दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 19
अजब गजब लग्न भाग - 19
राज भारतात आला होता.
एअरपोर्टवर त्याच्यासाठी आजोबांनी स्वतः गाडी पाठवली होती. राजने आपलं सगळं सामान गाडीत ठेवलं
आणि शांतपणे मागच्या सीटवर बसला.
आणि शांतपणे मागच्या सीटवर बसला.
गाडी हळूहळू घराच्या दिशेने निघाली…
काचेतून बाहेर पाहत असताना
त्याच्या मनात अनेक विचार गर्दी करत होते
आजोबा, घर, आणि… एक अनोळखी नातं.
त्याच्या मनात अनेक विचार गर्दी करत होते
आजोबा, घर, आणि… एक अनोळखी नातं.
घरी मात्र वेगळंच चित्र होतं.
आजोबा खूप खुश होते. त्यांचा राज परत येत होता
हेच त्यांच्या आनंदाचं कारण होतं.
हेच त्यांच्या आनंदाचं कारण होतं.
राजची रूम त्यांनी स्वतः पाहून साफ करून घेतली होती.
पडदे बदलले होते, बेड नीट मांडलेला होता, राजला आवडणाऱ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्या होत्या.
पडदे बदलले होते, बेड नीट मांडलेला होता, राजला आवडणाऱ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्या होत्या.
घरात एक वेगळीच चहल-पहल होती.
आजोबा दर पाच मिनिटांनी घड्याळाकडे पाहत होते.
कधी दरवाज्याकडे, कधी खिडकीकडे पाहत होते.
कधी दरवाज्याकडे, कधी खिडकीकडे पाहत होते.
“आता आला असेल…” “गाडी निघाली असेल…”
राज येण्याची वाट ते आतुरतेने पाहत होते.
आज फक्त नातू परत येणार नव्हता… तर घरात पुन्हा एकदा
आपुलकी, संवाद आणि थोडीशी आशाही परत येणार होती…
आपुलकी, संवाद आणि थोडीशी आशाही परत येणार होती…
---
गाडी घरासमोर थांबली.
राजने दरवाजा उघडला आणि खाली उतरला.
समोर तेच घर होतं जिथे तो मोठा झाला, जिथे त्याने स्वप्नं पाहिली, आणि जिथून तो कामासाठी दुर निघून गेला होता.
तो काही क्षण तिथेच थांबला. घराकडे पाहत राहिला.
हळूहळू
त्याने घरात पाऊल टाकलं…
त्याने घरात पाऊल टाकलं…
दाराच्या चौकटीत पाऊल ठेवताच
आत कुठेतरी ओळखीचा सुगंध दरवळला. घर अजूनही तसंच होतं,
पण तरीही काहीतरी बदललेलं वाटत होतं.
आत कुठेतरी ओळखीचा सुगंध दरवळला. घर अजूनही तसंच होतं,
पण तरीही काहीतरी बदललेलं वाटत होतं.
“राज…”
आजोबांचा आवाज कापरा झाला.
आजोबांचा आवाज कापरा झाला.
राजने डोळे वर केले.
समोर आजोबा उभे होते
डोळ्यांत आनंद, ओठांवर थरथरणारी स्माईल,
आणि चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते.
डोळ्यांत आनंद, ओठांवर थरथरणारी स्माईल,
आणि चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते.
“आलास?”
आजोबा पुढे आले.
आजोबा पुढे आले.
राज काही न बोलता
पुढे गेला आणि आजोबांच्या पायांना हात लावले.
पुढे गेला आणि आजोबांच्या पायांना हात लावले.
आजोबांनी राजला आशीर्वाद दिला. “सुखरूप आलास ना?”
आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
“हो आजोबा…”
राजचा आवाज थोडासा भरून आला.
राजचा आवाज थोडासा भरून आला.
त्या एका क्षणात घर पुन्हा घर झालं होतं.
राज आजूबाजूला पाहत होता सगळं नीटनेटके,
त्याच्या आवडीचं, जणू तो कधी गेलाच नव्हता.
त्याच्या आवडीचं, जणू तो कधी गेलाच नव्हता.
“तुझी रूम तयार आहे,” आजोबा म्हणाले,
“फ्रेश हो… मग बसूया निवांत.”
“फ्रेश हो… मग बसूया निवांत.”
राजने मान हलवली.
पण पाय पुढे जात असताना मन मात्र मागेच अडकलं होतं
त्या नात्यात, ज्याचं अस्तित्व
आता त्याला जाणवायला लागलं होतं…
त्या नात्यात, ज्याचं अस्तित्व
आता त्याला जाणवायला लागलं होतं…
घरात पाऊल टाकलं होतं राजने,
पण आयुष्यात खऱ्या अर्थाने नवीन अध्याय
आता सुरू होणार होता…
पण आयुष्यात खऱ्या अर्थाने नवीन अध्याय
आता सुरू होणार होता…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा