तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 41
अशोक आणि तृप्ती घरी आले. ललिता बाहेरच बसल्या होत्या.
अशोक आणि तृप्तीला पाहताच ललितांनी विचारले,
“कुठे गेले होते तुम्ही दोघे?”
“कुठे गेले होते तुम्ही दोघे?”
“अनघाला बघायला गेलो होतो,” अशोक शांतपणे म्हणाले.
“काय गरज होती तिच्याकडे जायची?” ललिता चिडून म्हणाल्या.
“आता आपण अनिकेतचं दुसरं लग्न करू.
ती अनघा काही त्याला बाप होण्याचं सुख देणार नाही.”
“आता आपण अनिकेतचं दुसरं लग्न करू.
ती अनघा काही त्याला बाप होण्याचं सुख देणार नाही.”
अशोकांचा चेहरा कठोर झाला.
“ललिता, तू काय बोलतेयस?” अशोक ठाम आवाजात म्हणाले.
“देवाने जीभ दिली आहे म्हणून काहीही बोलायचं का?
तूच तर तिच्याकडून काम करून घेतलंस ना!
थोडंसुद्धा वाईट वाटलं का तुला?
तिने तुझी सेवा केली… दिवस-रात्र.”
“देवाने जीभ दिली आहे म्हणून काहीही बोलायचं का?
तूच तर तिच्याकडून काम करून घेतलंस ना!
थोडंसुद्धा वाईट वाटलं का तुला?
तिने तुझी सेवा केली… दिवस-रात्र.”
“मग काय झालं सेवा केली तर?” ललिता निर्विकारपणे म्हणाल्या.
“सून आहे ती.”
“सून आहे ती.”
“सून आहे म्हणून असं वागायचं असतं का?” अशोक संतापून म्हणाले.
“सुनांना मुलीसारखं ठेवलं पाहिजे.
तेव्हा ती पण तुला आईसारखं मानेल.
पण तू तर सासू होण्याचाच अर्थ विसरलीस.”
“सुनांना मुलीसारखं ठेवलं पाहिजे.
तेव्हा ती पण तुला आईसारखं मानेल.
पण तू तर सासू होण्याचाच अर्थ विसरलीस.”
ललिताकडे पाहत अशोक पुढे म्हणाले,
“आज तुझ्या बोलण्यामुळे मला लाज वाटते.”
“आज तुझ्या बोलण्यामुळे मला लाज वाटते.”
ललिताला काहीच उत्तर देता आलं नव्हते.
त्या गप्प बसल्या…
पहिल्यांदाच शब्द हरवले होते.
त्या गप्प बसल्या…
पहिल्यांदाच शब्द हरवले होते.
---
अशोकांनी बोललेले शब्द ललिताच्या कानात घुमत राहिले.
त्या तिथेच बसून राहिल्या… बाहेरून शांत, पण आतून अस्वस्थ.
त्या तिथेच बसून राहिल्या… बाहेरून शांत, पण आतून अस्वस्थ.
“मी काय इतकं चुकीचं बोलले का?”
ललिताच्या मनात विचार आला.
ललिताच्या मनात विचार आला.
“सून आहे ती… तर तिने काम करायलाच हवं ना?”
पण लगेचच अनघाचा थकलेला चेहरा आठवला.
दिवसभर धावपळ, स्वयंपाक, घरकाम…
तरीही कुठलीच तक्रार नाही.
पण लगेचच अनघाचा थकलेला चेहरा आठवला.
दिवसभर धावपळ, स्वयंपाक, घरकाम…
तरीही कुठलीच तक्रार नाही.
“ती कधीच काही बोलली नाही…
मीच तिला आराम करू दिला नाही.”
मीच तिला आराम करू दिला नाही.”
अनघा माहेरी गेली, हे आठवताच ललिताच्या छातीत कळ उठली.
“तिचं बाळ गेलं…
आणि मी काय विचार करत होते?
दुसरं लग्न…?”
आणि मी काय विचार करत होते?
दुसरं लग्न…?”
मन कुठेतरी घाबरून गेलं.
“अनिकेतला कळलं तर?
तो परत या घरात येणंच बंद करेल…
माझ्यामुळे माझा मुलगा दूर गेला तर?”
तो परत या घरात येणंच बंद करेल…
माझ्यामुळे माझा मुलगा दूर गेला तर?”
पहिल्यांदाच ललिताला स्वतःच्या बोलण्याची भीती वाटली.
“अशोक बरोबर बोलतो…
सून नाही, मुलगी म्हणून वागायला हवं होतं.”
