Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -18

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं भाग -18



ती पाचही जणं चाट स्टॉलसमोर उभी राहिली.
स्टॉलवरून येणारा सुवास अनघाच्या चेहऱ्यावरच चमक घेऊन आला.

मोनिका हात चोळत म्हणाली,
“चला… पाणीपुरी कॉम्पिटिशन सुरू! मी जिंकेन, बाकी सगळे हरतील!”

अनिकेत खोडकर हसला,
“तुला तर एक प्लेट खाल्ली की हिचकी सुरू होते… कसं जिंकणार?”

मोनिका लगेच म्हणाली,
“अरे दादा! नियम बदलते मी!
जो जास्त तिखट पाणीपुरी खाईल, तो विजेता.”

शुभम बोलला,
“तर मग मोनिका सुरुवातीलाच बाहेर!”

सगळे जोरात हसले.


पाणीपुरीवाला म्हणाला,
“तिखट हवं? मध्यम? कमी?”


“मला सर्वात तिखट! " मोनिका म्हणाली.

अनघा लगेच तिच्या कानात कुजबुजली,
“घे आता… रात्री दादा आणि आजोबा दुध-साखर घेऊन फिरतील तुझ्यामागे!”

मोनिका जीभ बाहेर काढत,
“काळजी नको! मी शेरणी आहे!”

पहिली पुरी तोंडात टाकताच…
मोनिकाचे कान लाल, नाक लाल, डोळे पाणावले. शू... शू करत होती.

अनघा आणि शुभम तिला बघून हसू लागले.
अनिकेत म्हणाला,
“तिखट आहे की तुझ्या अट्टीतुडे सारखं जळजळीत?”

मोनिका खोकत म्हणाली,
“हाहा… फार हसू नकोस! तू पण खा!”

ते सगळे खायला लागले..


अनघाला पुरी तिखट असल्याने खाता येत नव्हती.
ती थोडी थांबली.
अनिकेतने तिच्याकडे आणलेले त्याने घेतले.

“इकडे दे… मी कमी तिखट मागवतो.”
असं म्हणत त्याने तिच्यासाठी वेगळं बाऊल घेतलं.
केवढं साधं काम, पण अनघाच्या मनात घर करणारं होते.

शुभमने ते पाहिलं आणि हसून म्हणाला,
“वा जीजू… आधी पुरी, मग पूरीचं पाणी, मग जीवनभर तिच्या आवडी लक्षात ठेवायच्या. खासच.”

अनघा लाजून खाली पाहू लागली.

तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार, अनिकेत म्हणाला.

शुभमला खूप छान वाटले..


मोनिका शेवटी हारलीच.
नाक चोळत म्हणाली,
“मी हार मानते… मला आईस्क्रीम नको, मला थंड पाणी हवं!”

आजोबा हसत म्हणाले,
“चल… आधी आईस्क्रीमच घेऊ. तुलाच खायला जास्त मिळेल.”

सगळेजण आईस्क्रीम घेऊन बसले.
थंड वाऱ्यात, हलक्या लाईट्सखाली…
अनघा शांतपणे बघत राहिली
तिचं दोन्ही जग एकाच जागी जमा झालेलं होते…

शुभम, तिचा जुना विश्वासू.
अनिकेत तिचं आजचं सुख.
मोनिका मस्तीचा तडका.
आजोबा आशीर्वादाचा सावली.

अनिकेत तिच्याकडे झुकून हलकेच विचारलं,
“सरप्राईज आवडलं?”

अनघा हलका हसली,
“खूप… कारण तू दिलंयस.”

दोघेही हसले.
मोनिकेने लगेच फोटो काढला
“थांबा, हे इंस्टाग्रामवर टाकते— Happy Family म्हणून!”

अनिकेत आणि शुभम दोघे एकत्र म्हणाले,
“मोनिकाऽऽ… फोन खाली ठेव!”

आणि सगळे पुन्हा एकदा हसायला लागले. मोनिकाने ठेवून दिला..

अनिकेत आणी मोनिका, आजोबा गप्पा मारत होते.

अनघा आणि शुभम थोडं बाजूलाच उभे होते.
गल्लीच्या कोपऱ्यावरच्या दिव्याच्या मंद प्रकाशात दोघांची हलकीशी सावली पडत होती.

अनघा मंद आवाजात म्हणाली,
“आई-बाबा कसे आहेत?
त्यादिवशी बाबा मला भेटायला आले होते… खूप वेळ बसले होते माझ्यासोबत छान बोलले. काहीतरी बोलायचं होतं, पण बोलले नाही. आई बदल असेल, मला वाटतं आहे. मला वाटतं आहे
‘काही काम लागलं तर, मला सांग.’” फक्त एवढेच म्हणाले. अनघा म्हणाली.

शुभमने एक दीर्घ श्वास घेतला.
"बाबा माझ्यासोबत काहीच बोललं नाही.
पण बरं झालं ताई… कमीतकमी तुला भेटायला तरी आले.
त्यांची खूप इच्छा होती.” शुभम म्हणाला..

अनघा हलकीशी उदास स्मित करून म्हणाली,
“हो… त्यांना सांगायला पाहिजे होतं, पण शब्दच फुटत नव्हते त्यांच्या तोंडातून.”

शुभमने तिच्या खांद्यावर हात ठेवला,
“जाऊ दे ताई… मनातलं असलं की बोलणं कठीण होतं.
चल आता… सगळे आपल्याकडे बघत आहेत. नाहीतर जीजू काहीतरी मजा-मस्करी करेल.”

अनघा हसली,
“चल मग…”

दोघे परत बाकीच्यांकडे गेले.
मोनिका लगेच म्हणाली, “अरे वा, तुम्ही दोघ इतका सीक्रेट मीटिंग घेऊन आलात? आम्हालाही सांगा ना काय बोललात!”

अनिकेत, आजोबा आणि बाकीचे सगळे हसत होते
आणि त्या क्षणी अनघाच्या मनात एकच विचार आला…

"कितीही दूर गेली तरी… माझी माणसं अजूनही माझ्याभोवतीच आहेत."

आता मी निघतो. आई बाबा वाट बघतील, बाबांना सांगितले आहे. पण आई ओरडेल, बाबांना काही बोलता येणार नाही. शुभम म्हणाला..

चालेल नीट जा, अनघा म्हणाली.


शुभम तिथून घरी जातो.
थोडा थकलेला असतो, पण मनात कुठेतरी समाधानही असतं… एक दिवस चांगला गेला याची जाणीव.

अनघा, अनिकेत, मोनिका आणि आजोबा देखील घरी निघून जातात.
गाडीच्या रस्त्यात सगळ्यांमध्ये हलकंसं बोलणं, थोडी हसणं-मस्करी सुरू असते.
आजोबा मात्र मागच्या सीटवर बसून शांतपणे खिडकी बाहेर बघत राहतात…
त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित
“आजची मुलं किती समजूतदार झाली आहेत…”
असा विचार त्यांच्या मनात फिरत असतात.

मोनिका अनघाला खोडकरपणे म्हणते,
“अनघा , आजचा दिवस भारी गेला ना? सगळं इतकं छान झालं…”

अनिकेत म्हणतो,
“हो… आणि अजून बरीच कामं आहेत उद्या. पण काळजी नका करू, सगळं जमून जाईल.”

घराच्या दिशेने जाताना वातावरण शांत, पण मन मात्र सगळ्यांचं खूश.


---

सगळे घरी आले आणि हॉलमध्ये बसले.
थोड्याच वेळात मोनिका उड्या मारत म्हणाली,
“आज ना… मला असं वाटत होतं आपण पिकनिकलाच आलोय! अनघा, तुझ्यासोबत मज्जा डबल होते.”

अनघा हसली.
अनिकेत म्हणाला, “हो, आणि माझ्याशी मस्ती ट्रिपल होते, बरोबर ना?”

मोनिका लगेच तोंड वाकडं करून,
“तुझ्याशी? अरे तू तर बिल्डर भाऊ, नेहमी सीरियसच!”

आजोबा मोठ्याने हसले.
“मोनिका, तू खूप छान आहेस ग. घरात तुझ्यामुळे चैतन्य येतं.”

मोनिका अभिमानाने म्हणाली,
“हो ना! मला माहित आहे मी हॅप्पी व्हायरस आहे.”

आजोबा अजूनच हसत म्हणाले,
“हो हो, अगदी व्हायरसच… पण गोड!”

अनघा आणि अनिकेत दोघेही हसले.

थोडा वेळ सगळेजण गप्पा मारत बसले.
घरात शांत, आनंदी वातावरण होतं.

थोड्या वेळाने आजोबा उठले आणि म्हणाले,
“आता झोपा सगळे… खूप वेळ झाला आहे.
अनिकेत, तुला उद्या कामाला जायचं असेल ना?
आणि मी पण आज खूप मजा केली… आता दमलो आहे.
मी माझ्या घरी जाऊन झोपतो.”

मोनिका लगेच म्हणाली,
“ए आजोबा, उद्या पुन्हा येणार ना?”

आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
“ मी रोज येतो, … तुला माझी आठवण आली की लगेच इथे येत जा.”

मग ते निघाले, आणि दारात पोहोचेपर्यंत मोनिका त्यांच्या मागे हात हलवत उभी राहिली.


मोनिका, अनघा आणि अनिकेत तिघेही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.
अजूनही चाटचा आणि आईस्क्रीमचा मूड त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मोनिका दोघांना चिडवत म्हणत होती,
“तुम्ही दोघं ना… इतके क्युट दिसता की, तुम्हाला पाहिल्यावर मला पण लग्न करावंसं वाटतं!”

अनिकेत भुवया वर करून,
“अगं! आधी कॉलेज पूर्ण कर. नंतर उगाच मोठ्या प्लॅनिंगला लागतेस.”

मोनिका लगेच,
“अरे वाह! मला समजावतोस? स्वतःने तर अर्धं आयुष्य काहीतरी लपवलं!”

अनघा हसत हसत बसली होती.
सगळ्यांचे बोलणे, हसणं … वातावरण खूप हलकं झालं होतं.

थोड्याच वेळात मोनिका पाय दुमडून सोफ्यावर टेकली.
अनघा हातात उशी घेतच बोलत होती… आणि अचानक तिचा आवाज मंद झाला.

अनिकेतने पाहिलं
दोघींचे डोळे मिटायला लागले होते.
त्यांनाही दिवसाचा थकवा जाणवत होता.

मोनिका म्हणाली,
“मी म्हणतेय… आपण बोलत, बोलत… जरा. ”
आणि तिचं वाक्यच अर्धवट राहिलं.
ती गादीला टेकून झोपून गेली.

अनघाही हळूच बाजूला घसरली आणि अनिकेतच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली.

अनिकेत शांतपणे हसला.
दोघींना झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर मायेचं हसू पसरलं.

तो हलकेच उठला,
दोघींवर चादर घातली,
लाईट मंद केला…

आणि स्वतःही त्यांच्या शेजारी येऊन बसला.
क्षणभरात त्यालाही डोळे मिटले.

आणि तिघंही एकाच खोलीत…
शांतपणे, सुखाने झोपून गेले.



क्रमश
दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all