तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 35
आरती अनघाच्या बेडजवळ जाऊन उभी राहिली. तिला पाहताच अनघाचे डोळे भरून आले.
आई… तू मला बघायला आलीस…? अनघा (थरथरत) म्हणाल्या.
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
आरतीने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात हातात घेतला.
तुला बघायला येणार नाही असं कसं होईल ग…
तुझी आई आहे ना मी… जेव्हा समजले, मी शुभमला घेऊन आली. आरती (डोळे पुसत) म्हणाल्या.
अनघा रडू लागली.
त्या रडण्यात वेदना होत्या, अपराधीपणा होता,
आणि आईच्या कुशीत मिळालेला आधारही होता.
त्या रडण्यात वेदना होत्या, अपराधीपणा होता,
आणि आईच्या कुशीत मिळालेला आधारही होता.
आई… माझं बाळ…
मी काहीच करू शकले नाही… अनघा म्हणाली.
आरतीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
ग… थांब… आत्ता बोलू नकोस… तू आधी सावर… आरती म्हणाल्या
अनघाने डोळे मिटले.
तुला राग आहे ना माझ्यावर अजूनही…? मी अनिकेत शिवाय कोणाचा विचार नाही केला. अनघा (हळू आवाजात) म्हणाल्या.
आरतीचे डोळे पुन्हा भरून आले.
राग… तो क्षणाचा होता… पण आईचं प्रेम कधी संपत नाही ग… आरती (ठाम पण मायेने) म्हणाल्या.
तिने अनघाच्या कपाळावर हलकेच चुंबन दिले.
आज तू फक्त माझी मुलगी आहेस… काही चुकीचं, काही बरोबर नाही… आरती म्हणाली.
अनघाने आरतीचा हात घट्ट धरला.
आई… मला खूप भीती वाटते… मला बाळ होईल ना. अनघा म्हणाली.
मी आहे ना… कटी नाहीस तू, आई आहे तुझ्याजवळ… आरती म्हणाल्या.
अनघाच्या अश्रूंना आता थोडी शांतता मिळत होती.
आईच्या स्पर्शात तिला पुन्हा श्वास घेण्याची ताकद मिळत होती.
आईच्या स्पर्शात तिला पुन्हा श्वास घेण्याची ताकद मिळत होती.
बाहेर उभा असलेला अनिकेत हे सगळं पाहत होता.
त्याच्या डोळ्यांतही पाणी तरळत होतं.
त्याच्या डोळ्यांतही पाणी तरळत होतं.
या वेदनेत…
आईचं प्रेमच तिच्यासाठी औषध बनलं होतं.
आईचं प्रेमच तिच्यासाठी औषध बनलं होतं.
---
शुभम हळूच रूममध्ये आला. अनघा आईशी बोलत होती.
शुभमला पाहताच तिचे डोळे पुन्हा भरून आले.
शुभमला पाहताच तिचे डोळे पुन्हा भरून आले.
शुभम… तू आलास…? अनघा (हळू आवाजात) म्हणाला.
शुभम जवळ आला. क्षणभर काहीच बोलू शकला नाही.
ताई…
मी… तुला असं पाहीन असं वाटलंच नव्हतं… शुभम (कंठ दाटून) म्हणाला.
अनघाने नजर खाली घेतली.
माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला ना…? अनघा म्हणाली.
नाही ताई…
असं काही बोलू नकोस.
तुला त्रास झाला आहे… तेच महत्त्वाचं आहे. शुभम (ताबडतोब) म्हणाला
अनघाच्या डोळ्यांत अश्रू आले.
मी आई होणार होते शुभम…
पण… माझं बाळ आता नाही राहिले … अनघा म्हणाली.
ती वाक्य पूर्ण करू शकली नाही.
शुभमने तिचा हात घट्ट धरला.
ताई…
बाळ गेलं म्हणजे सगळं संपलं असं नाही.
देव पुन्हा संधी देतो… पण आधी तू ठिक होणं गरजेचं आहे. शुभम म्हणाला.
मला खूप भीती वाटते… पोटात अजून दुखतंय…
आणि मन तर… पूर्ण तुटलंय… अनघा (थरथरत) म्हणाला.
मी आहे ना ताई… आता एकटी नाहीस तू.
आई आहे… मी आहे… सगळे आहेत. शुभम (डोळे पुसत) म्हणाला
अनघाने त्याच्याकडे पाहिले.
आईला सांगशील ना… मी तिला दुखावलं…
पण आज मला तिचीच गरज आहे… अनघा म्हणाला.
तुला काही सांगायची गरज नाही. आईला सगळं कळलंय.
ती आई आहे ताई… ती समजून घेते. शुभम (ठामपणे) म्हणाला .
अनघाने डोळे मिटले.
थँक यू शुभम… तू माझा चांगला भाऊ आहेस…
आज पुन्हा जाणवलं… अनघा (हळूच) म्हणाला.
शुभमचे डोळे भरून आले.
आणि तू माझी ताई आहेस… कधीही विसरू नकोस. शुभम म्हणाला
आई बाहेरून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते…
पण चेहऱ्यावर समाधान होतं.
पण चेहऱ्यावर समाधान होतं.
या दुःखाच्या क्षणी कुटुंब पुन्हा एकत्र येत होतं.
---
अनघा झोपलेली होती.
रूमच्या बाहेर आरती आणि अनिकेत शांतपणे उभे होते.
रूमच्या बाहेर आरती आणि अनिकेत शांतपणे उभे होते.
अनिकेत…
आता अनघाला थोडे दिवस मी माझ्या घरी घेऊन जाईन.
तिथे तिचा नीट आराम होईल… मनही थोडं शांत होईल.
तुला यायचं असेल तर… तू पण येऊ शकतोस. आरती (हळू आवाजात) म्हणाला.
अनिकेतने डोळे खाली घेतले.
क्षणभर शांतता पसरली.
क्षणभर शांतता पसरली.
मला माहीत आहे आई … तिच्यासाठी तेच योग्य आहे. अनिकेत (दडलेल्या वेदनेने) म्हणाला.
तो थोडा थांबला.
मी घरी जाईन…
आईची तब्येत अजून नीट नाही आहे. तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल. अनिकेत म्हणाला.
आरतीने त्याच्याकडे पाहिलं.
मला तुझं मन समजतं रे… पण तू स्वतःला दोष देऊ नकोस.
हे कुणाच्या हातात नव्हतं. आरती म्हणाल्या.
अनिकेतचे डोळे भरून आले.
आई…
मी तिचं नीट काळजी घेऊ शकलो नाही असं वाटतं…
ती पळून येऊन माझ्यावर विश्वास ठेवला…
आणि…
मी तिचं नीट काळजी घेऊ शकलो नाही असं वाटतं…
ती पळून येऊन माझ्यावर विश्वास ठेवला…
आणि…
तो पुढे बोलू शकला नाही. अनिकेत (दडलेल्या वेदनेने) म्हणाला
तू खूप चांगला नवरा आहेस अनिकेत.
आज जे झालं… ते नशिबाचं होतं.
अनघा तुझ्यावर रागावलेली नाही… ती तुझ्यावर प्रेम करते.
आरती (त्याच्या खांद्यावर हात ठेवत) म्हणाल्या.
आज जे झालं… ते नशिबाचं होतं.
अनघा तुझ्यावर रागावलेली नाही… ती तुझ्यावर प्रेम करते.
आरती (त्याच्या खांद्यावर हात ठेवत) म्हणाल्या.
अनिकेतने मान हलवली.
मी रोज येऊन तिला भेटेन. फोनवर बोलत राहीन.
ती एकटी वाटायला नको. अनिकेत म्हणाला.
हेच मला ऐकायचं होतं.
अनघाला आता फक्त प्रेम, आधार आणि शांतता हवी आहे. आरती (डोळे पुसत) म्हणाल्या.
दोघेही आत झोपलेल्या अनघाकडे पाहू लागले.
दुःख असलं तरी
नात्यांमध्ये समजूत आणि माणुसकी होती.
दुःख असलं तरी
नात्यांमध्ये समजूत आणि माणुसकी होती.
---
रात्रीची वेळ होती.
हॉस्पिटलच्या रूममध्ये हलकासा अंधार पसरला होता.
बाहेर मशीनचा मंद आवाज…
आणि आत दोन मनं, जी खूप काही सहन करून थकली होती.
हॉस्पिटलच्या रूममध्ये हलकासा अंधार पसरला होता.
बाहेर मशीनचा मंद आवाज…
आणि आत दोन मनं, जी खूप काही सहन करून थकली होती.
अनघा झोपण्याचा प्रयत्न करत होती…
पण डोळे मिटले सगळे पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं.
पण डोळे मिटले सगळे पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं.
आरती खुर्चीवर बसून तिच्याकडेच पाहत होत्या.
त्या हळूच उठून अनघाच्या जवळ आल्या.
त्या हळूच उठून अनघाच्या जवळ आल्या.
अनघा…
झोप येत नाहीये का ग? आरती (मऊ आवाजात) म्हणाला
अनघाने मान हलवली.
आई…
खूप रिकामं वाटतंय.
इथे… (हात पोटावर ठेवत) काहीतरी होतं… आता काहीच नाही. अनघा (दमलेल्या आवाजात) म्हणाला.
इतकं बोलताच तिचा बांध फुटला.
डोळ्यांतून अश्रू ओघळले.
डोळ्यांतून अश्रू ओघळले.
आरतीने लगेच तिला जवळ घेतलं. मुलीचं डोकं छातीशी धरलं.
रड…
मन मोकळं कर.
आईसमोर रडायला कधीही लाजायची गरज नसते. आरती म्हणाली.
आई…
मला काहीच कळालं नाही. मी इतकी कामं केली… कुणाला काही सांगितलंच नाही… माझ्यामुळेच माझं बाळ… अनघा रडत म्हणाली
ती पुढे काही बोलू शकली नाही.
नको अनघा. असं स्वतःला दोष देऊ नकोस.
हे तुझ्या हातात नव्हतं. आरती (थोडी कणखर पण प्रेमळ) म्हणाल्या
थोडा वेळ शांतता.
आई…
तू माझ्यावर रागावली होतीस ना? अनघा (हळू आवाजात) म्हणाली
आरतीचा श्वास थोडा थांबला.
हो…
राग होता. पळून लग्न केलंस म्हणून…
आपण बोललो नाही म्हणून… अनघा (हळू आवाजात) म्हणाली.
राग होता. पळून लग्न केलंस म्हणून…
आपण बोललो नाही म्हणून… अनघा (हळू आवाजात) म्हणाली.
पण लगेच तिचा आवाज भरून आला.
पण आज…
माझी मुलगी बेडवर वेदनेत पडलेली पाहिली तेव्हा सगळा राग वितळून गेला. आरती (ओल्या डोळ्यांनी) म्हणाल्या.
मला वाटलं होतं तू मला बघायलाच येणार नाहीस. अनघा म्हणाली.
आई असते रे ती. मुलीचं दुःख दूर असतं का? आरती म्हणाल्या.
अनघाने आईचा पदर घट्ट धरला.
आई… मी पुन्हा कधी आई होईन का? अनघा म्हणाली.
हा प्रश्न ऐकून आरतीने तिचं डोकं हलकेच कुरवाळलं.
नक्की होशील. आज नाही तर उद्या…
पण होशील. देव इतका निर्दयी नसतो. आरती म्हणाल्या.
अनिकेत खूप ताणात आहे. तो काही बोलत नाही…
पण मी ओळखते त्याला. अनघा म्हणाली.
तो चांगला मुलगा आहे. तुझ्यावर खरंच प्रेम करतो.
आता तू सावरलीस की तो आपोआप सावरतो. आरती म्हणाल्या.
थोड्या वेळाने अनघाचा श्वास नियमित झाला.
डोळे मिटले.
डोळे मिटले.
आरती तिथेच बसून राहिल्या.
मुलीच्या कपाळावरून हात फिरवत.
मुलीच्या कपाळावरून हात फिरवत.
आरती (मनात):
तुझं दुःख आता मी वाटून घेणार…
आई म्हणून हेच माझं काम आहे.
तुझं दुःख आता मी वाटून घेणार…
आई म्हणून हेच माझं काम आहे.
रात्रीच्या शांततेत,आईच्या कुशीत
अनघा शेवटी झोपली…
अनघा शेवटी झोपली…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा