तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -15
अनघा सांगायला लागली…
“मोनिका… आपण फर्स्ट इयरला होतो. तेव्हा तुझी माझी छान ओळख झाली होती.
बर्याच वेळा तुला अनिकेत सोडायला येत होता… तेव्हाच माझी आणि त्याची पहिली ओळख झाली.”
बर्याच वेळा तुला अनिकेत सोडायला येत होता… तेव्हाच माझी आणि त्याची पहिली ओळख झाली.”
मोनिका उत्सुकतेने म्हणाली,
“मग पुढे काय? कसा जुळला तुमचा ट्युन?”
“मग पुढे काय? कसा जुळला तुमचा ट्युन?”
तेवढ्यात अनिकेत बाहेर आला, तयार होत.
“अनघा, मी आता निघतो. उशिरा येईल,” तो म्हणाला.
“अनघा, मी आता निघतो. उशिरा येईल,” तो म्हणाला.
अनघा हलकेच स्मित करत म्हणाली, “ठीक आहे… काळजी घे.”
अनिकेत निघून गेला.
तिने दार बंद केले.
तिने दार बंद केले.
मोनिका दोन्ही हात कमरेवर ठेवून म्हणाली,
“आता सांग! मला एक-एक गोष्ट हवी… काहीही लपवायचं नाही.”
“आता सांग! मला एक-एक गोष्ट हवी… काहीही लपवायचं नाही.”
अनघा हसली.
“चल… बेडरूममध्ये बसू. शांतपणे सांगते.”
“चल… बेडरूममध्ये बसू. शांतपणे सांगते.”
दोघीही बेडरूममध्ये गेल्या.
मोनिका बेडवर पाय दुमडून बसली.
अनघा तिच्या बाजूला खुर्चीवर बसली आणि हळूवार बोलू लागली.
मोनिका बेडवर पाय दुमडून बसली.
अनघा तिच्या बाजूला खुर्चीवर बसली आणि हळूवार बोलू लागली.
“आमची ओळख हळूहळू वाढत गेली. तुझ्या घरी येताना आम्ही थोडं बोलायचो.
नंतर माझे एक्स्ट्रा क्लास असायचे… मी कॉलेजच्या बाहेर एकटी बसलेली असायची.
अनिकेत आला की एकदम उजळून जायचं वातावरण.
आम्ही अगदी साध्या गोष्टींवरून हसत-खेळत बोलायचो.”
नंतर माझे एक्स्ट्रा क्लास असायचे… मी कॉलेजच्या बाहेर एकटी बसलेली असायची.
अनिकेत आला की एकदम उजळून जायचं वातावरण.
आम्ही अगदी साध्या गोष्टींवरून हसत-खेळत बोलायचो.”
“मग एक दिवस… कुणीही खास कारण नसताना आम्ही एकमेकांचे नंबर घेतले.
मग मेसेज, कॉल… रात्री उशिरापर्यंत गप्पा…
हळूहळू आमची मैत्री इतकी गोड झाली की… आपल्यालाच कळत नव्हतं पण दोघंही प्रेमात पडत होतो.”
मग मेसेज, कॉल… रात्री उशिरापर्यंत गप्पा…
हळूहळू आमची मैत्री इतकी गोड झाली की… आपल्यालाच कळत नव्हतं पण दोघंही प्रेमात पडत होतो.”
मोनिका डोळे मोठे करत म्हणाली,
“हाय गं! मला काहीच कळलंच नाही!”
“हाय गं! मला काहीच कळलंच नाही!”
अनघा पुढे म्हणाली,
“एक दिवस तुझा बर्थडे होता. तू, मी, तुझ्या मैत्रिणी…
आणि अनिकेत-विक्रम दोघेही.
आपण खूप मजा केली… पण खूप उशीर झाला.”
आणि अनिकेत-विक्रम दोघेही.
आपण खूप मजा केली… पण खूप उशीर झाला.”
मोनिका लक्षपूर्वक ऐकत होती.
“अनिकेत मला घरी सोडायला येत होता.
तेवढ्यात दोन मुलांनी रस्ता अडवला…
वाटलं आयुष्य संपतं आता… पण अनिकेत पुढे उभा राहिला.
तो एकटाच दोघांसमोर उभा राहिला आणि मला वाचवलं.”
तेवढ्यात दोन मुलांनी रस्ता अडवला…
वाटलं आयुष्य संपतं आता… पण अनिकेत पुढे उभा राहिला.
तो एकटाच दोघांसमोर उभा राहिला आणि मला वाचवलं.”
अनघाच्या डोळ्यात पाणी आलं.
“त्या दिवशी कळलं… की मला त्याचं प्रेम आहे.
आणि तोही मला मनापासून जपतो.”
आणि तोही मला मनापासून जपतो.”
मोनिकाचे तोंड उघडेच राहिले.
“ओ माय गॉड… दादा इतका फिल्मी होता? मला माहीतच नव्हतं!”
“ओ माय गॉड… दादा इतका फिल्मी होता? मला माहीतच नव्हतं!”
अनघा हलकेच हसली.
“त्या दिवसाने… आमची कथा सुरू झाली.”
---
अनघा रूममध्ये एकटी बसली होती.
खिडकीतून हलकी हवा येत होती… खोलीत शांतता होती.
मोबाईलवर तिचं आवडतं रोमँटिक गाणं लागलं.
मनाचा सुरेल थरार जागा झाला.
मनाचा सुरेल थरार जागा झाला.
ती हलकेच गाणं गुणगुणायला लागली…
तिच्या डोळ्यासमोर अनिकेतचे चेहरेचे भाव, त्यांची स्माईल , त्याचा आवाज… सगळं तरळून गेलं.
ती खिडकीकडे पाहत गाणं म्हणत होती
कधी हसत, कधी लाजत… कधी उगीचच हृदय धडधडत होत होती
कधी हसत, कधी लाजत… कधी उगीचच हृदय धडधडत होत होती
अनिकेतला आठवून तिचे गाल गुलाबी झाले.
आपल्याला प्रेम आहे हे कबूल न केलं तरी… मनाने ते तिच्याकडून कबूल करून घेतलं होतंच.
आपल्याला प्रेम आहे हे कबूल न केलं तरी… मनाने ते तिच्याकडून कबूल करून घेतलं होतंच.
अनघाने हातातल्या ओढणीला हलकेच चुरगाळलं.
“किती विचित्र आहे ना… तो मला आठवला की मी अशी लाजते,” ती स्वतःशीच गुणगुणली.
“किती विचित्र आहे ना… तो मला आठवला की मी अशी लाजते,” ती स्वतःशीच गुणगुणली.
गाण्याच्या प्रत्येक ओळीबरोबर तिचं मन अनिकेतकडे उडत होतं…
त्या दोघांच्या पहिल्या भेटी… पहिल्या बोलण्यातला गोडवा…
पहिल्यांदा अनिकेतने तिच्याकडे नीट पाहिलेले डोळे…
त्या दोघांच्या पहिल्या भेटी… पहिल्या बोलण्यातला गोडवा…
पहिल्यांदा अनिकेतने तिच्याकडे नीट पाहिलेले डोळे…
त्याच्या आठवणींमध्ये हरवून ती अजूनच लाजली.
तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली.
“माझं हृदय कधी त्याचं झालं… ते मला कधी कळलंच नाही,” ती मनात म्हणाली.
“माझं हृदय कधी त्याचं झालं… ते मला कधी कळलंच नाही,” ती मनात म्हणाली.
---
अनिकेतलाही अनघाची आठवण येत असायची.
तो जेव्हा मोनिका सोबत बसून गप्पा मारायचा…
मोनिका अनघाबद्दल एखादं छोटंसं वाक्य म्हणायची,
आणि अनिकेतचं मन लगेच अनघाकडे धाव घ्यायचं.
मोनिका हसायला लावायची
“दादा, अनघा अशी करते… अनघा तसं बोलते…”
“दादा, अनघा अशी करते… अनघा तसं बोलते…”
आणि अनिकेतच्या चेहऱ्यावर न कळत हसू यायचं.
मोनिका लक्ष द्यायची
“दादा, तुला तिचं खूप आवडतं हो ना?
तू असा हसतोस की मला सगळं कळतं...”
मोनिका लक्ष द्यायची
“दादा, तुला तिचं खूप आवडतं हो ना?
तू असा हसतोस की मला सगळं कळतं...”
अनिकेत हसायचा, पण लपवूही शकत नव्हता.
अनघाचं नाव ऐकताच त्याचं मन खुश व्हायचं.
तिच्या छोट्या छोट्या गोष्टी, तिचा आवाज,
तिचं साधं हसणं…
काय पण आवडायचं त्याला.
अनघाचं नाव ऐकताच त्याचं मन खुश व्हायचं.
तिच्या छोट्या छोट्या गोष्टी, तिचा आवाज,
तिचं साधं हसणं…
काय पण आवडायचं त्याला.
कामात असला तरी तिचा विचार मनात घोळत असायचा.
अनघा काय करत असेल?
तिने जेवण केलं असेल का?
ती अभ्यासात गुंतली असेल का?
अशी काळजी घेणारी भावना त्याला स्वतःलाच नवीन वाटत होती. तू काही पण बोलते.
अनघा काय करत असेल?
तिने जेवण केलं असेल का?
ती अभ्यासात गुंतली असेल का?
अशी काळजी घेणारी भावना त्याला स्वतःलाच नवीन वाटत होती. तू काही पण बोलते.
मोनिका कधी कधी चिडवायची
“दादा, तिच्याशी बोलून घे ना…
नाहीतर तू दिवसभर अनघा अनघा असाच बसशील.”
“दादा, तिच्याशी बोलून घे ना…
नाहीतर तू दिवसभर अनघा अनघा असाच बसशील.”
अनिकेत हलकेच स्माईल करायचा
कारण मोनिकाला कळलं होतं…
तो प्रेमात पडतोय.
कारण मोनिकाला कळलं होतं…
तो प्रेमात पडतोय.
त्याला तिला सांगायचे नव्हते. तिला सांगितले म्हणजे सगळ्यांना समजेल. म्हणून त्याने मोनिकाला सांगितले नव्हते.
---
दुपारची लेक्चर सुटली होती.
कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये शांत वातावरण होतं.
अनघा क्लासमधून बाहेर आली तेव्हा तिच्या मोबाईलवर मेसेज चमकला.
अनिकेत : “बाहेर आहे… थोडं बोलायचं आहे.”
अनघाचं हृदय धडधडायला लागलं.
काय बोलणार असेल तो?
तोच आवाज… तोच नजर…
आणि तिच्या मनात गोंधळ उडाला.
काय बोलणार असेल तो?
तोच आवाज… तोच नजर…
आणि तिच्या मनात गोंधळ उडाला.
ती हळूच कॉलेजच्या गेटकडे आली.
अनिकेत तिथे उभा होता
साध्या शर्ट-जीन्समध्ये, केस वाऱ्यात उडत होते…
पण डोळ्यांत मात्र एक वेगळीच कोमलता होती.
अनिकेत तिथे उभा होता
साध्या शर्ट-जीन्समध्ये, केस वाऱ्यात उडत होते…
पण डोळ्यांत मात्र एक वेगळीच कोमलता होती.
अनघा जवळ येत म्हणाली,
“काय झालं? एवढं अचानक… बोलायचं म्हणालास?”
“काय झालं? एवढं अचानक… बोलायचं म्हणालास?”
अनिकेतने तिच्याकडे पाहिलं…
तो काही क्षण शब्दच शोधू शकला नाही.
तो काही क्षण शब्दच शोधू शकला नाही.
“अनघा… त्या दिवशी तुला काही झालं नाही ना?”
त्याचा आवाज काळजीने भारलेला होता.
त्याचा आवाज काळजीने भारलेला होता.
अनघा थोडं लाजत म्हणाली,
“नाही… तू मध्ये पडलास म्हणून वाचले.
नाहीतर खरंच खरं माहित नाही काय झालं असतं…”
“नाही… तू मध्ये पडलास म्हणून वाचले.
नाहीतर खरंच खरं माहित नाही काय झालं असतं…”
अनिकेतने एक दीर्घ श्वास घेतला.
तिच्या सुरक्षिततेने त्याच्या डोळ्यांत आराम उतरला.
तिच्या सुरक्षिततेने त्याच्या डोळ्यांत आराम उतरला.
दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली.
पण ती शांतताही किती गोड होती…
पण ती शांतताही किती गोड होती…
अनघाने हलकेच विचारलं,
“तू… घाबरलास का?”
“तू… घाबरलास का?”
अनिकेत हसला,
“तुझ्यासाठी… हो.
नाही माहिती का…
तुला काही झालं तर मला… बरं वाटलं नसतं.”
“तुझ्यासाठी… हो.
नाही माहिती का…
तुला काही झालं तर मला… बरं वाटलं नसतं.”
अनघा नजरेत नजर देऊ शकली नाही.
ती खाली बघत लाजली.
तिच्या हृदयात काहीतरी सळसळत होतं.
ती खाली बघत लाजली.
तिच्या हृदयात काहीतरी सळसळत होतं.
अनिकेत हळू आवाजात म्हणाला
“अनघा… तुझ्याबद्दल काहीतरी feel होतंय…
पण काय तेच समजत नाही…”
“अनघा… तुझ्याबद्दल काहीतरी feel होतंय…
पण काय तेच समजत नाही…”
अनघा हळूच हसली,
“मलाही.”
“मलाही.”
दोघांची नजर पहिल्यांदाच नीट भिडली
आणि त्या नजरेतच हजार शब्द होते.
आणि त्या नजरेतच हजार शब्द होते.
वाऱ्याचा हलका झुळूक…
कॉलेजचा गोंगाट त्यांच्यापासून दूर…
त्या क्षणी फक्त दोघंच होते
आणि त्यांचं हळूहळू वाढत जाणारं प्रेम.
कॉलेजचा गोंगाट त्यांच्यापासून दूर…
त्या क्षणी फक्त दोघंच होते
आणि त्यांचं हळूहळू वाढत जाणारं प्रेम.
.....
त्या दिवशी कॉलेज सुटलं होतं.
आकाश ढगांनी भरलं होतं… हलका वारा वाहत होता.
अनघाचा एक्स्ट्रा क्लास संपेपर्यंत अनिकेत गेटबाहेर उभा होता.
आकाश ढगांनी भरलं होतं… हलका वारा वाहत होता.
अनघाचा एक्स्ट्रा क्लास संपेपर्यंत अनिकेत गेटबाहेर उभा होता.
अनघा बाहेर आली तेव्हा तिने त्याला पाहिलं
तो तिच्याकडे पाहून हलकेच स्मित हसला.
तिला आपसूक हसू आलं.
तो तिच्याकडे पाहून हलकेच स्मित हसला.
तिला आपसूक हसू आलं.
“चल, तुला सोडतो,” अनिकेत म्हणाला.
दोघे बाजूने चालायला लागले.
रस्त्यावर शांतता…
पण मनात आवाज खूप होते.
रस्त्यावर शांतता…
पण मनात आवाज खूप होते.
अनिकेत हळूच बोलला,
“कालची रात्र… विसरली नाहीस ना?”
“कालची रात्र… विसरली नाहीस ना?”
अनघा लाजत म्हणाली,
“तू इतका काळजी घेतलीस… कशी विसरेन?”
“तू इतका काळजी घेतलीस… कशी विसरेन?”
दोघांच्या नजर भिडल्या आणि लगेच दूरही गेल्या.
ताणलेलं वातावरण… पण गोड.
ताणलेलं वातावरण… पण गोड.
थोडं चालल्यानंतर
अनघाच्या पायाखाली दगड आला आणि ती हलकी ढळली.
अनघाच्या पायाखाली दगड आला आणि ती हलकी ढळली.
क्षणभरात
अनिकेतने तिचा हात पकडला.
जोरात नाही… पण नेटक्या काळजीने.
अनिकेतने तिचा हात पकडला.
जोरात नाही… पण नेटक्या काळजीने.
अनघा एकदम थबकली.
तिचं हृदय धडधडू लागलं.
तिचं हृदय धडधडू लागलं.
त्या स्पर्शात काहीतरी होतं
उब होती… सुरक्षितता होती…
आणि एक भावनिक बोलणं होतं जे दोघेही बोलू शकत नव्हते.
उब होती… सुरक्षितता होती…
आणि एक भावनिक बोलणं होतं जे दोघेही बोलू शकत नव्हते.
अनिकेतचा हात अजूनही तिच्या हातात होता.
त्याने न सोडता विचारलं,
“ठीक आहेस ना?”
त्याने न सोडता विचारलं,
“ठीक आहेस ना?”
अनघा काही क्षण काहीच बोलू शकली नाही.
ती फक्त हळू आवाजात म्हणाली,
“हं… तू आहेस ना.”
ती फक्त हळू आवाजात म्हणाली,
“हं… तू आहेस ना.”
अनिकेतच्या चेहऱ्यावर शांत, गोड हसू उमटलं.
दोघे थांबलेच नाही…
ते चालतच राहिले आणि हातही सुटला नाही.
दोघे थांबलेच नाही…
ते चालतच राहिले आणि हातही सुटला नाही.
पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांना
हातांच्या उबेत सांगितलं
आपण एकमेकांसाठी वेगळे आहोत.
हातांच्या उबेत सांगितलं
आपण एकमेकांसाठी वेगळे आहोत.
तेव्हाच…
त्यांचं प्रेम नाव घेत न घेत
मनात रुजायला लागलं.
त्यांचं प्रेम नाव घेत न घेत
मनात रुजायला लागलं.
---
क्रमश
अनिकेत अनघाला प्रपोज कसे केले असेल?, त्यांच्यात दुरावा कसा आला?, त्यांनी लग्न कसे केले? पुढील भागात जाणून घ्या.
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा