तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 24
अनिकेत आईकडे गेला.
ललिताने त्याच्याकडे पाहिलं… त्यांना खूप आनंद झाला.
ललिताने त्याच्याकडे पाहिलं… त्यांना खूप आनंद झाला.
पण अनिकेतच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते.
तो शांतपणे म्हणाला,
“आई कशी आहेस? तुला नेमकं कसं काय लागलं? काळजी घेत जा ना.”
तो शांतपणे म्हणाला,
“आई कशी आहेस? तुला नेमकं कसं काय लागलं? काळजी घेत जा ना.”
अशोकही तिथेच होते.
ललिताच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू होते
तू घरी यावास म्हणूनच हे सगळं करावं लागलं आहे.
मला असं पडून राहायला कंटाळा आला आहे.
माझ्या किचनमध्ये काय चालू असेल?
अनघा घरी आली आहे, पण अजून मला भेटायलाही आली नाही, त्या मनात विचार करत होत्या.
मला असं पडून राहायला कंटाळा आला आहे.
माझ्या किचनमध्ये काय चालू असेल?
अनघा घरी आली आहे, पण अजून मला भेटायलाही आली नाही, त्या मनात विचार करत होत्या.
अनघा आणि मोनिका दोघीही आत गेल्या.
अनघाने ललिताला विचारलं,
“खूप त्रास होत आहे का, आई?”
“खूप त्रास होत आहे का, आई?”
“पडले आहे ना… त्रास तर होणारच,” ललिताने थोड्या तिखटपणे उत्तर दिलं.
अनिकेतला राग आला.
तो अनघाकडे पाहू लागला.
अनघाने शांतपणे “नको” अशी मान हलवली.
अनिकेत काहीच बोलला नाही.
तो अनघाकडे पाहू लागला.
अनघाने शांतपणे “नको” अशी मान हलवली.
अनिकेत काहीच बोलला नाही.
मोनिका ललिता आणि अशोकसाठी जेवण घेऊन आली.
त्यांच्या हातात दिलं.
ललिता काहीच बोलल्या नाहीत.
त्यांच्या हातात दिलं.
ललिता काहीच बोलल्या नाहीत.
मोनिका परत अनघा आणि अनिकेतकडे आली.
“आपण जेवायला बसू,” मोनिका म्हणाली.
अनघा शांतपणे म्हणाली,
“आई-बाबांचं होऊ दे… मग आपण जेवू.”
“आई-बाबांचं होऊ दे… मग आपण जेवू.”
तिघांमध्येच एक न बोललेला ताण पसरला होता.
---
ललिताला जेवण आवडलं होतं. पण त्या काहीच बोलल्या नाहीत.
मोनिकाला हाक मारून सगळं घेऊन जायला सांगितलं.
मोनिकाला हाक मारून सगळं घेऊन जायला सांगितलं.
मोनिका सगळं उचलून घेऊन गेली.
त्यानंतर अनघा, अनिकेत आणि मोनिका तिघांनीही जेवण करून घेतलं.
---
इकडे…
“शुभम, तुझी बहीण अनिकेतच्या घरी आली आहे,” शुभमच्या मित्राने सांगितलं.
“खरंच सांगतोयस का?” शुभम आनंदाने म्हणाला.
“अरे, मी स्वतः बघितलं आहे, म्हणूनच तुला सांगायला आलो,” तो म्हणाला.
“मी उद्याच तिला भेटायला जातो,” शुभम म्हणाला.
“हो, भेटून घे. मी आता निघतो, घरी वाट बघत असतील,” असं म्हणत तो तिथून निघून गेला.
शुभम खूपच खुश झाला.
शुभम आनंदात घरी आला.
“शुभम, तू आज इतका आनंदी का दिसतोयस?” आरती विचारतात.
“ताई, अनघा अनिकेतच्या घरी राहायला आली आहे. मी तिला भेटायला जाणार आहे,” शुभम आनंदाने म्हणाला.
आरती काहीच बोलल्या नाहीत.
शुभम थेट आपल्या रूममध्ये निघून गेला.
आरती मनात विचार करू लागल्या
ललिता अनघाशी नीट वागेल का? ती इथे का आली असेल? मी तर तिला बघायला गेले होते, तेव्हा ती तिथे नव्हती. आता नेमकं काय झालं असेल?
ललिता अनघाशी नीट वागेल का? ती इथे का आली असेल? मी तर तिला बघायला गेले होते, तेव्हा ती तिथे नव्हती. आता नेमकं काय झालं असेल?
असे विचार मनात ठेवत आरती पुन्हा आपल्या कामाला लागल्या.
---
अनघाने खूप छान जेवण बनवलं होतं. आली तशी ती लगेच कामाला लागली होती.
“बघितलंस ना, आली तशी कामाला लागली आहे,” अशोक म्हणाले.
“मला बघायला पण आली नाही. जेवण बरं होतं,” ललिता थोड्या तिरसटपणे म्हणाल्या.
“तुला घाबरली असेल म्हणून आली नसेल,” अशोक हसत म्हणाले.
“मी काय तिला खाणार आहे का?” ललिता म्हणाल्या.
“आता तर इथेच आहे ना. वेळ मिळेल तेव्हा येईल. उगाच चिडचिड करू नकोस, आणि तिच्या मागेही लागू नकोस,” अशोक शांतपणे म्हणाले.
पण ललितांच्या मनात वेगळंच सुरू होतं
मी तर तिच्या मागे लागणारच. माझ्या अनिकेतला माझ्यापासून दूर केलं तिने. म्हणूनच तर तिला इथे बोलवण्यासाठी पाय मोडून घेतला आहे. तिला सुखात कशी राहू देऊ?
मी तर तिच्या मागे लागणारच. माझ्या अनिकेतला माझ्यापासून दूर केलं तिने. म्हणूनच तर तिला इथे बोलवण्यासाठी पाय मोडून घेतला आहे. तिला सुखात कशी राहू देऊ?
अनिकेत आणि अनघा लवकरच झोपून गेले. सकाळी अनघाला लवकर उठायचं होतं. मोनिका बाहेर जाणार होती, तिला सगळं विचारून घ्यायचं होतं. अनिकेतचा डबा देखील तयार करायचा होता. हे सगळे विचार करतानाच अनघाला पटकन झोप लागली.
पण आजोबांना मात्र झोप येत नव्हती
अनघाला माझी किती काळजी… सगळं शिल्पालाही सांगून गेली होती. माझी किती काळजी करते ती.
तिथे पोहोचल्यावर तिने कॉलसुद्धा केला नाही. गेल्या गेल्या लगेच कामाला लागली असेल. तिथे नेमकं काय चालू असेल कोण जाणे…
उद्या फोन करून विचारतो तिला, आजोबा मनात म्हणाले.
हे सगळे विचार करता करता, झोप येईपर्यंत आजोबांच्या मनात फक्त अनघाच फिरत राहिली…
---
सकाळी अनघा लवकर उठली. घरात अजून शांतता होती. किचनमध्ये पाऊल टाकताना तिने हलकेच आवाज केला, कोणाची झोप मोडू नये म्हणून. मोनिकाने तिला सांगितलेले सगळे आठवत होते. तिने आधी चहा ठेवला, मग भाजी चिरायला घेतली. अनिकेतचा डब्बा नीट, आवडीप्रमाणे तयार करायचा होता.
थोड्याच वेळात मोनिका बाहेर येते.
“अगं, इतक्या लवकर?” ती आश्चर्याने म्हणाली.
“तू बाहेर जाणार आहेस ना, म्हणून,” अनघा हसत म्हणाली.
“अगं, इतक्या लवकर?” ती आश्चर्याने म्हणाली.
“तू बाहेर जाणार आहेस ना, म्हणून,” अनघा हसत म्हणाली.
दोघी मिळून काम करत होत्या. अनघाच्या हातची भाजी पाहून मोनिका मनातल्या मनात खुश झाली. ही मुलगी कामचुकार नाही, तिने स्वतःशीच म्हटलं.
अनिकेत तयार होऊन बाहेर आला. किचनमध्ये अनघाला पाहून तो थांबला. तिने त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही, पण त्या शांततेतही एक आपुलकी होती.
तेवढ्यात ललितांच्या रूममधून आवाज आला.
“मोनिका…”
मोनिका तिकडे गेली. अनघाही थोड्या वेळाने त्यांच्या रूमकडे गेली.
“आई, काही हवं आहे का?” तिने शांतपणे विचारलं.
“मोनिका…”
मोनिका तिकडे गेली. अनघाही थोड्या वेळाने त्यांच्या रूमकडे गेली.
“आई, काही हवं आहे का?” तिने शांतपणे विचारलं.
ललितांनी तिला वरून खाली पाहिलं.
“आत्तासाठी काही नाही,” त्या थोड्या कोरड्या आवाजात म्हणाल्या.
“आत्तासाठी काही नाही,” त्या थोड्या कोरड्या आवाजात म्हणाल्या.
अनघा काही न बोलता बाहेर आली. तिच्या मनाला थोडं लागलं, पण तिने स्वतःला सावरलं. आपण इथे मदतीसाठी आलो आहोत, तिने स्वतःला बजावलं.
.....
दुसरीकडे, आजोबा सकाळी उठताच फोन हातात घेतात. नंबर डायल करतात, पण कॉल लागत नाही.
“कामात असेल,” ते स्वतःशीच म्हणतात.
“कामात असेल,” ते स्वतःशीच म्हणतात.
ललिता खिडकीतून बाहेर पाहत होती. किचनमधून येणारा भाजीचा सुगंध तिच्या नाकात भरला. तिला नकळत वाटलं, हात चांगले आहेत… पण जास्त मोकळं व्हायचं नाही.
या घरात प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार, वेगवेगळे हेतू होते… आणि त्यांच्यातच अनघाचा हा नवा प्रवास सुरू होत होता.
...
अनिकेत ऑफिसला निघून जातो.
मोनिका देखील बाहेर जाते.
अनघा घरातलं सगळं आवरून शांतपणे बसलेली असते.
मोनिका देखील बाहेर जाते.
अनघा घरातलं सगळं आवरून शांतपणे बसलेली असते.
थोड्याच वेळात ललिता पुन्हा मोनिकाला हाक मारतात.
पण मोनिका घरात नसते.
मग ललिता अनघाला हाक मारतात.
पण मोनिका घरात नसते.
मग ललिता अनघाला हाक मारतात.
अनघा लगेच ललिताजवळ जाते.
“आई, काही हवं आहे का?” अनघा विचारते.
“आई, काही हवं आहे का?” अनघा विचारते.
“मला भूक लागली आहे. उद्यापासून घरात साडीच घालायची. आणि अनिकेत गेला का?” ललिता विचारतात.
“हो, अनिकेत ऑफिसला गेला आहे. तुम्हाला काय खायचं आहे?” अनघा शांतपणे म्हणते.
“अनिकेत काय म्हणतेस? त्यांचं नाव घ्यायचं नाही. ‘अहो’ म्हणत जा. जे काही बनवलं असेल ते घेऊन ये. आणि मी ठेवलेलं सामान तसंच राहू दे,” ललिता कठोरपणे म्हणाल्या.
अनघा फक्त मान हलवते.
ती तिथून निघून जाते. तिचे डोळे भरून आलेले असतात.
लगेच ती तोंडावर पाणी मारते, स्वतःला सावरते आणि ललितांसाठी ताट तयार करते.
ताट घेऊन ललितांकडे येते.
ती तिथून निघून जाते. तिचे डोळे भरून आलेले असतात.
लगेच ती तोंडावर पाणी मारते, स्वतःला सावरते आणि ललितांसाठी ताट तयार करते.
ताट घेऊन ललितांकडे येते.
“पाणी नाही आणलं का? ते पण सांगावं लागतं का?” ललिता चिडून म्हणाल्या.
अनघा पाणी आणायला गेली.
तेवढ्यात अशोक घरी आले.
अनघाने आधी त्यांना पाणी दिलं.
मग ती ललितांना पाणी द्यायला गेली.
अनघाने आधी त्यांना पाणी दिलं.
मग ती ललितांना पाणी द्यायला गेली.
“किती वेळ लावतेस! विहिरीतून पाणी आणायला गेलीस का?” ललिता टोमणा मारत म्हणाल्या.
“कशाला ओरडतेस? मला आधी तिने पाणी दिलं, म्हणून तिला थोडा वेळ लागला,” अशोक शांतपणे म्हणाले.
ललिता काहीच बोलल्या नाहीत…
पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.
पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.
---
क्रमश
ललिता अनघाला अजून किती त्रास देतील, अनिकेतला समजल्यावर तो अनघाला घेऊन जाईल का?.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा