Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग -39

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 39


अनिकेत सकाळी खूप लवकर उठला.  खरं तर तो नीट झोपलाच नव्हता.
डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती, मन अस्वस्थ होतं.
उठताच त्याने अनघाला मेसेज केला होता  “मी तुला भेटायला येतो.”

तो बाथरूममध्ये गेला, आवरलं, फ्रेश झाला आणि रूमच्या बाहेर आला.

बाहेर ललिता उभ्या होत्या.

अनिकेत सकाळी लवकर उठलास… तयार होऊन कुठे जात आहेस?  ललिता म्हणाल्या.

अनघाला भेटायला जात आहे,  अनिकेत शांत पण ठामपणे म्हणाला.

ती तुला सोडून गेली ना,  मग का तू तिला भेटायला जात आहेस? तिला यायचे असेल तर  येईल ना, ललिता रागात म्हणाल्या.

आई, तुला पूर्ण माहिती नाही ना,  मग बोलू नकोस.
ती मला सोडून गेली नाही.  ती आराम करायला तिच्या घरी गेली आहे.  आणि तू तर तिला इथे आराम करूच दिला नसतास,
अनिकेत रागात म्हणाला.

इतकं बोलून तो थेट बाहेर निघून गेला.

ललिता तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या मनात विचारांची गर्दी झाली.

अनघाला काय झालं असेल?  ती आराम करायला गेलम्हणजे… नक्की काहीतरी गंभीर असणार,  ललिता मनात विचार करत राहिल्या.

......

आई, अनिकेत येणार आहे. त्याला नाश्ता करशील का?
तो लवकरच निघेल, अनघा म्हणाली.

हो, मी आपल्यासाठी बनवत आहे. त्याला पण बनवते,  आरती हसत म्हणाली.

आई, मी बाहेरून घेऊन येतो… तू ताईसाठी नाश्ता बनव,  शुभम म्हणाला.

शुभम, नको, मी बनवते.  हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा बाहेरचं खाल्ले आहे,  आरती ठामपणे म्हणाली.

ठीक आहे, शुभम म्हणाला.

सकाळी सकाळी काय चर्चा चालू आहे,
संजय म्हणाला.

आरती संजयला सगळं सविस्तर सांगत होती.

काहीतरी चांगला नाश्ता कर, संजय म्हणाला.

आरती हसत किचनमध्ये निघून गेली.

अनघा सगळ्यांकडे बघत होती.
“आधी माझ्या लग्नाला सगळे नाही म्हणत होते…
आता अनिकेत सगळ्यांना आवडायला लागला आहे,” अनघा मनात विचार करत होती.

......

अनिकेत घराच्या बाहेर निघाला.
आईला काही माहिती नसेल का? अनघा निघून गेली आहे, हे कोणी सांगितले असेल? आईला याचा आनंद झाला असेल का? असे अनेक विचार करत अनिकेत अनघाच्या घरी जात होता.

थोड्याच वेळात अनिकेत अनघाच्या घरी पोहोचला. शुभम बाहेरच उभा होता.

“जीजू, या,” शुभम म्हणाला.

अनिकेत घरात गेला. संजय बसले होते.

अनिकेत संजयसोबत बोलला. दोघे थोडावेळ बसले. पण अनिकेतची नजर सतत अनघाला शोधत होती. हे संजयच्या लक्षात आले.

“अनिकेत, अनघा रूममध्ये आहे,” संजय म्हणाले.

हे ऐकताच अनिकेत लगेच उठला आणि अनघाला भेटायला तिच्या रूमकडे गेला.

अनिकेत हळूच अनघाच्या रूममध्ये गेला.
अनघा बेडवर बसलेली होती. तिला पाहताच अनिकेत थांबला.

अनघा…
तो आवाज थोडासा थरथरत होता.

अनघाने मान वर केली.
अनिकेतला पाहताच तिचे डोळे भरून आले.

तू… इतक्या लवकर आलास?  अनघा हळू आवाजात म्हणाली.

तुला भेटल्याशिवाय राहवलं नाही,
अनिकेत म्हणाला.
तुझा मेसेज वाचल्यानंतर… मला चैनच पडलं नाही.

अनघा काहीच बोलली नाही.  ती खाली पाहत बसली होती.

खूप दुखतंय का अजून?  अनिकेत काळजीने विचारतो.

थोडं… पण वेदना त्यापेक्षा वेगळ्याच आहेत,
अनघा म्हणाली.  आपण जे गमावलं… ते…

अनिकेत तिच्या जवळ बसला.

मला माफ कर अनघा…  मी तुला त्या घरात एकटी सोडली,  तुझ्यावर इतकं काम पडलं,  आणि मला काहीच कळालं नाही,
अनिकेतच्या डोळ्यात अश्रू आले.

अनघा पटकन म्हणाली,  नको अनिकेत… यात तुझा दोष नाही.
तू माझ्यासोबत होतास.  मला एवढंच पुरेसं आहे.

पण मी तुला कामापासून वाचवू शकलो नाही…   आणी आपल्या बाळाला…  अनिकेतचा आवाज अडखळला.

अनघाने त्याचा हात धरला.

आपण दोघं एकत्र आहोत ना,  हेच महत्त्वाचं आहे.
बाळ गेलं… पण आपण नाही हरवलो,  अनघा शांतपणे म्हणाली.

अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला.

मी तुला परत त्या घरात  तुझी इच्छा नसताना पाठवणार नाही,
आता फक्त तुझा आराम,  तुझं आरोग्य…
अनिकेत ठामपणे म्हणाला.

अनघा हलकेच हसली.

आज तू इथे आलास,  माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठं आधार आहे, अनघा म्हणाली.

अनिकेतने तिचा हात घट्ट धरला.
दोघेही काही क्षण शांत बसले  दुःखात तुटलेले,
पण एकमेकांच्या आधारावर उभे.

आरती नाश्ता घेऊन आल्या.
त्यांनी अनघा आणि अनिकेतला हाक मारली.

दोघेही बाहेर आले.
सगळे एकत्र बसले आणि मिळून नाश्ता केला.

आई-बाबा बरे झाले. तुम्ही राग धरून ठेवला नाहीत. आमच्याकडून चूक झाली होती. तेव्हा काही पर्याय नव्हता.
आता अनघाला मी घरी घेऊन जाऊ शकलो नाही, अनिकेत म्हणाला.

ललिताने काहीच काम केले नसते. माझ्या अनघाला लवकर कामाला लागावे लागले असते. आता मी तिची पूर्ण काळजी घेईन, आरती मनात म्हणाल्या.

अनघा आमची मुलगी आहे. तिचे चांगले-वाईट आम्हीच बघणार ना, संजय म्हणाले.

अनिकेत काहीच बोलला नाही. बाबा बरोबर बोलत होते, असे अनिकेत मनात विचार करत होता.

संजयने ते पाहिले. अनिकेतने मान खाली घातली होती. त्याला वाईट वाटले होते. म्हणून संजयने विषय बदलला.

अनिकेत, आता जेवण करून जा, संजय म्हणाले.

आता नको. मी ऑफिसला जातो आहे. आता सुट्ट्या संपल्या आहेत, अनिकेत म्हणाला.

मी डब्बा बनवू का? लगेच होऊन जाईल, आरती म्हणाल्या
आणि किचनमध्ये निघून गेल्या.

त्या अनिकेतसाठी डब्बा बनवू लागल्या.


आरतीने अनिकेतसाठी डब्बा बनवला.  तो डब्बा त्यांनी अनिकेतला दिला.

अनिकेत अनघाजवळ गेला.  तिच्याशी थोडावेळ शांतपणे बोलला, तिला काळजी घ्यायला सांगितले.

मग अनघाकडे एक नजर टाकून,  अनिकेत ऑफिसकडे निघून गेला.

....

अनिकेत अजून परत आलेला नव्हता.  तो ऑफिसला गेला असेल का? रात्री परत इथे येईल का?

जाताना मी त्याला चहा-नाश्त्याबद्दलसुद्धा विचारलं नाही…
अनघाला नेमकं काय झालं आहे, हे कोणाला विचारू?
ललिता मनातल्या मनात विचार करत होत्या.

त्या मोनिकाजवळ गेल्या.

“मोनिका… मोनिका…” ललितांनी हाक मारली.

“आई, काही काम होतं का?” मोनिका रूममध्ये येत म्हणाली.

“अनघाला काय झालं आहे? ती माहेरी का गेली आहे?” ललितांनी विचारलं.

“तिचं बाळ गेलं, आई. तिला आराम करायला सांगितलं आहे.
हॉस्पिटलमधून तिची आई तिला घरी घेऊन गेली. थोडा आराम करेल, मग परत येईल,” मोनिकाने शांतपणे सांगितलं.

“तिला परत बाळ होईल ना?” ललितांनी काळजीने विचारलं.

“आई, आता सगळं झालं आहे.
आता किमान सहा-सात महिने तरी थांबावं लागेल.
होईल बाळ… तू असे प्रश्न का विचारतेस?”
मोनिका वैतागून म्हणाली.

“नाहीतर अनिकेतचं दुसरं लग्न लावून देऊ,” ललिता सहजपणे म्हणाल्या.

“आई, तू काय बोलतेयस? तुला तरी समजतंय का? दादा दुसरं लग्न करेल का? त्याचं अनघावर खूप प्रेम आहे,”
मोनिकाने ठामपणे उत्तर दिलं.

“कसलं प्रेम… नंतर पण होईल.
एकदा लग्न झालं की सगळं आपोआप जुळतं,”
ललिता म्हणाल्या.

“आई, तू काय विचार करतेयस?
नाश्ता झाला का? मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे,”
मोनिका म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली.

अशोक मोनिका आणी ललिताचे सगळं बोलणे ऐकत होते.
ललिता अनघासोबत अशी का वागते, हेच त्यांना कळत नव्हतं.
अनघा इथे घरी होती तेव्हा तिनं ललिताची किती काळजी घेतली होती.
तरीही आज ललिता अनिकेतचं दुसरं लग्न लावण्याचा विचार करत होती.

हे जर अनिकेतला कळलं, तर तो इथे येणंही बंद करेल…
अशोक मनातच म्हणाले.

घरात शांतता होती, पण त्या शांततेआड
अनेक नात्यांची घुसमट अशोकांना स्पष्टपणे जाणवत होती.




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all