तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 29
रात्री अनिकेत अनघाशी बोलायचा प्रयत्न करत होता.
पण दिवसभराच्या थकव्यामुळे अनघा केव्हाच झोपून गेली होती.
अनिकेत फोन बाजूला ठेवत मनात म्हणाला
“तिला माझ्यासोबत बोलायलाच वेळ नाही का?”
दिवसभर घरचं सगळं काम करते… पण हे सगळं नेमकं काय चाललंय?
“तिला माझ्यासोबत बोलायलाच वेळ नाही का?”
दिवसभर घरचं सगळं काम करते… पण हे सगळं नेमकं काय चाललंय?
साडी नेसते, ‘अहो’ म्हणते… नवीन काय बदल आहे हा?
ती कोणाशी काय बोलते, काय सहन करते… मला काहीच कळत नाही.
ती कोणाशी काय बोलते, काय सहन करते… मला काहीच कळत नाही.
त्याच्या मनात शंका, काळजी आणि थोडीशी अस्वस्थता दाटून आली.
उद्या दुपारी मी लवकर घरी येतोच…
अनघा दिवसभर काय करते, घरात नेमकं काय वातावरण आहे स्वतः बघतो. आईचे काही सांगता येत नाही. अनिकेत मनात म्हणाला.
उद्या दुपारी मी लवकर घरी येतोच…
अनघा दिवसभर काय करते, घरात नेमकं काय वातावरण आहे स्वतः बघतो. आईचे काही सांगता येत नाही. अनिकेत मनात म्हणाला.
हा विचार करत करत अनिकेतही नकळत झोपेच्या कुशीत गेला.
पण त्याच्या मनात अनघाचाच चेहरा आणि न उलगडलेले प्रश्न घोळत राहिले होते.
पण त्याच्या मनात अनघाचाच चेहरा आणि न उलगडलेले प्रश्न घोळत राहिले होते.
.....
तृप्ती विक्रमसोबत फोनवर बोलत होती. तिचा आवाज थोडासा दबलेला, पण आतून अस्वस्थ होता.
“मला तुला भेटायचंच आहे. उद्या मी आणि मोनिका मार्केटला जाणार आहोत. तू पण ये. थोडा वेळ तरी मोकळेपणाने बोलता येईल,” तृप्ती म्हणाली.
“ठीक आहे. निघताना मला मेसेज कर. किती वाजता, कुठून निघणार आहेस ते सांग,” विक्रम शांतपणे म्हणाला.
“मी निघताना मेसेज करते,”
तृप्ती म्हणाली… पण तिच्या आवाजात घाई होती.
तृप्ती म्हणाली… पण तिच्या आवाजात घाई होती.
थोडा क्षण शांतता झाली.
“तृप्ती… आपण असंच लपूनछपून भेटत राहणार का?
मला हे नकोय. आपण लग्न करायचं का?”
विक्रमने थेट विचारलं.
मला हे नकोय. आपण लग्न करायचं का?”
विक्रमने थेट विचारलं.
तृप्ती दचकल्यागत झाली.
“लग्न…?”
तिचा आवाज थरथरला.
तिचा आवाज थरथरला.
“अनिकेत पण इथे आला आहे. आपण त्यांच्या घरी गेलास तर… काही प्रॉब्लेम होणार नाही ना?” विक्रम म्हणाला
ती घाबरत म्हणाली.
“अनिकेतला आपल्या बद्दल माहिती आहे का?”
तृप्तीने धडधडत्या मनाने विचारलं.
तृप्तीने धडधडत्या मनाने विचारलं.
थोडा वेळ विक्रम गप्प राहिला…
आणि मग ठामपणे म्हणाला
आणि मग ठामपणे म्हणाला
“हो…
त्याला आपल्याबदल माहिती आहे.”
त्याला आपल्याबदल माहिती आहे.”
हे ऐकताच तृप्तीचा श्वास अडखळला.
फोन कानाला लावलेलाच होता, पण क्षणभर तिला काहीच ऐकू येईना. मनात एकच विचार घोळत राहिला.
फोन कानाला लावलेलाच होता, पण क्षणभर तिला काहीच ऐकू येईना. मनात एकच विचार घोळत राहिला.
तृप्ती घाबरू नको, अनिकेत कोणाला काही सांगणार नाही. विक्रम म्हणाला..
तृप्ती थोडी रील्याक्स झाली.
दोघेही थोडावेळ अजून बोलत राहिले.
कधी जुन्या आठवणी, कधी उद्याच्या भेटीची हलकीशी उत्सुकता… पण दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार चालू होते.
कधी जुन्या आठवणी, कधी उद्याच्या भेटीची हलकीशी उत्सुकता… पण दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार चालू होते.
“आता उशीर झाला आहे,” विक्रम म्हणाला.
“हो… उद्या बोलू,” तृप्तीने हळूच उत्तर दिलं.
“हो… उद्या बोलू,” तृप्तीने हळूच उत्तर दिलं.
“गुडनाईट,” विक्रम म्हणाला
“गुडनाईट,” तृप्ती म्हणाली
फोन ठेवला गेला.
तृप्ती उशीवर मान टेकवून पडली. डोळे मिटले, पण मन मात्र जागंच होतं.
विक्रमचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते.
विक्रमचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते.
विक्रमही दुसऱ्या टोकाला शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण अनिकेत, तृप्ती आणि उद्याचा दिवस…
या सगळ्यांचा विचार त्याच्या मनात घर करून बसला होता.
या सगळ्यांचा विचार त्याच्या मनात घर करून बसला होता.
थोड्याच वेळात दोघांचेही डोळे मिटले… रात्रीच्या शांततेत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले.
......
सकाळ झाली होती. अनघाला जाग आली.
ती अनिकेतच्या मिठीत होती. अंगावर साडी तशीच होती.
ती अनिकेतच्या मिठीत होती. अंगावर साडी तशीच होती.
मी इतकी दमले होते की अनिकेतसोबत नीट बोलायलाही वेळ मिळाला नाही, ती मनात म्हणाली.
तो रागावला असेल का? पण मी तरी काय करू? दिवसभर घरकाम, पाहुणे, स्वयंपाक… रात्री बेडवर आडवे झाले की डोळे आपोआप मिटतात.
तो रागावला असेल का? पण मी तरी काय करू? दिवसभर घरकाम, पाहुणे, स्वयंपाक… रात्री बेडवर आडवे झाले की डोळे आपोआप मिटतात.
अनघाला वाईट वाटतं होते.
आज काय नवीन असणार आहे कुणास ठाऊक… मामा आज निघणार असतील तर त्यांच्यासाठी नाश्ता करावा लागेल. सोबत डब्बा द्यावा का? मोनिकाला विचारते, असा विचार करून अनघा उठली.
तिने शांतपणे आवरलं आणि थेट किचनमध्ये गेली. देवाजवळ दिवा लावला.
नाश्ता बनवायला लागली.
थोड्याच वेळात मोनिका देखील किचनमध्ये आली.
मोनिकाला पाहून अनघाला बरं वाटलं.
“मोनिका, मामा डब्बा घेऊन जातील का?” अनघाने विचारलं.
“मोनिका, मामा डब्बा घेऊन जातील का?” अनघाने विचारलं.
“मामाला डब्बा बनव. दादाचा डब्बा तर बनवतेसच ना, तोच मामाला दे. मामा काहीही खातो, त्याला सगळंच आवडतं. तो जेवणाला कधी नाव ठेवत नाही,” मोनिका म्हणाली.
“ठीक आहे. नाश्ता झाला आहे. आईचं आवरून आलीस का?” अनघाने विचारलं.
“आत्ताच आवरून आले. मी नाश्ता घेऊन तिथेच जाते. मी पण तिथेच खाते. तू दादाला उठवायला जाणार आहेस ना? तृप्तीला पण आवाज दे,” मोनिका म्हणाली.
तेवढ्यात तृप्ती किचनमध्ये आली.
“मोनिका, मी आली आहे. गुडमॉर्निंग मोनिका… अनघा वहिनी,” ती म्हणाली.
“मोनिका, मी आली आहे. गुडमॉर्निंग मोनिका… अनघा वहिनी,” ती म्हणाली.
“गुडमॉर्निंग,” दोघी एकाच वेळी म्हणाल्या.
“वहिनी, तू अनिकेतला उठवून ये. मी डब्ब्याचं बघते. तू आधीच तयारी केलेली दिसतेस,” तृप्ती म्हणाली आणि कामाला लागली.
अनघाला खूप छान वाटलं.
मोनिकाला स्वयंपाक येत नव्हता, त्यामुळे तिला फारशी मदत होत नव्हती.
पण तृप्ती स्वतःहून सगळं करत होती.
मोनिकाला स्वयंपाक येत नव्हता, त्यामुळे तिला फारशी मदत होत नव्हती.
पण तृप्ती स्वतःहून सगळं करत होती.
किमान कुणीतरी मला समजून घेतंय, असा विचार करून अनघाने मनातच देवाचे आभार मानले.
ती अनिकेतला उठवायला रूममध्ये गेली.
आणि मोनिका ललिताला नाश्ता देण्यासाठी निघून गेली.
......
अनघा हळूच रूममध्ये गेली.
अनिकेत अजून झोपलेलाच होता. ती थोडा वेळ त्याच्याकडे बघत उभी राहिली. काल रात्री त्याच्याशी नीट बोलताही आलं नव्हतं… हे तिच्या मनाला लागून राहिलं होतं.
अनिकेत अजून झोपलेलाच होता. ती थोडा वेळ त्याच्याकडे बघत उभी राहिली. काल रात्री त्याच्याशी नीट बोलताही आलं नव्हतं… हे तिच्या मनाला लागून राहिलं होतं.
“अहो… उठा ना… ऑफिसला उशीर होईल,” ती हलक्या आवाजात म्हणाली.
अनिकेतने डोळे उघडले. तिला समोर बघताच तो हसला.
“आज पण एवढ्या सकाळी उठलीस?” तो म्हणाला.
“आज पण एवढ्या सकाळी उठलीस?” तो म्हणाला.
“मामा जाणार आहेत ना… म्हणून,” अनघा म्हणाली.
अनिकेत उठून बसला.
“तू खूप थकलेली दिसतेस अनघा. काल रात्री तर अक्षरशः बोलता बोलता झोपून गेलीस,” तो थोडा काळजीच्या स्वरात म्हणाला.
“तू खूप थकलेली दिसतेस अनघा. काल रात्री तर अक्षरशः बोलता बोलता झोपून गेलीस,” तो थोडा काळजीच्या स्वरात म्हणाला.
अनघा शांत झाली.
“दिवसभर काम… साडी… सगळं एकदम… मला खरंच दमायला होतं. पण माझ्यावर राग नाही ना,” ती म्हणाली.
“दिवसभर काम… साडी… सगळं एकदम… मला खरंच दमायला होतं. पण माझ्यावर राग नाही ना,” ती म्हणाली.
अनिकेतने तिचा हात हातात घेतला. “मला राग नाही. फक्त तू स्वतःकडे लक्ष दे. सगळ्यांसाठी करतेस, पण स्वतःसाठी नाही,” तो म्हणाला.
अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं.
“तू समजून घेतोस… एवढंच पुरेसं आहे,” ती हसत म्हणाली.
“तू समजून घेतोस… एवढंच पुरेसं आहे,” ती हसत म्हणाली.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला.
“दादा… नाश्ता तयार आहे,” मोनिकाचा आवाज होता.
“दादा… नाश्ता तयार आहे,” मोनिकाचा आवाज होता.
अनिकेत आवरायला गेला.
अनघा पुन्हा किचनमध्ये आली.
अनघा पुन्हा किचनमध्ये आली.
तृप्ती डब्बा भरत होती.
“वहिनी, बाबा नक्की खुश होतील. कालच म्हणत होते तुमच्या हातचं जेवण भारी आहे,” त्यांना खाण्याची आवडत आहे. तुमच्या हाताला खूप छान चव आहे. तृप्ती म्हणाली.
“वहिनी, बाबा नक्की खुश होतील. कालच म्हणत होते तुमच्या हातचं जेवण भारी आहे,” त्यांना खाण्याची आवडत आहे. तुमच्या हाताला खूप छान चव आहे. तृप्ती म्हणाली.
अनघा लाजली.
“तू मदत करतेस, तेच खूप आहे, मी जसं जमत तसे करते. आईने शिकवले होते ” ती म्हणाली.
“तू मदत करतेस, तेच खूप आहे, मी जसं जमत तसे करते. आईने शिकवले होते ” ती म्हणाली.
मोनिका नाश्ता देऊन परत आली. ललिता पण बाहेर आली होती. तिने अनघाकडे एक नजर टाकली…
कालसारखी समाधानाने नव्हे, तरी बघत होत्या.
कालसारखी समाधानाने नव्हे, तरी बघत होत्या.
त्यांना आज चालता येत होते. मोनिकाने ललिताला पकडून बाहेर आणले होते. पायाची हालचाल झाली पाहिजे म्हणून. त्यांना बाहेर आणले होते.
सखाराम तयार होत होते. त्यांच्या नाश्ता झाला होता..
“अनघा, डब्बा नाही केला तरी चालेल,” ते म्हणाले.
“अनघा, डब्बा नाही केला तरी चालेल,” ते म्हणाले.
“केला आहे मामा, वाटेत लागेल,” अनघा म्हणाली.
सखारामने समाधानाने मान हलवली.
अशोक दूरून सगळं बघत होते.
त्यांच्या मनात एकच विचार आला
ही मुलगी घर सांभाळतेय… पण ललिता तिला समजून घेईल का?, तिला सून मानेल का? अशोक मनात विचार करतात.
अशोक दूरून सगळं बघत होते.
त्यांच्या मनात एकच विचार आला
ही मुलगी घर सांभाळतेय… पण ललिता तिला समजून घेईल का?, तिला सून मानेल का? अशोक मनात विचार करतात.
नवा दिवस सुरू झाला होता…
पण अनघासाठी प्रश्न अजूनही तसेच होते.
पुढे काय होईल?
पण अनघासाठी प्रश्न अजूनही तसेच होते.
पुढे काय होईल?
अनिकेत तयार होऊन आला.
अनघाने त्याला नाश्ता दिला. अनघाने आणी तृप्तीने पण खाऊन घेतले.
तृप्तीने अनिकेतचा पण डब्बा भरला होता.
अनघाने अनिकेतच्या बॅगेत ठेवून दिला.
मामा आणी अनिकेत निघून गेले...
क्रमश
ललिता अनघाला काय काम देणार?, अनघाला त्रास झालेला, अनिकेत बघू शकेल. का? तो त्यांच्या घरी जाईल का?
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा