तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 38
अनिकेत आजोबांसोबत बसला होता. त्याचा चेहरा शांत दिसत होता, पण मनात मात्र खूप काही चालू होतं.
आजोबा म्हणाले,
“अनिकेत… मोनिका आणि तृप्ती तुला घरी घेऊन जाणार म्हणत आहेत ना?”
“अनिकेत… मोनिका आणि तृप्ती तुला घरी घेऊन जाणार म्हणत आहेत ना?”
अनिकेत हळूच म्हणाला,
“हो आजोबा… बाबांनी बोलावलं आहे.”
“हो आजोबा… बाबांनी बोलावलं आहे.”
आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
आजोबा म्हणाले,
“जा बेटा. सध्या तुला माणसांची गरज आहे. एकटं राहणं योग्य नाही. तिथे गेलास तर मन थोडं हलकं होईल. अनघाला पण भेटता येईल,”
“जा बेटा. सध्या तुला माणसांची गरज आहे. एकटं राहणं योग्य नाही. तिथे गेलास तर मन थोडं हलकं होईल. अनघाला पण भेटता येईल,”
अनिकेत डोळे भरून म्हणाला,
“तुम्ही आहात म्हणूनच मी सावरतोय आजोबा.”
“तुम्ही आहात म्हणूनच मी सावरतोय आजोबा.”
आजोबा स्माईल करत म्हणाले,
“मी इथेच आहे. तू काळजी करू नकोस. अनघासाठी स्वतःला मजबूत ठेव.”
“मी इथेच आहे. तू काळजी करू नकोस. अनघासाठी स्वतःला मजबूत ठेव.”
तेवढ्यात मोनिका आणि तृप्ती आत आल्या.
मोनिका म्हणाली,
“दादा, चल. बाबा वाट पाहत आहेत.”
“दादा, चल. बाबा वाट पाहत आहेत.”
तृप्ती हळूच म्हणाली,
“सगळं ठीक होईल अनिकेत. आम्ही आहोत.”
“सगळं ठीक होईल अनिकेत. आम्ही आहोत.”
अनिकेतने आजोबांना नमस्कार केला.
अनिकेत म्हणाला, “मी लवकर येतो आजोबा.”
आजोबा म्हणाले,
“जा… आणि स्वतःला हरवू नकोस.”
“जा… आणि स्वतःला हरवू नकोस.”
अनिकेत मोनिका आणि तृप्तीसोबत घरी जायला निघाला. पावलांत अजूनही ओझं होतं, पण सोबत माणसं होती… आणि तेच त्याला थोडंसं आधार देत होतं.
---
अनिकेत मोनिका आणि तृप्तीसोबत घरी आला. दारात पाऊल टाकताच घराची शांतता त्याच्या मनात उतरली. नेहमी अनघाच्या आवाजाने भरलेलं घर आज वेगळंच वाटत होतं.
ललिता दारातच उभी होती.
“आला का माझा मुलगा…” ती हळूच म्हणाली.
“आला का माझा मुलगा…” ती हळूच म्हणाली.
अनिकेतने नजर खाली घातली. "हो आई,” एवढंच बोलू शकला.
अशोक पुढे आले.
“कसं आहेस अनिकेत?” त्यांनी काळजीने विचारलं.
“कसं आहेस अनिकेत?” त्यांनी काळजीने विचारलं.
“ठीक आहे बाबा,” अनिकेत म्हणाला, पण त्याचा आवाज त्यालाच खोटा वाटला.
तृप्ती शांतपणे सगळं पाहत होती. अनिकेतच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यातली ओल तिला स्पष्ट दिसत होती.
मोनिका म्हणाली,
“आधी आत बसा. उभ्याउभ्याच बोलू नका.”
“आधी आत बसा. उभ्याउभ्याच बोलू नका.”
सगळे आत बसले. ललिताने अनिकेतसमोर चहा ठेवला.
“काही खाल्लंस का रे?”
“काही खाल्लंस का रे?”
अनिकेतने मान हलवली.
“हॉस्पिटलमध्येच थोडंसं खाल्लं होतं.”
“हॉस्पिटलमध्येच थोडंसं खाल्लं होतं.”
ललिता त्याच्याकडे पाहत राहिली.
अनघा नसताना हा असा एकटा कसा राहील… तिच्या मनात विचार आला. आता अनघा पर्यत त्यांच्या आयुष्यात आली नाही पाहिजे
अनघा नसताना हा असा एकटा कसा राहील… तिच्या मनात विचार आला. आता अनघा पर्यत त्यांच्या आयुष्यात आली नाही पाहिजे
अशोक गंभीर आवाजात म्हणाले,
“जे झालं ते वाईट झालं. पण आता सगळ्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे.”
“जे झालं ते वाईट झालं. पण आता सगळ्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे.”