सून नाही, मुलगी म्हणून वागायला हवं होतं.”
डोळे पाणावले…
पण अहंकार अजूनही आडवा उभा होता.
पण अहंकार अजूनही आडवा उभा होता.
“माफी मागू का?
की वेळ जाऊ देऊ?”
की वेळ जाऊ देऊ?”
ललिता स्वतःशीच झगडत राहिल्या…
कारण अपराधाची जाणीव झाली होती,
पण स्वीकारायचं धैर्य अजून तयार नव्हतं.
कारण अपराधाची जाणीव झाली होती,
पण स्वीकारायचं धैर्य अजून तयार नव्हतं.
---
मी का माफी मागू?
ललिताच्या मनात विचार चालू होते.
ललिताच्या मनात विचार चालू होते.
मला तृप्तीच सून म्हणून हवी आहे.
तीच या घराला जास्त शोभते, असं ललिताला वाटत होतं.
तीच या घराला जास्त शोभते, असं ललिताला वाटत होतं.
अनघालाच समजायला हवं होतं ना,
की आपण आई होणार आहोत.
त्या अवस्थेत तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी होती.
की आपण आई होणार आहोत.
त्या अवस्थेत तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी होती.
सगळा दोष माझ्यावरच का येतो?
मी तिला काही वाईट केलं का?
सून आहे म्हणून तिने घर सांभाळणं, काम करणं हे अपेक्षितच आहे.
मी तिला काही वाईट केलं का?
सून आहे म्हणून तिने घर सांभाळणं, काम करणं हे अपेक्षितच आहे.
ललिताच्या मनात ठामपणा होता,
पण त्याच ठामपणाच्या मागे
कुठेतरी असुरक्षितता लपलेली होती.
पण त्याच ठामपणाच्या मागे
कुठेतरी असुरक्षितता लपलेली होती.
अनिकेतने जर अनघालाच जास्त महत्त्व दिलं,
तर माझं काय?
या घरात माझी जागा तरी राहील का?
तर माझं काय?
या घरात माझी जागा तरी राहील का?
या विचारांनी ललिता अधिकच कठोर होत गेल्या…
कारण स्वतःची चूक मान्य करण्यापेक्षा
त्या स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करत होत्या.
कारण स्वतःची चूक मान्य करण्यापेक्षा
त्या स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करत होत्या.
---
ललिता खोलीत येऊन बसल्या होत्या. चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती.
अशोक पेपर ठेवून त्यांच्या बाजूला बसले.
अशोक म्हणाले,
“ललिता, तू आज जे बोललीस ना… ते खूप चुकीचं होतं.”
“ललिता, तू आज जे बोललीस ना… ते खूप चुकीचं होतं.”
ललिता रागात म्हणाल्या,
“काय चुकीचं? मी सत्य बोलले. अनघा कधी आई होऊ शकणार नाही. मग अनिकेतचं आयुष्य वाया घालवायचं का?”
“काय चुकीचं? मी सत्य बोलले. अनघा कधी आई होऊ शकणार नाही. मग अनिकेतचं आयुष्य वाया घालवायचं का?”
अशोक आवाज चढवून म्हणाले,
“थांब! असं बोलायचं नाही.
आईपण हे फक्त बाळावर ठरत नाही.
माणूस म्हणून ती खूप चांगली आहे.”
“थांब! असं बोलायचं नाही.
आईपण हे फक्त बाळावर ठरत नाही.
माणूस म्हणून ती खूप चांगली आहे.”
ललिता उपहासाने म्हणाल्या,
“चांगली असली तरी घर सांभाळता आलं नाही ना.
माझी सेवा करायला हवी होती.
मी सासू आहे, माझा हक्क आहे.”
“चांगली असली तरी घर सांभाळता आलं नाही ना.
माझी सेवा करायला हवी होती.
मी सासू आहे, माझा हक्क आहे.”
अशोक ठामपणे म्हणाले,
“हक्क आहे म्हणजे छळ करायचा अधिकार मिळतो का?
ती गरोदर होती, ललिता.
तिला आरामाची गरज होती, कामाची नाही.”
“हक्क आहे म्हणजे छळ करायचा अधिकार मिळतो का?
ती गरोदर होती, ललिता.
तिला आरामाची गरज होती, कामाची नाही.”
ललिता चिडून म्हणाल्या,
“मग काय करायचं होतं? मी तिची सेवा करायची होती का?
सून आहे ती, राणी नाही!”
“मग काय करायचं होतं? मी तिची सेवा करायची होती का?
सून आहे ती, राणी नाही!”
अशोक डोळ्यात डोळे घालून म्हणाले,
“सून आहे म्हणून तिला माणूस नसल्यासारखं वागवायचं का?
तिला मुलीसारखं ठेवलंस असतंस,
तर आज परिस्थिती वेगळी असती.”
“सून आहे म्हणून तिला माणूस नसल्यासारखं वागवायचं का?
तिला मुलीसारखं ठेवलंस असतंस,
तर आज परिस्थिती वेगळी असती.”
ललिता क्षणभर गप्प राहिल्या…
पण लगेच म्हणाल्या,
पण लगेच म्हणाल्या,
“मला तृप्ती सून म्हणून हवी आहे.
ती समजूतदार आहे, शांत आहे.”
ती समजूतदार आहे, शांत आहे.”
अशोक दुःखाने म्हणाले,
“तुला सून नकोय, तुला तुझं वर्चस्व टिकवायचं आहे.
अनिकेत सुखी आहे की नाही,
यापेक्षा तुला घरात तुझं चालावं याचीच चिंता आहे.”
“तुला सून नकोय, तुला तुझं वर्चस्व टिकवायचं आहे.
अनिकेत सुखी आहे की नाही,
यापेक्षा तुला घरात तुझं चालावं याचीच चिंता आहे.”
ललिता आवाज कमी करत म्हणाल्या,
“माझं काय?
या घरात माझी किंमत उरली आहे का?”
“माझं काय?
या घरात माझी किंमत उरली आहे का?”
अशोक शांतपणे म्हणाले,
“किंमत प्रेमाने वाढते, भीतीने नाही.
अनघाला दुखावून,
अनिकेतला दूर ढकलून तू स्वतःच एकटी पडतेस आहेस.”
“किंमत प्रेमाने वाढते, भीतीने नाही.
अनघाला दुखावून,
अनिकेतला दूर ढकलून तू स्वतःच एकटी पडतेस आहेस.”
ललिताच्या डोळ्यांत पाणी तरळलं…
पण अहंकार आडवा आला.
पण अहंकार आडवा आला.
त्या काहीच न बोलता
दुसऱ्या बाजूला तोंड करून बसल्या.
दुसऱ्या बाजूला तोंड करून बसल्या.
अशोक दीर्घ श्वास घेत म्हणाले,
“अजून वेळ आहे, ललिता. नातं तोडायला नाही,
जोडायला शिक.”
“अजून वेळ आहे, ललिता. नातं तोडायला नाही,
जोडायला शिक.”
खोलीत शांतता पसरली…
पण त्या शांततेत
एक मोठा संघर्ष दडलेला होता.
पण त्या शांततेत
एक मोठा संघर्ष दडलेला होता.
---
मोनिका घरी आली. तिचा इंटरव्यू होता, पण तो चांगला गेला नव्हता.
तिला हवं तसं त्या कंपनीत काहीच मिळालं नव्हतं.
थकलेल्या मनाने ती घरी आली.
तृप्तीने तिला पाणी आणून दिलं.
तृप्ती म्हणाली,
“मोनिका, आज पण मनासारखं मिळालं नाही का?”
“मोनिका, आज पण मनासारखं मिळालं नाही का?”
मोनिका म्हणाली,
“हो ना… कधी मला चांगला जॉब लागेल कुणास ठाऊक.”
“हो ना… कधी मला चांगला जॉब लागेल कुणास ठाऊक.”
तृप्ती हळूच म्हणाली,
“तुला नक्कीच चांगला जॉब लागेल.
आज मी आणि मामा अनघाला बघायला गेलो होतो.
तिला भेटल्यावर तिचे डोळे भरून आले होते.
मामांनी तिला समजावलं, तरीसुद्धा आठवण तर येतच असेल ना…
अजून त्रासही होत असेल तिला.”
“तुला नक्कीच चांगला जॉब लागेल.
आज मी आणि मामा अनघाला बघायला गेलो होतो.
तिला भेटल्यावर तिचे डोळे भरून आले होते.
मामांनी तिला समजावलं, तरीसुद्धा आठवण तर येतच असेल ना…
अजून त्रासही होत असेल तिला.”
मोनिका थोडी भावूक होत म्हणाली,
“खरंच… मी पण तिला भेटायला जाईन.
तू पण चल, गप्पा मारू. तिला छान वाटेल.”
“खरंच… मी पण तिला भेटायला जाईन.
तू पण चल, गप्पा मारू. तिला छान वाटेल.”
तृप्ती म्हणाली, “हो, नक्की जाऊ.
तुला चहा करू का?”
तुला चहा करू का?”
मोनिका म्हणाली
“मी आधी फ्रेश होते. मग मी पण किचनमध्ये येते.”
“मी आधी फ्रेश होते. मग मी पण किचनमध्ये येते.”
असं म्हणून मोनिका बाथरूममध्ये निघून गेली.
तृप्ती किचनमध्ये गेली.
---
अनिकेत घरी येतो.
तो कोणाशीही बोलत नाही. थेट आपल्या रूममध्ये जातो.
तो कोणाशीही बोलत नाही. थेट आपल्या रूममध्ये जातो.
तृप्तीला अनिकेत येताना दिसतो.
ती लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते.
ती लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते.
अनिकेत शांतपणे पाणी घेतो.
काहीही न बोलता.
काहीही न बोलता.
तृप्ती त्याच्यासाठी चहा पण ठेवते. तो चहा हातात घेतो,
पण मन मात्र कुठेच रमत नाही.
पण मन मात्र कुठेच रमत नाही.
---
तृप्ती अनिकेतला चहा द्यायला रूममध्ये जाते.
ती शांतपणे चहाचा कप त्याच्यासमोर ठेवते.
अनिकेत चहाकडे बघतो,
डोळ्यांत थकवा आणि मनात वेदना असतात.
तो काहीच बोलत नाही.
डोळ्यांत थकवा आणि मनात वेदना असतात.
तो काहीच बोलत नाही.
हे सगळं ललिता दूरून पाहत असतात.
तृप्तीचा तो आपुलकीचा हावभाव, अनिकेतसाठीची काळजी
त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
तृप्तीचा तो आपुलकीचा हावभाव, अनिकेतसाठीची काळजी
त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
ललिताच्या मनात विचार येतो
“तृप्तीलाही अनिकेत आवडतो का?”
“तृप्तीलाही अनिकेत आवडतो का?”
तो एक विचार त्यांच्या मनात घर करून बसतो.
आणि त्या मनातच समाधानाने हसतात.
आणि त्या मनातच समाधानाने हसतात.
---
तृप्ती चहाचा कप ठेवून बाहेर गेली.
ललिता तिथेच उभ्या होत्या.
त्यांच्या ओठांवर हलकीशी वाकडी हसू उमटली.
मनात विचार सुरू झाले
मनात विचार सुरू झाले
“मला आधीच कळत होतं…
ही तृप्ती साधी आहे .”
ही तृप्ती साधी आहे .”
अनघा आता माहेरी आहे.
कमकुवत आहे मनाने तुटलेली आहे.
कमकुवत आहे मनाने तुटलेली आहे.
“आता वेळ आहे,”
ललिता मनात म्हणाल्या.
ललिता मनात म्हणाल्या.
“अनिकेत एकटा आहे. दुःखात माणूस पटकन आधार शोधतो.
आणि आधार देणारी समोरच आहे…”
आणि आधार देणारी समोरच आहे…”
तृप्ती.
घरातलीच.
सर्व कामात पुढे असणारी.
नम्र, शांत, समजूतदार आहे.
घरातलीच.
सर्व कामात पुढे असणारी.
नम्र, शांत, समजूतदार आहे.
“आज चहा, उद्या काळजी, आणि हळूहळू नातं…”
ललितांच्या डोळ्यांत चमक आली.
“अनघा आई होऊ शकली नाही.
ही तृप्ती मात्र होईल.
मला नातवाचं सुख हवंय.”
ही तृप्ती मात्र होईल.
मला नातवाचं सुख हवंय.”
मनातच त्यांनी निर्णय घेतला.
“अनिकेतला मी हळूहळू अनघापासून दूर नेईन.
तिला कमकुवत दाखवेन. आणि तृप्तीला योग्य ठिकाणी उभं करेन.”
तिला कमकुवत दाखवेन. आणि तृप्तीला योग्य ठिकाणी उभं करेन.”
ललिता स्वतःशीच पुटपुटल्या
“आई म्हणून मी जे करतेय, ते चुकीचं नाही…
माझ्या मुलाच्या भविष्यासाठी आहे.”
“आई म्हणून मी जे करतेय, ते चुकीचं नाही…
माझ्या मुलाच्या भविष्यासाठी आहे.”
पण त्या क्षणी
त्यांच्या मनातल्या कटकारस्थानात मध्ये
अनघाच्या वेदनांना कुठेच जागा नव्हती…
त्यांच्या मनातल्या कटकारस्थानात मध्ये
अनघाच्या वेदनांना कुठेच जागा नव्हती…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा