवत म्हणाली.

“रोज करणारच आहेस,”
अनिकेत डोळा मारून म्हणतो.

अनघा गोंधळून जाते.

आजोबा शांतपणे म्हणाले,
“तुमचं दोघांचं असलेलं नातं… शांत, प्रेमळ.
देव दोघांना सुखी ठेवो.”

अनिकेत आजोबांच्या हातावर हात ठेवतो,
“आजोबा… तुम्ही आहात ना आमच्यासोबत, तेच मोठं सुख आहे.”

अनघा त्यांच्याकडे पाहते…
डोळ्यात हलकी पाण्याची चमक.

ती म्हणते,
“आपण तिघे मिळून… असंच एकत्र सोबत राहू रोज.”

घरात त्या क्षणी इतकी माया आणि शांतता भरली,
जणू हे घर खऱ्या अर्थाने घर झालं होतं.


---


जेवण झालं.
आजोबा उठले, अनघा आणि अनिकेतसोबत थोडं बोलून त्यांच्या घरी निघून गेले.

अनघा भांडी आवरत होती.
अनिकेत तिच्याकडे येऊन खुर्चीवर बसला.

“अनघा… मला असं वाटतं, मोना आपल्याकडे येईल उद्या,”
अनिकेत म्हणाला.

अनघा थोडी घाबरलेली.
“ती राग धरेल का? आपले ऐकून घेईल का?”
ती शांतपणे म्हणाली.

अनिकेतने तिचा हात पकडला.
“ती समजून घेईल. तू नको काळजी करू.
आणि आई… आईने तिला काहीही नको सांगायला.
कारण ती तुझ्याबद्दल चांगलंच नाही बोलणार,”
अनिकेत म्हणाला.

अनघा थोडी सुस्कारा सोडते.
“जाऊ दे… आपण बघू. जे घडेल ते शांतपणे सांभाळू,”
अनघा म्हणाली.

अनिकेत उठून उभा राहिला.
“अनघा, मला उद्या उशिरा जायचं आहे ऑफिसमध्ये.
आजच जास्त काम पूर्ण करून आलो आहे,”
तो म्हणाला.

“ठीक आहे… आता तू झोपून घे,”
अनघा हळूच म्हणाली.

अनिकेतने तिला जवळ घेतलं.
“तू आलीस की मला लगेच झोप लागते,”
अनिकेत हसत म्हणाला.

अनघा लाजली.
“तुझे काहीही… असंच बोलत असतोस,”
ती म्हणाली.

“माझं काहीही असतं… पण खरं असतं,”
असं म्हणत अनिकेतने अनघाला घट्ट मिठीत घेतलं.

दोघं शांत उभे राहिले…
बाहेर घरात हलकी वाऱ्याची झुळूक होती,
आत त्यांच्यात एक सुंदर, सुरक्षित ऊब होती.


---


“आई… अनिकेत दादा कुठे गेला आहे का? अजून घरी आला नाही,”
मोनिका हॉलमध्ये येत विचारते.

ललिता थोडं चुळबुळतात.
“त्याने लग्न केले आहे. तो दुसरीकडे राहतो,”
त्या शांतपणे म्हणाल्या.

“काय! मला काहीच माहिती नाही?”
मोनिका थक्क होऊन बोलली.

“आम्हालाही माहिती नव्हतं.
लग्न करून आला… तेव्हा समजलं,”
ललिता म्हणाल्या.

मोनिकाचे डोळे भरून येतात.
“तुम्ही दादाला घरात घ्यायचं ना…?
कसं काय एकटं राहू दिलंत त्याला?”
मोनिका राग आणि दुःख एकत्र मिसळून म्हणाली.

ललिता आणि अशोक दोघेही शांत…
एकमेकांकडे पाहतात.
काहीच बोलू शकत नाहीत.

मोनिका ओशाळलेली, दुखावलेली…
रागातच तिच्या रूममध्ये निघून गेली.

अशोक आणि ललिता तिच्या मागे पाहत राहिले
घरातील वातावरण क्षणात जड झाले.


--

मोनिका रूममध्ये आली.
दार हलकेच बंद करून पलंगावर बसली.
मनात हजार विचार सुरू…

“अनिकेत दादाने कोणासोबत लग्न केले असेल?
मला कोणी काहीच कसं सांगितलं नाही…
अनघाने पण लग्न केले…
आणि दादानेही लग्न केलं…”

ती अचानक थांबली.
डोळे मोठे झाले.

“दोघांनी… दोघांनी तर एकमेकांशीच लग्न केलं नसेल ना?”

तिच्या मनात हा विचार वीजेसारखा चमकून गेला.
छातीत हलकंसं कळ आलं.

“नाही… पण शक्य आहे का?
अनघा मला ओळखते… दादाही तिला ओळखतो…
ते दोघे कॉलेजमध्येही भेटले असतील…”

मोनिका उठून खोलीत फेरफटका मारू लागली.

“मला उद्या दादाला भेटायलाच हवं.
काय झालं ते मीच ऐकणार.
विक्रम दादा तर सगळं जाणत असेल…
त्यालाही विचारायला पाहिजे…”

ती मनात पक्का निर्णय घेते.

मोनिकाच्या चेहऱ्यावर आता धास्ती, राग, काळजी आणि कौतुक सगळंच मिसळून गेलं होतं.


---


मोनिका लवकर उठून तयार झाली.
मोनिकाच्या डोक्यात अजूनही तेच विचार होते.
“आज दादाला भेटल्याशिवाय राहणार नाही.”

अंगणात आली तर विक्रम दूध घेऊन येत होता.


“अरे मोना! इतक्या लवकर? उठलीस की झोप नाही आली?” विक्रम म्हणाला.


“विक्रम दादा… मला तुझ्याशी बोलायचं आहे.” मोनिका थेट म्हणाली

विक्रम तिच्या चेहऱ्याकडे बघतो
तिचा गंभीर भाव पाहून समजतो, काही तरी महत्त्वाचं आहे.


“काय झालं? एवढं serious चेहरा का?” विक्रम म्हणाला

मोनिका थोडा श्वास घेते.


“अनिकेत दादाने कोणासोबत लग्न केलं?
आणि… अनघानेही लग्न केलं…
दोघांनी एकमेकांशी तर नाही ना केलं?” मोनिका म्हणाली.

विक्रमच्या हातातील दुधाचा पिशवी हलकीच थरथरली.
तो काही क्षण काहीच बोलला नाही.


“तुला हे कुठून वाटलं?” विक्रम म्हणाला.


“मला कोणी काही सांगत नाही…
पण माझं मन सांगतं दोघेच काहीतरी लपवत आहेत.
तू सांग… दादाने कोणाशी लग्न केलं?” मोनिका म्हणाली

विक्रम तिच्याकडे बघतो…
थोडं हसतो… पण डोळ्यात लपलेली गोष्ट दिसते.


“मोना… तुला हे माझे म्हणणे आज कळणार नाही, तुला खोटं वाटेल.
तुला दादालाच भेटावं लागेल.
तोच सत्य सांगेल.” विक्रम म्हणाला.


मोनिका चकित.
“म्हणजे… तू मला आत्ता सांगणार नाहीस?” मोनिका म्हणाली.


“नाही. माझं बोलणं चुकीचं होईल.
तू स्वतः दादाला भेट.
सगळं कळेल.
पण एक सांगू?
तुला धक्का बसेल… पण आनंदही होईल.” विक्रम म्हणाला..

मोनिकाचे डोळे आणखी मोठे झाले.
तिचं मन आता दादाकडे धावत होतं.


“ठीक आहे. मी निघते. आजच भेटते त्याला.” मोनिका म्हणाली.

विक्रम मान हलवतो.


“जाऊ दे… आणि राग करू नको.
सगळी कहाणी सुंदरच आहे.” विक्रम म्हणाला

मोनिका वेगाने घरात जाते
दादाला भेटायला तयार होण्यासाठी तयार होते.


---


क्रमश
दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all