अनिकेतचा संयम तुटला.
“बाबा, सगळं माझ्यामुळेच झालं… मी तिला त्या दिवशी इथे आणायला नको होते.…” तो पुढे बोलू शकला नाही.
“बाबा, सगळं माझ्यामुळेच झालं… मी तिला त्या दिवशी इथे आणायला नको होते.…” तो पुढे बोलू शकला नाही.
मोनिकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“दादा, स्वतःला दोष देऊ नकोस. काही गोष्टी आपल्या हातात नसतात.”
“दादा, स्वतःला दोष देऊ नकोस. काही गोष्टी आपल्या हातात नसतात.”
तृप्ती पहिल्यांदाच बोलली.
“अनिकेत, तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण कधी कधी मन मोकळं करायलाही गरज असते.”
“अनिकेत, तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण कधी कधी मन मोकळं करायलाही गरज असते.”
अनिकेतने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याला थोडासा आधार वाटला.
घरात पुन्हा शांतता पसरली…
पण त्या शांततेतही नाती हळूहळू आपापली जागा घेत होती.
पण त्या शांततेतही नाती हळूहळू आपापली जागा घेत होती.
---
अनघा माहेरी पोहोचली होती. दारात पाऊल टाकताच तिच्या डोळ्यांत भरून आले. हेच घर… जिथे ती नेहमी हसत-खेळत यायची, पण आज मन मात्र जड झालेलं होतं.
आई पटकन पुढे आली. “अनघा… बाळ…” आईने तिला घट्ट मिठीत घेतलं.
अनघा काही बोलू शकली नाही. आईच्या कुशीत डोकं टेकवताच अश्रू वाहू लागले.
“आई… खूप दमले आहे गं…” अनघा हळूच म्हणाली.
“आई… खूप दमले आहे गं…” अनघा हळूच म्हणाली.
आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“रड बाळ, मन मोकळं कर. इथे तू सुरक्षित आहेस.” आई म्हणाली.
“रड बाळ, मन मोकळं कर. इथे तू सुरक्षित आहेस.” आई म्हणाली.
तेवढ्यात बाबा आत आले. अनघाच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचं काळीज तुटलं.
“काय झालं माझ्या लेकीला?” बाबांनी काळजीने विचारलं.
“काय झालं माझ्या लेकीला?” बाबांनी काळजीने विचारलं.
अनघाने बाबांकडे पाहिलं.
“बाबा… सगळं सहन करायचा प्रयत्न केला, पण शरीर आणि मन दोन्ही थकलं.” अनघा म्हणाली.
“बाबा… सगळं सहन करायचा प्रयत्न केला, पण शरीर आणि मन दोन्ही थकलं.” अनघा म्हणाली.
बाबांनी तिच्या डोक्यावरून हात ठेवला.
“आता काहीच विचार करू नकोस. इथे फक्त आराम कर. बाकी सगळं आम्ही पाहू.” बाबा ठामपणे म्हणाले.
“आता काहीच विचार करू नकोस. इथे फक्त आराम कर. बाकी सगळं आम्ही पाहू.” बाबा ठामपणे म्हणाले.
आई तिला खोलीत घेऊन गेली.
“चल, आधी नीट झोप घे. तुझ्यासाठी सूप केलं आहे.” आई म्हणाली.
“चल, आधी नीट झोप घे. तुझ्यासाठी सूप केलं आहे.” आई म्हणाली.
अनघा पलंगावर बसली. खोलीतली ओळखीची शांतता तिला थोडा आधार देत होती.
“आई… अनिकेत…” अनघा बोलता-बोलता थांबली.
“आई… अनिकेत…” अनघा बोलता-बोलता थांबली.
आईने तिच्या हातात हात घेतला.
“तो चांगला आहे. पण आत्ता तुला स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःला सावरायचं आहे.” आई म्हणाली.
“तो चांगला आहे. पण आत्ता तुला स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःला सावरायचं आहे.” आई म्हणाली.
अनघाने डोळे मिटले.
माहेर… जिथे प्रश्न नाहीत, तक्रारी नाहीत…
फक्त माया आहे, काळजी आहे आणि आधार आहे.
माहेर… जिथे प्रश्न नाहीत, तक्रारी नाहीत…
फक्त माया आहे, काळजी आहे आणि आधार आहे.
.....
फोन हातात घेऊन अनिकेत काही क्षण थांबतो. डोळ्यांत चिंता, मनात हजार विचार. शेवटी तो कॉल लावतो.
फोन वाजतो…
हॅलो… अनघा म्हणाली.
अनघा… मी अनिकेत बोलतोय. कशी आहेस? अनिकेत म्हणाला.
(थोडा थांबा) ठीक आहे… बाबा आई आहे, म्हणून बरं वाटतंय.
हॉस्पिटलमधून आल्यावर तू थकलेली होतीस. नीट आराम करतेयस ना? औषधं वेळेवर घेतलीस का? अनिकत काळजीने म्हणाला..
हो… आई सगळं लक्ष ठेवते आहे. तू कसा आहेस? एकटा वाटत नसेल ना? अनघा म्हणाली..
एकटा तर वाटतंय… पण तुझा आवाज ऐकला की थोडं हलकं होतं. अनिकेत म्हणाला.
(हळू हसत) तू काळजी करू नकोस. मी लवकरच ठीक होईन. अनघा म्हणाली..
मला माहीत आहे. काही लागलं, काहीही… लगेच फोन कर. मी लगेच येईन. अनिकेत म्हणाला.
हो. आणि तू पण स्वतःची काळजी घे. आजोबांचं ऐक. अनघा म्हणाली.
ऐकतोय. तू स्ट्रॉंग आहेस, अनघा… आणि मी तुझ्यासोबत आहे. अनिकेत म्हणाला..
मला माहीत आहे. धन्यवाद, अनिकेत. अनघा म्हणाली.
दोघेही काही क्षण शांत राहतात.
फोन ठेवताना दोघांच्या मनात एकच भावना
हे अंतर तात्पुरतं आहे.
फोन ठेवताना दोघांच्या मनात एकच भावना
हे अंतर तात्पुरतं आहे.
.अनघा… मी घरी आलो आहे. अनिकेत म्हणाला.
(थोडी शांत) हो का… कोणासोबत? अनघा म्हणाली.
मोनिका आणि तृप्ती मला घ्यायला आल्या होत्या. बाबांनी घरी बोलावलं होतं. अनिकेत म्हणाला.
बरं झालं… तू एकटा नसशील. अनघा म्हणाली.
हो… पण तरीही मन तुझ्याशिवाय रिकामंच आहे. अनिकेत म्हणाला.
(हळू आवाजात) माझं पण तसंच आहे अनिकेत… अनघा म्हणाली.
तू काळजी घे. आराम कर. मी आहे… नेहमी. अनिकेत म्हणाली.
तू पण स्वतःची काळजी घे. अनघा म्हणाली..
घेईन. लवकरच भेटू… अनिकेत म्हणाला..
हो… अनघा. म्हणाली..
कॉल कट होतो… दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं, पण मनात एक आशा राहते.
अनघा आराम करते.
अनिकेत रूममध्ये एकटाच बसलेला होता.
त्या खोलीत बसावेसे त्याला अजिबात वाटत नव्हते… पण तरीही तिथेच राहावे लागत होते.
आजूबाजूला सगळं असूनही तो आतून पूर्ण रिकामा झाला होता.
त्याच्या डोळ्यांसमोर सतत अनघाचाच चेहरा येत होता.
या घरात तिला किती त्रास झाला… हा विचार त्याच्या मनात घोळत होता.
“माझं बाळ गेलं…” हा विचार मनात येताच त्याचा श्वासच अडखळला.
या घरात तिला किती त्रास झाला… हा विचार त्याच्या मनात घोळत होता.
“माझं बाळ गेलं…” हा विचार मनात येताच त्याचा श्वासच अडखळला.
आईने अनघाबद्दल कधीच काही विचारलं नाही,
तिला काम असलं की सरळ अनघालाच बोलवायचं…
ती कशी आहे, तिला काय वाटतं, तिला दुखतंय का,
यापैकी काहीच कुणाला पडलेलं नव्हतं.
तिला काम असलं की सरळ अनघालाच बोलवायचं…
ती कशी आहे, तिला काय वाटतं, तिला दुखतंय का,
यापैकी काहीच कुणाला पडलेलं नव्हतं.
आता माझी अनघा त्रासात आहे,
आणि इथे कुणालाच तिचं काहीच पडलेलं नाही…
हा विचार अनिकेतच्या मनाला अजूनच बोचत होता.
आणि इथे कुणालाच तिचं काहीच पडलेलं नाही…
हा विचार अनिकेतच्या मनाला अजूनच बोचत होता.
तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता,
पण मन मात्र सारखं अनघाकडेच धावत होतं.
डोळे पाणावले, छातीत कालवाकालव झाली…
आणि तो शांतपणे तिथेच बसून राहिला
फक्त विचार करत… अनघाचा… आणि आपल्या हरवलेल्या सुखाचा.
पण मन मात्र सारखं अनघाकडेच धावत होतं.
डोळे पाणावले, छातीत कालवाकालव झाली…
आणि तो शांतपणे तिथेच बसून राहिला
फक्त विचार करत… अनघाचा… आणि आपल्या हरवलेल्या सुखाचा.
आता फक्त अनघाचा विचार करायचा. उद्या अनघाला भेटायला जाईल. अनिकेत मनात. विचार करतो.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा