Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -27

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 27


अनघा  सकाळी उठली.  तिचे आवरून आली.
अनघा साडी नेसून नीट तयार झाली होती.
किचनमध्ये जाताना तिने देवाजवळ थांबून दिवा लावला.
क्षणभर डोळे मिटून तिने मनातच प्रार्थना केली.  सगळे छान होऊ दे.

आज नाश्ता तर बनवायचाच होता, पण जेवणही जास्त करायचं होतं.  घरात पाहुणे येणार होते,  आणि प्रत्येक गोष्ट नीट झाली पाहिजे, हा विचार तिच्या मनात चालू होता.

तेवढ्यात अशोक तयार होऊन बाहेर आले.

“गुड मॉर्निंग, अनघा,” अशोक म्हणाले.

“गुड मॉर्निंग बाबा,” अनघा हसत म्हणाली आणि त्यांच्या साठी चहा घेऊन आली.

अशोकांनी कप हातात घेतला.
“अनघा, तू पण घे,” ते आपुलकीने म्हणाले.

अनघानेही स्वतःसाठी चहा घेतला.
दोघे थोडावेळ शांतपणे चहा पित होते.

अशोकांनी अनघाकडे पाहिलं.  तिच्या चेहऱ्यावर थकवा होता,
पण तरीही कामाची घाई आणि जबाबदारी स्पष्ट दिसत होती.

“इतक्या सकाळी सगळं सुरू केलंस?”
अशोक विचारतात.

“हो बाबा,” अनघा शांतपणे म्हणाली,
“आज बरंच करायचं आहे. सगळं वेळेत झालं पाहिजे.”

अशोकांना तिचं ते बोलणं ऐकून मनात चुटपुट लागली.
इतकं सगळं सहन करून सुद्धा,  ती एकही तक्रार करत नव्हती.
अनिकेतची निवड  खूप छान आहे. ललिताला कधी समजेल,  ललिता अशीच  वागत  राहिली,  अनिकेत अनघाला. घेऊन जाईल.,  अशोक  मनात  विचार  करतात.

“काही लागलं तर सांग,” एवढंच म्हणत अशोक उठले.

अनघाने पुन्हा किचनकडे मोर्चा वळवला.
कामाच्या गडबडीतही,  तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता

आजचा दिवस नेमका कसा जाणार?
ती कामाला लागली.
....


मोनिका सुद्धा उठून आली.
ती थेट ललिताजवळ गेली. ललिताही उठल्या होत्या.
मोनिकाने त्यांना फ्रेश करून दिलं आणि मग ती किचनमध्ये गेली.

“अनघा, चहा झाला आहे का? आई उठली आहे. मी करू का?”
मोनिका विचारत म्हणाली.

“चहा झाला आहे. तुला ओतून देते, तू घेऊन जा.”
अनघा म्हणाली.

तेवढ्यात मोनिकाचं लक्ष अनघाकडे गेलं.

“अनघा, साडी नेसून काम होणार आहे का?  मामा येणार म्हणून साडी नेसली आहेस का?”  मोनिका हसत म्हणाली.

“मी इथे आहे तोपर्यंत साडीच नेसणार आहे,”
अनघा शांतपणे म्हणाली.

“तुझ्याकडून सगळं काम होईल का?”,  " मामा गावाला राहत असला तरी त्यांचे विचार तसें नाही आहे.  म्हणून तू माझ्याकडून  साड्या  घेतल्या का?,  मोनिका पुन्हा विचारते.

“होईल,”   "मला  साडीमध्ये पण  करता आले पाहिजे ना.  मामा  पहिल्यादाच येत आहे."   अनघा हसत उत्तर देते.

“मी आईला चहा देऊन येते.  तू दादाला उठवायला जाणार आहेस का?”  मोनिका म्हणाली.

“आधी त्यांचा डबा करून घेते, मग उठवायला जाईन,”
अनघा म्हणाली.

मोनिका ललिताच्या रूमकडे जाताना मनात विचार करत होती
अनघा काय करत आहे? साडी का नेसत आहे?  दादाला ‘अहो’ म्हणायला लागली आहे.  आईने अनघाला काही बोललं असेल का? मोनिका मनात विचार करत होती.

इकडे अनघाचा अनिकेतचा डबा तयार झाला होता.
ती त्याला उठवायला रूममध्ये गेली.

“अहो, उठा ना…   तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल,”
अनघा हळूच म्हणाली.

अनिकेत काहीच बोलला नाही. अनघाने पुन्हा तसंच म्हटलं.

तेव्हा अनिकेत कान चोळत उठला.

“तू मला ‘अहो’ म्हणालीस का?”  तो हसत म्हणाला.

अनघा लाजतच मान हलवून  “हो,” म्हणाली.

अनिकेतने तिला मिठीत घेतलं.

“खूप मस्त वाटत आहे…  पण तू ‘अनिकेत’ म्हणतेस, तेच जास्त छान आहे,”  तो प्रेमाने म्हणाला.

तो तिच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला,
“आणि हे काय… आज साडी नेसली आहेस?”

“छान दिसतेय ना?”  अनघा हसत म्हणाली.

“छान दिसतेय, पण काम करताना कसं करशील?  तुला जमणार आहे का?  मामा येत आहे.  जेवण पण  जास्त बनवायचे आहे,” अनिकेत काळजीने म्हणाला.

“मी करेन. तुम्ही उठा, नाश्ता थंड होत आहे,”  अनघा म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली.

अनघाला काय झाले.  अरे तुरे वरून अहो काहो झाले आहे.
नंतर तो त्याचे आवरायला उठला.

.....

सगळे नाश्त्यासाठी एकत्र आले.   मोनिका ललिताला नाश्ता घेऊन गेली. 
अनघाने सगळ्यांना गरमागरम नाश्ता वाढला.

नाश्ता झाल्यावर अनिकेत आवरून कामावर निघून गेला.
निघताना त्याने एकदा अनघाकडे पाहिलं, हलकंसं हसलाही…
अनघाच्या मनात कुठेतरी समाधान होतं.

अशोक पेपर वाचत बसले होते.  ललिताचं मात्र सगळ्यावर बारीक लक्ष होतं.

अनघाने साडी नेसली आहे…
अनिकेतला ‘अहो’ म्हणते आहे…  माझं ऐकलं आहे.
दिसतंय सगळं…  त्या मनात  म्हणाल्या.

हा विचार करत ललिताच्या ओठांवर हलकीशी समाधानाचे हसू  उमटले.  मनातल्या मनात त्या आनंदी झाल्या.
.......

सखाराम आणि तृप्ती घरी आले.
अनघाने नम्रपणे पुढे येत दोघांनाही पाणी दिलं, आणि लगेच चहा आणून दिला.

पाणी-चहा घेतल्यावर दोघेही ललिताजवळ गेले.
“कशी आहेस आता?” सखारामने काळजीने विचारलं.

“आता बरं वाटतंय… पण पाय अजून दुखतोय,” ललिता हळू आवाजात म्हणाल्या.
तृप्तीने तिच्या पायाकडे पाहिलं आणि सहानुभूतीने मान हलवली.

“काळजी घ्यायला हवी होतीस आत्या,” तृप्ती म्हणाली.

ललिता हळूच उसासल्या,
“आता घरात सगळं माझ्या नशिबावरच आहे,” असं म्हणत त्यांनी नजर अनघाकडे वळवली.

अनघा मात्र शांतपणे उभी होती.
तिच्या चेहऱ्यावर आदर होता… पण डोळ्यांत कुठेतरी दडलेली अस्वस्थता दिसत होती.

...

तृप्ती अनघाकडे नीट पाहत होती.
साधी साडी, शांत वागणूक, आणि चेहऱ्यावरचा संयम  सगळंच तिला वेगळं वाटत होतं.

अनिकेतची बायको खूप सुंदर आहे… तृप्ती मनात म्हणाली.
म्हणूनच अनिकेतला ती आवडली असेल.

त्या विचारासोबतच तिच्या मनात हलकीशी चुरचुरही उठली.
सुंदरतेपेक्षा जास्त, अनघामध्ये असलेला आत्मविश्वास आणि शांतपणा तिला जाणवत होता.

......

मोनिका आणि तृप्ती एकमेकांच्या शेजारी बसून मस्त गप्पा मारत होत्या.
कधी कॉलेजच्या आठवणी, कधी नोकरीचे किस्से, तर कधी हलकीफुलकी हसणं, दोघींची चांगलीच रंगत जमली होती.

हॉलमध्ये अशोक आणि सखाराम गंभीर आवाजात बोलत होते.
घर, व्यवसाय, जुन्या ओळखी… विषय एकामागोमाग एक निघत होते. सखाराम अधूनमधून घराकडे नजर टाकत होता, जणू सगळं नीट चाललंय ना याची खात्री करत होता.

किचनमध्ये अनघा एकटीच कामात गुंतलेली होती.
भाजी चुलीवर ठेवलेली, भात शिजत होता, आणि डाळीला फोडणी देताना तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता.
इतक्या लोकांसाठी जेवण करत असतानाही तिच्या हालचाली घाईच्या नव्हत्या,  सगळं नीट, पद्धतशीर  होते.

ललिता कधी किचनकडे नजर टाकत होत्या, तर कधी तृप्तीकडे.
काम तर नीट करते आहे… त्या मनात म्हणाल्या,
पण बघू या, पुढे काय होतं ते.

अनघाने शेवटची भाजी उतरवली आणि हात पुसत बाहेर आली.
“जेवण तयार आहे,” ती शांतपणे म्हणाली.

घरातल्या गप्पांचा आवाज क्षणभर थांबला…
आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं.

सगळे जेवायला बसले.
अनघाने वाढलेलं जेवण अगदी सुगरणीसारखं होतं. भाजीला चव, वरणाला योग्य फोडणी, भात मऊ आणि गरम.
सखाराम मामा पहिलाच घास घेताच थांबले.
“वा गं अनघा… खूपच छान जेवण केलं आहेस. अशी चव आजकाल कुठे मिळत नाही,” ते मनापासून म्हणाले.
तृप्तीनेही मान डोलावली.
“खरंच अनघा , तुझ्या हाताला खूप छान चव आहे,” ती हसत म्हणाली.
अनघाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
सकाळपासूनची धावपळ, साडी नेसून केलेलं काम, ललितांचे टोमणे, सगळ्या थकव्यावर मामांचे ते दोन शब्द  तिला छान वाटले.
ती आतून सुखावली होती.
अशोकांनी समाधानाने अनघाकडे पाहिलं.
“मी म्हणत होतो ना, अनघा सगळं नीट करते,” ते शांतपणे म्हणाले.
ललिता काही बोलल्या नाहीत.
ताटातल्या घासांकडे पाहत राहिल्या, पण मनात मात्र विचार चालू होते
सगळ्यांना इतकं आवडतंय म्हणजे जेवण चांगले असणार ललिता मनात  म्हणाल्या


जेवण संपत आलं तसं घरात एक वेगळाच शांत, पण भारलेला माहोल तयार झाला.



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all