Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -19

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग -19



सकाळचं गार वारे लागलं, आणि अनघा नेहमीप्रमाणे लवकर उठली.
तिने घर आवरलं, स्वयंपाकाची तयारी केली.

थोड्यावेळाने अनिकेतही उठला.
“गुड मॉर्निंग,” तो डोळे चोळत म्हणाला.

दोघंही मोनिकाकडे गेले
पण मोनिका अजूनही गादीला बिलगून झोपली होती.

अनघाने हलकेच म्हटलं,
“मोनिका... उठ ना… सकाळ झाली.”
पण काही प्रतिसादच नाही.

अनिकेत तिला उठवायला गेला.
“ए उठ!! किती झोपतेस??”
मोनिका तोंड वळवून परत झोपली.

अनिकेतने अगदी शेवटचा उपाय केला
त्याने तिच्या तोंडावर थोडंसं पाणी टाकलं.

क्षणात
“पाऊस… पाऊस… पाऊस पडतोय!!”
मोनिका ओरडत उठली.

अनघा आणि अनिकेत पोट धरून हसू लागले.

“अगं, हा पाऊस नाही… तू झोपेचे राज्य सोडून बाहेर ये जरा!” अनिकेत म्हणाला.

मोनिका झोपेच्या बोबड्या आवाजात,
“काय यार… तुम्ही मला त्रास देता. मी लहान आहे म्हणून का?”

अनिकेत कपाळावर हाथ मारून,
“हो हो… बाळ आहेस तू!
आता उठ लवकर, मला ऑफिसला जायचं आहे.”

मोनिका अचानक उठली,
“अंघोळ तर झाली… आता काय आवरू?”


“मोनिका… आता मी खरंच मारेल!
जा, आवरून ये!” अनिकेत म्हणाला.

मोनिका नाक वर करून,
“जा ना… बाबा झालाय तू माझा ,” म्हणत बाथरूममध्ये गेली.

अनघा तिच्याकडे बघून हसत होती.

तिघांची ही सकाळची मस्ती… घरभर गोडस हसू पसरवत होती.


मोनिका बाथरूममध्ये गेल्यानंतर घरात पुन्हा शांतता पसरली.
अनघा नाश्त्याची तयारी करत होती.
अनिकेत किचनच्या दाराला टेकून तिला बघत होता.

तेवढ्यात दरवाज्यावर हलका आवाज आला.

टक…टक…

अनघा वळली
“अनिकेत, आजोबा आलेत!”

आजोबा दरवाज्यात उभे होते, एकदम ताजेतवाने, पण चेहऱ्यावर नेहमीसारखं प्रेमळ हसू होते.

“काय रे, उठलो का सगळे?” आजोबा म्हणाले.

अनिकेत हसत,
“उठलो हो… पण मोनिकाला उठवायला थोडी मोहीम राबवावी लागली.”

आजोबा हसले,
“अग ती पोरी तर एकदम दंगा आहे.
काल रात्री एवढी मस्ती केलीत की आज उठणं जडेलच ना!”

अनघा पुढे येत म्हणाली,
“आजोबा, आत या… मी नाश्ता करत आहे. चहा देते आत्ताच.”

आजोबा आत आले, खुर्चीवर बसले.
अनिकेत त्यांच्या बाजूला बसला.

“अनघा, काल खूप मजा केली ना तुम्ही?” आजोबा विचारत म्हणाले.

अनघाने हलकं हसत मान डोलावली.
“हो आजोबा, खूप… मोनिका आणि आपण असता ना, घर अगदी जिवंत वाटतं होते.” ती म्हणाली.

आजोबा तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाले,
“तू हसतेस ना… ते पाहून मी पण शांत होतो. तू अशीच खूश राहिली पाहिजेस.”

मग त्यांनी अनिकेतकडे पाहून डोळा मारत म्हटलं
“आणि हा नायक… काल काय काय मस्ती करत होता, आम्हाला दिसलंच आहे.”

अनिकेत लाजला,
“आजोबा… आता तुम्हीही सुरुवात केली ना!”

ते तिघे हसत होते.
घरात इतकं उबदार वातावरण होतं, जणू खूप दिवसांनी खऱ्या घराची ओळख झाली होती.

तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडतो
“माझ्यावाचून इतकी मिटींग?
मोनिका मिसिंग असताना कुणी बोलूच नये!”
मोनिका टॉवेल घेऊन केस पुसत म्हणाली.

आजोबा हसून म्हणाले,
“अग तू आलीस म्हणजे आता घरातला आवाज परत आला!”

नाश्त्याची प्लेट मांडून अनघा सगळ्यांना बोलावते.
आजोबा, अनिकेत आधी बसलेले.
मोनिका हातात कंगवा घेऊनच येते.


“अहो, मी अजून सुकवले नाही केस… पण भूक अशी लागली आहे की आधी नाश्ता, मग सौंदर्य!” मोनिका म्हणाली.

अनघा हसत तिच्यासमोर प्लेट ठेवते.
अनिकेत डोळे फिरवतो.


“तू काल आईस्क्रीम खाऊन पोट भरलं नाहीस वाटतं?” अनिकेत म्हणाला.


“अरे, माझं पोट दिसते तसें नाही आहे.!
कितीही खाऊ शकते!” मोनिका म्हणाली

आजोबा हसतात,
“तू तर खरी घराला रंगत आणणारी पोरी आहेस.”

मोनिका लगेच हात जोडून,
“थँक यू आजोबा!
अनघाने तर मला दासी बनवलं आहे.
'कढी आण, पूर्‍या दे, चटणी दे' असं सांगून सांगून हात दुखले!”

अनघा एकदम चकित,
“अग मी केव्हा सांगितलं असं?
तूच सगळं स्वतःहून घेत होतीस!”

“हो घेत होते… पण तक्रार करायला मजा येते ना!” मोनिका म्हणाली.

अनिकेत आणि आजोबा मोठ्याने हसतात.

अनघा पण हसू आवरत नाही.

मोनिका, अनिकेतकडे बघत:
“आणि हो… काल तुझं सरप्राईज तर टॉप होत!
शुभम आला तेव्हा अनघा तर बटरसारखी वितळली होती!”

अनघा लाजते,
“मोनिका… बस्सss!”


“का? मला पण सांगायला आवडतं.
माझा भाऊ इतका रोमँटिक असेल असं वाटलंच नव्हतं!” मोनिका म्हणाली.

अनिकेत खोटं रागावून म्हणतो,
“एक शब्द अजून बोललीस ना, तर आज आईस्क्रीम कॅन्सल!”

मोनिका प्लेट हातात घेऊन नाटक करते.
“नाहीईईईई!
माझं प्रेम, माझं आयुष्य, माझी जान आईस्क्रीम!!
ठीक आहे… मी आता गप्प बसते.”

सगळे हसतात.
आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात.

“तू दोघांना खुश ठेवतेस… म्हणून मला तू खूप आवडतेस.” आजोबा म्हणाले

मोनिका हसून ओठातल्या ओठात,
“मी कुणाला खुश नाही ठेवत…
फक्त माझ्या लोकांना त्रास देत जगते!”

अनघा बाजूला बसलेली तिला हलकं ढकलते.
नाश्ता हसत खेळत संपतो.


मोनिका उभी राहिली, पर्स घेतली आणि आजोबा-अनघासमोर आली.
तिच्या चेहऱ्यावर नेहमीची मस्ती नव्हती… आज थोडी शांत होती.

“आजोबा, मी आता निघते.
पण मी खरंच… लवकरच परत येईल तुमच्याकडे.
तुम्ही एकटे बसू नका… बरं?” मोनिका म्हणाली.

आजोबांच्या डोळ्यात हलकी पाण्याची किनार आली.
त्यांनी तिला जवळ घेतलं.

“बाळ… तुझ्यासारखं मन असलेली मुलगी घरात आली की घर उजळून जातं.
आता नीट जा… पण ये नक्की. मी वाट बघेन.” आजोबा म्हणाले.

अनघा बाजूला उभी होती.
तिला मोनिकाची ऊर्जा आणि आजोबांचे प्रेम बघून आपसूकच स्माईल आली.
क्षणभर घरातलं वातावरण गोड आणि भावूक झालं होते.

अचानक अनिकेत बाहेरून हाक मारतो—


“मोनिका… मला उशीर होतोय! चल, ऑफिसलाही जायचंय.” अनिकेत म्हणाला.

मोनिका हसली.
“येतोय बाबा … किती घाईघाई!”

ती पुन्हा आजोबांकडे पाहते.


“ठीक आहे आजोबा… बाय!
आणि हो, दुपारी अनघाला त्रास देऊ नका… तिला काम असतं!” मोनिका म्हणाली.

ती डोळा मारत हसते.


“अग्ग… मी तुला दाखवते नंतर!” अनघा म्हणाली.

दोघींची मस्ती पाहून आजोबा पुन्हा एकदा हसतात.

अनघाने दारापर्यंत येऊन तिला हात हलवून निरोप दिला.

मोनिका अनिकेतसोबत बाइकवर बसते.
अनिकेत हेल्मेट लावत म्हणतो.


“चल मग, मॅडम आईस्क्रीम क्वीन.” अनिकेत म्हणाला..


“हो हो… मला आईस्क्रीम हवंय, प्रॉमिस!” मोनिका म्हणाली.

अनिकेत हसला.
दोघे घराबाहेर निघून गेले.

घरात शांती पसरली.
आजोबा खुर्चीवर बसले, अनघा स्वयंपाकघरात गेली…
पण दोघांच्या चेहऱ्यावर मोनिकाने सोडलेली हसरी उब अजूनही होती.


---


मोनिका आणि अनिकेत निघून गेल्यावर घरात हलकी शांतता उतरली.
अनघा पाणी भरून ठेवत होती. आजोबा त्यांच्या खुर्चीवर निवांत बसले होते.

थोड्याच वेळात अनघा येऊन आजोबांच्या समोर बसली.


“मोनिका होती… तर घर भरल्यासारखं वाटत होतं.
आता घर अगदी… खाली खाली वाटतंय.” अनघा म्हणाली.

आजोबा हसले, पण त्यांच्या हसण्यातही थोडं रिकामेपण दिसत होतं.

“अग बाळ, ती इतकी बडबड करते की
घरात हवा जरी थांबली तरी तिला बोलायचं असतं!” आजोबा म्हणाले.

दोघेही हसले.

आजोबा पुढे म्हणाले:
“पण बघ… अशा माणसांमुळे घर जिवंत राहतं.
ती आली की… तुमच्यापेक्षा मला जास्त ऊर्जा यायची.
छान वाटत होतं.”

“हो आजोबा…
तिचं बोलणं, हसणं, चिडवणं
सगळंच गोड आहे.
तिच्यामुळे दोन दिवसात घराचे वातावरण पूर्ण बदलले.” अनघा म्हणाली.

आजोबा तिच्याकडे प्रेमाने पाहतात.


“तूही बदललीस अनघा.
कालपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख दिसायचं…
आता त्याजागी थोडंसं हसू दिसतं.
हे मला जास्त आनंदाचं.” आजोबा म्हणाले..

अनघा शांत झाली…
हलकं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं.

“कधी कधी वाटतं… काही लोक आपल्याला भेटतात
फक्त आपलं मन हलकं करण्यासाठी. मोनिका तशीच आहे.” अनघा म्हणाली.

आजोबा मान हलवून म्हणाले

“हो.
तुम्ही सारं कुटुंब एकत्र असाल…
तर माझं आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटतं.”

अनघा त्यांच्या बाजूला बसली,
त्यांच्या हातावर हात ठेवते.


“आम्ही आहोत ना तुमच्यासोबत.
कधीही एकटे नाही राहू तुम्ही.” आजोबा म्हणाले.

आजोबा भावूक हसतात.

घर शांत होतं…
पण त्या शांततेतही प्रेमाचं उबदारपण दाटून पसरलेलं होतं.


---


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all