तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 32
अनघा आणि अनिकेत घरी आले.
घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच अनघाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
मनावरचा सगळा ताण जणू एका क्षणात उतरला.
“आपलं घर… आपली माणसं…” या विचारानेच अनघाला खूप आनंद झाला.
अनघा घरात गेली. थेट तिच्या बेडरूममध्ये गेली. अनिकेतही तिच्या मागे आला. दोघेही मस्त फ्रेश झाले.
अनघा हलकेच म्हणाली,
“किती छान वाटतंय ना…”
“किती छान वाटतंय ना…”
अनिकेत हसत म्हणाला,
“खरंच खूप छान वाटतंय. आणि त्यात तू ‘अहो’ म्हणत नाहीयस ते अजूनच भारी आहे.”
“खरंच खूप छान वाटतंय. आणि त्यात तू ‘अहो’ म्हणत नाहीयस ते अजूनच भारी आहे.”
अनघा लाजली.
“आई बोलल्या होत्या म्हणून मी म्हणत होते,” ती हळूच म्हणाली.
“आई बोलल्या होत्या म्हणून मी म्हणत होते,” ती हळूच म्हणाली.
“बरं असू दे,” अनिकेत प्रेमाने म्हणाला.
“आता सांग, जेवण काय बनवायचं की बाहेरून मागवू?”
“आता सांग, जेवण काय बनवायचं की बाहेरून मागवू?”
“हो चालेल,” अनघा म्हणाली.
“आजोबांचं जेवण आलंच असेल. मला हलकी खिचडी मागव. जरा मळमळ होतेय.”
“आजोबांचं जेवण आलंच असेल. मला हलकी खिचडी मागव. जरा मळमळ होतेय.”
“चालेल,” अनिकेत म्हणाला, तिच्याकडे काळजीने पाहत.
कसला त्रास होत आहे?
कसला त्रास होत आहे?
पोटात दुखतं आहे. झोपले की बर वाटेल, अनघा म्हणाली..
ठीक आहे, मी घेऊन येतो. अनिकेत म्हणाला.
चालेल, अनघा म्हणाली.
.....
आजोबा गार्डनमध्ये गेले होते. ते फिरत असतानाच त्यांना अनिकेत दिसला.
आजोबांच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद फुलला.
“अनिकेत दिसतोय म्हणजे अनघा पण आली असणार,” आजोबा मनातच म्हणाले.
ते लगेच अनघाला भेटायला निघाले.
मनात थोडी काळजी, पण त्याहून जास्त ओढ होती तिला भेटायची.…
आपली मुलगी घरी परत आलीय, ही भावना त्यांच्या पावलांना गती देत होती.
ते अनिकेतच्या घराजवळ गेले.
आजोबांनी दरवाजा वाजवला.
अनघाने दरवाजा उघडला… समोर आजोबांना पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.
मनात थोडी काळजी, पण त्याहून जास्त ओढ होती तिला भेटायची.…
आपली मुलगी घरी परत आलीय, ही भावना त्यांच्या पावलांना गती देत होती.
ते अनिकेतच्या घराजवळ गेले.
आजोबांनी दरवाजा वाजवला.
अनघाने दरवाजा उघडला… समोर आजोबांना पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.
“आजोबा…”
ती आपोआपच हसली.
ती आपोआपच हसली.
आजोबा आत आले.
“अनघा, कशी आहेस?” त्यांनी काळजीने विचारलं.
“अनघा, कशी आहेस?” त्यांनी काळजीने विचारलं.
“मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात?” अनघा प्रेमाने म्हणाली.
“मी पण मस्त आहे. तुझी खूप आठवण येत होती गं,” आजोबा हसत म्हणाले.
“आम्हालाही तुमची खूप आठवण येत होती. तिकडे खूप लोक होते… मोनिका तर तुम्हाला माहितीच आहे. अनिकेतच्या मामाची मुलगीसुद्धा आली होती,” अनघा सांगत होती.
“तुम्ही आलात म्हणजे बरं वाटलं. पण अनिकेतची आई आता बरी आहे ना? पाय ठीक झाला का?” आजोबांनी विचारलं.
“हो, आता बरं आहे. म्हणूनच आम्ही परत आलो,” अनघा म्हणाली.
“मग छानच झालं,” आजोबा समाधानाने म्हणाले.
