Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -26

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 26




आजोबांनी राहून  अनिकेतला कॉल केला.
दोन दिवस झाले होते. अनघाचा, अनिकेतचा काहीच कॉल नव्हता. आजोबांच्या मनात नकळत काळजी वाढत चालली होती. कॉल का करत नाही आहे? त्यांनी कॉल केला.

फोन वाजला आणि अनिकेतने लगेचच कॉल घेतला.

“हॅलो आजोबा…” अनिकेत म्हणाला.

“अरे बाबा, किती दिवस झाले फोन नाही केला. काळजी वाटायला लागली होती,” आजोबा हळू आवाजात म्हणाले.

“सॉरी आजोबा… इथे थोडं गडबडीत आहे. आईचं पायाचं दुखणं, घरातलं सगळं… लक्षच गेलं नाही,” अनिकेत म्हणाला.

“अनघा कशी आहे?” आजोबांनी थेट विचारलं.

अनिकेत क्षणभर थांबला.
“ठीक आहे… म्हणजे आहे… सगळं सांभाळते आहे,” तो म्हणाला, पण आवाजात खात्री नव्हती.

आजोबांना ते जाणवलं.
“बाबा, तिला जप. ती खूप मन लावून सगळं करते. स्वतःकडे पाहायचं विसरते,  तिची काळजी घे, ” आजोबा म्हणाले.

“हो आजोबा… मी आहे ना,” अनिकेत म्हणाला, पण त्यालाही आतून काहीतरी खटकत होतं.

“तिला सांग, मी तिच्यावर खूप खुश आहे. तिचा रिझल्ट… तिचं सगळं मला माहीत आहे,” आजोबा म्हणाले.

अनिकेत थोडा भावुक झाला.
“मी तिला सांगतो,” तो म्हणाला.

“आणि बाबा… काही अडचण असेल तर सांग. घर असो की माणसं… कुठेही असली तरी आधार हवा असतो,” आजोबांनी समजावलं.

“हो आजोबा. तुम्ही काळजी करू नका,” अनिकेत म्हणाला.

कॉल कट झाला.

अनिकेत फोन हातातच धरून बसला. रूममधून अनघाचा आवाज आला, “कोण होता?”

तो तिच्याकडे पाहत म्हणाला,
“आजोबा… तुझी खूप चौकशी करत होते.”

अनघाच्या चेहऱ्यावर क्षणभर स्माईल आली… पण डोळ्यांत थोडी ओलही चमकली.

“तू पण आजोबांसोबत बोलून घे. त्यांना आता तुझी सवय झाली आहे,” अनिकेत हसत म्हणाला.

अनघाने हलकेच मान हलवली.
“हो,” एवढंच म्हणत तिने मोबाईल हातात घेतला.

तिने आजोबांना कॉल केला.

रिंग गेली… आणि लगेच फोन उचलला गेला.

“हॅलो… अनघा?” आजोबांचा आनंदी आवाज आला.

“हो आजोबा, मीच,” अनघा म्हणाली. आवाज थोडा थरथरत होता.

“अगं, किती बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. कशी आहेस बाळ?” आजोबा प्रेमाने म्हणाले.

“मी ठीक आहे आजोबा. तुम्ही कसे आहात?” अनघाने विचारले.

“मी ठीक आहे, पण तुझी खूप आठवण येते गं. घर एकदम शांत वाटतंय,   शिल्पा सगळे  बघत आहे.” आजोबा म्हणाले.

अनघा थोडी भावूक झाली.
“मलाही तुमची आठवण येते आजोबा. इथे सगळं सांभाळते आहे, पण वेळ कसा जातो कळत नाही,” ती म्हणाली.

“तू स्वतःकडे पण लक्ष दे. सतत काम, काम… असं नको,” आजोबा काळजीने म्हणाले.

“हो आजोबा, मी लक्ष ठेवीन,” अनघा म्हणाली.

“तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं आहे. पण आता थोडं थांबेल,” आजोबा हसत म्हणाले.

अनघा हसली.
“काय आहे ते?” तिने विचारले.

“आता नाही सांगणार. तू परत आलीस की देईन,   तुला खूप आवडेल, ” आजोबा म्हणाले.

“चालेल,” अनघा म्हणाली.

“आणि काही त्रास झाला तर नक्की फोन कर. तू एकटी नाहीस,” आजोबांचा आवाज आपुलकीने भरलेला होता.

“हो आजोबा. मी आहे, काळजी करू नका,” अनघा म्हणाली.

कॉल कट झाला.

अनघाने फोन खाली ठेवला.
अनिकेत तिच्याकडे पाहत होता.

“आजोबा काय म्हणाले?” त्याने विचारले.

अनघा हलकेच हसली.
“म्हणाले… घर माझ्याशिवाय रिकामं वाटतंय.”


सखारामने तृप्तीकडे पाहिलं आणि म्हणाला,
“आत्या पडली आहे. पायाला दुखापत झाली आहे. मी उद्या तिला बघायला जाणार आहे. तू पण चल. तिथे राहिलीस तर तिला तुझी मदत होईल.”

तृप्तीने क्षणाचाही विचार केला नाही.
“हो बाबा, मी येते. आत्या एकट्या असतील, त्यांना आधार लागेल,” म्हणत ती तयार झाली.

थोड्याच वेळात सखारामने ललिताला कॉल केला.
“ताई, आम्ही उद्या सकाळी येत आहोत. तुझी काळजी घ्यायला,” तो म्हणाला.

फोनच्या पलिकडून ललिताचा आवाज आला,
“बरं झालं सख्या. तू आणि तृप्ती येताय म्हणल्यावर मला खूप बरं वाटतंय.”

कॉल कट झाला.

फोन ठेवताच ललिताच्या ओठांवर हलकीस  हसू  आले.
योजनेप्रमाणे सगळं होत आहे… ती मनात म्हणाली.

आता बघते.  अनघा अनिकेतसोबत कशी राहते.  लवकर  घरातून आणी त्यांच्या आयुष्यातून काढून टाकेल, त्या  विचार  करतात.


ललिताने अनिकेत आणि मोनिकाला हाक मारली.

“अनिकेत… मोनिका…”

दोघेही लगेच आत आले. काही त्रास झाला असेल या काळजीने मोनिका आधीच बोलली.

“आई, काही त्रास होत आहे का?” मोनिका म्हणाली.

अनिकेत शांतपणे सगळं पाहत उभा होता.

“मला काहीच त्रास होत नाही,” ललिता थोड्या उत्साहात म्हणाल्या.
“उद्या सखा आणि तृप्ती येणार आहेत.”

मोनिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.
“खरंच? बरं झालं आई, तुला सोबत मिळेल,” ती म्हणाली.

अनिकेत मात्र काहीच बोलला नाही. त्याच्या मनात मात्र विचारांची गर्दी झाली होती.
आता तृप्ती येतेय म्हणजे घरातलं वातावरण आणखी बदलणार आहे…


ललिता अनिकेतकडे वळून पाहिले

“अनघाला सांग. उद्या चांगलं जेवण बनवायला सांग.
घर नीट साफ करून घ्यायला सांग.
आणि तृप्तीसाठी कोपऱ्यातली रूम पण साफ करायला सांग.
ती इथेच राहणार आहे.”

हे ऐकून मोनिका थोडीशी गोंधळली.
“तृप्ती इथे राहणार?” ती हळूच म्हणाली.

ललितांनी ठामपणे मान हलवली.
“हो. मला आता जास्त हालचाल करता येत नाही.
तिला इथेच राहायला सांगितलं आहे.”

अनिकेत काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, पण तो काही बोलला नाही.

“मी अनघाला सांगतो,” एवढंच म्हणून तो बाहेर निघून गेला.

ललिता समाधानाने मागे टेकल्या.
आता बघू अनघा किती दिवस इथे टिकते,
असा विचार त्यांच्या मनात चालू होता.


अनिकेत अनघाजवळ गेला.

“अनघा, उद्या मामा आणि त्यांची मुलगी तृप्ती येणार आहेत.
आईने खास जेवण बनवायला सांगितलं आहे. घर साफ पण  करायला सांगितले आहे.   मामा खूप साधा आहे.  प्रेमाने केले तर त्याला लगेंच समजते. टेन्शन घेऊ नको.  फक्त मनापासून कर,   मी तुला सांगतो काय काय करायचं,” अनिकेत म्हणाला.

तो तिला सगळं सविस्तर सांगतो.
अनघा शांतपणे ऐकून घेते, मान हलवते.
“ठीक आहे,” एवढंच म्हणते.
पण तिला थोडं टेन्शन आले होते.

---

तेवढ्यात अशोक ललितांकडे वळले.

“तू सखारामला कॉल केला होतास का?
त्यांना कसं काय कळलं?” अशोक विचारतात.

“मीच कॉल केला होता,” ललिता निर्विकारपणे म्हणाल्या.
“तृप्तीला पण घेऊन ये असं सांगितलं.
अनिकेत घरी आला आहे…
आणि अनघाला घरातून काढायचं आहे.”
तृप्ती सोबत अनिकेतचे लग्न करायचे आहे.
म्हणून तृप्तीला घेऊन ये असे सांगितले आहे.

हे ऐकून अशोक चिडले.

“ती पोरगी सगळं करत आहे,
घर सांभाळते आहे, तरीसुद्धा तू तिच्या मागे लागली आहेस?” "अनिकेतला ती आवडते, त्यांचे आता लग्न झाले आहे. "
ते संतापून म्हणाले.

“तुम्हाला काहीच समजत नाही,” ललिता तिखटपणे म्हणाल्या.
“मला अनघा आवडत नाही. मला तृप्ती सून म्हणून हवी आहे.”

अशोक हताशपणे मान हलवतात.

“तुझं काहीच होऊ शकत नाही,” असं म्हणत ते तिथून निघून गेले.

ललिता मात्र शांत बसल्या होत्या, डोळ्यांत ठाम निर्णय स्पष्ट दिसत होता.

.....


आरती अनघाला दुरून बघून गेल्या होत्या.
अनघा घरातले काम करत होती. अनघाला भेटायला जायला शुभमला वेळ मिळाला नव्हता. संजय अजून माहिती नव्हते. अनघा आली आहे. ते एकदा तिला बघायला, भेटायला आले असते.



क्रमश

ललिता अजून काय काय करतात? सखारामला अनघा आवडते का? विक्रम तृप्तीला भेटायला येईल का?.....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all