Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 36

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 36



अनिकेत घरी गेला होता. आजोबा त्यांच्या जवळ बसले होते.

अनिकेत अनघाची आई तिच्यासोबत चांगली बोलली ना, आजोबा काळजीने म्हणाले.

हो आजोबा खूप छान बोलली. काळजी पण घेत आहे, अनिकेत म्हणाला.

चांगले आहे. तू आता हॉस्पिटलमध्ये जात आहे का, आजोबा म्हणाले..

हो, तिला खायला काही तरी घेऊन जातो, अनिकेत म्हणाला..

मी पण येईल, तू तुझ्या घरी सांगितले का, आजोबा म्हणाले..

काय सांगू, तिथे गेलो म्हणून हे सगळे झाले, अनिकेतचे डोळे भरून आले होते.

आजोबा उठले. अनिकेत जवळ गेले. अनिकेतला मिठी मारली.

अनिकेत, आता जे झाले ते झाले. तू असा रडशील, अनघाला कोण बघेल, तिच्यासाठी तुला स्ट्रॉंग व्हावे लागेल, आजोबा म्हणाले.

हो आजोबा. तिच्यासाठी मी स्ट्रॉंग होईल, अनिकेत म्हणाला.

चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, आजोबा म्हणाले..

दोघे पण हॉस्पिटलमध्ये गेले.

......

संजय बाहेर गेले होते. आताच घरी आले. त्यांना आरती दिसल्या नव्हत्या.

शुभम घरात होता.

शुभम आई कुठे गेली, संजय म्हणाले.

आई हॉस्पिटलमध्ये गेली आहे, शुभम म्हणाला.

काय! तिला काय झाले, संजय काळजीने म्हंटले.

आईला काही नाही झाले. अनघा ताईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे, शुभम म्हणाला..

अनघाला काय झाले, संजय म्हणाले.

शुभम संजयला सगळे सांगतो.

माझी अनघा, किती सहन करणार आहे. मला पण हॉस्पिटलमध्ये जायचे आहे, संजय म्हणाले..

मी पण जात होतो. तुम्ही पण माझ्यासोबत चला, शुभम म्हणाला.

दोघे पण हॉस्पिटलमध्ये गेले.

अनिकेत आणि आजोबा, संजय आणि शुभम हॉस्पिटलमध्ये पोहचले.


---

संजय हॉस्पिटलमध्ये येताच थेट अनघाच्या बेडजवळ गेले.
अनघाला पाहताच त्यांच्या डोळ्यांत पाणी आले,

अनघा… बाळा… कशी आहेस तू आता? खूप त्रास झाला असेल ना, आजोबा म्हणाले.

अनघाने त्यांच्याकडे पाहिले, तिचे डोळे भरून आले,

मी ठीक आहे आजोबा… थोडं दुखत आहे, पण आता बरं वाटतंय, अनघा म्हणाली.

देवाने खूप परीक्षा घेतली गं तुझी, पण तू खूप धीराने सगळं सहन केलंस, आजोबा म्हणाले.

माझ्या नशिबात हेच होतं कदाचित, पण अनिकेत माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी सावरते आहे, अनघा म्हणाली.

तू एकटी नाहीस अनघा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, आजोबा म्हणाले.

आजोबा… माझं बाळ गेलं, पण मला अजूनही वाटतं ते कुठेतरी आहे, अनघा रडत म्हणाली.

आजोबांनी तिचा हात हातात घेतला, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो, तू मजबूत आहेस, पुन्हा उभी राहशील, आजोबा म्हणाले.

तुम्ही माझ्या जवळ आहात, एवढंच मला पुरेसं आहे, अनघा म्हणाली.

अनघा… आता फक्त आराम कर, स्वतःची काळजी घे, पुढचं सगळं आम्ही बघू, आजोबा म्हणाले.


---

संजय अनघा सोबत बोलायला लागले.

अनघा… माझ्या बाळा… कशी आहेस तू आता? संजय काळजीने म्हणाले.

अनघाने वडिलांकडे पाहिले, तिचे डोळे भरून आले, अनघा म्हणाली.

बाबा… खूप दुखत होतं… पण आता थोडं बरं वाटत आहे, अनघा म्हणाली.

संजय तिच्या जवळ बसले आणि तिचा हात हातात घेतला.

मी तुझ्या जवळ नसताना तुला एवढा त्रास झाला, मला माफ कर बाळा, संजय भरलेल्या आवाजात म्हणाले.

नाही बाबा… तुम्ही माझ्यासाठी नेहमीच चांगलंच केलं आहे, अनघा म्हणाली.

तू आई होणार होतीस… आणि असं सगळं घडलं, देव का रे एवढी कठोर परीक्षा घेतो, संजय म्हणाले.

माझ्या नशिबात हेच होतं बहुतेक, पण अनिकेत माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी टिकून आहे, अनघा म्हणाली.

अनिकेत चांगला मुलगा आहे, तो तुझी खूप काळजी घेतो, मला त्याचं समाधान आहे, संजय म्हणाले.

बाबा… मला पुन्हा सगळं नॉर्मल होईल ना? मी घाबरले आहे, अनघा म्हणाली.

हो बाळा… तू मजबूत आहेस, वेळ लागेल पण तू नक्की सावरशील, बाबा तुझ्या पाठीशी आहे, संजय म्हणाले.

तुम्ही जवळ आहात, हेच माझ्यासाठी मोठं बळ आहे, अनघा रडत म्हणाली.

संजयने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, आता आराम कर, बाकी सगळं आम्ही बघतो, संजय म्हणाले.


---


आरती अनघाच्या जवळ बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला, आरती म्हणाल्या.

अनघा बाळा, आता खूप झालं… हॉस्पिटलमध्ये पुरेसा आराम झाला आहे, आता घरी चल, आरती म्हणाल्या.

हो आई… पण मला थोडी भीती वाटते, अनघा हळूच म्हणाली.

भीती नको बाळा, आपण सगळे तुझ्यासोबत आहोत, घरी गेलीस की मन पण शांत होईल, संजय म्हणाले.

आई… बाबा… मी तुम्हाला खूप त्रास दिला ना? अनघा रडत म्हणाली.

नाही गं वेडे, मुलीचा त्रास म्हणजे आई-बाबांचा त्रास नसतो, तीच आमची जबाबदारी असते, आरती म्हणाल्या.

तू आता काहीच विचार करू नकोस, फक्त स्वतःचा आराम बघ, संजय म्हणाले.

घरी तुझ्यासाठी सगळं नीट बघू, वेळेवर औषधं, खाणं, झोप… सगळं, आरती म्हणाल्या.

आई… मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे, खूप थकल्यासारखं वाटतंय, अनघा म्हणाली.

चल मग, आजपासून काही दिवस फक्त आराम… बाकी सगळं आम्ही बघू, आरती प्रेमाने म्हणाल्या.

अनघाने आई-बाबांकडे पाहिलं, डोळ्यात अश्रू होते पण मनात थोडं समाधान होतं, अनघा मनात म्हणाली.


---


अनिकेत बाहेर उभा होता. चेहऱ्यावर थकवा आणि काळजी दोन्ही स्पष्ट दिसत होती.
आरती आणि संजय त्याच्याजवळ आले.

आरती म्हणाल्या,
अनिकेत… काळजी करू नकोस रे. अनघा आता बरी आहे. तिला थोडा मानसिक आधार हवा आहे, बाकी सगळं ठीक होईल.

अनिकेत हळूच म्हणाला,
आई… मी तिचं नीट लक्ष ठेवलं नाही असं वाटतंय मला. ती एवढं सगळं मनात ठेवून होती, मला कळलंच नाही.

संजय त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
असं स्वतःला दोष देऊ नकोस. संसारात दोघेही शिकत असतात. चुका होतात, पण महत्वाचं म्हणजे आपण एकमेकांना सोडत नाही.

अनिकेत डोळे पुसत म्हणाला,
मी तिला खूप प्रेम करतो बाबा… पण कधी कधी जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात ते दाखवायला कमी पडलो.

आरती म्हणाल्या,
हेच प्रेम आता तिला जास्त हवं आहे. शब्दात, स्पर्शात, वेळेत…
तू तिच्यासोबत असशील, एवढंच तिच्यासाठी पुरेसं आहे.

अनिकेत म्हणाला,
मी आता तिला एकटी पडू देणार नाही. तिचा त्रास, तिची भीती… सगळं मी ऐकून घेईन.

संजय शांतपणे म्हणाले,
बस्स… एवढंच हवं होतं आम्हाला ऐकायला.
अनघा आमची मुलगी आहे, पण तू तिचा आधार आहेस.

अनिकेत थोडा हलका झाला.
त्याने दोघांकडे पाहिलं आणि म्हणाला,
आई… बाबा… धन्यवाद. आज मला खूप ताकद मिळाली.

आरती हसत म्हणाल्या,
आई-बाबा असतातच मुलांना बळ द्यायला.

तीनही जणांच्या चेहऱ्यावर आता थोडी शांतता दिसत होती…
अनघासाठी, त्यांच्या नात्यासाठी.


---

अनिकेत अनघा सोबत बोलायला आला


अनिकेत हळूच अनघाच्या बेडजवळ येऊन बसला.
तिच्या हातावर हात ठेवला.

अनघा त्याच्याकडे पाहत म्हणाली,
अनिकेत… तू इतका घाबरलास का?

अनिकेतचा आवाज थरथरला,
घाबरलो नाही तर काय झालो असतो?
तुला असं पाहून… मला माझं सगळं चुकल्यासारखं वाटलं.

अनघा डोळे भरून म्हणाली,
मला त्रास झाला… पण मला तुझी उणीव जास्त जाणवली.
तू जवळ असायला हवा होतास.

अनिकेत खाली मान घालून म्हणाला,
मला माफ कर अनघा.
मी जबाबदाऱ्यांच्या मागे धावत राहिलो आणि तुला समजून घ्यायलाच विसरलो.

अनघा त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली,
मला मोठं काही नको होतं…
फक्त तू ऐकून घ्यावंस, एवढंच.

अनिकेत म्हणाला,
आता ऐकून घेईन… रोज.
तुझ्या मनातलं, तुझ्या डोळ्यातलं सगळं. मनातले सांगू शकला नाही.

अनघा हळूच हसली,
मग मला पुन्हा असं कमजोर वाटणार नाही.

अनिकेत तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला,
तू कमजोर नाहीस अनघा.
तू माझी ताकद आहेस.

अनघाच्या डोळ्यातून अश्रू आले, पण ते वेदनेचे नव्हते…
ते समाधानाचे होते.

अनघा म्हणाली,
बस्स… एवढंच ऐकायचं होतं मला.

अनिकेत हळूच म्हणाला,
मी आहे ना… कायम तुझ्या सोबत असेल,


---





क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all