Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -22

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं भाग - 22




चार–पाच दिवस शांतपणे निघून जातात.
आज अनघाचा रिझल्ट लागण्याचा दिवस होता… पण कामाच्या धकाधकीत ती पूर्ण विसरून जाते.

तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन येतो.

“अनघा! रिझल्ट लागला! तू फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आहेस!” ती म्हणाली.

हे ऐकताच अनघाच्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्माईल आले.
तिच्या आवाजात उत्साह झळकतो.

“खरंच?? वा! खूप छान!”  अनघा म्हणाली.

दोघींची काही वेळ आनंदाने गप्पा होतात.
मैत्रिणीलाही चांगले मार्क्स मिळालेले असतात. दोघी एकमेकींचं अभिनंदन करतात.  नंतर  कॉल कट करतात.


अनिकेत त्या वेळेस ऑफिसमध्ये असतो.
आनंद थांबवता न येऊन अनघा त्याला फोन करते.

“अनिकेत… मी पास झाले! फर्स्ट क्लास!”  अनघा म्हणाली.

अनिकेतच्या आवाजातही खूप खुशी.

“वा अनघा, काँग्रॅच्युलेशन्स! Proud of you.”  अनिकेत म्हणाला

अनघा हसत म्हणते,
“Thank you…”

अनिकेत पुढे म्हणतो,
“तू आजोबांना सांगून ये. मला सरांनी बोलावलं आहे, थोडं काम आहे.”

“चालेल… मी सांगते.”
अनघा म्हणाली आणी कॉल कट करते.


अनघा आजोबांकडे जाते

आजोबा माझा रिझल्ट लागला आणि मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाली आहे. अनघा म्हणाली.
आजोबा तर आनंदाने चमकूनच जातात.

“वा बाळा! खूप छान! मला माहित होतंच तू पास होशील.”

क्षणभर थांबून ते म्हणतात

“तुला माझ्याकडून एक गिफ्ट आहे… रात्री देतो.” आजोबा म्हणाले..

अनघा गोंधळते.

“काय गिफ्ट? असं काय आणलं आहे तुम्ही?” अनघा म्हणाली

आजोबा हसतात.

“तुला स्वतःहूनच समजेल. आणि तुला नक्कीच आवडेल.” आजोबा म्हणाले.

अनघा काही बोलत नाही.
हसतच घरी परतते.


---

अनघा गेल्यानंतर आजोबा त्यांच्या रूममध्ये जातात.
फोन लावतात.

“हो… आज मी सांगितलेले कागद घेऊन या. आजच हवी आहे.”

समोरून फक्त एवढंच उत्तर येतं

“ठीक आहे.”

कॉल कट होतो.
आजोबांच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित असते.…

रात्री तिला देईल, तिला खूप आवडेल, आजोबा मनात म्हणाले


आजोबा फोन कट करतात…
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं, अभिमानाचं हसू असतं.

इतक्या दिवसांपासून आजोबा एक गोष्ट मनात ठेवून बसले होते.
त्यांची स्वतःची कंपनी होती. खूप मोठी कंपनी होती. खूप नाव होत. हे त्यांनी अजून अनघाला आणी अनिकेतला सांगितले नव्हते. जिथे आजोबांना विशेष मान होता. त्यांनी ती कंपनी त्यांच्या भावाच्या मुलाला बघत होता.

आजोबा आता वयस्कर झाले होते.
कंपनीत जाणं, काम पाहणं… त्यांच्यासाठी शक्य नव्हतं.
पण कंपनी सांभाळायला एक विश्वासू, हुशार आणि सरळ स्वभावाची मुलगी हवी होती.

आणि आजोबांनी आपल्या घरात एकच व्यक्ती पाहिली होती
अनघा.

ते तिला रोज पाहत होते
ती छोटस काम मन लावून काम करते,
न घाबरता ग्राहकांना हाताळते,
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जबाबदारी टाळत नाही.

त्यांना प्रत्येक दिवसात हेच जाणवत होतं

“अनघा जितकी साधी, तितकीच जबाबदार.
ही मुलगी कंपनी सांभाळू शकते.”

आजोबा अनघाचा रिझल्ट लागण्याची वाट बघत होते.
त्या आधी तिला काहीच सांगायचं नव्हतं.
कारण अनघा काम करत असली तरी तिला तिचं शिक्षण पूर्ण झाल्याचा अभिमान हवा होता.

आज तिचा रिझल्ट लागला.
ती फर्स्ट क्लास आली.
आजोबांना तर जणू स्वतःची मुलगी पास झाल्याचा आनंद झाला. ते खूप खुश होते.

म्हणूनच आजोबांनी फोन करून सांगीतले

“आज मी सांगितलेली गोष्ट घेऊन या…”

ते म्हणजे अनघासाठी तयार केलेलं अपॉइंटमेंट लेटर होते.


आजोबा अनघाला त्यांच्या कंपनीत ‘असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन्स’ म्हणून जॉईन करायला सांगणार होते.

कारण

तिचा स्वभाव शांत
जबाबदारीने काम करणारी
इतरांना मदत करणारी
प्रॉब्लेम आल्यास घाबरत नाही
आणि सर्वात महत्त्वाचं  आजोबांचा तिला अढळ विश्वास होता.


रात्री आजोबा अनघाला हे सर्व सांगायला तयार होत होते.
आणि अनघाच्या आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार होता…  आजोबा  मनात म्हणाले..


---


मला अनिकेतला घरी आणायचे आहे. मोनिका जॉब शोधेल, अनघा… बघू ती घरचे काम कसे करते? मी बोलेल ते ऐकेल का? ती घरी कशी येईल? मी काय करू?  ललिता विचार करत बसल्या होत्या.

मोनिका तिच्या रूममध्ये होती. अशोक बाहेर गेले होते.

ललिता बराच वेळ विचार करत होत्या. त्यांच्या डोक्यात खूप काही येत होतं, आणि त्यातलं एक त्या करणार होत्या. त्यांनी विचार केला. मी जर आजारी पडली तर, हाताला काही झाले तर, माझ्या पायाला काही तरी करून घेते.

त्यांनी पडायचे नाटक केले.

अचानक धाडकन!, असा आवाज आला. ललिता जोरात पडल्या.

मोनिका घाबरून रूममधून बाहेर आली.
“आई… तुला काय झालं?” मोनिका रडतच म्हणाली.

ललिताला काहीच झालं नव्हतं. फक्त अनिकेतला घरी बोलावण्यासाठी त्यांनी मुद्दाम मोठा आवाज केला होता.

“मोनिका… मला उठताही येत नाहीये. खूप पाय दुखतो आहे ग… तुझ्या बाबांना बोलव. डॉक्टरला पण बोलव…” ललिता वेदनेच्या आवाजात म्हणाल्या.

मोनिकाने ताबडतोब अशोकला फोन केला आणि त्यांना घरी बोलावून घेतले.


मोनिका मला आधार देग... पाय खूप दुखतं आहे. आई ग.... आई.... ललिता म्हणाल्या.

मोनिकाने कसाबसा आधार देत आईला त्यांच्या रूममध्ये आणलं. त्यांना बेडवर नीट झोपवले. पाया खाली उशी ठेवली. अशोक आणी बाबाला येण्याची वाट बघू लागली.

थोड्याच वेळात अशोक डॉक्टरांसोबत आले.

डॉक्टरांनी तपासून पाहिलं.

“डॉक्टर, काय झालं? पायाला काही गंभीर झालंय का?” मोनिका काळजीने विचारते.

“काही गंभीर नाही,” डॉक्टर म्हणाले. “त्यांच्या पायाला आराम द्यायला हवा. जास्त उभं राहू देऊ नका. तुम्ही घरातली कामं सांभाळा. मी काही गोळ्या लिहून देतो. त्या वेळेवर द्या… आणि त्यांच्या पायाची मालीशही करा. त्यांना थोडं थोडं चालवा.”

“ओके,” मोनिका मान हलवून म्हणाली.

अशोक डॉक्टरांना सोडायला बाहेर गेले.

मोनिका आईकडे पाहून दीर्घ श्वास घेत म्हणाली
“मला तर काहीच येत नाही… अनघाशी बोलावे लागेल ती आली तर, बर होईल, ती सगळे येते, पण ती घरी येईल का?… आई बरी झाल्यावर ती परत जाईल. बघू काय करते.”

मोनिकाने अनघाला कॉल करून सगळं सांगितलं.


अनघा फोन ठेवून बराच वेळ शांत बसली होती.
मोनीकाचं बोलणं तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होतं.

“आईला दुखापत झाली आहे… तू आलीस तर बरं होईल…”

अनघाच्या मनात शंभर प्रश्न उभे राहिले.

मी गेलं तर?
त्या माझ्यासोबत नीट बोलतील का?
मला घरात राहू देतील का?
किंवा… पुन्हा अपमान करतील?, खरच त्यांना त्रास होत असेल का? मी तिकडे गेली तर आजोबांचे काय होईल?

ती खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर वारा वाहत होता, पण तिच्या मनात मात्र धुरकट धुकं पसरलं होतं.

अनिकेतला सांगू का?
पण नाही…
तो कामावर आहे… त्याला त्रास कशाला द्यायचा?

ती पुन्हा खुर्चीत बसली. हात गुडघ्यांवर ठेवून अगदी हळू आवाजात स्वतःशी म्हणाली

“काय करू देव जाणे… जाऊ का? नाही जाऊ का? ते मला त्रास देतील का?”

तिच्या मनात सतत हाच गोंधळ.
दहा मिनिटं… पंधरा मिनिटं… वीस मिनिटं…

अनघा तशीच विचारात हरवून बसली होती.

तिला वाटत होतं…
कदाचित हीच संधी असेल काहीतरी सुधारण्याची.
किंवा… कदाचित ही पुन्हा एक परीक्षा असेल,

ती खोल श्वास घेते.

आणि स्वतःला म्हणते
“चल अनघा… धैर्य धर. काहीतरी चांगलं होईल.”
तिच्या कामाला लागते.





क्रमश


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all