Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 34

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल

तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं भाग - 34


आजोबा हळूच अनघाच्या बेडजवळ आले.
तिचा चेहरा फिकट झाला होता, डोळे सुजलेले होते.
पण तरीही तिने आजोबांना पाहताच बसायचा प्रयत्न केला.


अगं… बसू नकोस.
तू झोपूनच बोल… मी इथेच आहे. आजोबा (मायेने) म्हणाले.

अनघाच्या डोळ्यांत पाणी तरळलं.


आजोबा…
मी तुम्हाला सांगू शकले नाही… मी प्रेग्नेंट होते… मलाच समजले नाही. अनघा म्हणाली.

आजोबांचे डोळे भरून आले.
पण आवाज संयमित होता.

माहिती आहे बाळा…
डॉक्टरांनी सांगितलं मला. आजोबा म्हणाले

अनघा रडू लागली.


माझ्यामुळे सगळं बिघडलं… मी काम थांबवलं नाही…
मला समजायला हवं होतं… अनघा म्हणाली

आजोबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.


नाही अनघा. हे ऐक आणि लक्षात ठेव
आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही. आईपण आधीच तुझ्यात होतं. आजोबा म्हणाले.

अनघाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.


पण माझं बाळ…? अनघा म्हणाली

ते बाळ…
थोडा वेळ आपल्याकडे आलं… आणि परत गेलं.
काही आत्मा आपल्याला आयुष्यभरासाठी नसतात…
ते आपल्याला मजबूत करायला येतात. आजोबा म्हणाले.

अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती शांत झाली.


मला वाटतं… मी अपयशी ठरले… अनघा म्हणाली.

आजोबा थोडे पुढे झुकले.


अपयशी? जी बाई इतकं सहन करूनही उभी राहते, ती कधीच अपयशी नसते. आजोबा म्हणाले

थोडा थांबून ते पुढे म्हणाले

तुला माहितेय का अनघा, खऱ्या आयुष्यातली ताकद ही हळूहळू सावरायची असते. आज नाही जमलं तरी चालेल. पण स्वतःला दोष देऊ नकोस. आजोबा म्हणाले

अनघा रडत म्हणाली


मला भीती वाटते आजोबा… पुन्हा कधी आई होईन का? अनघा म्हणाली. अनघा म्हणाली.

आजोबांनी तिचा हात हातात घेतला.

भीती येईल… पण त्यापेक्षा मोठा विश्वास येईल. आणि तो विश्वास तू मिळवशील कारण तू कमकुवत नाहीस. आजोबा म्हणाले.

ते हळूच हसले.


आधी बरी हो. शरीर आणि मन दोन्ही चांगले झाले पाहिजे. बाकी सगळं नंतर. आजोबा म्हणाले.

अनघाने मान हलवली.


तुम्ही आहात…
म्हणून मला थोडं हलकं वाटतंय. अनघा (हळू आवाजात) म्हणाली.

आजोबा तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले

मी आहे…
आणि कायम राहीन. आजोबा म्हणाले

अनघाचे डोळे मिटले.
या वेदनेतही आजोबांची माया तिच्यासाठी आधाराचं छत्र बनली होती.


---

आजोबांचा फोन आला होता.
आरती तिथेच होत्या. शुभमचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं होतं. कॉल संपताच त्या शुभमजवळ आल्या.

शुभम… कोणाचा कॉल होता?
तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोयस? आरती म्हणाल्या

शुभम काही क्षण शांत राहिला. डोळे खाली घातले.


तुला खरंच ऐकायचं आहे का आई?
तुला राग नाही येणार ना? शुभम म्हणाला.


बोल… काय झालं आहे? आरती म्हणाल्या.

शुभमचा आवाज थरथरला.


अनघा ताईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे… शुभम म्हणाला

हे ऐकताच आरतीच्या डोळ्यांत पाणी आलं.


माझ्या अनघाला काय झालं रे? आरती म्हणाल्या.

शुभम थोडा गोंधळला.


आई, तू हे असं का बोलतेस?
तुला तर ताईचा राग येत होता ना… पळून जाऊन लग्न केलं म्हणून. शुभम म्हणाला

आरतीने डोळे पुसले.


हो, राग होता…
पण म्हणून तिला असा त्रास व्हावा का? तिला नेमकं काय झालं आहे? तुला कुणाचा कॉल आला होता ना… त्यांना विचार. आरती म्हणाल्या.


ताईच्या घराजवळ आजोबा राहतात. त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनीच कॉल करून सांगितलं… शुभम म्हणाला.


मग तू त्यांना लगेच कॉल कर. अनघाला काय झालं आहे ते विचार. आरती म्हणाल्या.

शुभमने मोबाईल हातात घेतला आणि आजोबांना कॉल केला.

आजोबा घरी बसले होते. फोन वाजताच त्यांनी लगेच उचलला.


हॅलो शुभम… आजोबा म्हणाले


हॅलो आजोबा… शुभम म्हणाला


स्पीकरवर टाक. आरती म्हणाली

शुभमने फोन स्पीकरवर ठेवला.


आजोबा, ताई आता कशी आहे?
मी हॉस्पिटलमध्ये जातो आहे… शुभम म्हणाला

आजोबांचा आवाज गंभीर झाला.


अनघाला आत्ता तिच्या आईची खूप गरज आहे.
तू तुझ्या आईशी बोलून बघ.
ती तयार असेल तर तिला हॉस्पिटलला घेऊन ये.

अनिकेतच्या आईचा पाय अजून बरा नाही आहे…
आणि शुभम…
तू मामा होणार होतास… पण बाळ पोटातच वारलं आहे. आजोबा म्हणाले

आरतीला धक्का बसला.

अनघाच्या पोटात खूप दुखत होतं. अनिकेतने तिला रात्रीच ऍडमिट केलं. मी आताच घरी आलो आहे. आजोबा म्हणाले.

शुभमला काही क्षण काहीच बोलता आलं नाही.
तरी सावरत तो म्हणाला


आजोबा, हॉस्पिटलचं नाव सांगा…
मी लगेच जातो. शुभम म्हणाला.

ये…
आणि आईलाही घेऊन ये, जमलं तर. आजोबा म्हणाले

कॉल कट झाला.

आरती खाली बसल्या. त्यांच्या तोंडून सुस्कारा फुटला.


माझी अनघा आई होणार होती… ती तिकडे गेली आणि तेव्हाच काहीतरी बिनसलं. ललिता बाई फार वाईट आहेत…
अनघाकडून खूप काम करून घेतलं असणार… माझं काळीज सांगतंय… आरती रडत म्हणाल्या.


आई, तुला कसं माहीत ताई तिकडे आली होती? शुभम म्हणाला


तूच सांगितलं होतंस… आणि मी तिला बघायला गेले होते. आरती म्हणाल्या

शुभम काहीच बोलला नाही.
तो हॉस्पिटलला जायची तयारी करू लागला.


मीही हॉस्पिटलमध्ये येते. आरती म्हणाल्या.

शुभम थांबून तिच्याकडे पाहू लागला.


मी तिची आई आहे.
माझ्या अनघाला आत्ता माझी गरज आहे. आरती (ठाम आवाजात) म्हणाल्या.

शुभमने मान हलवली.


चल… लवकर निघूया. शुभम म्हणाला

दोघंही हॉस्पिटलच्या दिशेने निघाले… मनात एकच भीती आणि एकच प्रार्थना अनघा लवकर बरी व्हावी.


---


आरती आणि शुभम हॉस्पिटलकडे निघाले होते.
रस्त्यात गाडी शांत होती… पण दोघांच्या मनात वादळ उठलेलं होतं.

आरती खिडकीबाहेर पाहत होती.
डोळ्यांतून अश्रू निःशब्द वाहत होते.


शुभम… माझ्या अनघाने किती स्वप्नं पाहिली असतील रे…
आई होण्याची… घर, संसार, बाळ… आरती (हळू आवाजात) म्हणाल्या.

शुभम काही बोलू शकला नाही.
त्याने गाडी थोडी वेगात चालवली.


आई, ताई मजबूत आहे… ती हे सगळं झेलू शकेल…
पण आपण तिच्यासोबत उभं राहायला हवं. शुभम म्हणाला

आरतीने मान हलवली.


मी तिच्यावर राग धरला… तिला समजून घेतलं नाही…
आज वाटतंय, तेव्हा तिला मिठीत घेतलं असतं तर… आरती म्हणाल्या

हॉस्पिटल दिसू लागलं.

आरतीचं काळीज धडधडू लागलं.

गाडी थांबली.
दोघं झपाट्याने आत गेले.

रिसेप्शनवर शुभमने विचारलं.


अनघा अनिकेत… कुठल्या वॉर्डमध्ये आहेत? शुभम म्हणाला

नाव तपासून नर्स म्हणाली


ICU नाही… पण ऑब्झर्वेशन वॉर्ड आहे. ती आता झोपेत आहे. नर्स म्हणाली.

हे ऐकताच आरतीला थोडा धीर आला.

दोघं वॉर्डकडे निघाले.

वॉर्डच्या दारात अनिकेत बसलेला होता.
डोळे लाल झाले होते…
चेहऱ्यावर थकवा आणि अपराधीपणा स्पष्ट दिसत होता.

आरती थांबली.
क्षणभर तिच्या पायात ताकदच राहिली नाही.


अनिकेत… आरती (थरथरत) म्हणाल्या..
.

अनिकेत उभा राहिला.
त्याने काही बोलायचा प्रयत्न केला… पण शब्दच फुटले नाहीत.

आरती पुढे गेली.

माझ्या मुलीला कसं आहे? आरती म्हणाल्या

अनिकेतने डोळे पुसले.


आत्ता झोपली आहे… डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंय…
पण… (थांबतो) बाळ… वाचलं नाही. अनिकेत म्हणाल्या.

आरतीचा हात थरथरला. शुभमने तिला सावरलं.

आरतीने डोळे मिटले. हात जोडले.


अनघा बाकी सगळं सहन करीन… आरती म्हणाल्या

त्या क्षणी अनिकेतचं मन पूर्णपणे तुटलं.


मी दोषी आहे… तिच्याकडून खूप काम झालं…
मला लक्ष द्यायला हवं होतं… अनिकेत म्हणाला.


आत्ता दोष नको अनिकेत… आत्ता माझ्या अनघाला आपली गरज आहे. आरती (ठामपणे) म्हणाल्या.

शुभमने खिडकीतून आत डोकावलं.

अनघा बेडवर झोपलेली होती.
चेहरा फिकट… हातावर सलाईन…
पण श्वास सुरू होता.

ताई... शुभम ने हाक मारली.

आरती आत जाण्यासाठी पुढे सरकली.

आज पहिल्यांदाच… आई आणि मुलगी पुन्हा भेटणार होत्या
दुखऱ्या शांततेत, पण प्रेमाच्या आधाराने.


---



क्रमश

. आरती आणी अनघाचे काय बोलणे होते ..

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all