तेवढ्यात अनिकेत घरी आला.
आजोबांना पाहताच त्याच्याही चेहऱ्यावर आनंद उमटला.
घरात पुन्हा एकदा आपुलकीचं, मायेचं वातावरण भरून राहिलं.
आजोबांना पाहताच त्याच्याही चेहऱ्यावर आनंद उमटला.
घरात पुन्हा एकदा आपुलकीचं, मायेचं वातावरण भरून राहिलं.
आजोबा अनिकेतकडे पाहत म्हणाले,
“अनिकेत, कसा आहेस? आता खूप काम असेल ना?”
“मी मस्त आहे आजोबा. तुम्ही कसे आहात?” अनिकेत म्हणाला.
“मी पण मस्त आहे,” आजोबा हसत म्हणाले.
“मी फ्रेश होऊन येतो,” असं म्हणत अनिकेत रूममध्ये गेला.
“अनघा, तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. ते घेऊन येतो,” असं म्हणत आजोबा त्यांच्या घरी गेले.
अनघा खूप दमली होती. ती सोफ्यावर बसली. तेवढ्यात अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला.
“अनघा, चल जेवण करून घेऊ,” अनिकेत म्हणाला.
अनघा उठली. ताटं घेऊन आली. दोघांनी शांतपणे जेवण करून घेतलं.
थोड्याच वेळात आजोबा सरप्राईज घेऊन अनघा आणि अनिकेतकडे आले.
“अनघा, हे तुझं सरप्राईज… घे,” आजोबा म्हणाले.
अनघाने ते घेतलं. उघडलं… आणि क्षणभर तिला काहीच बोलता आलं नाही. तिचे डोळे भरून आले.
“आजोबा… माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंत. मी लवकर जॉइन करेन,” अनघा भावुकपणे म्हणाली.
“तुला आवडेल म्हणूनच मी हे गिफ्ट तुझ्यासाठी ठरवलं,” आजोबा म्हणाले.
“आजोबा, तुम्ही कंपनीत जात नाही का?” अनिकेतने विचारलं.
“माझा पुतण्या आहे. त्याला मी CEO केलं आहे. तो सगळं बघतो. मला काही काळजी नाही. आता अनघा सगळं बघेल,” आजोबा आत्मविश्वासाने म्हणाले.
“मला जमेल का?” अनघा थोडी घाबरत म्हणाली.
“अनघा, तुला सगळं जमेल. शिकत शिकत सगळं येतं. कुणीच आधीपासून सगळं शिकून येत नाही. तुला काहीही प्रॉब्लेम आला तर मी आहेच. आणि रोनक, माझ्या भावाचा मुलगा, तो तुला सगळी मदत करेल. खूप चांगला मुलगा आहे. लहान वयात सगळं सांभाळतो, खूप मेहनती आहे,” आजोबा म्हणाले.
अनघा फक्त हलकंसं स्माईल केली.
“तुम्ही आता आराम करा. मी पण झोपायला जातो,” आजोबा म्हणाले.
“गुडनाईट,” असं म्हणत ते निघून गेले.
अनघा आणि अनिकेत एकमेकांसमोर बसून बोलत होते.
“आजोबांनी खरंच खूप छान गिफ्ट दिलंय,” अनघा म्हणाली. “माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे.”
“हो ना,” अनिकेत हसत म्हणाला, “त्यांना आधीपासूनच तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी इतकी मोठी जबाबदारी तुला दिली.”
“पण मला थोडी भीती वाटतेय,” अनघा शांतपणे म्हणाली. “इतकी मोठी कंपनी… मी कधी जॉईन करायचं तेही ठरवायचं आहे.”
“भीती वाटणं साहजिक आहे,” अनिकेत म्हणाला. “पण तू एकटी नाहीस. आजोबा आहेत, रोनक आहे, आणि मी पण आहे.”
अनघा हलकंसं हसली. “मला वाटतं, आठवडाभरात सगळं समजून घेऊन जॉईन करायला हरकत नाही.”
“मलाही तेच वाटतं,” अनिकेत म्हणाला. “आधी थोडं सेटल हो, मग आत्मविश्वासाने सुरुवात कर.”
“हो,” अनघा म्हणाली, “या वेळी मी स्वतःसाठी आणि आपल्या दोघांसाठी उभी राहणार आहे.”
