Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -23

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 23


अनघा शिल्पाकडे जाऊन थोडावेळ थांबली. तिने तिला सगळं सांगितलं. शिल्पाने शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला धीर दिला.
अनघा तू काही काळजी करू नको, मी बघेल सगळं, शिल्पा म्हणाली.

थँक्यू ताई, अनघा म्हणाली..

ताई म्हणते, आणी थँक्यू म्हणते. तू काही काळजी करू नको, शिल्पा म्हणाली.

अनघाने स्माईल दिली. आणी अनघा घरी निघून गेली.

अनघा घरी आली.

तिने कपाट उघडलं. थोडे कपडे, गरजेच्या वस्तू बॅगेत ठेवल्या. घर नीट आवरून घेतलं. सगळं करताना तिच्या मनात मात्र अजूनही गोंधळ चालू होता.

थोड्याच वेळात अनिकेत घरी आला.

अनघा लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.
त्याने पाणी घेतलं आणि काही न बोलता फ्रेश व्हायला रूममध्ये गेला.

तो फ्रेश होऊन बाहेर आला…
आणि त्याची नजर थेट बॅगेवर पडली.

तो थबकला.

“अनघा…
अनघा…” अनिकेतने आवाज दिला.

अनघा लगेच आली.

“हा, बोल… काय झालं?” अनघा म्हणाली.

“ही बॅग का भरली आहे?
तू कुठे जाणार आहेस?” अनिकेत थोडा आश्चर्याने म्हणाला.

अनघा शांतपणे त्याच्याकडे बघत म्हणाली,
“मी एकटी नाही जाणार…
आपण दोघं जातोय.”

“काय?”
“मला आत्ता सुट्टी मिळणं शक्य नाही,” अनिकेत म्हणाला.

“तुला सुट्टी घ्यायचीच गरज नाही,” अनघा ठामपणे म्हणाली.

अनिकेत गोंधळून गेला.
“तू नेमकं काय बोलतेयस, अनघा?” तो म्हणाला.

अनघाने खोल श्वास घेतला…
आता तिला सगळं सांगायचं होतं.

अनिकेत तयार होईल ना. अनघाच्या मनात आले.
तरी तिने सांगायचे ठरवले.

अनघा शांतपणे बोलू लागली,
“मला मोनिकाचा कॉल आला होता. आई पडल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्याकडून सध्या काहीच काम होत नाही. मोनिकाने मला बोलावलं आहे.
तू पण माझ्यासोबत तिथे चल. त्यांना बरं वाटलं, परिस्थिती नीट झाली तर आपण परत इथे येऊ.” अनघा म्हणाली.

अनिकेत थोडा काळजीने म्हणाला,
“अनघा, आई तुला खूप बोलेल. मी रोज ऑफिसला जाणार आहे. तुला त्रास होईल.”

“त्यांना आपली गरज आहे,”
अनघा समजावणीच्या स्वरात म्हणाली.

“तुला जर थोडाही त्रास झाला, तर मला लगेच सांग. मी तुला तिथून लगेच परत घेऊन येईन,”
अनिकेत ठामपणे म्हणाला.

अनघा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांत भावना होत्या.

“आजोबांना सांगितलं आहे का? त्यांचं काय करायचं?”
अनिकेतने विचारलं.

“शिल्पाताईंना सांगितलं आहे. त्या लक्ष देतील,”
अनघा म्हणाली.

अनिकेत हळूच म्हणाला,
“अनघा… आजचा दिवस तुझा होता.” आपण मस्त सेलिब्रेट केले असते.

अनघा हलकंसं हसली,
“आपण नंतर सेलिब्रेट करू.” तू माझ्यासोबत असला, सगळे दिवस सेलिब्रेट असते. ती म्हणाली.

अनिकेत जास्त काही बोलला नाही.
तो शांतपणे उठला आणि त्याला लागणारे कपडे, सामान गोळा करू लागला.

घरात शांतता होती…
पण त्या शांततेत अनेक भावना दडलेल्या होत्या.


---

अनघा आणि अनिकेत जायला निघाले.

तेवढ्यात आजोबा त्यांच्या घराच्या बाहेर आले.

“अनघा… अनिकेत… कुठे निघालात? काहीच सांगितलं नाही,”
आजोबा थोड्या काळजीने म्हणाले.

अनघाने थांबून सगळं सांगितलं
ललितांची तब्येत, मोनिकाचा फोन, आणि काही दिवस तिथे थांबायचं कारण.

आजोबांनी दोघांकडे पाहिलं.
“काळजी घ्या. आणि मला कॉल करत राहा,”
ते मायेने म्हणाले.

“हो आजोबा,”
अनघा आणि अनिकेत दोघेही एकाच वेळी म्हणाले.

दोघांनी आजोबांना नमस्कार केला…
आणि मग गाडीत बसून तिथून निघून गेले.

आजोबा काही वेळ दरवाज्यातच उभे राहिले…
दूर जात असलेली गाडी पाहत राहिले.

गाडी वळणावरून नजरेआड झाली…
तरीही आजोबा तिथेच उभे राहिले.

त्यांच्या मनात काळजीचा एक धूसर ढग दाटून आला होता.

अनघा तिथे कशी राहील?, अनिकेतची आई तिला स्वीकारतील का? अनघाला त्रास होईल का?, तिच्या मनावर पुन्हा कुठे ओरखडे पडू नयेत…

अनघाचा शांत चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर आला.
सगळं सहन करूनही हसत राहणारी अनघा…

“ती खूप मजबूत आहे, सगळ्यांना समजून घेते. ”
आजोबा स्वतःशीच पुटपुटले.

पण तरीही मन शांत होत नव्हतं.

अनिकेत आहे तिच्यासोबत…
तो तिला समजून घेईल… सांभाळेल… मोनिका पण आहे. मोनिकाला कॉल करता येईल,
हा विचार जरा दिलासा देऊन गेला.

“देवा, माझ्या पोरीला त्रास होऊ देऊ नकोस,”
आजोबांनी मनोमन प्रार्थना केली.

हळूच आत गेले…
दार लावलं.

घरात सगळं तसंच होतं…
पण अनघा नसल्यामुळे आज घर अधिकच रिकामं वाटत होतं.

आजोबा खुर्चीत बसले.
फोन हातात घेतला.

कधीही कॉल येऊ दे…
मी तयार आहे…

डोळ्यांत ओल दाटली…
पण चेहऱ्यावर संयम होता.

कारण आजोबा होतात…
आणि आजोबा नेहमी मजबूत असतात.

आजोबा थोडावेळ तिथेच उभे राहिले.

त्याच्याकडे कुरियर आले होते.
आजोबांनी ते हातात घेतले. त्यांनी छोटासा पॅकेट घट्ट धरलेला होता.

आज तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं…
पण ठीक आहे…
नंतर देईन…

ते हळूच मनात म्हणाले.

आत्ताच्या क्षणी तिला माझ्यापेक्षा त्यांचीच जास्त गरज आहे…
आई आजारी आहे… घरात तिला हवंच असणार…

आजोबांच्या मनात कुठलाही राग नव्हता.
फक्त काळजी होती… आणि मायेची ओल होती. आणी अनघाची काळजी होती.

माझी पोरी आहे…
कर्तव्य ओळखणारी आहे...

त्यांनी पॅकेट बाजूला ठेवलं.
खिडकीतून बाहेर पाहिलं.

देवा, तिला शक्ती दे…
जिथे गेली आहे, तिथे तिला मान मिळू दे…

हळूच एक सुस्कारा टाकत ते म्हणाले,

“सरप्राईज थांबेल…
पण तिचं सुख थांबू नये…”

आजोबा शांतपणे खुर्चीत बसले…
मन मात्र अनघाच्या सोबतच होतं.


---


अनघा आणि अनिकेत घरी पोहोचतात.
मोनिका लगेचच त्यांच्या जवळ येते.
अशोकांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.

“आधी सामान ठेवून या,” अशोक म्हणाले.

अनिकेत आणि अनघा रूममध्ये जातात.

अनघा आजूबाजूला नजर फिरवते.
हीच ती रूम…
पूर्वी ती इथे आली होती, आता मात्र ती रूम तिचीही होती.

भिंती, कपाट, खिडकी
सगळं तसंच होतं,
पण तिचं मन वेगळंच होतं.

आता इथे थांबायचं आहे…
जुळवून घ्यायचं आहे…

अनघा शांतपणे उभी राहते.
अनिकेत तिच्याकडे पाहतो.

रूम जरी ओळखीची असली,
तरी त्या क्षणी सगळंच नव्याने सुरू झाल्यासारखं वाटत होतं.


अनघा लगेचच बाहेर येते.
ती मोनिकाजवळ जाते आणि तिच्याशी बोलायला लागते.

“मोनिका, आपण जेवण बनवूया. मला सांग कुठे काय ठेवले आहे. तू मला सगळं दाखव. आपण लवकर जेवण बनवू टाकू,” अनघा म्हणाली.

मोनिका तिला किचनमधलं सगळं सांगते
भांडी कुठे आहेत, डाळ-भाजी कुठे ठेवली आहे,
मसाले कुठल्या कपाटात आहेत.

अनघा लक्ष देऊन सगळं ऐकते.
एकेक वस्तू पाहते, मनात नोंद करून ठेवते.

आणि मग,
क्षणाचाही वेळ न घालवता
अनघा लगेचच जेवण बनवायला लागते.

किचनमध्ये पुन्हा हालचाल सुरू होते.
भांडी वाजतात, गॅस पेटतो,
आणि घरात हळूहळू जेवणाचा सुगंध पसरायला लागतो.


अनघा मोनिकासोबत गप्पा मारत मारत सगळं जेवण बनवते.
कधी हसत, कधी आठवणी सांगत, तर कधी साध्या गोष्टींवर बोलत त्यांचा वेळ कसा निघून जातो, हे दोघींनाही कळत नाही.

किचनमध्ये हलकंफुलकं वातावरण होतं.
भाजी कापता कापता, फोडणी टाकताना,
दोघींच्या गप्पा सुरूच होत्या.

अनघा सहजतेने सगळं हाताळत होती.
मोनिकाला तिची ही ओळखीची, घरची वाटणारी बाजू दिसत होती.

गप्पा, हसू आणि काम
या सगळ्यांतून
सगळं जेवण छान तयार होतं.




क्रमश

अनघाच्या  हातचे जेवण ललिताला आवडेल का?  त्या अनघाचे कौतुक करतील का?  अनघा अनिकेतच्या घरी आली आहे हे अनघाच्या आई बाबा समजेल का? ...



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all