तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 30
अनघा कामात गुंतलेली होती.
तेवढ्यात अशोकांनी तिला हाक मारली.
“अनघा…”
अनघा लगेच त्यांच्या जवळ गेली.
“बाबा, हाक मारलीत? काही काम होतं का?” अनघा विचारते.
“चहा आहे का? करून देशील का? मला थोडं बाहेर जायचं आहे. यायला उशीर होईल. तुम्ही दोघी जेवण करून घ्या. तू जास्त दमू नकोस, थोडा आराम कर,” अशोक म्हणाले.
अनघाने होकारार्थी मान हलवली आणि किचनमध्ये चहा करायला निघून गेली.
हे सगळं ललिताने ऐकलं होतं.
बरं झालं, अनिकेतचे बाबा पण बाहेर जाणार आहेत. आता घरात मी आणि अनघाच, त्या मनात म्हणाल्या.
बरं झालं, अनिकेतचे बाबा पण बाहेर जाणार आहेत. आता घरात मी आणि अनघाच, त्या मनात म्हणाल्या.
अनघाने अशोकांना चहा आणून दिला.
अशोकांनी लगेच चहा घेतला.
अशोकांनी लगेच चहा घेतला.
चहा दिल्यावर अनघा पुन्हा किचनमध्ये गेली. सगळं आवरून झाल्यावर ती थोडावेळ आपल्या रूममध्ये गेली. मोबाईल हातात घेतला.
तेवढ्यात तिला आजोबांची आठवण आली.
तिने लगेच आजोबांना कॉल केला.
तिने लगेच आजोबांना कॉल केला.
आजोबांनीही फोन लगेच उचलला.
“हॅलो… अनघा, कशी आहेस?” आजोबा म्हणाले.
“हॅलो आजोबा, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात?” अनघा प्रेमाने म्हणाली.
“मी पण मस्त आहे. पण तुमची खूप आठवण येतेय,” आजोबा म्हणाले.
“आजोबा, आम्ही दोन-तीन दिवसांत येऊ. आता आईला चालता येत आहे. त्यांच्या भावाची मुलगी पण आली आहे. ती सगळं करते,” अनघा सांगते.
“छान आहे. तुझ्या हातच्या जेवणाची आम्हाला सवय झाली होती. दोन-तीन महिने खूप छान निघून गेले,” आजोबा म्हणाले.
“हो आजोबा, आपली माणसं जवळ असली की महिने, वर्ष कशी निघून जातात कळतच नाही,” अनघा म्हणाली.
“एकदम बरोबर बोललीस,” आजोबा हसत म्हणाले.
तेवढ्यात ललिता मनात म्हणाल्या,
अनघा काय करत असेल? कामाला लावते की रूममध्ये लोळत पडली असेल?
अनघा काय करत असेल? कामाला लावते की रूममध्ये लोळत पडली असेल?
त्या जोरात हाक मारतात,
“अनघा…”
“अनघा…”
“आजोबा, आई हाक मारत आहे. मी नंतर बोलते,” असं म्हणत अनघाने कॉल कट केला.
आणि ती लगेच ललिताच्या रूममध्ये गेली.
---
अनघा ललिताच्या रूममध्ये आली.
“आई, हाक मारली होती. काही हवं होतं का?” अनघा शांतपणे विचारते.
ललिता तिला वरून खाली न्याहाळतात.
“काय करतेस एवढा वेळ? घरात इतकी कामं आहेत आणि तू रूममध्ये बसून मोबाईल बघत होतीस?” ललिता तिरकसपणे म्हणाल्या.
“काय करतेस एवढा वेळ? घरात इतकी कामं आहेत आणि तू रूममध्ये बसून मोबाईल बघत होतीस?” ललिता तिरकसपणे म्हणाल्या.
“आई, सगळी कामं आवरूनच मी रूममध्ये गेले होते. थोडा वेळ आजोबांशी बोलत होते,” अनघा नम्रपणे म्हणाली.
“आजोबा… आजोबा…” ललिता उपहासाने म्हणाल्या.
“इथे घरात लोक आहेत, पाहुणे आहेत, त्याचं काही कर्तव्य नाही का तुला?” " कोण आजोबा काय आजोबा, त्यांच्या सोबत बोलत बसली होती.
“इथे घरात लोक आहेत, पाहुणे आहेत, त्याचं काही कर्तव्य नाही का तुला?” " कोण आजोबा काय आजोबा, त्यांच्या सोबत बोलत बसली होती.
“आहे ना आई. म्हणूनच तर सकाळपासून स्वयंपाक, नाश्ता, चहा सगळं मीच केलं,” " आजोबा बदल काही बोलू नका, " अनघा शांत आवाजात म्हणाली.
“तू केलं म्हणजे उपकार केलेस का? हे तुझं घर आहे. कर्तव्य आहे तुझं,” ललिता कडकपणे म्हणाल्या.
अनघाने मान खाली घातली.
“हो आई, मला माहिती आहे. मी कधीच नाही म्हटलं की माझं कर्तव्य नाही.”
“हो आई, मला माहिती आहे. मी कधीच नाही म्हटलं की माझं कर्तव्य नाही.”
“मग सारखी अशी साडी नेसून, अहो-जाओ करत काय दाखवायचं आहे तुला?” ललितांचा आवाज चढला.
अनघा दचकली.
“आई, मी काही दाखवण्यासाठी नाही… पाहुणे आहेत म्हणून नीट राहायचा प्रयत्न करते आहे.” " तुम्हीच तर म्हंटल्या होत्या. साडी नेसत जा. अनिकेत म्हणून नको, मी काय बोलू मग? अनघा म्हणाली.
“आई, मी काही दाखवण्यासाठी नाही… पाहुणे आहेत म्हणून नीट राहायचा प्रयत्न करते आहे.” " तुम्हीच तर म्हंटल्या होत्या. साडी नेसत जा. अनिकेत म्हणून नको, मी काय बोलू मग? अनघा म्हणाली.
“नीट राहायचं असेल तर कामात दिसलं पाहिजे. बोलण्यात नाही,” ललिता म्हणाल्या.
अनघाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने ते आवरलं.
“मी अजून काही काम असेल तर सांगाल का? मी लगेच करते,” अनघा म्हणाली.
“मी अजून काही काम असेल तर सांगाल का? मी लगेच करते,” अनघा म्हणाली.
ललितांनी थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं.
“संध्याकाळी चहा वेळेवर पाहिजे. आणि घर नीट आवरलेलं दिसलं पाहिजे,” त्या थंडपणे म्हणाल्या.
“संध्याकाळी चहा वेळेवर पाहिजे. आणि घर नीट आवरलेलं दिसलं पाहिजे,” त्या थंडपणे म्हणाल्या.
“हो आई,” एवढंच म्हणत अनघा बाहेर पडली.
रूमच्या बाहेर येताच तिचा श्वास जड झाला.
मी कितीही केलं तरी… कमीच आहे, ती मनात म्हणाली.
मी कितीही केलं तरी… कमीच आहे, ती मनात म्हणाली.
--
अनघा किचनमध्ये उभी राहून भांडी घासत होती. हात लाल झाले होते, पाणी थंड होतं, तरी ती थांबत नव्हती. सिंकमध्ये आधीच स्वच्छ असलेली काही भांडी पुन्हा काढून घासायला लावली होती.
ललिता किचनच्या दारात उभ्या राहून बडबड करत होत्या.
“असं कसले भांडी घासतेस? नीट लक्ष दे. पाहुणे गेले म्हणजे काम संपलं असं समजायचं नाही. घर चालवायचं कसं ते शिकायला लागेल,” त्या सतत बोलत होत्या.
“असं कसले भांडी घासतेस? नीट लक्ष दे. पाहुणे गेले म्हणजे काम संपलं असं समजायचं नाही. घर चालवायचं कसं ते शिकायला लागेल,” त्या सतत बोलत होत्या.
अनघा काहीच बोलत नव्हती. मान खाली घालून फक्त भांडी घासत राहिली. डोळ्यांत पाणी होतं, पण ते पाण्यातच मिसळून गेलं.
तेवढ्यात दार उघडण्याचा आवाज आला.
अनिकेत घरी आला होता.
तो बूट काढत किचनकडे आला आणि दृश्य पाहून क्षणभर थांबला. सिंकमध्ये ठेवून दिलेली स्वच्छ भांडी, अनघाचे थरथरणारे हात, आणि आईची न थांबणारी बडबड, सगळं त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होतं.
“हे काय चाललंय?” अनिकेतचा आवाज गंभीर होता.
ललिता लगेच म्हणाल्या,
“काय म्हणजे? तिला काम शिकवते आहे. घरात राहायचं असेल तर नियम पाळावे लागतात.”
“काय म्हणजे? तिला काम शिकवते आहे. घरात राहायचं असेल तर नियम पाळावे लागतात.”
अनिकेतने थेट सिंककडे पाहिलं.
“आई, ही भांडी तर आधीच स्वच्छ दिसत आहे ना?”
“आई, ही भांडी तर आधीच स्वच्छ दिसत आहे ना?”
अनघा दचकली. तिने काही बोलायचा प्रयत्न केला, पण आवाज गळ्यात अडकला.
“मी सांगितलं तिला पुन्हा घासायला,” ललिता ठामपणे म्हणाल्या.
तेवढ्यात अनिकेतचा संयम सुटला.
“बस्स आई!” तो जरा मोठ्या आवाजात म्हणाला.
“ती सकाळपासून काम करते आहे. पाहुण्यांचं सगळं केलं. तरीही तू तिला पुन्हा भांडी घासायला लावते आहे?”
“ती सकाळपासून काम करते आहे. पाहुण्यांचं सगळं केलं. तरीही तू तिला पुन्हा भांडी घासायला लावते आहे?”
“अनिकेत, माझ्याशी आवाज चढवू नकोस,” ललिता चिडून म्हणाल्या.
“मी आवाज चढवत नाही, पण अन्याय सहनही करणार नाही,” अनिकेत ठामपणे म्हणाला.
“ही माझी बायको आहे. नोकर नाही.”
“ही माझी बायको आहे. नोकर नाही.”
अनघाच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी उभं राहिलं होतं.
अनिकेतने तिचा हात पकडला.
“बस अनघा. पुरे झाले. आता तू आराम कर.”
“बस अनघा. पुरे झाले. आता तू आराम कर.”
ती काहीच बोलू शकली नाही. फक्त मान हलवली.
ललिता गप्प उभ्या राहिल्या.
आज पहिल्यांदाच घरात शांतता होती… पण ती शांतता वादळाची चाहूल देत होती.
---
मार्केटमध्ये नेहमीची गडबड सुरू होती. लोकांची गर्दी, दुकानांतून ऐकू येणारे आवाज, आणि रंगीबेरंगी वस्तूंनी भरलेली दुकाने सगळं काही उत्साही वाटत होतं.
तृप्ती, मोनिका आणि विक्रम तिघेही एकत्र फिरत होते, पण मनाने तिघांची दुनिया वेगळीच होती.
मोनिका एका दुकानात कपडे पाहण्यात पूर्ण गुंतलेली होती.
“हे बघ तृप्ती, हा ड्रेस किती छान आहे ना?” ती आरशात पाहत म्हणाली.
तृप्तीने हसत मान हलवली, पण तिचं लक्ष मात्र समोर उभ्या असलेल्या विक्रमकडेच जात होतं.
“हे बघ तृप्ती, हा ड्रेस किती छान आहे ना?” ती आरशात पाहत म्हणाली.
तृप्तीने हसत मान हलवली, पण तिचं लक्ष मात्र समोर उभ्या असलेल्या विक्रमकडेच जात होतं.
विक्रम आणि तृप्ती एकमेकांकडे चोरून चोरून पाहत होते. नजर भेटली की दोघेही पटकन नजर वळवायचे. त्या नजरेत न बोललेलं खूप काही होतं काळजी, ओढ आणि थोडी भीतीही होती.
एका छोट्या दुकानात विक्रम थांबला. तिथे साधी पण देखणी बांगड्या होत्या.
“ही तुझ्यावर छान दिसेल,” तो हळूच तृप्तीला म्हणाला.
तृप्तीच्या चेहऱ्यावर लाजरी स्माईल आली.
“नको… मोनिका आहे,” ती कुजबुजली.
“ही तुझ्यावर छान दिसेल,” तो हळूच तृप्तीला म्हणाला.
तृप्तीच्या चेहऱ्यावर लाजरी स्माईल आली.
“नको… मोनिका आहे,” ती कुजबुजली.
“ती तिच्यातच बिझी आहे,” विक्रम हसत म्हणाला.
तृप्तीने ती बांगडी घेतली, पण मनात एक वेगळीच धडधड सुरू होती.
थोडं पुढे गेल्यावर तृप्ती एका वॉलेटच्या दुकानासमोर थांबली.
“हे तुझ्यासाठी,” ती म्हणाली, आवाजात हलकं थरथर होतं.
थोडं पुढे गेल्यावर तृप्ती एका वॉलेटच्या दुकानासमोर थांबली.
“हे तुझ्यासाठी,” ती म्हणाली, आवाजात हलकं थरथर होतं.
विक्रम काही क्षण शांत राहिला.
“आपण हे असं लपून… बरोबर आहे का?” तो हळूच म्हणाला.
“आपण हे असं लपून… बरोबर आहे का?” तो हळूच म्हणाला.
तृप्तीने नजर खाली घातली.
“माहीत नाही… पण मन थांबत नाही.”
“माहीत नाही… पण मन थांबत नाही.”
तेवढ्यात मोनिका परत आली.
“अरे, तुम्ही दोघं इतके गप्प का?” ती हसत म्हणाली.
दोघेही एकदम दचकले.
“अरे, तुम्ही दोघं इतके गप्प का?” ती हसत म्हणाली.
दोघेही एकदम दचकले.
“काही नाही… गर्दी बघत होतो,” विक्रम पटकन म्हणाला.
मोनिका पुन्हा शॉपिंगमध्ये गुंतली.
तृप्ती आणि विक्रम परत एकदा नजरेतूनच बोलू लागले.
मार्केटच्या त्या गोंगाटात, त्यांचं गुपित अजूनही सुरक्षित होतं… पण किती दिवस?
मार्केटच्या त्या गोंगाटात, त्यांचं गुपित अजूनही सुरक्षित होतं… पण किती दिवस?
---
क्रमश
अनिकेतने आता सगळे पाहिले आहे. आईला उभ राहता येत आहे. ती पडली होते म्हणून आले होते. आता अनिकेत काय करेल? अनघाला काही त्रास होईल का? आरती अनघा सोबत नीट बोलतील का?.......
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा