Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग -21

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग -21




अनघा शिल्पाकडे जाऊन लवकर  लवकर काम उरकून आली. दुपारी आजोबांना जेवण उशिरा दिले. तिला ते आवडले नव्हते.
सहा वाजता ती थेट घरी पोहोचली.
सगळा दिवस धावतपळत गेलेला… अंगात ताकदच उरली नव्हती.

घरी येताच तिने पटकन फ्रेश होऊन घेतलं,
आणि न थांबता चहा ठेवला.
आजोबांना हाक मारली

“आजोबा… चहा झाला.”

आजोबा हळूहळू बाहेर आले. अनघाला पाहत म्हणाले
“अनघा, आज खूप उशीर झाला गं.”

अनघा चहा कपात ओतत म्हणाली
“आज काम खूप होतं आजोबा… म्हणून लक्षच गेलं नाही.”

आजोबा कप हातात घेत गंभीर आवाजात म्हणाले
“असं रोज काम करशील तर मला अनिकेतला सांगावंच लागेल.”

अनघा लगेच घाबरली
“नाही आजोबा, नका सांगू ना…
पाच सहा दिवसांनी रिझल्ट आहे.
तो लागला की मी दुसरीकडे ट्राय करेन.
थोडं दिवस सांभाळते.” अनघा म्हणाली.

आजोबांनी काहीच उत्तर दिलं नाही.
फक्त तिला एक प्रेमळ, काळजीचा कटाक्ष दिला.

इतक्यात दरवाजावर टकटक झाली.
अनघा धावतच उघडायला गेली.
बाहेर अनिकेत उभा होता…
त्याला पाहताच अनघाच्या चेहऱ्यावर थकव्यामागून एक हलकी, गोड स्माईल आली.

अनिकेत घरात आला, आजोबांकडे गेला आणि काही हलक्या गप्पा मारल्या.
मग म्हणाला
“मी जरा फ्रेश होऊन येतो.” तो बेडरूममध्ये निघून गेला

अनघा आजोबांचा रिकामा कप घेऊन किचनमध्ये गेली आणि अनिकेतसाठी ताजा चहा केला.

थोड्याच वेळात अनिकेत बाहेर आला.
अनघा त्याला कप देताना हलकेच म्हणाली
“हा… गरम आहे, सावकाश.”

अनिकेतने चहा घेतला,
तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं…
पण तो काही न बोलता फक्त शांतपणे तिचं आभार मानत स्माईल केली.

त्या संध्याकाळी घरात शांतता होती…
अनघा, अनिकेत आणि आजोबा
तिघांची एकत्र असणारी छोटीशी उबदार दुनिया आहे.

अनिकेतने चहा घेतला… कप हातात घेताच त्याने अनघाकडे नीट पाहिलं.
तिच्या चेहऱ्यावरचा थकवा त्याला पहिल्या नजरेत दिसला.


“आज खूप दमली आहेस ना?” अनिकेत (हळू आवाजात) म्हणाला.

अनघा कप ठेवत हसली.
“हो… पण काम होतं. पूर्ण केलं.”

आजोबांनी दोघांकडे पाहत खोल श्वास घेतला.

“मी सांगतोय ना, ही स्वतःला त्रास करून घेते.
एकट्याने एवढं काम नको करायला.” आजोबा म्हणाले.

अनघाने आजोबांना इशारा केला, ‘काही सांगू नका’.

अनिकेतने ते पाहिलं… पण तो शांतच राहिला.
तो कपातला घोट घेत तिच्याकडे बघत म्हणाला

“काम कितीही असलं तरी, स्वतःला थकवायचं नाही.
घड्याळ बघायचं.
चहा, जेवण, विश्रांती  सगळं वेळेवर झाले पाहिजे.” तो. म्हणाला..

अनघा काही बोलली नाही, फक्त मान हलवली.


“तू अशी चहकली की घर उजळतं…
आणि तू थकली की माझं मन खाली जातं.” अनिकेत (हळू हसत) म्हणाला..

अनघाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी स्माईल आली.

आजोबा उठले आणि म्हणाले
“मी थोडा बाहेर बसतो. तुम्ही गप्पा मारा.”
आणि हसत बाजूला गेले.

अनिकेतने कप खाली ठेवला.
थोडा पुढे झुकून अनघाचा हात हलकेच पकडला.

“उद्या मी तुला घेऊन डॉक्टरकडे नाही…
थेट बाहेर नेणार आहे. आराम. फक्त आराम.
समजलं?” अनिकेत म्हणाला.

अनघा त्याच्याकडे बघत अलगद म्हणाली
“मी ठीक आहे… फक्त जरा दमले होते.”

अनिकेत हसला.
“हो, आणि तेच मला नको आहे.”

दोघांच्या डोळ्यांत मायेची ऊब पसरली.


---

अनिकेत चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाला,
“अनघा, मी बाहेरून जेवण मागवतो… तुला त्रास नको.”

अनघाने लगेच मान हलवली,
“नाही रे, मी करते. कशाला बाहेरून मागवतो? मी ठीक आहे.”

अनिकेत अजूनही काळजीत,
“तू करशील ना नक्की? जास्त थकू नकोस…”

अनघा हलकं हसली,
“हो करते. आजोबा बाहेर एकटे बसलेत… तसं मला चांगलं वाटत नाही.”

“मी बघतो,” अनिकेत म्हणाला आणि पटकन बाहेरच्या व्हरांड्याकडे गेला.

आजोबा दूर पायऱ्यांवर बसून विचारात हरवलेले. अनिकेतने हळुवार विचारलं,
“आजोबा, इथे का बसलात? आत या ना…”

आजोबा दीर्घ श्वास घेत म्हणाले,
“बस जरा… जुनी सवय आहे. पण अनघा एकटी किचनमध्ये काम करतेय… म्हणून मी बाहेर आलो. बायको आठवली रे… तीही अशीच किचनमध्ये मस्त गाणी म्हणत काम करायची…”

अनिकेत त्यांच्या शेजारी बसला.
“आजोबा… तुम्ही काळजी करू नका. अनघा सगळं नीट करते. पण तुम्ही असे बाहेर बसू नका… तिला वाईट वाटतं.”

आजोबा हसले,
“हं… समजलं. चल, आत जाऊ या.”

दोघे उठून हळूहळू आत आले.
किचनमध्ये अनघा तळणी करत होती. घरात पुन्हा एकदा घरगुती सुवास भरत होता.

अनिकेतने तिला पाहून मनात म्हटलं
“हीच तर माझं घर आहे… आणि हीच माझी शांतता आहे.”


अनघाने छानपैकी जेवण बनवलं. तिघेही जेवायला बसले. घरात शांतता, उब आणि आपलेपणा भरून राहिला होता.

जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसून निवांत गप्पा मारत होते. तेवढ्यात आजोबा जुन्या आठवणीत हरवून म्हणाले,
“मोनिका होती ना… खूप मजा यायची. घर भरल्यासारखं वाटायचं. आता तिची आठवण खूप येते.”

अनिकेतने लगेच मोबाइल उचलला.
“मी तिला कॉल करतो.”

रिंग गेली आणि मोनिका झटकन फोन उचलते
“हॅलो दादा!”

अनिकेत हसत,
“हॅलो मोनिका… जेवण झालं का?”

“आताच झालं. मी बाहेर फेऱ्या मारतेय.”

अनिकेत म्हणाला,
“आजोबांना तुझी खूप आठवण येत होती.”

मोनिका लगेच,
“मला पण सगळ्यांची आठवण येते. मी तुझ्याकडे राहायला येऊ का?”

अनिकेत जोरात हसला,
“आई तुला घरात घेणार नाही रे! परत पळवेल.”

मोनिका पण हसायला लागली.

तेवढ्यात मागून विक्रमचा आवाज आला
“मोना डार्लिंग! अशी हसतेस? कोणी पाहिलं तर घाबरून पळून जाईल.”

मोनिका लगेच त्याला ठोसा मारत म्हणाली,
“तुला नंतर बघते!”

अनिकेतने हसत विचारलं,
“कोणाशी बोलतेयस?”

“विक्रम दादा आला आहे. मला चिडवतोय.” मोनिका म्हणाली.

अनिकेत खेळकरपणे,
“तो काय करतो आता?”

मोनिका खट्याळ हसत म्हणाली,
“तो भूत आहे! रात्री झाल्यावर सगळीकडे फिरत असतो.”

अनिकेत हसत असतो.

विक्रम मागून ओरडला,
“माझ्याबद्दल कोणाला सांगतेस?”

मोनिका आणखी हसली,
“अनिकेत दादाला सांगतेय. त्याला सगळं माहिती असतं!”

विक्रम म्हणाला,
“तुला बघतो!”

तो तिच्या डोक्यावर हलकासा मारतो आणि पळायला लागतो.
मोनिका पण त्याच्या मागे पळत होती… आणि तिला फोन अजूनही चालू आहे हे विसरून गेली!

अनिकेतने मोठ्याने हसत फोन कट केला.
तो जे काही घडलं ते आजोबा आणि अनघाला सांगून दाखवतो. तिघेही हसून हसून थकतात.

आजोबा डोळे पुसत म्हणाले
“विक्रमला घरी बोलव. मला भेटायचं आहे त्याला.”

अनिकेत मान डोलवत म्हणाला,
“हो आजोबा, मी त्याला सांगतो.”

घरात पुन्हा एकदा हशा, ऊब आणि आपलेपणा भरला.

आजोबा उठून उभे राहिले. हलकं हसत अनघा अनिकेतकडे पाहत म्हणाले,

“मी झोपायला जातो आता. तुम्ही दोघांनीही आराम करा. सकाळी तुमचीही कामं असतात. आणि मला पण आता छान झोप येतेय.”

ते प्रेमाने दोघांकडे पाहतात,
“गुड नाईट हो.”

असं म्हणत आजोबा आपल्या घराकडे निघून गेले. घरात शांत, हलकी उबदार शांतता पसरली.

अनघा आणि अनिकेतही दिवे कमी करत, हॉल आवरून आपल्या बेडरूममध्ये गेले.
थकलेले, पण मन मात्र शांत…

अनिकेत अनघा सोबत बोलतो. अनघा काही रिप्लाय देत नाही. तो बघतो तर, अनघा झोपून गेलेली असते.

अनघा घरातले एवढे काम करावे लागते का? ती किती दमली आहे. काही दुसरे करत असेल का? अनिकेत विचार करतो. कधी तरी त्यांच्या डोळा लागतो.





क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all