अनिकेतने तिच्या हातावर हात ठेवला.
“आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे.”
“आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे.”
दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले… नव्या सुरुवातीचा विश्वास त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता.
......
अनघा आणि अनिकेत झोपून गेले होते.
अचानक अनघाला जाग आली. तिच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. ती पोट दाबत बसली.
तेवढ्यात तिचं लक्ष कपड्यांकडे गेलं…
कपड्यांवर रक्त लागलेलं पाहून ती एकदम घाबरली.
“हे काय झालं…?”
तिच्या अंगात थरकाप उडाला. काहीच सुचत नव्हतं.
तिच्या अंगात थरकाप उडाला. काहीच सुचत नव्हतं.
आता अनिकेतला उठवायलाच हवं…
असं ठरवून तिने हलक्या आवाजात हाक मारली.
असं ठरवून तिने हलक्या आवाजात हाक मारली.
“अनिकेत…”
अनिकेत लगेच जागा झाला.
“अनघा… काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस?”
तो डोळे चोळत, काळजीने विचारू लागला.
तो डोळे चोळत, काळजीने विचारू लागला.
“माझं… माझं खूप पोट दुखतंय,”
अनघा म्हणाली आणि थरथरत्या हाताने तिने त्याला तिचा ड्रेस दाखवला.
अनघा म्हणाली आणि थरथरत्या हाताने तिने त्याला तिचा ड्रेस दाखवला.
क्षणातच अनिकेत पूर्ण शुद्धीत आला.
त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती.
त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती.
“चल, आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ,”
तो ठाम आवाजात म्हणाला.
“तू पटकन ड्रेस चेंज कर.”
तो ठाम आवाजात म्हणाला.
“तू पटकन ड्रेस चेंज कर.”
अनघाने घाईघाईने ड्रेस बदलला.
अनिकेतने तिला आधार देत जवळ घेतलं.
अनिकेतने तिला आधार देत जवळ घेतलं.
दोघेही एक शब्द न बोलता घराबाहेर पडले…
आणि थेट हॉस्पिटलकडे निघाले.
आणि थेट हॉस्पिटलकडे निघाले.
रात्रीची शांतता त्यांच्या मनातील भीती अजूनच वाढवत होती
अनघा घाईघाईने ड्रेस चेंज करून बाहेर आली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. अनिकेतने तिला आधार देत जवळ घेतलं.
“घाबरू नकोस अनघा… मी आहे ना,” तो शांत आवाजात म्हणाला, जरी त्याच्या मनातही भीती होती.
दोघे लगेच हॉस्पिटलकडे निघाले. गाडीमध्ये संपूर्ण वेळ अनिकेत अनघाचा हात घट्ट धरून होता. अनघाला पोटात कळा येत होत्या, वेदना सहन करणं कठीण होत होतं.
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच अनिकेतने स्ट्रेचर मागितला. नर्स लगेच धावून आली.
“काय प्रॉब्लेम आहे?” तिने विचारलं.
“पोटात खूप दुखतंय… आणि ब्लीडिंग सुरू झालंय,” अनिकेत काळजीने म्हणाला.
अनघाला ताबडतोब तपासणीसाठी आत नेण्यात आलं. अनिकेत बाहेर बसून तणावात वाट पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर वेगवेगळे विचार फिरत होते.
थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले.
“तुम्ही घाबरू नका,” डॉक्टर म्हणाले. “सध्या तिला निरीक्षणाखाली ठेवलं आहे. काही तपासण्या कराव्या लागतील. वेळेत आलात, हे चांगलं झालं.”
अनिकेतने सुटकेचा श्वास घेतला, पण काळजी अजूनही कमी झाली नव्हती.
“मी तिला भेटू शकतो का?” त्याने विचारलं.
“हो, पण थोडा वेळ द्या,” डॉक्टर म्हणाले.
अनिकेत पुन्हा बसला…
मनात एकच प्रार्थना, अनघा ठीक असो… बाकी सगळं नंतर पाहू.
मनात एकच प्रार्थना, अनघा ठीक असो… बाकी सगळं नंतर पाहू.
क्रमश
अनघाला काय झाले असेल? तिची आई तिचे करायला. येईल का? मोनिका. आणी तृप्ती अनघाला घेतायला येतील का?..
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा