Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -20

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 20



ललिता त्राग्याने घरभर फिरत होत्या.
“मोनिका आज तरी येणार आहे का? अनघाने तर तिच्यावर जादूच केली आहे. घर म्हणजे तिच्याशिवाय रिकामंच!”

अशोक शांतपणे पेपर बाजूला ठेवतात.
“अगं, अनिकेतही तिथेच होता. काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस.”

ललिता अजूनच चिडून,
“पण रात्री ती आपल्याकडे आलीच नाही! तिथे थांबायचं कारण तरी काय?”

अशोक हळू आवाजात पण ठाम:
“तिने मला विचारलं होतं. थांबू का म्हणून. आणि तिला वाटलं
भावाजवळ राहावं. एवढंच.”

ललिता आश्चर्याने त्यांच्याकडे बघते,
“मग मला का नाही सांगितले? मी तिला लगेच बोलावून घेतलं असतं!”

अशोक हसत, खट्याळपणे उत्तर देतात,
“म्हणूनच सांगितलं नाही. तू आलासालंस करून तिला लगेच ओढून आणली असतीस.”

ललिताने रागाने श्वास सोडला… पण चेहऱ्यावर नकळत कोमलता आली.
“हं… असो. आली की सांगेन तिला, रोज राहायला इथेच यावं!”


ललिता किचनमध्ये चहा करत असतात. अशोक शांतपणे त्यांच्या मागे उभे राहतात.

ललिता पुटपुटत म्हणतात,
“मोनिका आली की बस्स, दोन दिवस तरी मला तिच्यासोबत बसून बोलायचं आहे… अनिकेत मोनिकाच्या भांडणांपेक्षा तिच्या गप्पा मजेशीर!”

अशोक हसतात,
“हो, हो… तुझ्या गप्पांची साथीदार मिळाली की तू खुश.”

ललिता कपात चहा ओतत , दोघे  चहा घेतात.

---

मोनिका दरवाजा उघडून आत येते…
अशोक हॉलमध्ये बसलेले. ललिता किचनमध्ये भांडी लावत असतात. मोनिका शांतपणे आत येते.

“आई… बाबा… मी आले.” मोनिका म्हणाली

अशोक लगेच उठतात.
“अगं मोनिका! ये गं, बस इथे. कशी आहेस?”

मोनिका त्यांच्याजवळ येऊन बसते.
“ठीक आहे बाबा.सकाळी लवकर इथली. Dadan3 मला सोडले.” मोनिका म्हणाली.

ललिता आवाज ऐकून बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा नाराजीचा भाव, पण काळजीही दडलेली.

“काय मोनिका… आज लवकर आलीस? काल तरी कुठे होतीस? फोनही नीट करत नाहीस तू!” ललिता रागात म्हणाल्या.

मोनिका त्यांच्या जवळ येते, हळूच हात ललिताच्या खांद्यावर ठेवते.
“आई, रागावू नको. मी अनिकेत दादाकडे थांबले होते. अनघा, … सगळे होते. खूप मजा आली.” मोनिका म्हणाली.

ललिता चेहरा वळवतात, पण डोळ्यात ममत्व येतं.
“तरी पण मला सांगायला पाहिजे होतं ना? मी वाट पाहत बसले होते.”

अशोक हसत म्हणतात,
“अगं, मी सांगितलं होतं ना, तिला थांबायचं असेल तर थांबू दे. त्यात काही बिघडत नाही.”

ललिता थोडी शांत होतात.
“बरं… बरं… पण पुढे सांगून जायचं. आई आहे मी तुझी.”

मोनिका त्यांच्या मांडीवर बसल्यासारखी जवळ येते.
“सॉरी आई. खरंच सॉरी. आज आलोय ना… बसू तुझ्या जवळ.”

ललिताचा राग वितळतो.
“चल, जेवायला काहीतरी गरम करून देते. मजा करून आली आहेस. थकली असशील.”

अशोक न्युपपेर फोल्ड करत म्हणतात,
“चल, जेवायला बसू. माझी मुलगी आली की घरचं वातावरणच बदलतं!”

मोनिका हसते… घरात एकदम उबदारपणा येतो.

मोनिका सोफ्यावर बसून आपल्या बाबांशी मस्त गप्पा मारत होती.


“बाबा, आम्ही फिरायला गेलो होतो ना… अहो, खूप मजा आली! अनघा, अनिकेत, आजोबा, सगळ्यांसोबत. चाट खाल्ली, पाणीपुरी खाल्ली… अनिकेत दादाने तर मला खास आईस्क्रीमही खाऊ घातलं.” मोनिका म्हणाली.


“खूप छान… तुम्ही दोघं भाऊ बहीण भेटले की घरचं वातावरणच बदलतं. मला माहीत होतं, तू गेलीस की मजा होणारच.” अशोक म्हणाले.

इतक्यात ललिता किचनमधून बाहेर येतात, हात पुसत, थोड्या नाराजीसह.

“फिरायला गेलात ठीक आहे, पण अनघाला काही जेवण बनवता येत नसेल. माझ्या मुलाला काय खायला घालते कोण जाणे! बिचारा अनिकेत उपाशीच राहत असेल!” ललिता म्हणाल्या.

मोनिका लगेच डोळे मोठे करत हसत म्हणते

“आई, तुला अनघाचे जेवण खाल्ले तर बोटं चाटत राहशील. खूप छान स्वयंपाक करते ती! अनिकेत दादा रोज पोटभर खाऊनच ऑफिसला जातो.” मोनिका म्हणाली

ललिता चेहरा वळवतात पण आतून त्यांना आनंदच असतो.

“तू तर कायम अनघावरच राग काढतेस. मुलगा आनंदात आहे, तेवढं पाहा.” अशोक म्हणाले..

त्यांच्या अशाच गप्पा, टोमणे, हसणे चालू होते… घरात एकदम हलकं वातावरण.


---


अनघा मात्र आपल्या कामात गढलेली.
दोन दिवस काम कमी होतं, पण आज अचानक खूप ऑर्डर्स आल्या होत्या.
शिल्पा सोबत काम करत होती.

वेळ कसा जात होता, अनघाला कळतच नव्हतं.

घड्याळ एक वाजून गेले…
आजोबा घरात एकटे बसून अनघाची वाट बघत होते.

शेवटी त्यांनी फोन केला.

“अनघा… एक वाजला आहे. तुला भूक नाही का? किती काम करणार तू? थोडं स्वत:कडेही लक्ष दे.” आजोबा म्हणाले.

अनघाला ते ऐकून अपराधी वाटलं.


“आजोबा, माझ्या लक्षातच आलं नाही वेळ! तुम्ही आधी जेवून घ्या, मी येते थोड्या वेळाने.”


“नाही. तू आल्यावरच आपण जेवू. मी वाट बघतो.” आजोबा ठाम आवाजात म्हणाले

अनघा चिंताग्रस्त झाली.
तीने शिल्पाला थोडा वेळ सांभाळायला सांगून, तिच्या घरी जायला निघाली.

घरी जाऊन आवाज दिला
“आजोबा… चला, जेवूया.”

आजोबा दाराजवळच उभे हसत होते.


घरात पुन्हा एकदा शांत, उबदार वातावरण पसरलं.


अनघा स्वयंपाकघरातून गरम गरम जेवण घेऊन आली.
आजोबा टेबलाजवळ आधीच बसले होते.

तीने प्रेमाने ताट वाढले आणि दोघे शांतपणे जेवायला बसले.

थोडं खातानाच आजोबा गंभीरपणे म्हणाले

“अनघा… इतकं जास्त काम करू नकोस.
जेवण वेळेवर झालं पाहिजे.
त्यात अनिकेतलाही काही माहिती नसते तू किती थकतेस.
मला काळजी वाटते बाळा.” आजोबा म्हणाले.

अनघा हळूच हसली, पण तिच्या नजरेत थकवा दिसत होता.


“आजोबा… आजच काम खूप आलं होतं.
दोन दिवस काहीच नव्हतं, म्हणून आज अचानक गोंधळ झाला.
काम करताना मला वेळच कळत नाही.
म्हणून उशीर झाला.” अनघा म्हणाली.

आजोबा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले


“काम येतं जातं… पण शरीर एकदाच आहे.
स्वतःची काळजी न घेतलीस तर उद्या हेच काम त्रास देईल.
थोडं कमी वेगात कर…
आणि जेवण वेळेवर कर.
नाहीतर मला आणि अनिकेतला दोघांनाही काळजी लागते.” आजोबा म्हणाले.

अनघा हलकं हसली.

“ठीक आहे आजोबा… पुढे लक्ष देईन.
तुम्ही काळजी करू नका.” अनघा म्हणाली.

आजोबा समाधानाने मान हलवतात.

“हसलीस ना तू… म्हणजे मी जिंकलो.” आजोबा म्हणाले.

दोघे हसत हसत जेवण संपवतात.
घरात पुन्हा एकदा शांत, प्रेमळ वातावरण पसरतं.


---


अनिकेत ऑफिसमधून ब्रेकमध्ये बाहेर आला.
मोबाईल काढला… अनघाचा नंबर डायल केला. अनघाने पण लगेंच उचलला.


“हॅलो अनिकेत…?” अनघा म्हणाली.


“कुठे आहेस?
आजोबांनी कॉल केला होता मला… म्हणाले वेळेवर जेवलं नाहीस तू.” अनिकेत (थोडा काळजीत) म्हणाला.

अनघा हसली.


“अरे काही नाही… आज काम खूप होतं.
वेळ कळलाच नाही.
आलोच मी… आता जेवलं आम्ही दोघांनी.” अनघा म्हणाली


“हं… पण जपून काम कर.
तू थकलीस तर मला अजिबात आवडत नाही.
चहासुध्दा वेळेवर घेत जा.” अनिकेत म्हणाला.

अनघाला त्याच्या काळजीने हसू आलं.


“मी सांभाळते सगळं…
आणि आजोबांनीही भरपूर ज्ञान दिलं आहे, काळजी नको.” अनघा म्हणाली


“हो, आजोबा आहेत ना आपले बॉडीगार्ड.
ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येईन. तू थोडी विश्रांती घे. घरातले एवढे काम करू नको, ” अनिकेत म्हणाला..


“ठीक आहे, अनघा म्हणाली.

दोघे थोडा वेळ हसत गप्पा मारतात.


“ठीक आहे, आता कामाला जातो.
काही लागलं तर लगेच फोन कर. मी आहे ना.” अनिकेत म्हणाला..


“हो… आहेस.” अनघा हसत म्हणते.

कॉल कट झाला…
पण दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं.


---



क्रमश


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all