Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -31

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग  - 31




“अनघा… बॅग भर. आपण आपल्या घरी जाऊ,”
अनिकेत रागात म्हणाला.

त्याच्या आवाजातला राग अनघाच्या मनात खोलवर उतरला.
खरंच… आपल्याला इथे यासाठीच बोलावलं होतं का?
आता चालता येतंय, उभं राहता येतंय, घरातली कामंही होऊ शकतात… मग आपली गरज संपली,
असं तिला मनात वाटलं.

अनघा तशीच उभी राहिली.
काय बोलावं, काय करावं  काहीच कळत नव्हतं.
डोळे पाणावले, पण ती गप्प होती.

“अनघा!”
अनिकेतने जोरात हाक मारली.

अनघा दचकली.

“मी सांगितलं ना! बॅग भर. आपण आत्ताच निघतो,”
तो अजूनच चिडून म्हणाला.

एक शब्दही न बोलता अनघा रूममध्ये निघून गेली.
तिच्या पावलांत जडपणा होता.
अनिकेतही तिच्या मागोमाग रूममध्ये गेला.

हॉलमध्ये ललिता एकट्याच उभ्या राहिल्या.

मी काय काय विचार केला होता…  हे असं होईल असं वाटलंच नव्हतं, त्या मनात पुटपुटल्या.  तिथेच  खाली  बसल्या.

तृप्ती आली की अनिकेत इथेच राहील असं वाटलं होतं.
त्यांचं काहीतरी जुळेल… अनघा आपोआप निघून जाईल…  मी त्यांचे लग्न लावून देईल,  पण वास्तव वेगळंच निघालं.

आता अनघा गेली तर…
मला चांगलं जेवण कोण बनवून देणार?
तृप्ती आहे खरी… पण तिच्याकडून सगळं होईलच असं वाटतं नाही.
शेवटी मलाच उठावं लागेल, मलाच काम करावं लागेल…

ललिताच्या चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता दोन्ही स्पष्ट दिसत होत्या.
तिने जे खेळ मनात आखले होते, ते सगळे एकामागोमाग एक उधळत चालले होते…  त्यांनी डोक्याला हात लावला.


---


अनघा रूममध्ये आली.
हात थरथरत होते. तिने कपाट उघडलं… बॅगेकडे पाहिलं… पण हात पुढे सरकेनात.

अनिकेत मागोमाग रूममध्ये आला.
दरवाजा बंद झाला आणि खोलीत एकदम शांतता पसरली.

“मी तुला किती वेळा सांगतोय अनघा?”
अनिकेत राग आवरायचा प्रयत्न करत म्हणाला.
“आईचा आवाज, बडबड, भांडी… हे सगळं मी पाहतोय. तुला इथे का ठेवलंय तेच तूला कळत नाही का?”, "  तुला काम  करायला बोलवले,  तुला घरातून काढायचे, "  अनिकेत  म्हणाला..

अनघा हळू आवाजात म्हणाली,
“मी काहीच चुकीचं करत नाहीये अनिकेत… जे काम समोर येतं ते करतेय.”

“तेच तर!”
अनिकेतचा आवाज चढला.
“तू सगळं करतेस, आणि तरीही तुला बोलणं, अपमान सहन करावा लागतो. मला ते पाहवत नाही.”

अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मी सहन करतेय कारण हे तुमचं घर आहे. आई आहेत… बाबा आहेत… मला कुठेच तक्रार करायची नाही. आपण  सगळे सोबत  राहिलो असतो.”   अनघा म्हणाली.

“पण मला आहे!”
अनिकेत ठामपणे म्हणाला.
“तू इतकी दमतेस, रात्री माझ्याशी बोलायलाही तुला ताकद उरत नाही. हे नॉर्मल आहे का?”,  "  तुला माझ्यासाठी वेळ नसतो.  दोन  मिनिट आपले आपल्याला मिळत  नाही." अनिकेत म्हणाला

अनघा खाली पाहत म्हणाली,
“तू रागवला असं वाटत असेल तर सॉरी… पण मी खरंच थकते.  खूप काम  असते.  मामा,  तृप्ती वाढले.  मोनिकाला काहीच  येत नाही.  तृप्तीला मी काय काम सांगणार होते.”  ती म्हणाली
.

अनिकेत तिच्याजवळ गेला.
त्याचा आवाज थोडा नरम झाला.

“मी तुला इथे सोडून स्वतः ऑफिसला जातो… आणि मागे काय चालतं ते मला कळतं नाही.  आई तुला काय सांगते?  ते पण  मला माहिती नव्हते.  तू फक्त साडी नेसलीस, ‘अहो’ म्हणालीस म्हणून तुला स्वीकारलं जातं… हे मला मान्य नाही.”

अनघा रडत म्हणाली,
“मी बदलतेय कारण मला तुमच्याशी भांडण नको आहे.
मला घर टिकवायचं आहे, अनिकेत.”

अनिकेतने तिचे हात धरले.
“घर टिकवण्यासाठी एकट्याने झिजायचं नसतं, अनघा.
आता बस. बॅग भरायची गरज नाही… आपण स्वतःचा निर्णय घेऊ.”

अनघाने डोळे पुसले.
“मग… आपण काय करणार?”

अनिकेत शांतपणे म्हणाला,
“आधी तू आराम कर.
आणि मग आपण दोघं मिळून ठरवू  कुठे, कसं आणि कोणासाठी जगायचं.”

अनघाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडी शांतता उतरली…
पण बाहेर अजूनही वादळ थांबलेलं नव्हतं.

अनघाला झोप लागली. मीच बॅग भरून  घेतो.

अनिकेतने बॅग व्यवस्थित भरली. अनघा थोडावेळ आराम करत होती,  तिला जाग आली.  मग ती फ्रेश झाली.

“हो झाले ना? चल, आता आपण जाऊ,” अनिकेत म्हणाला.

अनघा अनिकेतच्या मागे जायला निघाली.

“अनिकेत, जाऊ नकोस ना… मी  तीला काहीच त्रास देणार नाही,” ललिता म्हणाल्या.

“आई, जे झाले ते बस झाले,” अनिकेतने सांगितले.

त्याने अनघाचा हात धरला आणि घराच्या बाहेर  जायला निघायला लागला. अनघा लगेच ललिताच्या पायाजवळ आदरपूर्वक झुकली, ललिता मागे गेल्या.

अनिकेतला अजून थोडासा राग होता. तो  बाहेर निघून गेला. बाईक जवळ गेला.  त्याने बाईक चालू केली, अनघाला जवळ  बॅग दिली,   अनघा   बाईक वर बसली, आणि ते तिथून जायला निघत होते.

ललिताने डोक्यावर हात ठेवून शांततेत मनात म्हणाली,
“अनघाला अनिकेत सोडणार नाही. ती   त्यांच्यासाठी  माझ्यापेक्षा महत्त्वाची आहे.”


---

अनिकेतने बाईक सुरु केली. अनघा त्याच्या मागे घट्ट धरून बसली. शहराच्या रस्त्यांवरून जाणारा वारा त्यांच्या चेहऱ्यावर खेळत होता. अनघाच्या मनात हलकी घामट, थोडा उत्साह आणि थोडीच भीती होती.

“काय वाटत आहे तुला?” अनिकेतने हलके हसत विचारले.

“माझ्या मनात गोंधळ आहे… पण तुला सोबत पाहून बरं वाटतंय,” अनघाने उत्तर दिले.

अनिकेत त्याच्या डोळ्यातून तिच्या डोळ्यात पाहत होता. “तुला काही त्रास देणार नाही. मी तुझ्यासोबत आहे,” त्याने अनघाचे हात घट्ट धरले.

रस्त्याच्या दोन्हीकडे उडणारी धुळी, गर्दीतील लोकांची हलकी गजबज आणि शहराचा आवाज… सगळे विसरून, दोघे फक्त एकमेकांच्या जवळ होते. अनिकेत अनघाला सुरक्षित ठेवत, हळूहळू घरी  पोहोचत होते.

अनघा हळूच हसली. “तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे,” तिने फक्त इतकंच म्हटलं.

अनिकेतने तिच्या केसांच्या कडे हलके हात फिरवले. “आणखी काही वेळ असेच फक्त तुला जवळ ठेवू,” तो म्हणाला.

दोघ पण आता आनंदी होते.  अनघा पण  अनिकेत सोबत  गप्पा मारत  होती. 

---


मोनिका आणि तृप्ती घरी आल्या. त्यांनी अनघाला हाक मारली, पण अनघा घरात नव्हती.

(अनघा आणि अनिकेत आधीच निघून गेले होते.)

मोनिका अनघा वहिनी घरात  नाही का?  आवाज देऊन पण  त्या आल्या नाही.  तृप्ती म्हणाली.
"आईने काही केले असेल का?" मोनिका मनात विचार करत होती.

आपण   त्यांच्या रूममध्ये  जाऊ,  मोनिका म्हणाली.  दोघी अनघाच्या रूममध्ये गेल्या.

दोघी अनघा कडे गेल्या, पण तिथे समानाची बॅग नव्हती. अनिकेत आणि अनघाचा सामानही दिसत नव्हता.

"अरे, त्यांचा सामानही दिसत नाही आहे?" तृप्ती आश्चर्यचकित झाली.

ते  निघून गेले असतील का?,  मोनिका  म्हणाली.

मला पण  वाटतं आहे.  आपण  बघू काही काम बाकी आहे का?  तृप्ती म्हणाली.

दोघी हळूहळू घरात फेरफटका मारत, पाहत होत्या की काय बाकी आहे. मोनिका मनात म्हणाली, "सगळं आवरायला आहे, पण अनघा नसेल तर काम करायला जड जाईल."  मोनिका म्हणाली.


---

अशोक घरी आले. मोनिकाने त्यांना पाणी आणून दिले.

"मोनिका, अनघाला सांग की जेवण घेऊन ये," अशोक म्हणाले.

मोनिका लगेच जेवण घेऊन आली.

अशोक बघत होते, "सगळं मोनिकाने आणलं आहे, अनघा काय करत आहे?" ते विचार करत होते.

"जेवण आणले आहे तर, जेवण करून घेतो," अशोक स्वतःच म्हणाले.


---




क्रमश

अनघा आणी अनिकेत सोबत काय  होते?  अशोकला समजल्यावर  ते काय करतील? .....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all